पुणे-मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यातील सानसवाडी येथे जॉन डिअरच्या निर्यात करण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरच्या कंटेनरला हिरवी झेंडा दाखविला . मंत्री श्री गिरीश बापट, खासदार आढळराव पाटील आणि जॉन डिअर या कंपनीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री श्री गिरीश बापट यांनी यावेळी जॉन डिअरच्या परिसराला भेट दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कंपनीने आपल्या कामातून मेक इन इंडिया अभियानात मोलाचे योगदान दिले आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी हा पुढाकार अतिशय मोलाचा आहे. आम्हाला जगात मोठे व्हायचे, ते आयात करणारे म्हणून नव्हे, तर संपूर्णत: मेक इन इंडिया मालाचे निर्यात करणारे म्हणून! त्यामुळे जॉन डिअरचे कार्य हे केवळ पुण्यासाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे. जगातील 118 देशांत ते निर्यात करीत आहेत. महाराष्ट्रात इज ऑफ डुईंग बिझनेस आणि अनेक सुधारणा घडवून आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे कंपनीने आपली गुंतवणूक अधिक वाढवावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.