Home Blog Page 710

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलला प्रथम तर द्वितीय क्रमांक कोथरूडच्या भारतीय विद्या भवनला,आणि सिद्धिविनायक योग प्रसारक संस्थेला तिसरा क्रमांक

पुणे- सध्याच्या डिजिटल युगामध्ये लहान मुलांमधील वाढते मोबाईलचे प्रमाण आरोग्यास हानिकारक आहे. लहान मुलांना व्यायाम आणि योगा याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी क्रीडा सेल आणि सीएफसी योगा कमिटीतर्फे भव्य राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धांमध्ये केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल ला प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक कोथरूड येथील भारतीय विद्या भवनला, तर सिद्धिविनायक योग प्रसारक संस्थेला तिसरा क्रमांक मिळाला.
पुण्यातील शिवाजी मराठा सोसायटीच्या महाविद्यालयामध्ये या स्पर्धा भरवल्या होत्या. योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा मुलांना निरोगी आणि मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी योगामध्ये आवड निर्माण व्हावी असा हा या स्पर्धेचा उद्देश होता.
यामध्ये योगाचार्य योग साधक आणि पालक वर्ग सहभागी झाले होते. आठ वर्षापासून ते साठ वर्षापर्यंत या वयोगटातील स्पर्धा आयोजित केल्या होत्या.सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र अण्णा देशमुख,अरविंद साळवे,योगाचार्य विनायक मुसळे शिवाजी घोडके, नितीन बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेमध्ये लॉटरी पद्धतीने तसेच ऐच्छिक योगासने सादर करण्यात आली.

पुनीत बालन यांच्या पाठीमागे कोण ?.. ते कवितेत सांगितले मंत्री आठवलेंनी

पुणे- केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज पुण्यातील भाऊ रंगारी गणपती चे दर्शन घेतले . यावेळी त्यांनी भाऊ रंगारीच्या गणेश मूर्तीच्या उद्देशाबद्दल आणि एकूणच उत्सवाच्या उद्देशाबद्दल वक्तव्ये केली आणि पत्रकारांच्या आग्रहावरून कविता सादर करतांना थेट पुनुत बालन यांच्या पाठीमागे कोण आहे ते सांगितले ते ऐका त्यांच्याच शब्दात ….

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,’मानाच्या गणपतीत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती

पुनीत बालन यांच्या कार्याचे केले कौतुक

पुणे-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.१०) श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पुनीत बालन यांच्या कार्याचे कौतुकही केले.पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर या वेळी त्यांच्या समवेत होते. माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “कसबा मानाचा पहिला गणपती … अन … मानाच्या गणपतीत या गणपतीचा समावेश होतो ..खरंतर मी मधल्या काळात पुनीत बालन यांनी लक्ष देऊन ज्या पद्धतीने हेरिटेजचे काम झाले, मी स्वतः त्याचे काम बघितले, मला ते मनापासून आवडलं.आपल्या पूर्वजांनी आपल्या बापजाद्यांनी काही गोष्टी त्याकाळात सुरु केलेल्या आहेत. त्या पुढे तशाच पद्धतीने जतन झाल्या पाहिजेत. त्यावेळचे लाकूड, किंवा हेरिटेजचे कोरीव काम वैगरे तसंच ते ठेवलं गेलं पाहिजे या मताचा मी नेहमी राहिलो आहे.

मधल्या काळात मी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात भेट दिली. ज्यावेळी काही गोष्टी बघितल्या त्या खरोखरच सर्व पुणेकरांना महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा पद्धतीच्या आहेत. त्यामुळे भाविकही मोठ्या प्रमाणावर येत असतात. ही एक चांगली परंपरा आहे, जातीय सलोखा निर्माण होतो, एकोपा निर्माण होतो, सर्वजण आनंदाने या उत्सवात सहभागी होतात, असेही अजित पवार म्हणाले.

सात वर्षापासुन खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीच्या आवळल्या मुसक्या

पुणे- खून करून ७ वर्षापासून फरार असलेल्या सुनिल लक्ष्मण पवार, वय ३४ वर्षे, रा. सोमनाथ मंडळाजवळ, लालचाळ झोपडपट्टी, गोखलेनगर, पुणे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पोलिसांनी अखेरीस पकडले आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे अभिलेखावरील तसेच चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर कडील गुन्हा रजि नं ४८२/२०१७, भा.दं. वि. कलम ३०२,३०७,५०४ तसेच चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन कडील इतर चार गुन्ह्यातील रेकॉर्डवरील हा फरार आरोपी गुन्हा, केल्यापासून गेले ७ वर्षे तो फरार होता. न्यायालयाने त्याचे अटकेबाबत वॉरंट काढून तो न्यायालयात हजर झाला नाही. त्यानंतर न्यायालयाने त्यास फरार घोषित केले होते.
त्याअनुषंगाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस अंमलदार बाळु गायकवाड व महेश पाटील यांना वरील गुन्हयातील व मा. न्यायालयाने घोषित केलेला फरार असलेला नमूद आरोपी हा मांडवी पाडा काशिगाव तालुका जिल्हा ठाणे येथे स्वतःचे अस्तित्व लपवुन राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.त्याप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकाकडील सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस अंमलदार गायकवाड, महेश पाटील व साईकुमार कारके असे मांडवी पाडा, काशिगाव, ता. जि. ठाणे येथे वेशांतर करुन सापळा रचून ०७ वर्षापासुन भा.द.वि.कलम ३०२,३०७,५०४ या गुन्हयात फरारी असलेला आरोपी नामे सुनिल लक्ष्मण पवार, हा पळुन जात असताना त्यास पाठलाग करुन पकडुन त्यास ताब्यात घेतले व त्याचेकडे चौकशी करता तो यापुर्वी छत्रपती संभाजीनगर, रांजणगाव असे वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे नाव बदलुन रहात असलेबाबत सांगितले. सदर आरोपीस पुढील कारवाईकरीता चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे १) गणेश इंगळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ नंदकुमार बिडवई, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काकुखे, पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, महेश पाटील, साईकुमार कारके, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, रविंद्र लोखंडे, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, अजित शिंदे, गणेश गोसावी, अमित गद्रे, नारायण बनकर, म.पो.अंमलदार मनिषा पुकाळे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे

ड्रायव्हींग लायसन्सच्या ‘स्मार्ट कार्ड’ रूपांतरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

0

मुंबई, दि. १० : ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या वाहन चालकांनी मानवी हस्ते अनुज्ञप्ती प्राप्त केली आहे, अशा वाहन चालकांनी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत अनुज्ञप्तीचे (ड्रायव्हींग लायसन्स) संगणक प्रणालीद्वारे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले आहे.

१५ सप्टेंबर नंतर मानवी हस्ते प्राप्त झालेल्या अभिलेखाचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरण केले जाणार नाही याची अनुज्ञप्ती धारकांनी नोंद घ्यावी. मुंबई (मध्य) ताडदेव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) परिसरात कार्यालयीन इमारतीचे बांधकाम, आय ॲण्ड सी सेंटर, वाहन चालक प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम होणार आहे. या कार्यालयाकडून नोव्हेंबर २००६ पूर्वी जारी करण्यात आलेल्या सर्व अनुज्ञप्ती धारकांना अनुज्ञप्ती मानवी स्वरूपातच आहे. अशा अनुज्ञप्ती धारकांनी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत या कार्यालयामध्ये येऊन आपले अनुज्ञप्तीचे संगणक प्रणालीमध्ये बॅकलॉग करून घ्यावे व अभिलेखाचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

‘जंगल्या’च्या खुनाचा कट उधळला; खूनाच्या तयारीत असलेली टोळी गजाआड

पुणे: स्वारगेट, लोहियानगर, भवानी पेठ परिसरातील कुख्यात गुन्हेगार विशाल सातपुते उर्फ ‘जंगल्या’ याच्या खुनाचा कट उधळण्यात पोलिसांना यश आले. त्याचा खून करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गजाआड करण्यात आले आहे.

लोणीकंद पोलिसांनी सात जणांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून सात पिस्तुले आणि २३ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सातपुते याने एकेकाळचा त्याचा साथीदार आणि स्वारगेट भागातील लाईन बॉय गुंड कुणाल पोळ याचा खून केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी हा कट रचण्यात आला होता.

शुभम उर्फ मॅटर अनिल जगताप (वय २७), सुमित उत्तरेश्वर जाधव (वय २६), अमित म्हस्कू अवचरे (वय २७), ओंकार उर्फ भैय्या अशोक जाधव (वय २४), अजय उर्फ सागर बाळकृष्ण हेगडे (वय २७), राज बसवराज स्वामी (वय २६), लतिकेश गौतम पोळ (वय २२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी स्वारगेट आणि लोहियानगर भागात राहणारे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी सासवड येथून दहिहंडीचा कार्यक्रम संपवून घरी निघालेल्या गुंडावर कोलवडी परिसरात हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. हा हल्ला सुमित जाधव आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली होती. आरोपी सुमित हा स्वारगेट परिसरात सक्रिय असलेल्या एन्जाॅय ग्रुपचा सदस्य आहे. आरोपींच्या शोधासाठी चाकण, पिंपरी चिंचवड, मुळशी परिसरात एक पथक पाठविण्यात आले होते. तर, दुसरे पथक सासवड, हडपसर, कोंढवा, कात्रज भागात पाठविण्यात आले होते. आरोपी हडपसर येथे भेकराईनगरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलीस या भागात तळ ठोकून होते.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त हिम्मत जाधव, साहाय्यक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, संदीप तिकोणे, कैलास साळुंके, स्वप्नील जाधव, अजित फरांदे, सागर जगताप आणि पथकाने कारवाई करून आरोपींना पकडले. सुरुवातीला शुभम आणि सुमित या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्य आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अवचरे आणि हेगडे या दोघांकडून सुरुवातीला दोन पिस्तुले आणि ९ काडतुसे जप्त करण्यात आली. त्यांची पोलीस कोठडी मिळवण्यात आली. या कालावधीत त्यांच्याकडून आणखी ३ पिस्तुले आणि १४ काडतुसे आणि ७ मोबाईल जप्त करण्यात आले.

