पुणे: वानवडी येथील इंडियन ऑईल कंपनीचे गॅस वितरक राधा कृष्ण इंडेन या नूतन गॅसवितरक एजन्सीच्या भव्य शोरूमचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील व माजी आमदार वसंतराव थोरात यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर प्रशांत जगताप महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळसाहेब शिवरकर , माजी आमदार अशोकराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते ,
इंडियन ऑईल कंपनीचे पुणे विभागाचे मुख्य अधिकारी कुलविंदरसिंग यांनी कंपनी विषयी माहिती दिली . प्रत्येक घरात नवीन जोडणी देण्याची योजना आहे . शिवाय ग्रामीण भागात धूरमुक्त खेडी करण्याचे व त्याकरिता प्रत्येक वितरकाने एक खेडे दत्तक घ्यावे अशी सूचना केली .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर प्रशांत जगताप , महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील , महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळसाहेब शिवरकर यांनी व्यवसाय वाढीकरिता कसे प्रयत्न करावे याबाबत विवेचन केले . यावेळी इंडेनची नूतन एजन्सीची इमारत पुण्याच्या पूर्व भागातील वानवडी येतील तीन हजार स्क़ेवर फुट क्षेत्रफळामध्ये भव्य तीन मजली इमारत उभारण्यात आली आहे . यामध्ये राधा कृष्ण इंडेनचे गस एजन्सीचे सर्व कामकाज चालणार असून ग्राहकांना सिलेंडर सुरक्षितरीतीने हाताळणे बाबत माहिती देण्यात येणार आहेत . तसेच , गॅस शेगडी , सिलेंडर ट्रोली , सुरक्षा पाईप , सुरक्षा अप्रन , तसेच इतर घरगुती उपकरणेदेखील विक्रीस ग्राहकासाठी उपलब्ध आहे . विशेष म्हणजे एका तासामध्ये नवीन गस कनेक्शन ग्राहकांच्या घरी जाऊन देतो . राधा कृष्ण इंडेनने वानवडीमध्ये पंधरा वर्षापूर्वी आपल्या व्यवसायास एका ग्राहकापासून सुरुवात केली होती . आज बाराहजार पाचशे ग्राहकांचा टप्पा ओलांडला आहे . व्यावसायिक गॅस सिलेंडरवितरणामध्ये पुणे एरिया ऑफिसमध्ये सलग तीन वर्ष प्रथम क्रंमांक प्राप्त केला आहे . भविष्यात एक खेडे दत्तक घेयून धूरमुक्त करणार आहे . अशी माहिती राधा कृष्ण इंडेन संचालक प्रविण खंडाळकर यांनी दिली .
या उद्घाटन सोहळ्यास इंडियन ऑईल कंपनीचे पुणे विभागाच्या व्यवस्थापिका कविता टिक्कू , उपव्यवस्थापिका अपर्णा कुमारी , पुणे गस पार्टसचे जयसिंग संपत , अपंग कल्याणकारी संस्थेचे कार्याध्यक्ष मुरलीधर कचरे , नगरसेविका कविता शिवरकर , नंदा लोणकर , माजी नगरसेवक अभिजित शिवरकर , रोटरीचे राजेश शहा , उद्योजक राजकुमार मगर , पंकज पटेल , व्यंकटेश कृपाचे शुगर चेअरमन संदीप तौर , सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब ढेरे , अड. प्रताप परदेशी , डॉ. मंदार अंबिके , राष्ट्रवादी कॉंग्रेस हवेली तालुका अध्यक्ष नंदूपाटील काळभोर , फुरुसुंगी ग्रामपंचायत सदस्य प्रविण कामठे , राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे जिल्हा युवक अध्यक्ष मानसिंग पानचुंदकर . पी. एन. जी. चे संचालक पराग गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते .
इंडियन ऑईल कंपनीचेगॅस वितरक राधा कृष्ण इंडेन कंपनीचे डिलिव्हरीबॉय मोहन बिष्णोई व कामगारांचा शिस्तप्रिय कामगार बीना पानसरे म्हणून कौतुक करून त्यांना सिलेंडर प्रतिकृती असलेली ट्रॉफी देण्यात आली .
प्रास्ताविक इंडियन ऑईल कंपनीचे गस वितरक राधा कृष्ण इंडेनचे उपव्यवस्थापिका अपर्णा कुमारी यांनी केले . तर आभार प्रदर्शन राधा कृष्ण इंडेन संचालक प्रविण खंडाळकर यांनी मानले .