Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

निवडणुका लांबवून सत्तेची सूत्रे स्वतः कडे ठेवण्यासाठी भाजपाचा आटापिटा

Date:

भाजपचा दुटप्पीपणा:पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे काय होणार ?

निवडणुका लांबवून सत्तेची सूत्रे स्वतः कडे ठेवण्यासाठी भाजपाचा आटापिटा सुरु असून दिल्लीत ३ महापालिकांचे विलीनीकरण करायचे असा मुद्दा उपस्थित करून तिथे निवडणुका लांबवणाऱ्या भाजपने आता पुण्यात महापालिकेचे विभाजन केले पाहिजे असे संगयाला सुरुवात केली आहे . जानेवारीत व्हायला हव्या त्या निवडणुका या ना त्या कारणाने लांबवील्या जात आहेत आणि प्रशासकीय कारभार मार्फत सत्तेची सूत्रे मात्र स्वतः कडे ठेवली जात आहेत , हे लोकशाही विरोधी धोरण जनतेने लक्षात घ्यावे असे आवाहान पुण्यातील आम आदमी पार्टीने आज केले आहे .

या संदर्भात आम आदमी पार्टीचे विजय कुंभार म्हणाले कि,’ पुणे शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येचा विचार करता पुण्याचे विभाजन करून दोन महापालिकांची आवश्यकता आहे, अशी भूमिका राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली. दिल्लीमध्ये मात्र तीन महापालिकांचे विलीनीकरण करून एकच महापालिका करण्यात आली आहे. त्यासाठीही भारतीय जनता पक्षच आग्रही होता. प्रशासकीय सोयीसाठी सत्तेचे विकेंद्रीकरण आवश्यक असते मात्र त्यासाठी एकच काहीतरी भूमिका असली पाहिजे. इथं मात्र पक्षाच्या सोयीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका मांडली जात आहे. यात जनतेचे हित प्रशासनाची सोयकुठेही दिसत नाही, तर काहीही करून सत्ता मिळवण्यासाठी सर्व चांगल्या गोष्टींची मोडतोड करायची हे धोरण दिसते. त्यातूनच वार्डांची संख्या बदलणं, वॉर्ड रचना बदलणे अशा गोष्टी केल्या जातात. दिल्लीत महापालिकांचे विलीनीकरण करण्याच्या नावाखाली निवडणूक प्रलंबित ठेवण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातही घडताना दिसत आहे. वेगवेगळ्या कारणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलून घटनेमध्ये करण्यात आलेल्या ७३ व्या आणि ७४ व्या दुरुस्तीची वाट लावली जात आहे आहे. हा सगळा प्रकार सत्तेची सूत्र स्वतःकडे ठेवण्यासाठी चाललेला आहे. परंतु जनता हे फार काळ सहन करणार नाही. असे आप राज्य संघटकविजय कुंभार यांनी म्हटले आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...