पुणे-पाच राज्यातील निवडणुकीत कमबॅॅक ने पुण्यातील कॉंग्रेस भवनात ‘आनंद उत्सव ‘साजरा करण्यात आला. एरवी सुने सुने पडणारे कॉंग्रेस भवन आज मोटारी आणि कार्यकर्त्यांच्या तसेच माध्यम प्रतिनिधींच्या गर्दीने फुलून गेले होते.
पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे ,ज्येष्ठ नेते बाळासाहेब शिवरकर ,उल्हास पवार ,अभय छाजेड,मोहन जोशी ,अरविंद शिंदे ,कमल व्यवहारे ,सोनाली मारणे,अविनाश बागवे, संगीता तिवारी ,अजित दरेकर ,बाळासाहेब अमराळे,कौस्तुभ गुजर ,राजा महाजन आदी कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस भवनात सकाळपासूनच गर्दी केली होती . अगोदर शहराध्यक्ष यांच्या कार्यालयात टीव्हीवर पाच राज्यातील निवडणुकींचे निकाल पाहता पाहता या सर्वांच्या आनंदला उधाण आले आणि मग फटाके, पेढे आणि ढोल ताशाबरोबर नाचो ..उत्सव मोठ्या जोशात साजरा करण्यात आला पहा या आनंदाला उधाण आलेल्या जल्लोषमय उत्सवाची एक व्हिडीओ झलक …