Home Blog Page 756

लाडक्या बहिणींना सरकार २१०० रुपये देणार की नाही? सरकारला जेरीस आणू – रोहित पवार

पुणे-निवडणुकीच्या तोंडावर सरसकट १५०० रुपये दरमहा लाडक्या बहिणींना देणारे सरकार आता त्याच पद्धतीने म्हणजे ज्यांना पूर्वी दिलेत त्यांना न वगळता २१०० रुपये दरमहा देणार कि नाही ? यावरून आम्ही सरकारला धारेवर धरू असे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे .

सरकारने लाडकी बहीण योजना काढली परंतु आता भाजप त्यामध्ये सर्शत अटी टाकण्याचा विचार करत आहे. सरकार २१०० रुपये महिलांना देणार की नाही, ज्या वंचित महिला योजनेपासून दूर राहिल्या त्यांना आगामी काळात समाविष्ट केले जाणार की नाही, याबाबत अधिवेशनात आम्ही मुद्दे मांडणार आहे. परंतु अधिवेशन कधी होणार, आम्हाला बोलण्याची संधी दिली जाणार का? हे प्रश्न आहे. सरकारला सहा महिने कामासाठी दिले पाहिजे. लोकांच्या खिशातून सरकार पैसे काढणार का? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. बेरोजगारी, महागाई. भ्रष्टाचार याबाबत आगामी काळात आम्ही सरकारला जाब विचारत राहणार आहे.

रोहित पवार म्हणाले, महायुतीच्या नेत्यांना सर्व राज्यातील विविध ठिकाणी समान आसपास मते मिळाल्याचे ईव्हीएम मशीन मधून दिसून येते. काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस हे ईव्हीएम बाबत खुलासा करण्यासाठी पुढाकार घेत आहे. नागरिकांच्या देखील ईव्हीएम बाबत शंका असून त्या आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी दूर केल्या पाहिजे. महायुतीला २२० पेक्षा अधिक जागा मिळाल्या असून नऊ दिवसानंतर राज्याला मुख्यमंत्री मिळत नाही किंवा मंत्रीमंडळ विस्तार होत नाही, त्यामुळे लोकांनी मते देऊन चूक केली का? असे वाटू लागले आहे.

बसच्या दरात १४ टक्के वाढ करण्याच प्रस्ताव एसटी महामंडळाकडे आला आहे. व्यवसायिक गॅस १६ टक्के वाढ झाली असल्याने १७२ रुपयाने सदर गॅस महागलेला आहे. योजनादूत यांना दोन महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही. महायुतीला ईव्हीएमने मदत केल्याने बाकी लोकांची काही मदत झाली नाही, असे त्यांना वाटत आहे. न्यायालयाच्या भरतीत देखील कंत्राटी भरती होणार आहे, याला आमचा विरोध असणार आहे.

राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा महासागर

आज नगरसेवकापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वचजण दुःखी, नितीन गडकरी यांच्या विधानाची चर्चा

नागपूर-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक विधानांसाठी कायमच चर्चेत असतात. सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले. नितीन गडकरी यांनी राजकारणाला ‘असंतुष्ट आत्म्यांचा महासागर’ अशी उपमा दिली आहे. राजकारणात प्रत्येक व्यक्ती दु:खी असतो आणि नेहमीच सध्याच्या पदापेक्षा वरच्या पदाची आकांक्षा बाळगतो, असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

नागपूर येथे रविवारी ‘जीवनाचे 50 स्वर्णिय नियम’ या पुस्तकाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर रोखठोक भाष्य केले. राजकारणात महत्त्वाकांक्षा कशी वाढली आहे, याची व्याख्याही त्यांनी केली.

नितीन गडकरी म्हणाले, राजकारण संतुष्ट आत्म्यांचा महासागर आहे. राजकारणात सर्वच लोक दु:खी आहेत. नगरसेवकाला नाराज असतो कारण त्याला आमदार होता नाही आले. एक आमदार यासाठी नाराज असतो कारण त्याचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही. मंत्री दु:खी असतो कारण त्याला चांगले खाते भेटत नाही आणि ते मुख्यमंत्री होऊ शकले नाही. तर मुख्यमंत्री देखील तणावात असतो कारण पक्षश्रेष्ठी त्यांना कधी ठेवतील आणि बाजुला करतील याची त्याला भीती असते, असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले.

पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, जीवन हा तडजोडी, मजबुरी, अडथळे आणि विरोधाभासांचा खेळ आहे. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय किंवा कॉर्पोरेट जीवन असो, जीवन आव्हाने आणि समस्यांनी भरलेले असते. त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ समजून घ्यावे लागेल.

नितीन गडकरी म्हणाले की, त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या आत्मचरित्रातील एक कोट आठवतो, ज्यात म्हटले आहे की, ‘माणूस जेव्हा पराभूत होतो तेव्हा तो संपत नाही. जेव्हा तो हार मानतो तेव्हा तो संपतो. नितीन गडकरी यांनी आनंदी जीवनासाठी चांगल्या मानवी मूल्यांवर आणि संस्कारांवर भर दिला. जीवन जगण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी त्यांनी आपले आदर्श आणि नियम सांगताना ‘व्यक्ती, पक्ष आणि पक्ष तत्त्वज्ञान’ याचे महत्त्व अधोरेखित केले.

८ डिसेंबर  रोजी कोथरूड मध्ये  गांधी दर्शन शिबीर

पुणे :
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने रविवार, दि. ८  डिसेंबर  २०२४ रोजी सकाळी साडेनऊ  ते सायंकाळी साडेपाच  या वेळेत ‘गांधी दर्शन’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरूड येथील गांधी भवनच्या  सभागृहात हे शिबीर होणार आहे. गांधी पीस फाऊंडेशनचे अध्यक्ष कुमार प्रशांत  (जयप्रकाश व महात्मा गांधी  यांचे आंदोलन ),महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी  (गांधी आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक), साप्ताहिक ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ (युवकांसमोरील आव्हाने) हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. ‘ ‘गांधी दर्शन’ विषयावरचे हे १६ वे शिबीर आहे. 
अधिक माहितीसाठी  एड.स्वप्नील तोंडे (९९२३५२३२५४) तेजस भालेराव (९१७२४८७०१९),सचिन पांडुळे (९०९६३१३०२२) यांच्याशी संपर्क साधता येईल.शिबिरासाठी दोनशे रुपये नोंदणी शुल्क आहे. त्यात शिबिरस्थळी नाश्ता,चहा आणि भोजनाचा समावेश आहे .स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे युवक युवती आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांना प्रवेश शुल्क ऐच्छिक आहे.
समाजाला सकारात्मक दिशा देणाऱ्या महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानावर आधारित हे शिबिर आयोजित केले गेले आहे.या शिबिरात सत्य,अहिंसा,सामाजिक बांधिलकी आणि स्वावलंबन यासारख्या गांधीजींच्या महत्त्वपूर्ण तत्त्वांवर सखोल चर्चा होईल.गांधीवादी विचारसरणी आजच्या जगातदेखील  कशी उपयुक्त ठरू शकते, यावर प्रकाश टाकला जाईल, त्यामुळे सर्वांनी सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.  

