गुरुग्राम, १७ मार्च २०२२ – साहसी रायडर्ससाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने आज भारतात आपल्या नव्या 2022 आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्सचे बुकिंग सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. ही गाडी होंडाच्या एक्सक्लुसिव्ह बिग विंग टॉपलाइन शोरूम्समध्ये उपलब्ध होणार आहे. नवी मोटरसायकल सीकेडी* (कम्प्लीट नॉक डाउन) पद्धतीने भारतीय बाजारपेठेत उपलब्ध केली जाईल.
2022 आफ्रिका ट्विन अडव्हेंटर स्पोर्ट्स मॉडेल ड्युएल क्लच ट्रान्समिशन (डीसीटी), मॅट बॅलिस्टिक ब्लॅक मेटॅलिक रंगात, तर मॅन्युअल ट्रान्समिशन, पर्ल ग्लेयर व्हाइट ट्रायकलर स्कीम अशा २ प्रकारांत उपलब्ध होईल.
याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अत्सुशी ओगाता म्हणाले, ‘२०१७ मध्ये भारतात प्रवेश केल्यापासून आफ्रिका ट्विनने भारतात साहसी रायडिंगचा नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. त्यापुढे जात 2022 आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्स रायडर्सना त्यांचा स्वतःचा मार्ग तयार करत अज्ञात वाटा धुंडाळण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. नवे मॉडेल बुकिंगसाठी खुले करण्यात आले असून सर्व साहसप्रेमींना पुढचे वर्ष नव्या वाटा, अनुभव आणि थराराचे जावो अशी सदिच्छा करतो.’
भारतात 2022 आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्सचे बुकिंग खुले झाल्याची घोषणा करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘भारतात वैविध्यपूर्ण भूभागांची रेलचेल असल्यामुळे साहसी रायडिंग करणाऱ्यांचे प्रमाणही विकसित होत आहे. आफ्रिका ट्विन ट्राइब आपल्या डकार रॅली डीएनएसह भारतात विस्तारत असून त्याचवेळेस सर्व प्रकारच्या भूभागांवर आपल्या क्षमतेचा आनंद घेत आहे. आता 2022 आफ्रिका ट्विनमुळे साहसाची ही संस्कृती आणखी उंचावेल.’
ताकद आणि कामगिरी
लांबवरचा पल्ला गाठण्याची तसेच ऑफ- रोडिंगची क्षमता आणखी विस्तारत 2022 आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्सला १०८२.९६ सीसी लिक्विड कुल्ड ४-स्ट्रोक ८ व्हॉल्व्ह पॅरलल ट्विन इंजिन, ओव्हरहेड कॅमशाफ्ट (ओएचसी) टाइप व्हॉल्व्ह सिस्टीम ७३ केडब्ल्यू अट ७५०० आरपीएमला आणि १०३एनएमचा टॉर्क ६००० आरपीएम यांची जोड देण्यात आली आहे. त्याशिवाय २७०- अंशाचे ऑफसेट क्रँकशाफ्ट जबरदस्त ट्रॅक्शन आणि पल्सेटिंग इंजिन कामगिरीसाठी प्रतिसादात्मक अक्सलरेशन देते
तंत्रज्ञान आणि उपलब्धता
‘गो एनीव्हेयर’ ही वृत्ती रूजवणाऱ्या 2022 आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये तंत्रज्ञान, नाविन्य आणि सिक्स- अक्सिस इनर्शियल मेझरमेंट युनिट (आयएमयू), २- चॅनेल एबीएस, एचएसटीसी (होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल) आणि ब्लुटुथ कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्य यांचा समावेश करण्यात आला आहे. एमटी आणि डीसीटी प्रकारात चार डिफॉल्ट रायडिंग मोड सेटिंग्ज देण्यात आले असून त्यात टुर, अर्बन, ग्रॅव्ल आणि ऑफ- रोड यांचा समावेश आहे. रायडिंगच्या सर्व परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी हे सेटिंग्ज देण्यात आले आहेत व त्याचबरोबर दोन कस्टमायझेबल युजर १ आणि २ सेटिंग्जही देण्यात आले आहेत.
रायडर्सकडून मिळणाऱ्या मौल्यवान अभिप्रायाची दखल घेत 2022 आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये नव्याने अडजस्ट करण्यात आलेले कन्सोल स्क्रीन देण्यात आले आहेत, ज्यामुळे रायडिंग करताना जास्त चांगली दृश्यमानता मिळते. मनोरंजनाच्या बाबतीत नव्या 2022 मॉडेलमध्ये अपल कारप्ले (आयओएस युजर्ससाठी) आणि नव्याने समाविष्ट करण्यात आलेला अँड्रॉइड ऑटो असे दोन्ही प्रकार देण्यात आले आहेत.
डिझाइन आणि वैशिष्ट्ये
ऑन/ऑफ रोड क्षमतेसह अडव्हेंचर टुअरर तयार करण्यासाठी आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्सची रचना स्थैर्य आणि हाताळणीसाठी मास सेंट्रलायझेशनसह करण्यात आली आहे, तर पेग्जवर उभी असताना अक्शनवर नियंत्रण ठेवण्यासाठी अरूंद सेंट्रल एरिया आणि रूंद फ्रंट देण्यात आले आहे. टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन आणि प्रो लिंक रियर सस्पेन्शनमुळे सर्वोत्तम कंपोझर आणि रायडरला आरामदायीपणा मिळतो. ऑन/ऑफ रोड बाइकसाठी हे सर्वोत्तम समीकरण आहे.
या मॉडेलमध्ये अडजस्टेबल सीट आणि रॅली स्टाइल्ड पॉझिटिव्ह एलसीडी कलर डिस्प्ले अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, ज्यामुळे प्रवास आरामदायी होतो. सेमी डबल क्रॅडल स्टील फ्रेमही इंजिनची ताकद वाढवण्यासाठी व त्याला आधार देण्यासाठी लावण्यात आली असून त्यामुळे प्रवास आनंददायी होतो.
सुरक्षितता वाढवण्यासाठी आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये ड्युएल एलईडी हेडलाइट्ससह डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल) आणि कॉर्नरिंग लाइट्स देण्यात आले आहेत, जे सातत्याने चांगली दृश्यमानता मिळवून देतात व अंधारे कोपरे उजळवतात. २४.५ लीटर्सची इंधनाची टाकी लांबच्या प्रवासासाठी अगदी योग्य ठरते.
रंग, किंमत आणि उपलब्धता
आजपासून होंडाने 2022 आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्सचे बुकिंग गुरुग्राम (हरियाणा), मुंबई (महाराष्ट्र), बेंगळुरू (कर्नाटक), इंदौर (मध्य प्रदेश), कोची (केरळ), हैद्राबाद (तेलंगणा), चेन्नई (तमिळ नाडू) येथील आपल्या बिगविंग टॉपलाइन वितरकांकडे खुले केले आहे.
आफ्रिका ट्विन अडव्हेंचर स्पोर्ट्स 2022 | ||
प्रकार | मॅन्युअल ट्रान्समिशन | ड्युएल क्लच ट्रान्समिशन (डीसीटी) |
रंग | पर्ल ग्रे व्हाइट ट्रायकलर | मॅट बॅलिस्टिकब्लॅक मेटॅलिक |
किंमत (एक्स शोरूम) | रू. 16,01,500 | रू. 17,55,500 |
गुरुग्राम, | ||
(हरियाणा) |