असंघटित क्षेत्रातील व्यक्तींनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा : आ. चंद्रकांतदादा पाटील

Date:

पुणे-देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी असंघटित क्षेत्रातील व्यक्तींच्या अडचणी जाणून विविध योजना राबविल्या आहेत, या योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि भाजपा कोथरुड मंडलच्या माध्यमातून गोसावी वस्तीतील नागरिकांना ई-श्रम कार्ड आणि कोविड लसीकरण स्मार्ट कार्ड देण्यात येत असून, या शिबीरास आ. पाटील यांनी सदिच्छा भेट दिली, यावेळी त्यांनी हे आवाहन केले.

यावेळी भाजपा पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, योजना प्रमुख नगरसेवक अजय खेडेकर, पुणे शहर भाजपा सरचिटणीस दीपक पोटे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, शिक्षण समिती अध्यक्षा नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक जयंत भावे, स्विकृत सदस्या अॅड. मिताली सावळेकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबी जवळून अनुभवली आहे. त्यामुळे असंघटित क्षेत्रातील व्यक्तींच्या अडचणी त्यांना चांगल्याच माहिती आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठीच माननीय मोदीजींनी उज्वल गॅस योजना, आयुष्मान भारत योजना, ई-श्रम कार्ड योजना, सर्वांसाठी स्वच्छतागृह यांसारख्या अनेक योजना देशभरात राबविल्या. यापैकी आयुष्मान भारत योजनेमुळे अनेकांना मोफत औषधोपचार मिळाले. त्यामुळे या सर्व योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आ. पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ई-श्रम कार्डचे वाटप केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय खेडेकर यांनी केले. सूत्रसंचालन पुनित जोशी यांनी केले. तर दीपक पोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...