नेहरू रस्त्यावरील सम्राट हॉटेलमध्ये कुणाल पोळ याचा पाच वर्षांपूर्वी खून करण्यात आला होता. विशाल उर्फ जंगल्या सातपुतेच्या साथीदारांनी त्याचा खून केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयामधून जंगल्याची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता झाली होती. मात्र, पोळच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचे साथीदार तयार होते. जंगल्याच्या खुनासाठी आरोपी सुमित आणि त्याच्या साथीदारांनी कट रचत शस्त्रांची जमवाजमव केली होती.

चुकीचा इतिहास दाखविणाऱ्या ‘Emergency’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवा -शीख हेल्पलाइन फाऊंडेशन

पुणे- कंगना रणौत दिग्दर्शित ‘इमर्जन्सी’ या आगामी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी पुणे आयुक्त कार्यालयाने त्वरित हस्तक्षेप करण्याचे आवाहन शीख हेल्पलाइन फाऊंडेशनचे संस्थापक राज सिंग यांनी केले आहे. ही तातडीची विनंती शीख समुदायाच्या वतीने आहे. जे चित्रपटातील संत जर्नेल सिंग भिंद्रनवाले आणि इतर शीख व्यक्तींच्या आक्षेपार्ह आणि वस्तुस्थितीनुसार चुकीच्या चित्रणामुळे व्यथित आहेत.असे राज सिंग यांनी म्हटले आहे.

त्यांनी पुढे असे म्हटले आहेकी,’ पुण्यातील मल्टिप्लेक्समध्ये आणीबाणीसाठी प्रचारात्मक बॅनर लावण्यात आले आहेत, ज्यामुळे शीख इतिहास आणि संस्कृतीचे चुकीचे चित्रण करण्यात आले आहे. वेगळ्या शीख राज्याच्या बदल्यात भिंद्रनवाले हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी वाटाघाटीत सामील होते, असे या चित्रपटात चुकीचे दाखवले आहे. ऐतिहासिक तथ्यांचा हा घोर विपर्यास केवळ शीख समुदायाच्या भावना दुखावत नाही तर आपल्या नेत्यांच्या वारशालाही बदनाम करतो, खोटी आणि फूट पाडणारी कथा तयार करतो.

शिख हेल्पलाइन फाऊंडेशन या चुकीच्या माहितीवर कठोर कारवाई करण्यास तयार आहे. चित्रपटात मांडलेल्या कथेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि आमच्या चिंतेकडे लक्ष न देता रिलीज पुढे गेल्यास पुण्यातील मल्टिप्लेक्सबाहेर निदर्शने करण्याचा आमचा मानस आहे. शीख समुदायाच्या चुकीच्या चित्रणामुळे अशांतता निर्माण होण्याचा आणि सांप्रदायिक सौहार्दाला धोका निर्माण होतो.आम्ही या प्रकरणात आपल्या त्वरित हस्तक्षेपाची विनंती करतो आहोत.

शहर आणि मल्टिप्लेक्समध्ये फिरणारे बॅनर आणि प्रचारात्मक साहित्य तपासा, जे शीख समुदायामध्ये संताप वाढवत आहेत.लोकांना दाखविण्यापूर्वी असे हानिकारक चित्रण दुरुस्त केले जातील याची खात्री करण्यासाठी शीख समुदायाच्या नेत्यांशी सहयोग करा.सांप्रदायिक शांततेला कोणताही संभाव्य व्यत्यय टाळण्यासाठी योग्य अधिकाऱ्यांकडून चित्रपटाचे सखोल पुनरावलोकन केले जाईल याची खात्री करा.देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्याचा शिखांचा मोठा आणि अभिमानास्पद इतिहास आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आपल्या अमूल्य योगदानापासून ते राष्ट्राच्या संरक्षणातील आपल्या शूर बलिदानापर्यंत, शीख समुदाय नेहमीच एकता, समानता आणि सर्वांच्या कल्याणासाठी उभा राहिला आहे. कारगिल युद्ध, पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध यासह प्रत्येक मोठ्या संघर्षात शीख सैनिकांनी पराक्रमाने लढा दिला आहे. शीख नेते आणि कार्यकर्ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीत आघाडीवर होते आणि आमचा समुदाय कृषी, व्यवसाय आणि सार्वजनिक सेवेसह प्रत्येक क्षेत्रात भारताच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीत योगदान देत आहे.

