Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आयटीए एसपीएच्या पुणे शाखेचे उद्घाटन डेव्हिड धवन यांच्या हस्ते आयटीए एसपीएचे उद्घाटन

Date:

david-1
पुणे- इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी स्कूल आॅफ परफाॅर्मिंग आर्टस् (आयटीए एसपीए) पुणे शाखेचे उद्घाटन आज (२३ सप्टेंबर) डेव्हिड धवन, शशी रंजन यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे सेंटरचे संचालक नंदन गिजारे, श्रृती गिजारे आणि केंद्र प्रमुख, आयटीए एसपीए मैथीली पागे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आयटीए एसपीएची सुरूवात २०११ साली शशी रंजन आणि अनू रंजन यांनी केली. आयटीए एसपीएच्या पाच शहरांमध्ये शाखा सुरू होत असून पुणे हे त्यापैकी एक प्रमुख शहर आहे.
यावेळी गिजारे म्हणाले, ”पुणे शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी शिक्षणासाठी पुण्यात येणार्या विद्यार्थ्यांची संख्या वाढतच आहे. अनेक सिने कलाकार पुण्यातील एफटीआयआयमधून शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. थिएटर आणि अभिनयासाठी पुणे शहर ओळखले जाते.” ते पुढे म्हणाले, ”याबरोबरच पुण्यातील संस्कृतीची छाप यामध्ये दिसून येते. या संस्थेतर्फे अभिनय, नृत्य, गायन, माॅडेलींग आणि इमेज ग्रूमिंगचे धडे देण्यासाठी भारतातील नामवंतांना बोलविले जाणार आहे. विद्यार्थ्यांची स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी नेहमी प्रयत्न केले जातील,” असा विश्वास त्यांनी दिला.
इंडियन टेलिव्हिजन अकॅडमीच्या गव्हर्निंग काउंसिलमध्ये जे. पी. दत्ता, गुलशन ग्रोव्हर, रविना टंडन, महिमा चौधरी, रूप कुमार राठोड आणि अल्का याग्निक आदी मान्यवर सदस्य आहेत.
मैथिली पागे म्हणाल्या, ”ज्या विद्यार्थ्यांना टीव्ही आणि बाॅलिवडू क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे त्यांना दिशा देणे हे या अकॅडमीचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान देऊन त्यांची स्वप्ने साकार करण्याची संधी दिली जाणार आहे.”
येथे गुरू म्हणून अनेक नामवंतांना बोलविले जाणार आहे. माॅडेलिंगसाठी संदिप धर्मा, नृत्यासाठी कुणाल फडके, गायनासाठी अली हुसैन आणि मैथिली पागे या अभिनय विभागाच्या विभाग प्रमुख असतील.
कला क्षेत्रात करिअर करू इच्छिणार्या विद्यार्थांसाठी ही अकॅडमी ‘गेट वे टू बाॅलिवूड’ ठरेल, अशी खात्री श्रृती गिजारे यांनी व्यक्त केली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

युध्दविराम 3 दिवसांनंतर केला असता तर POK भारतात असते! अमित शहांचे ‘ते’ भाषण व्हायरल…

युध्दविरामाचा निर्णय झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियात याबाबत नाराजी व्यक्त...

कलाकार व्हा, सेलिब्रिटी नव्हे:संतोष जुवेकर

'एमआयटी एडीटी'चा 'कारी-२०२५' महोत्सव संपन्न पुणेः कलाकृती ही कलाकारापेक्षा जास्त...

नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा मोठे मुद्दे

1. ऑपरेशन सिंदूरची कारवाई फक्त स्थगित केली आहे, पण...

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...