भाजपा नेता मोहित कंबोजची X वर जाहीर धमकी:गजाभाऊ नामक युझरला म्हणाले – कुठेही असला तरी उचलून आणणार;प्रत्युत्तर आले,’ बापाला सोबत घेऊन ये, मी पण वाट बघतोय…

मुंबई-भाजप नेते मोहित कंबोज यांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर गजाभाऊ यांना धमकी दिली आहे. कुठेही असला तरी, उचलून आणणार, अशी धमकी मोहित कंबोज यांनी गजाभाऊला दिली. तर मोहित कंबोज यांच्या धमकीचे आवाहन गजाभाऊने स्वीकारले आहे. येताना एकटा येऊ नकोस बापाला सोबत घेऊन ये, मी पण वाट बघतोय, असे प्रत्युत्तर गजाभाऊने दिले आहे. या दोघांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.

https://twitter.com/mohitkamboj_/status/1863268323540283512

गजाभाऊ हा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. त्याचे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 27 हजार फॉलोवर्स आहेत. गजाभाऊ सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच राजकीय परिस्थितीवर भाष्य करत भाजपवर निशाणा साधत असतो. तर मोहित कंबोज हे भाजप नेते असून देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात.

मोहित कंबोज यांनी गजाभाऊला उचलून नेण्याचा इशारा दिला आहे. तर गजाभाऊने देखील मोहित कंबोज यांचे आवाहन स्वीकारले आहे. येताना एकटा येऊ नकोस बापाला संगती घेऊन ये. मी पण वाट बघतोय, असे उत्तर गजाभाऊने दिले आहे.तसेच देवेंद्र फडणवीस यांनी मोहित कंबोज यांच्या अकाउंटवरून धमकी देऊ नये, असे गजाभाऊने म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस ओरिजिनल अकाउंट येऊन धमकी दे, असल्या बाहेरच्या भैयाकडून धमक्या देऊ नकोस, असे ट्वीट केले आहे.

एका परप्रांतीयाने मराठी माणसाला धमकी दिल्यामुळे सोशल मीडियावर वॉर सुरू आहे. सोशल मीडिया युजर्स गजाभाऊच्या समर्थनार्थ मोहित कंबोज विरोधात ट्वीट करत आहेत, तर मोहित कंबोज समर्थकांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांनी एव्हीएम मशीनवर शंका व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात झालेल्या ईव्हीएमच्या महाघोटाळ्याबद्दल बोलत रहा, या सर्व गोष्टीवरून लक्ष हटविण्यासाठी भरपूर प्रयत्न करतील, असे आवाहन गजाभाऊने केले होते.

कोण आहे गजाभाऊ?

गत काही दिवसांपासून सोशल मिडीयावर गजाभाऊ हे एक्स हँडल तुफान चर्चेत आहे. भाजप व महायुतीमधील घटक पक्षांवर टीका करत या अकाऊंटवरुन अनेक पोस्ट शेअर केल्या जातात. ‘जन्माने बॉक्सर, मुंबईकर पुणेकर आणि सांगलीकर, यांत्रिकी अभियंता संस्थापक सदस्य भाऊ गँग’ असे या हँडलच्या बायोमध्ये नमूद आहे. हे एक व्हेरीफाईड हँडल आहे. या अकाऊंटवरून केलेल्या पोस्टवरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत.

मोहित कांबोज आणि देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांची जवळीक देखील X वर दिसून येते …

https://twitter.com/mohitkamboj_/status/1860251004505325866

वैकुंठ स्मशानभूमीत कोणत्याही उणीवा राहणार नाहीत याची दक्षता घेऊ – आमदार हेमंत रासने.

देव दिवाळी व हेमंतभाऊ आमदार झाल्याच्या निमित्ताने क्रिएटिव्ह फाउंडेशन व नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट तर्फे वैकुंठ स्मशानभूमीत साहित्य भेट – संदीप खर्डेकर.

पुणे-वैकुंठ स्मशानभूमीत कोणत्याही उणीवा राहणार नाहीत याची दक्षता घेऊ असे सांगतानाच ” अधिकाऱ्यांनी येथे काय साहित्य व इतर सुधारणा करायच्या आहेत त्याची यादी त्वरित द्यावी ” अश्या सूचना नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने यांनी दिल्या.
आज देव दिवाळी च्या निमित्ताने आणि हेमंतभाऊ आमदार पदी निवडून आल्याच्या निमित्ताने क्रिएटिव्ह फाउंडेशन व नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट च्या वतीने वैकुंठ स्मशानभूमीत विविध उपयोगी साहित्य भेट देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, विश्वस्त व माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,माजी नगरसेवक राजेश येनपुरे,ग्लोबल ग्रुप चे संजीव अरोरा, नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट चे मनोज हिंगोरानी,मनपा विद्युत विभागाच्या प्रभारी मुख्य अभियंता मनीषा शेकटकर,उपअभियंता जयदीप अडसूळ,क्रिएटिव्ह फाउंडेशन चे विश्वस्त सतीश कोंढाळकर व विद्युतदाहिनीतील कर्मचारी उपस्थित होते.
आमचे स्नेही मित्र हेमंत रासने यांचा पोटनिवडणूकीतील पराभव जिव्हारी लागला होता असे संदीप खर्डेकर म्हणाले.
ही सल भरून निघाल्यावर फ्लेक्स लावून अभिनंदन करण्यापेक्षा लोकोपयोगी कार्य करून हेमंतभाऊंचे अभिनंदन करावे, शुभेच्छा द्याव्यात असा विचार करून आज देवदिवाळी च्या दिवशी वैकुंठ स्मशानभूमीत कपाट, टेबल खुर्च्या व इतर साहित्य भेट देताना मनस्वी आनंद होत असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.
वैकुंठात सुवर्णयुग तरुण मंडळाच्या माध्यमातून मी ही मदत कार्य करत असतो मात्र संदीप खर्डेकर हे गेली पस्तीस वर्षे (35 ) वैकुंठात सेवाकार्य करत असतात याबद्दल त्यांचे पुणेकरांच्या वतीने आभार व्यक्त करतो अश्या शब्दात हेमंत रासने यांनी क्रिएटिव्ह फौंडेशन चा गौरव केला. तसेच मनपा च्या अधिकारी मनीषा शेकटकर यांना ” रक्षा विसर्जनासाठीचा गाडा व अन्य आवश्यक साहित्य मी उपलब्ध करून देईन ” असे सांगतानाच, वैकुंठातील कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही असेही त्यांनी नमूद केले.
भावी काळात शहरातील सर्वच स्मशानभूमीत जे जे साहित्य लागेल ते नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने देण्यात येईल असे मनोज हिंगोरानी व सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप खर्डेकर यांनी केले तर सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी संयोजन केले.