आम्ही पुणे पोलिसांना विनंती करतो की या चित्रपटामुळे आमच्या समाजाच्या वारशाचे नुकसान होणार नाही किंवा समाजात फूट पडणार नाही याची खात्री करण्यासाठी त्वरित आणि योग्य कारवाई करावी. कोणतीही कारवाई न केल्यास, आम्ही शीख समुदायाच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी आणि शहराच्या शांततेचे रक्षण करण्यासाठी आमचे निषेधाचे प्रयत्न वाढवू. असेही राज सिंग यांनी म्हटले आहे.

वक्फ बोर्डाचे दुरुस्ती विधेयक रद्द करा- ऑल इंडिया औकाफ ट्रस्टीज असोसिएशनच्या राष्ट्रीय परिषदेत मागणी

पुणे : मुस्लिमांनी देणगी म्हणून दिलेल्या संपत्ती किंवा मालमत्तांचे व्यवस्थापन करण्याचे काम ट्रस्टी व त्यावर गिराणी त्या-त्या राज्यातील वक्फ बोर्ड करतात. बोर्डचे कामकाज संसदेने पारित केलेल्या वक्फ कायदा १९९५च्या तरतुदीनुसार केले जाते. परंतु, २०१४ नंतर आलेल्या केंद्रातील भाजप सरकारने जे मुस्लिम विरोधी कायदे व निर्णय घेतले यास ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड यांच्या चुकीच्या धोरणामुळे हि परिस्थिती समाजावर ओढावली आलेली आहे. वक्फ संस्था तसेच अनेक कायदेशीर बाबींबाबत प्रसारमाध्यमांद्वारे हेतूपुरस्सर गैरसमज पसरवित आहे. वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकातून मुस्लिमांच्या हक्काच्या वक्फ बोर्डाच्या मालमत्ता केंद्र सरकार हडप करण्याचा डाव आखत आहे. त्यामुळे वक्फ बोर्डाचे दुरुस्ती विधेयक रद्द करण्यात यावे, असा सूर ल इंडिया औकाफ ट्रस्टीज असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने वक्फ दुरुस्ती विधेयकावर झालेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला.

ऑल इंडिया औकाफ ट्रस्टीज असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने वक्फ(दुरुस्ती) विधेयक २०२४ यावर पुण्यात राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे जनरल सेक्रेटरी हजरत मौलाना फजलूर-रहिम मुजद्दिदी, माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, अॅड. मेहमूद प्राचा, मो. खालीद खान, जॉईंट सेक्रेटरी राज्यसभा, मौलाना निजामुद्दीन फक्रुद्दीन, , मौलाना रजिन अशरफी, सुफियान पठाण, महेबूब सय्यद, मुनिसा बुशरा आबेदी, नझीर भाई तांबोळी, ॲङ एम. एम. सय्यद, डॉ. राही काझी, ॲङ अयुब ईलाही बख्श, डॉ. अन्वर हुसेन, डॉ. अझीमोदिन, विठ्ठल पवारराजे, राजेंद्र गायकवाड, आदींनी मार्गदर्शन केले.

वक्फ बोर्डाचे कामकाज संसदेने पारित केलेल्या वक्फ कायदा १९९५ च्या तरतुदीनुसार केले जाते. वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकातून मुस्लिमांच्या हक्काच्या वक्फ बोर्डाच्या मालमत्ता केंद्र सरकार हडप करण्याचा डाव आखत आहे. त्यामुळे वक्फ दुरुस्ती विद्येयकातील तरतुदी रद्द करण्यात यावे, असा सूर ऑल इंडिया औकाफ ट्रस्टीज असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने झालेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला.

मो. खालीद खान म्हणाले, वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेले आहेत. अनेक जमिनी इनाम म्हणून दिल्या गेल्या आहेत, शेती काही ठिकाणी केली जाते याशिवाय अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. एक ठिकाणी सीईओ नाहीत यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे, ही नवीन बिलाने होणार नाही. नविन विधेयक नविन दुरुस्तीने वक्फ बोर्ड कमकुवत करणारे ठरेल, आणि वक्फ च्या संपत्तीची संख्या लाखोंवरून काही हजारत येईल.

