पुणे बेंगलोर ग्रीन फिल्ड हाय वे चे कामे सुरू
पुणे- बेंगलोर साडेतीन तासात… नितीन गडकरींच्या पुण्याबाबत च्या घोषणाडबल डेकर बस तसेच कमी भांडवलावर राबवता येणाऱ्या इलेक्ट्रिक केबल बस, आदी सुरु करण्याच्या पुण्यात संधीपालखी मार्गाच्या काही टप्प्यांचे डिसेंबर पर्यंत उद्घाटन शक्यपुण्साा्चा रिंग रोड साठी १३०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून काही मार्गांवर काम सुरू असून, निधीसाठी राज्य शासनाबरोबर चर्चा करण्यात येईल, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. चांदणी चौक येथे भेट देऊन पाहणी करण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना गडकरी यांनी ही माहिती दिली.ते म्हणाले, ‘चांदणी चौकातील उड्डाणपुलासाठी तातडीने भूसंपादन आवश्यक आहे. ते झाले तर वाहतूक कोंडी दूर होईल. चांदणी चौकातील जुना उड्डाणपूल पाडण्याची कार्यवाही येत्या काही दिवसांत होईल. त्या अनुषंगाने विविध सेवा रस्ते सुरू करण्याचे नियोजित आहे’पुण्यात येणारी वाहतूक जास्त असल्याने पुणे- अहमदनगर- औरंगाबाद महामार्गाचे काम सुरू आहे. पुणे सातारा रस्त्याचे शास्त्रीय पद्धतीने सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यात येईल. पुणे बेंगलोर ग्रीन फिल्ड हाय वे ची कामे सुरू झाली आहेत, असेही गडकरी म्हणाले.मुंबईमध्ये विजेवर चालणारी डबल डेकर बस सुरू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर पुण्यातही ही सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव आल्यास केंद्राकडून निधी दिला जाईल. जोड बस आणि ट्रॉली बसचा ही महापालिकांनी विचार करावा, अशी माहिती त्यांनी दिली.‘नवले ब्रीजवरील अपघात रोखण्यासाठी दीर्घ कायमस्वरूपी उपाययोजनांबरोबरच तात्पुरत्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. वारजे बावधन वेदभवन सेवा रस्त्यांची कामे सुरू आहेत, असे गडकरी यांनी सांगितले. चाकण एमआयडीसी परिसरात १५० हेक्टर जागेवर लॉजेस्टिक पार्क प्रस्तावित आहे. अवजड वाहने पुणे शहरात येणार नाहीत, असे गडकरी म्हणाले.
गडकरी म्हणाले, “इलेक्ट्रिक डबलडेकर बस पुण्यात सुरु करण्याचा विचार आहे मात्र इलेक्ट्रिक डबलडेकर बसचा खर्च भरपूर आहे. त्यासाठी विविध पर्याय देखील आहेत. केबलवर जमिनीपासून वर उडणाऱ्या बसेसचा खर्च कमी आहेे. त्याचादेखील विचार करण्याचा प्रयत्न आहे. त्यात दोन प्रकार आहेत. एक बस असेल आणि दुसरी ट्रॉली असेल. मात्र यात अनेक बाबी आहेत. ज्याचा विचार अजून होणं गरजेचं आहे,”
वाहतुकीसाठी अडचणीचा ठरणारा चांदणी चौकातला पूल पुढील दोन-तीन दिवसात पाडण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. हा पूल 30 मीटर लांबीचा आहे. पूल पाडण्यासाठी ट्विन टॉवर्सप्रमाणेच स्फोटकांचा वापर केला जाणार आहे. पूल पाडण्यापूर्वी वाहतूकीचं नियोजन करण्यात येईल. दोन ते तीन तासांसाठी पुलाखालचा रस्ता वाहतूकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल.