पुणे विभागातील 5 लाख 62 हजार 181 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी;विभागात कोरोना बाधित 5 लाख 85 हजार 20 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव
पुणे,दि.1 :- पुणे विभागातील 5 लाख 62 हजार 181 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 85 हजार 20 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 790 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 49 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.74 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.10 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 606 ने वाढ झाली आहे .
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 79 हजार 357 रुग्णांपैकी 3 लाख 65 हजार 158 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 5 हजार 232 आहे. यामध्ये 4 स्ट्रेन या नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 967 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.26 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 56 हजार 289 रुग्णांपैकी 53 हजार 860 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 613 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 816 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 346 रुग्णांपैकी 48 हजार 819 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 732 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 795 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 97 रुग्णांपैकी 46 हजार 218 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 130 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 749 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 931 रुग्णांपैकी 48 हजार 126 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 83 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 722 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 606 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 469, सातारा जिल्ह्यात 66, सोलापूर जिल्ह्यात 51, सांगली जिल्ह्यात 5 तर कोल्हापूर जिल्ह्यात 15 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 526 आहे. पुणे जिल्हयामध्ये 415, सातारा जिल्हयामध्ये 11, सोलापूर जिल्हयामध्ये 83, सांगली जिल्हयामध्ये 11 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 6 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 37 लाख 8 हजार 524 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 85 हजार 20 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 31 जानेवारी 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )