म्हाळुंगे मुख्य रस्त्याचे भुमिपुजन संपन्न

Date:

पुणे-आज म्हाळुंगे येथील मुख्यरस्त्याचेडांबरीकरण व साईड पट्टीचे काम करणे या कामाचा भुमिपुजन समारंभ भारतीय जनता पार्टी व म्हाळुंगे ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कामासाठी पुणे महापालिकेच्या मुख्य खात्यातुन व महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विशेष सहकार्यातुन रक्कम रु.४० लक्ष रुपयांची तरतुद उपलब्ध करण्यात आली आहे.
           “पुणे मनपा हद्दित नव्याने समाविष्ठ झालेल्या सुस-म्हाळुंगे गावांमध्ये स्थानिक नागरीकांच्या मुलभुत गरजा ओळखुन विविध विकास कामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करण्यात येईल व तसेच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन अतिशय नियोजित असा विकास केला जाईल.” असे यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी व्यक्त केले.
                पुणे महापालिकेत समाविष्ठ झाल्यानंतर या गावांतील पाणी समस्या संपुष्टात आली असुन रस्ते, ड्रेनेज व इतर सुविधांची कामे भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन झपाट्याने व अगदी नियोजनबद्ध पद्धतीने  होत असल्याचे सांगत म्हाळुंगे गावातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.
       यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, भाजपा नेते प्रकाशतात्या बालवडकर, लहुशेठ बालवडकर, भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, मंदार राराविकर, काळुराम गायकवाड संजय पाडाळे, राजेंद्र पाडाळे, मा.उपसरपंच सुनिल पाडाळे,  उपाध्यक्ष भाजपा मुळशी तालुका भानुदास कोळेकर, रविंद्र मोहोळ, सह्याद्री प्रतिष्ठाण संपर्क प्रमुख पुणे जिल्हा .सदाशिव मोरे, बाबासाहेब तारे, अंकुश पाडाळे, तुषार हगवणे, गणेश पाडाळे, गुलाब गायकवाड, सुरेश कोळेकर, समीर कोळेकर, लक्ष्मण पाटील, राजेंद्र पाडाळे, माउली सुतार, हॅाटेल रुपा  सचिन पाडाळे, नामदेव गोलांडे ,भानुदास पाडाळे (मा ग्रामपंचायत सदस्य), सोपानआण्णा पाडाळे (हाॅटेल राधा) अंशाआका पाडाळे, दातीर मायी, शिवाजी खैरे, भगवान खैरे, मनोज पाडाळे, बाबासाहेब कोळेकर, गीताताई गुजर, नामदेव पाडाळे, गुलाब पाडाळे, मयुर कोळेकर, संतोष बबन पाडाळे  बाबुराव मोहोळ व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...