बी. जी. कोळसे पाटील म्हणाले, केंद्रातील सरकार दलित, आदिवासी आणि मुस्लिम विरोधी धोरणे राबवत आहे. वक्फ विधेयक त्याचाच एक भाग आहे. काही मुस्लिमांना सुद्धा सक्षम वक्फ बोर्ड नको आहे त्याचा फायदा भाजप उचलत आहे. वक्फ बोर्ड सक्षम आणि स्वतंत्र पाहिजे. तसेच सरकार विरोधात तुम्हाला सर्वांची साथ हवी असेल तर स्थानिक लोकांमध्ये जा, त्यांच्याशी त्यांच्या भाषेत चर्चा करा, आज कार्यक्रम महाराष्ट्रात होत आहे मात्र एकही वक्ता मराठीत बोलला नाही अशी खंत यांनी व्यक्त केली.

अॅड. मेहमूद प्राचा म्हणाले, वक्फ बोर्डात काही ठिकाणी गैरकारंभार होत आहे हे आपण मान्य केले पाहिजे. भ्रष्ट लोकांना दूर करण्यासाठी आपण सरकारची मदत घेत असतो, मात्र याचा अर्थ संपूर्ण कार्यभार सरकारने हाती घ्यावा असे होत नाही. बोर्ड सक्षम करण्यासाठी काही बदल आवश्यक असले तरी त्या बद्दलच्या सूचना मुस्लिम समाजाकडून सरकारने घ्यायला पाहिजे. आता सरकार संसदीय समिती नेमण्यास तयार झाले असले तरी त्या समितीचा निर्णय सरकारवर बंधनकारक असणार नाही यामुळे सदरील समिती हा फक्त दिखावा आहे. याच बरोबर ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड हाताळत असलेल्या, तीन तलाक, केसेस व बाबींमध्ये चुकीचे धोरणामुळे आजतागायत मुस्लीम समाजाती फरफट झाली आहे व त्यांना जबाबदार ठरवले

दरम्यान, आपला देश हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. प्रत्येक मुस्लिम नागरिकाला स्वत:ची मिळकत, मालमत्ता, दान केल्यानंतर दान केलेल्या व्यक्तिच्या इच्छेप्रमाणे त्याचा उपयोग न होता तो इतराने बनवलेल्या कायद्याप्रमाणे त्या मालमत्तेचा उपभोग होणे म्हणजे मानवाधिकाराचे उल्लंघन आहे हे बिल भारतीय संविधानाच्या कलमाला छेद करणारे आहे म्हणून केंद्र सरकारने वक्फ दुरुस्ती विधेयक रद्द करावे. विधेयक रद्द केले नाही, तर मुस्लिम समाज देशभर आंदोलन उभारेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष – सुफियान पठाण, जन. सेक्रेटरी महेबूब सय्यद, वजीरभाई मुलाणी-सातारा, हाफीज सद्दाम-सांगली, जे.के. मिस्त्री-सोलापूर, मुफ्ती जलल मोमीन-पुणे, मुबारक शेख, शेख जफर-बीड, जलिलभाई शेख-पिं.चिं., अलताफभाई सय्यद, साबीर सय्यद, रफिक सय्यद, साबीर शेख-तोपखाना, जमीर मोमीन, सुलेमान सय्यद यांनी यशस्वीरित्य केले.

उझबेकिस्तान एअरवेजने ताश्कंद-मोपा उड्डाणे सुरू केल्याने, गोव्याने नवीन आंतरराष्ट्रीय मार्गाचे केले स्वागत

पुणे : गोवा ने नवीन आंतरराष्ट्रीय मार्गाचे स्वागत केले: उझबेकिस्तान एअरवेजने ताश्कंद-मोपा फ्लाइट्सची सुरुवात केली – उझबेकिस्तान एअरवेजने अधिकृतपणे ताश्कंदहून गोव्याला थेट उड्डाणांची घोषणा केली आहे. हे उड्डाण २७ ऑक्टोबर २०२४ पासून आठवड्यातून दोनदा चालवले जाईल. अत्याधुनिक एअरबस A320 निओ विमानाद्वारे ही सेवा दिली जाईल, जी ताश्कंदला मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) शी जोडेल, उझबेकिस्तान आणि गोव्यातील पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी नवीन मार्ग खुले करेल.

उझबेकिस्तानच्या दूतावास आणि पर्यटन एजंट्सच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांनंतर, तसेच ताश्कंदमधील भारतीय दूतावासाच्या महत्त्वपूर्ण सहकार्यामुळे या उड्डाणांची सुरुवात झाली आहे. गोवा पर्यटन विभागाने या जोडणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. गोव्याच्या जागतिक पोहोच विस्ताराच्या या प्रयत्नांच्या अनुषंगाने, गोवा पर्यटन विभाग ताश्कंद आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळाव्यात (TITF) देखील सहभागी होईल.

