वसंत रांजणे इलेव्हन संघाचा मोठा विजय

Date:

पुणे: साई9स्पोर्ट्स यांच्या तर्फे दुसऱ्या श्री.शरदचंद्रजी पवार प्रौढ करंडक  क्रिकेट स्पर्धेत वसंत रांजणे इलेव्हन संघाने डी.बी. देवधर एलेव्हन संघाचा 8 गडी राखून दणदणीत पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

नेहरू स्टेडीयम क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात सचिन सामलच्या नाबाद 36 धावांच्या बळावर वसंत रांजणे इलेव्हन संघाने डी.बी. देवधर एलेव्हन संघाचा 8 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना पराग चितळे ,सुभाष रांजणे, मोहन जाधव व विवेक मालशे यांच्या अचूक गोलंदाजीने डी.बी. देवधर एलेव्हन संघाचा डाव 15 षटकात 6 बाद 74 धावांवर रोखला. अनंत नेरळकरच्या एकतर्फी 44 धावा संघाचा डाव भक्कम करू शकल्या नाहीत. 74 धावांचे लक्ष सचिन सामलच्या नाबाद 36 व  सनी मारवाडीच्या 19 धावांसह वसंत रांजणे इलेव्हन संघाने 3 चेंडू बाकी असताना 2 बाद 76 धावांसह सहज पुर्ण केले. 50 चेंडूत नाबाद 36 धावा करणारा सचिन सामल सामनावीर ठरला. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

डी.बी. देवधर एलेव्हन- 15 षटकात 6 बाद 74 धावा(अनंत नेरळकर 44, पराग चितळे 2-14, सुभाष रांजणे 1-12, मोहन जाधव 1-5, विवेक मालशे 1-23) पराभूत वि वसंत रांजणे इलेव्हन – 14.3 षटकात 2 बाद 76 धावा (सचिन सामल नाबाद 36, सनी मारवाडी 19, रोहुल कानडे नाबाद 5, पराग कानडे 1-17, करण थापा 1-14) सामनावीर- सचिन सामल

वसंत रांजणे इलेव्हन संघाने 8 गडी राखून सामना जिंकला. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्हेनेझुएलात दुहेरी भूकंपाचा तडाखा; 7.2 आणि 7.5 रिश्टर तीव्रतेचे धक्के, हजारो मृत्यूंची भीती

कराकसमध्ये इमारती कोसळल्या; 126 वर्षांतील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक,...

महापालिकेने पाण्याचे टँकर मोफत पुरवावेत..

जिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी विहिरी, बोअरवेल महापालिकेकडे सुपूर्त. कराव्यात: संकट काळात...

पुण्यात पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार , शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट

पुणे :गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि उपनगरांमध्ये हजेरी...