उपमुख्यमंत्रीपद : काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

मुंबई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. त्याबदल्यात शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद मिळणार असून त्यासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा रंगली होती. यावर खुद्द श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही, असे श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत सांगितले. श्रीकांत शिंदे यांच्या स्पष्टीकरणामुळे त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत. वस्तूतः यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले.

श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय पदाबाबतही भाष्य केले. लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांना धोक्यांची जाणीव:त्यामुळेच त्यांनी होम मिनिस्ट्रीचा आग्रह धरला -रोहित पवार

भाजपचा शतप्रतिशतच्या दिशेने प्रवास

पुणे-काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भविष्यातील धोक्याची जाणीव झाली आहे. त्यामुळेच त्यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा आग्रह धरला आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी केला. भाजप यावेळी मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार करत असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

रोहित पवार यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी वार्तालाप केला. त्यात त्यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता असल्याचा दावा केला. भाजपकडून यंदा पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे या ओबीसी नेत्या आहेत. त्यांचा अनुभवही मोठा आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळेल असा अंदाज आहे. एकनाथ शिंदे यांना भविष्यातील धोक्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे त्यांनी गृहमंत्रीपदाचा आग्रह धरला आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून निश्चितच फडणवीस यांच्यापेक्षा चांगले काम केले आहे.रोहित पवार पवार पुढे म्हणाले, आपल्या पक्षातील कोणत्या आमदाराला मंत्रीपदासाठी संधी द्यायची हे ठरवण्याचा अधिकार त्या – त्या पक्षाच्या प्रमुखाच असतो. पण या ठिकाणी सर्वकाही दिल्लीचे नेते ठरवत आहेत. 2029 मध्ये शतप्रतिशत भाजप या दिशेने त्यांचा प्रवास सुरू झाला आहे. अजित पवारांच्या पक्षाचे मंत्रीही सध्या भाजपचेच लोक ठरवताना दिसून येत आहेत.

रोहित पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट 88.06, तर महायुतीचा 81 टक्के होता. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीच हा रेट 30 टक्क्यांच्या आसपास होता. भाजपने या निवडणुकीत 100 आमदार किंवा त्यांच्या नातेवाईकांना संधी दिली. त्यातील 95 निवडून आले. या निवडणुकीत महायुतीला लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला. पण काही ठिकाणी ईव्हीएममध्ये फेरफार करून विजय मिळवल्याचे दिसून येत आहे. विशेषतः भाजपचे उमेदवार असलेल्या जागेवर 10 टक्के, तर अजित पवार व एकनाथ शिंदे यांचे उमेदवार उभे असलेल्या जागेवर 8 टक्के फेरफार झाल्याचा अंदाज आहे.

सोलापूरच्या गावात बॅलेट पेपरवर मतदान-सोलापूरच्या एका गावात बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे. त्यातून सत्य परिस्थिती पुढे येईल. अन्यही काही ठिकाणी भाजप उमेदवारांना एकसमान मतदान झाले आहे. हा केवळ योगायोग नाही. त्यात काहीतरी गडबड आहे. काँग्रेस ईव्हीएमच्या मुद्यावर आता पुढाकार घेत आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. उद्धव ठाकरे यांचा पक्षही या प्रकरणी सकारात्मक भूमिका घेईल असे वाटते.

आठवणीतल्या पहिल्या प्रेमाची गोष्ट ‘इलू इलू’

पहिल्या प्रेमाच्या आठवणींचा एक हळवा कोपरा प्रत्येकजण आपल्या मनात सदैव जपत असतो. मनाच्या कोपऱ्यातील या गोड आठवणी आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर सदैव आपल्या सोबत असतात. कधीतरी या गोड आठवणींनी मन हळवं होतं. त्या पहिल्या नजरेने, पहिल्या स्पर्शाने झालेलं ‘इलू इलू’ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतं. प्रेमाच्या याच अलवार भावनेची हलकी झुळूक घेऊन प्रत्येकाच्या मनात दडलेल्या पहिल्या ‘इलू इलू’ची आठवण ताजी करायला फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ हा मराठी चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘क्षण प्रेमाचे..गोड गुलाबी आठवणींचे’…असं म्हणत या चित्रपटाचे रोमँटिक मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे.   

असं म्हणतात, ‘पहिलं प्रेम माणूस कधीच विसरत नाही,’  प्रत्येकाला त्यांच्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा ‘इलू इलू’ हा चित्रपट प्रत्येकाला नक्कीच नॉस्टॅलजिक करेल असा विश्वास दिग्दर्शक अजिंक्य बापू फाळके व्यक्त करतात.    

वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात, मीरा जगन्नाथ, निशांत भावसार, श्रीकांत यादव, कमलाकर सातपुते, अंकिता लांडे,  गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे-जोशी, सिद्धेश लिंगायत हे कलाकार चित्रपटात असून हॉलीवूड आणि बॉलीवूड गाजवलेला एक लक्षवेधी चेहरा या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. हा चेहरा नेमका कोणाचा? याचा उलगडा लवकरच होणार आहे.

‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत.  छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे  यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.

ॲक्सिस बँकेतर्फे  ‘हर राह दिल से ओपन’ चे अनावरण

ग्राहक संबंध उंचावण्यात 100,000 हून अधिक कर्मचारी आणि त्यांच्या भूमिकेची ओळख

 मुंबई२ डिसेंबर २०२४,: भारतातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने त्यांच्या प्रसिद्ध ‘दिल से ओपन’ मोहिमेचा पुढचा भाग सादर केला आहे. हा नवीन टप्पा ‘हर राह दिल से ओपन’ या नावाने ओळखला जातो आणि उत्कृष्ट ग्राहक अनुभव प्रदान करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या 100,000 हून अधिक बँकर्सच्या समर्पणाला सलाम करतो. व्यवहार-केंद्रित बँकिंगच्या युगात ग्राहक-प्रथम दृष्टिकोन आणि नातेसंबंधांवर भर देणारी ही मोहीम 2019 मध्ये सुरू झाली होती. ‘दिल से ओपन’ तत्त्वज्ञानाचे मूल्य या मोहिमेच्या केंद्रस्थानी आहे. आपलेपणाची भावना, सहानुभूती, दयाळूपणा आणि खुलेपणा ही ॲक्सिस बँकेची मूल्यं या मोहिमेतून बळकट होतात.

