पुणे : ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ची (फिक्की) महिला शाखा असलेल्या ‘फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘फ्लो’ या संस्थेच्या वतीने वृक्षरोपण करण्यात आले. पुणे शुद्ध हवेचे ठिकाण व्हावे, याकरिता शहर आणि परिसरालगतच्या भागात संस्थेच्या वतीने वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात आला. या उपक्रमाला ‘ट्री पब्लिक फाऊंडेशन’चे सहकार्य लाभले. विविध प्रकारची शेकडो झाडे या सप्ताहादरम्यान लावण्यात आली. वाढते शहरीकरण, पर्यावरणातील बदल, मोठया प्रमाववर होणारी वृक्षतोड, जंगलांचे घटते प्रमाण, पक्ष्यांचे स्थलांतरण यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यासाठी मोठया संख्येत वृक्षारोपण होणे गरजेचे आहे, हीच बाब लक्षात घेऊन शहर हरीत तसेच पर्यावरणपूरक व्हावे, यासाठी संस्थेच्या वतीने नियमित उपक्रम राबविले जात आहेत, असे ‘फ्लो’च्या अध्यक्षा रितू छाब्रिया म्हणाल्या.