पर्यटन मंत्री रोहन ए. खांटे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि सांगितले, “ताश्कंदहून गोव्याला थेट उड्डाणे सुरू होणे हा मध्य आशियाशी गोव्याच्या जोडणीचा एक मोठा टप्पा आहे. ही नवीन जोडणी केवळ पर्यटनाला चालना देणार नाही, तर उझबेकिस्तानशी आपले सांस्कृतिक संबंधही मजबूत करेल. आम्ही गोव्याला जगभरातील प्रवाशांसाठी एक सहज प्रवेशयोग्य आणि चांगले जोडलेले पर्यटन स्थळ बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

सुनील आंचीपका, IAS, पर्यटन संचालक आणि GTDC चे व्यवस्थापकीय संचालक यांनी मंत्र्यांच्या भावना प्रतिध्वनित करताना सांगितले, “उझबेकिस्तान एअरवेजने गोव्यामध्ये उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने आमच्या राज्याच्या पर्यटन क्षेत्रावरील जागतिक आकर्षणाची पुष्टी होते. ही थेट जोडणी उझबेकिस्तानमधील पर्यटकांसाठी प्रवास अनुभव नक्कीच अधिक सोपा आणि आमंत्रित करणारा बनवेल.”

हा नवीन मार्ग राज्याच्या पर्यटन आधार विस्तृत करण्याच्या आणि गोव्याला वर्षभर पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहित करण्याच्या व्यापक धोरणाशी सुसंगत आहे. पर्यटन विभाग उझबेकिस्तानमधून पर्यटकांचे स्वागत करण्यास उत्सुक आहे आणि गोव्याची अनोखी संस्कृती, इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्य प्रदर्शनाची तयारी करीत आहे. या नवीन उड्डाण मार्गाच्या सुरुवातीमुळे उझबेकिस्तानमधून गोव्यामध्ये पर्यटन वाढणार असून, गोव्याच्या पर्यटन क्षेत्राच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावेल.

श्री गणेश विसर्जनाकरिता पुणे महापालिकेच्या वतीने जय्यत तयारी

पुणे -महानगरपालिकेच्या वतीने श्री गणेश विसर्जनाकरिता सर्व  स्तरांवरुन जय्यत तयारी करण्यात आलेली असून याकरिता मनपाचे विविध विभाग, क्षेत्रिय कार्यालयांनी आपल्या स्तरावरही जय्यत तयारी केलेली आहे.

          नदीकिनार परिसरातील विसर्जन घाटांवरील दुरुस्ती, रंगरंगोटी, लोखंडी टाक्या, निर्माल्य कलश, विसर्जन हौद, विसर्जन घाटावरील विद्युत व्यवस्था, कचरा वाहतूक व्यवस्थेचे नियोजन या स्वरुपाच्या कामाबरोबरच सार्वजनिक स्वच्छता, मिरवणूक मार्गावर स्वच्छता व औषधोपचाराची व्यवस्था, ग्रुप स्विपींग, कंटेनर, निर्माल्य कलश, किटकनाशक फवारणी, विसर्जन घाटांवर अग्निशमनदल कर्मचारी व्यवस्थापन, घाटांवर औषध फवारणी, नदी किनारच्या विसर्जन घाटांवर तसेच ज्या भागात नदी, तलाव, विहीरी नाहीत अशा परिसरातून विसर्जन हौद, लोखंडी टाक्यांची सोय करण्यात आलेली आहे. त्याच बरोबर जीवरक्षकांच्या नियुक्त्या, दोन पाळ्यांतून अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्त्या, सुरक्षा यंत्रणा, विद्युत जनित्र, ध्वनिक्षेपक यंत्रणा, जलवाहिनी व मलवाहिन्या यांचे गळती ठिकाणी त्वरीत दुरुस्ती कामे करणेकरिता स्वतंत्र कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणेत आलेल्या आहेत. ध्वनीक्षेपनाची व प्रकाशाची व्यवस्था करणेत आलेली आहे.  सार्वजनिक स्वच्छता गृहे, शौचालयांची स्वच्छता, फिरती शौचालये, सुचना फलक आदी स्तरावरुन तयारी करणेत आलेली आहे.

          गणेश विसर्जन कोणत्याही नदी किवा तलावात (नैसर्गिक जलस्त्रोतात)करू नये. जमा झालेले निर्माल्य कोठेही न टाकता महानगरपालिकेच्या यंत्रणेकडे सुपूर्त करावे किवा निर्माल्य कलशामध्ये टाकावे. तसेच दैनंदिन येणाऱ्या कचरा वेचकांमार्फत सुद्धा घरातील निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. गणेश मूर्ती विसर्जनाऐवजी मूर्तीदान हि संकल्पना महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असून जास्तीत जास्त नागरिकांनी मूर्ती दान करावी.