जनरेशन Z च्या डिजिटल-प्रथम आवडीनिवडींपासून भारत आणि शहरी समुदायांच्या विशिष्ट गरजांपर्यंत, 2024 ची ही मोहीम बँकेच्या मूलभूत मूल्यांना बदलत्या गतीशीलतेशी जुळवून घेताना दाखवते. नवीन मोहीम, ‘हर राह दिल से ओपन’ ही पाच फिल्म्सच्या माध्यमातून सादर केली गेली आहे. त्यात पगारदार, ज्येष्ठ नागरिक, उद्योजक, उच्च-मूल्य वर्गीय ग्राहक आणि भारतातील ग्राहक अशा वेगवेगळ्या ग्राहक गटांवर लक्ष केंद्रित केले आहे. या फिल्म्समध्ये ॲक्सिस बँकचे कर्मचारी 5,577 शाखांच्या विस्तृत जाळ्यामधून कार्यरत राहून ग्राहकांच्या विविध प्रकारच्या  आर्थिक गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कसे कटिबद्ध आहेत हे दाखवले आहे. ही मोहिम सिटी बँकेच्या एकत्रीकरणामुळे मजबूत झालेल्या ॲक्सिस बँकेच्या कार्यशक्तीचाही उत्सव साजरा करते. त्यामुळे बँकेची ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्याची क्षमता वाढली आहे.

या घोषणेबाबत बोलताना ॲक्सिस बँकेचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर राजीव आनंद म्हणाले,  “आम्ही नेहमीच आमच्या मूल्यांशी बांधील असलेली संस्था म्हणून कार्यरत आहोत. ग्राहक-केंद्रित दृष्टीकोनासाठी असलेली आमची कटिबद्धता आमच्या अद्वितीय मूल्य प्रस्तावाचा आधार आहे. आपण सतत बदलत्या आणि आव्हानात्मक व्यावसायिक वातावरणात प्रवास करत असताना कितीही परिक्षेत्र बदलले तरी ग्राहकांना प्रथम स्थान देणारी संस्थाच नेहमी सुसंगत राहील याचा आम्हाला आत्मविश्वास आहे.”

या मोहिमेबद्दल प्रतिक्रिया देताना ॲक्सिस बँकेचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अनुप मनोहर म्हणाले, “आमची ‘दिल से ओपन’ मोहीम, ‘हर राह दिल से ओपन’ ही आमच्या बँकेला आकार देणाऱ्या मूल्यांचा आणि आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या ग्राहकांप्रति असलेल्या बांधीलकीचा उत्सव आहे. ॲक्सिस बँकेत आम्हाला विश्वास आहे की बँकिंग म्हणजे केवळ व्यवहार नाही तर ही गोष्ट मानवी संबंधांबद्दल आहे. आमच्यापैकी बरेचसे बँकर्स ग्राहकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करण्यासाठी अखंडपणे, पडद्यामागे राहून काम करतात. सध्याच्या जगात तंत्रज्ञान सगळ्या गोष्टींच्या केंद्रस्थानी असताना, महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असताना आमची कार्यशक्ती हीच खरा बदल घडवते यावर आमचा विश्वास आहे.”

जसजसे बँकिंग क्षेत्र बदलत आहे आणि ग्राहकांच्या अपेक्षा विकसित होत आहेत, तसतसे ॲक्सिस बँकेचे ‘दिल से ओपन’ तत्त्वज्ञान उत्कृष्ट ग्राहक अनुभवाच्या मुळाशी अर्थपूर्ण मानवी संबंध महत्त्वाचे असतात या विश्वासाला मजबूत करत आहे.

ही मोहीम लोवे लिंटास यांनी संकल्पित केली असून ती टीव्ही, डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडियावर चालवली जाईल.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचा ‘सल्लागार स्टॅक’ ICICI Pru Edge ने एजंट उत्पादकतेत 37% ची वाढ केली

·      व्यापक ग्राहक आधारापर्यंत पोहोचण्याच्या क्षमतेमुळे उच्च कमाई वाढवते

·      भागीदारीसाठी कंपनीला सर्वोत्तम जीवन विमा कंपनी म्हणून स्थान देते

·      98.1% पात्र सल्लागार त्याच दिवशी स्टॅक सशुल्क कमिशन वापरतात

·      अंदाजे 61% शीर्ष सल्लागार स्टॅकचे सक्रिय वापरकर्ते आहेत

·      ग्राहकांना पेपरलेस खरेदी प्रवास ऑफर करण्यासाठी सल्लागारांना सक्षम करते

मुंबई, 2 डिसेंबर, 2024: आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्सने ऑफर केलेला IPRU Edge, एक सर्वसमावेशक ‘सल्लागार स्टॅक’ मुळे H1-FY2025 मध्ये एजंट उत्पादकतेत 37% वाढ झाली आहे, परिणामी त्यांची कमाई वाढली आहे.

‘ॲडव्हायझर स्टॅक’ कंपनीच्या 2 लाख एजंट्सच्या सल्लागार नेटवर्कला त्यांचा व्यवसाय कार्यक्षमतेने वाढवण्यासाठी, ऑपरेशन्स व्यवस्थापित करण्यासाठी आणि वर्धित ग्राहक अनुभव देण्यासाठी सक्षम करते. विशेष म्हणजे, ~61% कंपनीचे शीर्ष स्तरावरील सल्लागार आता स्टॅकचे सक्रिय वापरकर्ते आहेत, त्यांच्यासाठी व्यवसायाच्या यशाचे मुख्य सक्षमकर्ता म्हणून त्यांची भूमिका अधिक भक्कम होते.

IPRU Edge, हे सहज जाता-जाता काम करण्यासारखे आहे. जे एजंटना प्रशासकीय गोष्टींमध्ये अडकवण्यापेक्षा नवीन ग्राहक संपादनांवर प्रयत्न केंद्रित करण्यास सक्षम करतात. नवीन व्यवसाय लीड्समध्ये एजंट प्रवेश मिळवतात, सोशल मीडियाद्वारे मागणी निर्माण करतात आणि ग्राहकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करतात. तसेच, ते त्यांना त्यांचा व्यवसाय आणि कमाई पाहण्यास सक्षम करते. IPRU Edge द्वारे मिळालेले हे समर्थन कंपनीला सल्लागारांसाठी भागीदारी करण्यासाठी सर्वोत्तम जीवन विमा कंपनी म्हणून स्थान देते.

