प्रत्येकाने किमान एका झाडाचे संवर्धन करावे- सयाजी शिंदे

Date:

पुणे : “जागतिक तापमान वाढ आणि प्रदूषणाचा विळखा घट्ट होत असताना त्याला सामोरे जाण्यासाठी स्वच्छ, निरोगी वायू देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करणे खूप गरजेचे आहे. या देशी वृक्षांपासून आपल्याला शुद्ध हवा, सुंदर फुले आणि मधुर फळे मिळतात. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात वाढदिवस किंवा इतर आनंदाच्या क्षणाचे निमित्त साधत एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे,” असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते आणि सह्य़ाद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

येवलेवाडी येथील केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित ट्रिनिटी अकॅडेमी ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. आंबा, चिंच, आवळा, पेरू आदी देशी वृक्षांची रोपे लावण्यात आली. त्यामुळे महाविद्यालयाच्या परिसरात देशी वृक्षांची देवराई पाहायला मिळाली. प्रसंगी केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, संचालक डॉ. व्यासराज काखंडकी, सयाजी शिंदे यांचे महेश नामपूरकर, ट्रिनिटी अकॅडेमीचे प्राचार्य डॉ. निलेश उके, स्थापत्य विभाग प्रमुख डॉ. सतीश देशमुख,ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कुलच्या मुख्याध्यापिका प्रीती सांगवान आणि राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक सचिन कुदळे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थीमोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सयाजी शिंदे यांनी ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थींनीशी संवाद साधला. प्रसंगी त्यांनी कवी अरविंद जगताप यांची झाडांचे महत्व सांगणारी कविता स्वतःसह उपस्थिताकडून म्हणवून घेतली. कल्याण जाधव यांनी संस्थेच्या ११० एकर जागेत किमान एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प असल्याचे सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

क्रांतीज्योती बाल संगोपन योजनेचा 8 हजाराहून अधिक लाभार्थ्यांना लाभ

पुणे, दि. 22: माहे एप्रिल 2025 अखेर क्रांतीज्योती बाल...

YES BANK तर्फे नफ्यात सातत्यपूर्ण वाढ,तिमाहीत 1,068 कोटी रु.चा निव्वळ नफा

विकासाला गती, CASA मध्ये उत्कृष्ट कामगिरी, सुधारित मार्जिन्स आणि...

गोदरेज इंडस्ट्रीजचे २०३१ पर्यंत ५ लाख कोटींचे उद्दिष्ट

'१८९७ पासून निरंतर निर्मिती, प्रत्येक येणाऱ्या उद्याची' (Crafting tomorrow since 1897) हे कंपनीचे सामायिक ध्येय मुंबई, २२ एप्रिल, २०२६: गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने आज आपले नवे ध्येय आणि नवी ब्रँड ओळख प्रस्तुत केली....