          दीड दिवसांचे गणेश विसर्जन मोठ्या उत्साहात व शांततेने पार पडले. १५ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत बांधलेल्या हौदात २७२२ मूर्तींचे विसर्जन झाले, लोखंडी टाक्यांमध्ये ७६२७ मूर्तींचे विसर्जन झाले, संकलित केलेल्या १०९७ मूर्ती होत्या. अशा रीतीने एकूण ११४४६ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच अंदाजे १३३७५.७५ किलो निर्माल्य जमा झाले.

प्रमुख विसर्जन घाट खालीलप्रमाणे.

संगम घाट१०ओंकारेश्वर
वृध्देश्वर घाट / सिध्देश्वर घाट११पुलाची वाडी, नटराज सिनेमा मागे
अष्टभुजा मंदिर (नारायण पेठ)१२खंडोजी बाब चौक
बापूघाट (नारायण पेठ)१३गरवारे कॉलेजची मागील बाजू
विठ्ठल मंदिर (अलका चौक)१४दत्तवाडी घाट
ठोसरपागा घाट१५औंधगाव घाट
राजाराम पूल घाट, सिध्देश्वर मंदिर         १६बंडगार्डन घाट
चिमा उद्यान येरवडा१७पांचाळेश्वर घाट
वारजे कर्वेनगर, गल्ली क्र. १ नदीकिनार  

विविध क्षेत्रिय कार्यालयांकडील विसर्जन व्यवस्था, हौद, टाक्या यांच्या सुविधा करण्यात आलेल्या आहेत.

भवानीपेठ क्षेत्रिय कार्यालय-

भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाकडील कार्यक्षेत्रातील गणेश विसर्जनासाठी सावित्रीबाई फुले प्रशाला, आनंदीबाई कर्वे शाळा, स्वारगेट पोलिस लाईन या ठिकाणी विसर्जन हौद करणेत आले आहे.

विद्युत विभागामार्फत गणेशोत्सव कालावधीमध्ये दोन शिफ्टमध्ये सेवकांच्या नेमणूका करण्यात आलेल्या असून विसर्जन मार्गावर तसेच मुख्य ठिकाणी गुरुवार पेठ, पालखी चौक, लोहियानगर, काशिवाडी, लक्ष्मीरोड, सोमवार पेठ, रास्ता पेठ या ठिकाणी सदर सेवकांच्या नेमणूका करुन विद्युत विषयक देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यात आलेली आहेत.

स्वच्छतेबाबत भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रात व मिरवणुकीच्या मार्गावर झाडणकाम, ग्रुप स्विपींग करुन पावडर मारुन किटकनाशक औषध फवारणी करणे तसेच कचरा दोन शिफ्टमध्ये वाहतुक करुन घेणे व परिसर स्वच्छ करणे इ. कामे तत्परतेने करणेत येणार आहे. या कामी क्षेत्रिय अधिकारी, वैद्यकीय क्षेत्रिय अधिकारी, उप अभियंता, प्रभाग अधिकारी, विभागीय आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मोकादम व सफाई सेवक तसेच विद्युत विभागाकडील कर्मचारी व तांत्रिक विभागाकडील अभियंता यांच्या कामकाजाचे नियोजन करणेत आले आहे.

सिंहगड रस्ता क्षेत्रिय कार्यालय- सिंहगड रस्ता क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीतील  श्रीगणेश विसर्जनाच्या ठिकाणी मा.महापालिका सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता ,कनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता,आरोग्य विभागाकडील क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी विभागीय आरोग्य निरीक्षक आरोग्य निरीक्षक, मुकादम,मिस्त्री, बिगारी इत्यादी सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.  गणेश विसर्जन हौद ,तात्पुरती लोखंडी टाकी व्यवस्था, जीवरक्षकांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत. जीवरक्षक व आरोग्य विभागाकडील सेवकांनी विसर्जन होईपर्यंत व परीसराची पूर्ण स्वच्छता होईपर्यंत आरोग्य विभागाकडील सेवकांनी नेमून दिलेल्या ठिकाणी थांबणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

खालील ठिकाणी गणेश विसर्जन व्यवस्था करणेत आलेली आहे-

१) जनता वसाहत कॅनॉल, पर्वती पायथा, २) जयभवानीनगर, जनता बाग मागे, ३) गोल्डन व्हिल पूल, ४) चूनाभट्टी कॅनॉल, ५) पानमळा कॅनॉल,

वारजे कर्वेनगर कार्यालय –

वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ३ विसर्जन हौद, २६ लोखंडी टाक्या, ९ मूर्ती संकलन केंद्रे, १५ ठिकाणी फायबर शौचालये अशी सोय करण्यात आलेली आहे.