OCR तंत्रज्ञानासह एम्बेड केलेला सल्लागार स्टॅक, रिअल-टाइम केवायसी प्रमाणीकरणासह पेपरलेस प्रवास सुलभ करतो ज्यामुळे कार्यक्षमता वाढते. हे लहान शहरे आणि खेड्यांमधील एजंटना मोठ्या प्रमाणात मदत करते. परिणामी, ते त्यांना ग्राहकांना त्रास-मुक्त अनुभव देतात.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे उत्पादन आणि विपणन प्रमुख श्रीनिवास बालसुब्रमण्यन म्हणाले, “ॲडव्हायझर स्टॅक किंवा आयपीआरयू एज आमच्या सल्लागार नेटवर्कला शक्तिशाली टूल्स आणि वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश देते ज्यामुळे त्यांना प्रशासकीय कामकाजाऐवजी महसूल निर्मितीच्या कामावर लक्ष केंद्रित करून त्यांचा व्यवसाय वाढविण्यात मदत होते. स्टॅक सल्लागारांना नवीन व्यवसायात लॉग इन करण्यास मदत करते, त्यांना आघाडीच्या संधी, मागणी निर्माण करणे, ग्राहक सेवा काही पर्यायांची नावे देण्यास मदत करते.

आम्हाला हे सांगण्यास आनंद होत आहे की, IPRU Edge वापरणाऱ्या सल्लागारांनी H1-FY2025 मध्ये रिटेल वेटेड प्राप्त प्रीमियममध्ये एजन्सी चॅनेलच्या योगदानामध्ये उत्पादनात 37% वाढ आणि वार्षिक 49% वाढ दर्शविली आहे.

निवडक सल्लागारांना त्याच दिवशी कमिशन देणारी आमची देशातली पहिली जीवन विमा कंपनी आहे. उल्लेखनीय म्हणजे, IPRU Edge वापरणाऱ्या पात्र एजंटांपैकी 98.1% यांना त्याच दिवशी कमिशन दिले गेले.

सर्वात वितरक-अनुकूल जीवन विमा कंपनी बनण्यासाठी, आम्ही तंत्रज्ञान उपाय लागू केले आहेत, ज्यामुळे आम्ही अंदाजे 50% पॉलिसी जारी करण्यात सक्षम झालो आहोत. H1-FY2025 मध्ये व्यवसायाच्या बचत लाइनसाठी पहिल्याच दिवशी एवढ्या पॉलिसी काढण्यात आल्या.

सल्लागार स्टॅक एजंट्सना विविध ग्राहक सेवा व्यवहार करण्यास अनुमती देतो जे ग्राहकांना सोयी प्रदान करते आणि एजंटना दीर्घकालीन मजबूत संबंध निर्माण करण्यास मदत करते.”

श्रीश्रीनिवास शेवटी म्हणाले, “याच कालावधीत आयपीआरयू एज वापरणाऱ्या सल्लागारांचे 13व्या आणि 25व्या महिन्यातील चिकाटीचे प्रमाण अनुक्रमे 91.7% आणि 89.6% होते. एकूण एजन्सी चॅनेल 13व्या आणि 25व्या महिन्याच्या सातत्य गुणोत्तरांच्या तुलनेत हे जास्त आहे जे अनुक्रमे 90.0% आणि 86.7% होते.

आम्हाला विश्वास आहे की, IPRU Edge चे यश हे कंपनीच्या सल्लागारांना विम्याच्या गरजा पूर्ण नसलेल्या उद्योगात भरभराटीसाठी सर्वोत्तम-इन-क्लास साधने आणि तंत्रज्ञान प्रदान करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे.”

सल्लागार स्टॅक प्रशिक्षण आणि विकासासाठी एक आवश्यक व्यासपीठ म्हणून देखील कार्य करते, सल्लागारांना प्रक्रिया आणि उत्पादन ऑफरशी संबंधित विशेष सामग्रीचा फायदा होतो. शिकण्यावर सतत हा फोकस ग्राहकांच्या विकसित होत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुसज्ज राहण्याची खात्री देतो. जलद डिजिटलायझेशनमुळे प्रक्रिया सुलभ करणाऱ्या, कार्यक्षमतेत सुधारणा करणाऱ्या आणि आमच्या सल्लागारांना वेगळा दृष्टिकोन प्रदान करणाऱ्या साधनांची वाढती गरज आहे.

IPRU Edge आमच्या सल्लागारांना यासह समर्थन देते:

·         नवीन व्यवसाय:

·                     व्यवसाय आणि सेवा दोन्ही संधींसाठी लीडसह मदत करते

·                     सानुकूलित उत्पादन सामग्री पोस्ट करून सोशल मीडियाद्वारे मागणी निर्माण करण्याची संधी प्रदान करते

·                     नवीन व्यवसाय लॉगिनसह सल्लागार कार्यक्षमतेत सुधारणा करते – इश्यूअन्सचा मागोवा घेणे सुरू करा

·                      सल्लागाराची क्षमता निर्माण करते – महसूल व्युत्पन्न करणाऱ्या घडामोडींमध्ये वेळ घालवते

·         स्वयंसेवा :

·                     व्यवसाय आणि कमाईचे विहंगावलोकन देते

·                     डिजिटल बिझनेस कार्ड तयार करण्याची सुविधा देते

·                      बक्षिसे आणि ओळख याविषयी माहिती देते

·         ग्राहक सेवा:

·                     सल्लागारांना शेअर पर्यायासह क्लायंट-स्तरीय पोर्टफोलिओचे सर्वसमावेशक दृश्य मिळते

·                     नूतनीकरण प्रीमियम पेमेंटसाठी स्मरणपत्रे ग्राहकांसोबत पेमेंट लिंक शेअर करण्याच्या पर्यायासह

·                     पॉलिसी दस्तऐवज, टॅक्स स्टेटमेंट, फंड व्हॅल्यू, स्विचिंग इत्यादी स्टेटमेंटसह जाता-जाता सेवा प्रदान करते.

