मुंबई – पोलिसांना ७५० रुपये दिवाळी बोनस जाहीर करून महाविकास आघाडी सरकारने पोलिसांचा अवमान केला आहे . किमान त्यांच्या पद व कर्तव्यानुसार त्यांना २५,००० रूपसे ते ५०,००० पर्यंत दिवाळी बोनस द्यावा अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोध यांनी केली आहे.
कोरोनाच्या विळख्यात वावरुन पोलिसांनी जिवाची पर्वा न करता दिवस रात्र काम केलं ते संपूर्ण जगाने पाहिले आहे. त्याच पोलिसांसाठी दिवाळी निमित्त काहीतरी करायची वेळ आली असताना अत्यंत तुटपुंजा बोनस देऊन पोलिसांचा अवमान केला जात आहे, दिवाळी बोसन पोलिसांना वाढवून द्यावा अशी मागणी मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई पोलीस महासंचालक संजय पांडे यांना पत्र देऊन केली आहे.
लोढा म्हणाले की, कोरोना काळात पोलिसांनी प्रशांसात्मक कार्य केले असून त्याकाळात कर्तव्य बजावत असताना काहींना आपले प्राणही गमावले आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल प्रत्येक मुंबईकर त्यांचा सन्मान करत होता. परंतु दिवाळा सणाच्या निमित्त महाराष्ट्र सरकारने ७५० रूपये बोनस ची रक्कम जाहीर केली आहे. जाहीर केलेली रक्कम अत्यंत तुटपंजी असुन या रकमेमध्ये सुधारणा करून त्यांच्या पद व कर्तव्यानुसार त्यांना २५,००० रूपसे ते ५०,००० पर्यंत दिवाळी बोनस द्या अशी विनंती मुंबई पोलीस महासंचालक यांच्याकडे केली असल्याचे लोढायांनी सांगितले.