पुणे- कॅम्पमधील महात्मा गांधी रोडवरील इंडियन रेडक्रॉस सोसायटीची कर्णबधिर मुलांच्या शाळेची दिंडी पुणे कॅम्प भागात महात्मा गांधी रोडवर काढण्यात आली . कर्णबधिर मुलांनी हातामध्ये “ पाणी वाचवा , झाडे जगवा “ असे जनजागृतीपर फलक हातामध्ये धरून मुलांनी समाजामध्ये पर्यावरण जनजागृती केली . कर्णबधिर मुलांना प्रत्येक गोष्टींचे आकलन व्हावे याकरिता दृश्य माध्यमातून सर्व सण शाळेच्यामाध्यमातून साजरे करत असतो .
यावेळी दिंडीमध्ये मुलांनी ढोल , टाळ , लेझीम यांच्या गजरात पालखी काढण्यात आली . दिंडीमध्ये शाळेच्या अध्यक्षा जास्मिन दलाल , प्राचार्य मनीषा डोंगरे , सर्व शिक्षिका व कर्मचारी वर्ग उत्साहाने सहभागी झाले होते .