·                      ‘माय टास्क’ टॅब वापरून कार्ये व्यवस्थापित करण्याचा पर्याय ग्राहक संवाद आणि प्रतिबद्धता प्रभावीपणे सक्षम करते

ॲप आता iOS आणि Android दोन्ही उपकरणांवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. सर्व विमा सल्लागारांना हे विनामूल्य आहे, तसेच ज्यांना त्यांच्या सेवा ऑफर आणखी वाढवण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी प्रीमियम वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

सीतारामन, रुपाणी BJP चे पक्ष निरीक्षक:विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत CM ठरवणार

मुंबई-
भाजपने अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. या दोघांच्या उपस्थितीतच महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल.या घडामोडींत भाजपवर तिसऱ्यांदा आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीची तारीख बदलण्याची वेळ आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आता ही 4 डिसेंबरला बैठक होईल. यापूर्वी ही बैठक 29 नोव्हेंबर रोजी होणार होती. पण ती ऐनवेळी 1 डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली. त्यानंतर ती 3 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण आता ती 4 तारखेला होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित केले आहे. आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला. त्यात भाजप, शिवसेना, व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला 230 जागा मिळाल्या. म्हणजे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 145 च्या जादुई आकड्याहून 85 जास्त जागा. पण आता निकाल लागून 9 दिवस लोटलेत. पण महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला आपणच मुख्यमंत्रीपदी हवे असल्याचे ठणकावून सांगितले आहे. ते इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, ‘मी सर्वसामान्यांसाठी काम करतो. मी जनतेचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मीच व्हावे अशी जनतेची इच्छा आहे.’ एकनाथ शिंदे यांनी आजच्या आपल्या सर्वच बैठका रद्द केल्या आहेत. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार दिल्लीला रवाना झालेत. त्यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीसही दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. हो दोन्ही नेते संभाव्य मंत्र्यांची यादी व त्यांच्या रिपोर्ट कार्डची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करतील. यापूर्वी 28 नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे, फडणवीस आणि पवार हे तिघेही दिल्लीला गेले होते.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 30 नोव्हेंबर रोजी नागपुरात सांगितले होते की, नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. पंतप्रधान मोदी स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

केनडियर बाय कल्याण ज्वेलर्सने हिंजवडीमध्ये नवे स्टोर सुरु करून पुण्यामध्ये विस्ताराची आगेकूच कायम राखली

हिंजवडी२ डिसेंबर,२०२४केनडियरकल्याण ज्वेलर्सचा हा ब्रँड ट्रेंडी  आधुनिक डिझाइन्ससाठी सुप्रसिद्ध आहेया लाइफस्टाइल ज्वेलरी ब्रँडने हिंजवडीमध्ये आपले नवीन शोरूम सुरु केले आहेपुण्यामध्ये हिंजवडीच्या गजबजलेल्या टर्मिनल वन भागात सुरु करण्यात आलेले हे पुणे शहरातील दुसरे आणि भारतातील ४९ वे केनडियर स्टोर आहे.

वजनाला हलकेबहुउपयोगी आणि जेन झेडनोकरीव्यवसाय करणाऱ्या महिला आणि फॅशनफॉरवर्ड पुरुषांची आवडनिवडगरजा लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आलेले दागिने ही केनडियरची ओळख आहेयाठिकाणी प्रत्येक दागिन्यांमध्ये आधुनिक स्टाईल आणि परवडण्याजोग्या किमती यांची सांगड घालण्यात आली आहेग्राहकांसाठी हे दागिने म्हणजे स्वअभिव्यक्तीचे सहजसोपे माध्यम आहेतफक्त १०,००० रुपयांपासून सुरु होणाऱ्या किमती असलेल्या केनडियर कलेक्शनमध्ये अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध करवून देण्यात आले आहेतविचारपूर्वक दिली जाणारी भेट म्हणूनप्रत्येक प्रसंग कायमचा आठवणीत राहावा यासाठी हे दागिने अगदी सुयोग्य आहेत.

हिंजवडीमध्ये नवीन शोरूमचे उदघाटन ब्रँड विस्तार आणि वृद्धीबरोबरीनेच ग्राहकांसाठी आग्रहाचे आमंत्रण आहे की त्यांनी याठिकाणी येऊन अशा दागिन्यांच्या खरेदीचा आनंद घ्यावा ज्यांना शैली आणि अर्थ यांचा मिलाप करून तयार करण्यात आले आहेहे स्टोर आपल्याला एका नव्या जगात घेऊन जातेयाठिकाणी तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्वआवडनिवडजीवनशैली यांना अनुरूप दागिने मिळतात.

नवीन स्टोरच्या निमित्ताने केनडियरने एका विशेष लॉन्च ऑफरची देखील घोषणा केली आहेडायमंड मेकिंग चार्जेसवर १००पर्यंतची सूटसर्वात कमी गोल्ड रेटगोल्ड मेकिंग चार्जेसवर ५०पर्यंतची सूट आणि प्लॅटिनम मेकिंग चार्जेसवर ५०पर्यंतची सूट मिळवण्याची सुवर्णसंधी ब्रँडने उपलब्ध करवून दिली आहेसॉलिटेयर खरेदी करायचे असतील तर स्टोनच्या किमतींवर ३०पर्यंतची सूट देखील मिळू शकतेआधुनिक दागिन्यांची नवी व्याख्या रचणारे आणि ऑफर्सना अजूनचबनवणारे कलेक्शन खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे.

डिजिटलफर्स्ट ब्रँड ते ओम्नीचॅनेल रिटेलरपर्यंतच्या या प्रवासातकेनडियरने आपल्या ग्राहकांनाऑनलाईन  ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर अतिशय सुविधाजनक खरेदी अनुभव प्रदान करण्याची बांधिलकी कायम राखली आहेकल्याण ज्वेलर्सच्या मजबूत समर्थनासह केनडियरने आपले विस्ताराचे आणि सजावटीबरोबरीनेच वैयक्तिक स्टाईल  स्वयंअभिव्यक्तीचा अभिन्न भाग बनणारे दागिने प्रस्तुत करण्याचे मिशन सुरु ठेवले आहे.

हिंजवडीमध्ये नवीन स्टोरसहकेनडियरने ग्राहकांना वेगवेगळी आवडनिवड पूर्ण करणारेअतिशय आकर्षक आणि अनोखे दागिने प्रस्तुत करण्याची बांधिलकी कायम राखली आहेयाठिकाणी प्रत्येक दागिना स्टाईलची कहाणी सांगतो आणि तुमच्या जीवनातील खास क्षणांचा अविभाज्य भाग बनतो

ताहिर राज भसीनचा हिट शो : ‘ये काली काली आंखें 2’ 10 देशांत गाजतोय

प्रेक्षकांना आता सिझन ३ ची प्रतीक्षा – २ आणायला किती उशीर केला अशीही तक्रार

गेल्या शुक्रवारी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला ‘ये काली काली आंखें’ सीझन 2 ..

गुन्हा, प्रेम, वेड आणि हत्येच्या जबरदस्त मिश्रणाने प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. सध्या हा शो भारत, बहरेन, मालदीव, मॉरिशस, यूएई, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, कतर आणि ओमान अशा 10 देशांत ट्रेंडमध्ये आहे, जे याच्या जागतिक लोकप्रियतेचे आणि कथानकाच्या तीव्रतेचे द्योतक आहे.

या शोच्या केंद्रस्थानी ताहिर राज भसीन याचा दमदार अभिनय आहे, जो एका अशा व्यक्तीची भूमिका साकारतो, जो सतत धोके आणि असहायतेचा चक्रात अडकलेला असतो. त्याच पात्र एक सामान्य व्यक्तीच्या आतून बदल होत जाण्याचा त्रासदायक प्रवास दाखवतो, जो बाहेरील धोके आणि अंतर्गत संघर्षामुळे ग्रस्त आहे. जसजसे प्रसंग गंभीर होतात आणि प्रेम व वेडामध्ये सीमारेषा अस्पष्ट होतात, तसतसे प्रेक्षकांना थरारक, भावनांनी भरलेला आणि अनपेक्षित वळणांचा प्रवास अनुभवायला मिळतो.

ताहिर म्हणतो, “पहिल्या सीझनच्या प्रचंड यशानंतर, ज्याने जागतिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले, दुसऱ्या सीझनला 10 देशांमध्ये अधिक प्रेम आणि कौतुक मिळणे हे माझ्यासाठी कलाकार म्हणून अत्यंत सन्मानजनक आहे. दुसरा सीझन बनवताना, पहिल्या यशाच्या अपेक्षांना सामोरे जाण्याचा ताण असतो, पण आम्हाला आनंद आहे की आम्ही सीझन 2 च्या ‘कर्स’ ला तोडले आणि आमच्या चाहत्यांचे उत्तम मनोरंजन केले. या सिक्वेलसाठी मिळालेला प्रचंड प्रतिसाद खूप उत्साहवर्धक आहे.”

तो पुढे म्हणाला,
“माझ्या सहकलाकारांचे आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार, ज्यांच्या मेहनतीमुळे हा प्रवास अविस्मरणीय झाला. हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत समृद्ध करणारा होता, आणि भविष्यात आणखी दमदार कथा सादर करण्याची संधी मिळण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.”

सीझन 2 पात्रांच्या गुंतागुंतींना आणखी खोलवर नेतो. ताहिरचा अभिनय भीती, अस्तित्वासाठी संघर्ष, आणि भ्रष्टाचार व फसवणुकीने भरलेल्या जगात घेतलेल्या निर्णयांचे परिणाम या सर्वांचा प्रभावी प्रवास दर्शवतो. या शोची गडद थीम इतक्या तीव्रतेने मांडण्याची क्षमता याला क्राइम थ्रिलर श्रेणीत वेगळं स्थान मिळवून देते आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवते.

सिझन १ आणि २ चे सर्व भाग एकाच वेळी लागोपाठ लोकांनी पहिले आणि आता सिझन ३ ची देखील प्रतीक्षा करत आहेत . मुळात लोकांना सिझन २ साठी खूपच प्रतीक्षा करावी लागली .. आता ३ तरी कधी आणणार असा लोकांचा सवाल आहे.

(Sharad Lonkar)

EVM हॅक करण्याचा दावा करणाऱ्यावर FIR:आरोपी म्हणाला होता – 53 कोटी द्या, महाराष्ट्रात 63 जागांवर EVM हॅक करू

मस्क म्हणाले होते- ईव्हीएम हॅक होऊ शकते

राहुल गांधी म्हणाले होते – भारतातील ईव्हीएम ब्लॅक बॉक्ससारखे

मुंबई-इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) हॅक केल्याचा दावा करणाऱ्या सय्यद शुजाविरोधात निवडणूक आयोगाने एफआयआर दाखल केला आहे. 30 नोव्हेंबर रोजी दक्षिण मुंबईतील सायबर पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) आणि IT कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.14 नोव्हेंबरला सय्यद शुजाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये तो महाराष्ट्र निवडणुकीत वापरण्यात येणारे ईव्हीएम हॅक करू शकतो, असा दावा करत होता. 53 कोटी रुपये दिले तर 63 जागांचे ईव्हीएम हॅक करू, अशी ऑफरही त्यांनी नेत्यांना दिली होती.सय्यद शुजा हैदराबाद येथील सायबर सुरक्षा संशोधक आहेत. सध्या तो कॅनडामध्ये आहे.

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) म्हणाले की, ईव्हीएम हॅकिंगचे दावे निराधार, खोटे आणि अप्रमाणित आहेत.महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान सय्यद शुजा यांनी निवडणूक जिंकण्यासाठी काही नेत्यांशी संपर्क साधला होता. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून तो ईव्हीएम हॅक करू शकतो, असा दावा त्याने केला होता. त्यासाठी तो पैसे घेईल. तो अमेरिकेच्या संरक्षण खात्यात कंत्राटावर काम करत असल्याचेही शुजाने सांगितले होते.सय्यद शुजा यांनी 21 जानेवारी 2019 रोजी लंडनमध्ये इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन (IJA) च्या पत्रकार परिषदेतही असाच दावा केला होता. आपण 2009 ते 2014 पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ICIL) मध्ये काम केल्याचे शुजाने सांगितले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन बनवणाऱ्या टीमचा तो एक भाग होता. एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा वापर करून या मशीन्समध्ये छेडछाड केली जाऊ शकते, असे त्याने सांगितले होते.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम हॅक करण्यात आले हाते आणि त्यावरच भाजपने विजय मिळवला होता, असा दावा शुजा याने केला होता. काँग्रेसचे माजी नेते कपिल सिब्बल यांनी या दाव्यांचा मुद्दा बनवून ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले होते.2019 मध्येही निवडणूक आयोगाने शुजाविरोधात दिल्लीत एफआयआर दाखल केला होता. मात्र, त्यानंतर या प्रकरणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. तर, ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असून वायफाय किंवा ब्लूटूथसह कोणत्याही नेटवर्कशी कनेक्ट केले जाऊ शकत नाहीत, असे निवडणूक आयोगाने म्हटले होते

मस्क म्हणाले होते- ईव्हीएम हॅक होऊ शकते
जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलोन मस्क यांनी 15 जून रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फॉर्म एक्सवर लिहिले होते – ईव्हीएम रद्द केले पाहिजे. हे मानव किंवा AI द्वारे हॅक होण्याचा धोका आहे. हा धोका कमी असला तरी तो खूप जास्त आहे. अमेरिकेत यातून मतदान होऊ नये.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील मस्क यांच्या पोस्टला रिपोस्ट करत म्हटले होते की, भारतातील ईव्हीएम ब्लॅक बॉक्ससारखे आहेत. त्याची चौकशी करण्याची कोणालाही परवानगी नाही. आमच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाही एक ढोंग बनते आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते.

सर्वोच्च न्यायालय आणि सत्ताधारी यांनी भारतातील EVM वर अनेक वेळा विश्वास व्यक्त केला भाजप नेते आणि माजी आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले, मस्कच्या मते, कोणीही सुरक्षित डिजिटल हार्डवेअर बनवू शकत नाही, हे चुकीचे आहे. त्यांचे विधान यूएस आणि इतरत्र लागू होऊ शकते, जिथे ते इंटरनेट-कनेक्टेड मतदान यंत्रे तयार करण्यासाठी नियमित संगणकीय प्लॅटफॉर्म वापरतात.भारतीय ईव्हीएम सुरक्षित आहेत आणि कोणत्याही नेटवर्क किंवा मीडिया पेक्षा वेगळे आहेत. त्याला कोणती कनेक्टिव्हिटी, ब्लूटूथ, वायफाय, इंटरनेट नाही. त्यामुळे त्याला हॅक करायचा कोणताही मार्ग नाही. फॅक्टरी प्रोग्राम केलेले नियंत्रक असतात, जे पुन्हा प्रोग्राम केले जाऊ शकत नाहीत. ईव्हीएमची रचना भारतात तशीच केली आहे. भारतात ते हॅक करणे शक्य नाही.या वर्षी एप्रिलमध्ये, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) मते आणि व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) स्लिप्सच्या 100% क्रॉस-चेकिंगच्या मागणीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या मागणीशी संबंधित याचिका सर्वोच्च न्यायालयात फेटाळण्यात आल्या. याशिवाय अनेक राजकीय पक्षांशी संबंधित लोक ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अनेकवेळा ईव्हीएमवर विश्वास व्यक्त केला आहे.

उरी पेक्षा मोठ्या गोष्टी करणे भारताला शक्य: निंभोरकर

पुणे :

मनुष्यबळ विकास (एचआर)आणि व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘ओएचआर फाउंडेशन ‘च्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्या ‘अनटोल्ड स्टोरी: सर्जिकल स्ट्राईक – उरी’ या विषयावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.निंभोरकर हे उरी सर्जिकल स्ट्राईकमधील नेतृत्वासाठी प्रसिद्ध आहेत.

हे व्याख्यान शनिवार,दि. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६:३० वाजता, काळे सभागृह, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, बीएमसीसी रस्ता, (डेक्कन, पुणे)येथे झाले.प्रवेश मोफत होता.फाउंडेशनतर्फे वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी प्रेरक व्याख्यानांचे आयोजन केले जाते.

जितेंद्र पेंडसे यांनी प्रास्ताविक केले, उपक्रमांची माहिती दिली. महेश करंदेकर,मिलिंद काळे, बिपीन घाटे ,प्रशांत इथापे, विश्वस्त उपस्थित होते. सुक्रीती छेत्री यांनी सूत्रसंचालन केले.

राजेंद्र निंभोरकर म्हणाले,’उरी सर्जिकल स्ट्राईक पहाटे करताना भारतीय सैन्यदलाने अचूक नियोजनाचा कळस करून दाखविला.अशा कामगिरीच्या वेळी सर्व प्रकारच्या हानी बरोबरच देशाची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते.मनोहर पर्रीकर यांच्यासारखा संरक्षणमंत्री असल्याने उरी सर्जिकल स्ट्राईक करणे हे शक्य झाले.त्या हल्ल्याचे थर्मल कॅमेर्‍याने चित्रीकरण केल्याने तो स्ट्राईक फर्जिकल नव्हता,हे सिद्ध करता आले. भारताने ही कामगिरी यशस्वी केल्याने जगात मान उंचावली. त्यानंतर २६/११ सारखे प्रकार झाले नाहीत.उरी पेक्षा मोठ्या गोष्टी करणे भारताला शक्य आहे.पण,त्या कोणत्या हे कोणीही सांगू शकत नाही.

मनुष्य बळ विकास हे अतिशय अवघड काम आहे.ते कौशल्यपूर्ण पद्धतीने करावे लागते. आपल्याकडील संसाधने वाचवावी लागतात. युद्धपरिस्थितीत नेत्यालाच चांगले निर्णय सुचतात, असे नाही,तर हाताखालील कनिष्ठ देखील निर्णयप्रक्रियेत मदत करतात. नेतृत्व करणे कोणत्याही क्षेत्रात सोपे नसते.शत्रूला बेसावध ठेवणे,चकित करणे महत्वाचे असते.वेळ साधणे महत्वाचे असते,असेही ते म्हणाले.

सैन्य दलाइतकी धर्मनिरपेक्ष व्यवस्था दुसरी कोणतीही नाही.आपण आपल्या सैन्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. त्यांच्या कामगिरी बदल प्रश्न उपस्थित करणे योग्य नसते.शाबासकीचा हात पुरेसा असतो,पारितोषिकांची गरज नसते,असे निंभोरकर यांनी नमूद केले.

भूदलाने सप्टेंबर २०१६मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे निंभोरकर हे मुख्य नियोजनकर्ता होते, तो हल्ला त्यांच्याच नेतृत्वात करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर या व्याख्यानात त्यांनी देशाच्या लष्कराने लढलेले युद्ध व त्याची फलनिष्पत्ती, देशाच्या शस्त्रसामग्रीची सज्जता व उत्पादन स्थिती, सर्जिकल स्ट्राइकनंतर बदललेली मानसिकता यावर त्यांनी भाष्य केले.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय सैन्य दलाविषयी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.निंभोरकर यांचा आयोजकानी सत्कार केला.
ओएचआर फाउंडेशन ११ व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या दशकभरापासून, हे ज्ञानवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरले आहे, जे एचआर व्यावसायिक, कार्यकारी नेतृत्व आणि प्रतिष्ठित योगदानकर्त्यांना एकत्र आणते. २०१३ मध्ये स्थापनेपासून, ओएचआर फाउंडेशनने व्यावसायिक प्रगती आणि ज्ञानविनिमयाला प्रोत्साहन देण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवली आहे. हा ऐतिहासिक कार्यक्रम एचआर व्यावसायिक, प्रायोजक आणि कार्यकारी टीम सदस्यांच्या सातत्यपूर्ण योगदानातून साकार होत आहे. दोन हजाराहून अधिक सदस्य आहेत,अशी माहिती देण्यात आली.