१)राजारामपूल,डी.पी रोड, २) साई मंदिर, सौरभ सोसायटी समोर, डीपी रोड, ३) राहूलनगर, जितेंद्र अभिषेकी उद्यानाशोजारी, ४) मनमोहन सोसायटी, कर्वेनगर, ५) अनुसयाबाई खिलारे शाळा, ६)पंडित दीनदयाळ शाळा  ७) वारजे पुलाखाली वारजे, ८) मॅजेस्टिक हॉल, सर्व्हिस रस्ता, ९) अतुलनगर कॉर्नर, १०) गार्डन सिटी वारजे, ११) शिवणे शाळा, १२) उत्तमनगर शाळा, १३) आठवले चौक, १४) सम्राट अशोक शाळा १५)तपोधाम सोसायटी १६)न्यू कोपरे शाळा १७)कोंढवे धावडे गेट नं१० १८)दांगट पाटील नगर कमान एक, शिवाने १९)नादब्रम्ह सोसायटी २०)विकास चौक कर्वेनगर २१)वारघडे चौक कर्वेनगर २२)हिंगणे होम कॉलनी २३)शामाप्रसाद मुखर्जी उद्यान २४) वारजे हायवे उरीट नगर

वर नमूद केलेल्या ठिकाणी विद्युत व्यवस्था सी.सी.टी.व्ही. कॅमेरा यंत्रणा, मांडव व इतर व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच रोटरी क्लब युवा, कोथरूड मार्फत निर्माल्या निर्मुलन करणेसाठी श्रेडींग मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय-

१) कै गंगुबाई भिमाले उद्यान, सॅलिसबरी पार्क २) स.नं. ३८८, वैरागे मनपा उद्यान, मीरा सोसायटी ३) पुजारी गार्डन मिनाताई ठाकरे वसाहत, ४), ५) पाटबंधारे कार्यालय शेजारी स्वारगेट ६) प्रेमनगर वाहनतळ सिटी प्राइड शेजारी पार्किंग, ७) गंगाधाम चौक स.नं. ५७८ बिबवेवाडी अग्निशमन केंद्र ८) कै.यशवंतराव चव्हाण शाळा ९) चिंतामणराव देशमुख शाळा इंदिरानगर १०)अप्पर सुप्पर इंदिरा नगर ११)व्हीआयटी कॉलेज जवळ १२)अप्पर बस स्टाप १३)सालीटर, बिबवेवाडी कोंढवा रस्ता

प्रभागामधील विसर्जन हौदाच्या ठिकाणी  निर्माल्य कलश, कंटेनर, हॅलोजन व्यवस्था, जनरेटर व्यवस्था, ठिकाणी मंडप व्यवस्था व स्वच्छतेविषयक व्यवस्था करणेत आलेली आहे.

सदर व्यवस्थापनेसाठी प्रभाग अधिकारी, आरोग्य निरीक्षक, मोकादम, विद्युत विभागातील सर्व सेवक, जीव रक्षक तसेच इतर सेवकांची नेमणूक करणेत आलेली असून त्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे.

रामटेकडी, वानवडी  क्षेत्रिय कार्यालय –

१)शिंदे छत्री २)जांभूळकर मळा, घोरपडी कॅनॉल ३)सोपान बाग कॅनॉल ४) संत गाडगे महाराज शाळा

धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय –

१)तळजाई मंदिर तळजाई टेकडी, २) ढुमे क्रिडांगण, सहजीवन सोसायटी पटांगण, ३) शिंदे हायस्कूल जवळ, तळजाई कडे जाणारा रस्ता, ४) तुळशीबागवाले कॉलनी मैदानाजवळ, ५) मनपा शाळा क्र. ९१ जी चे मागे, रामचंद्र नगर, धनकवडी गाव, ६) गुलाबनगर, कानिफनाथ नगर, धनकवडी पोस्ट ऑफीस समोर ७) स.नं. ३५ जावळकर शॉप समोर, राजे चौक ८) आंबेगाव पठार, आरोग्य कोठी लगत (साई सिध्दी) ९) कात्रज रॅम्प (कात्रज डेअरी शेजारी) १०) कात्रज गावठाण तलाव, ११) थोरवे विद्यालय, १२) गायमुख चौक, आंबेगाव, १३) जांभूळवाडी तलाव, १४) चिंतामणी शाळे समोर, अवंती कॉम्प्लेक्स जवळील अॅमिनिटी स्पेस १५) अशोक लेलॅण्ड कॅम्प लोखंडी टाकी  तसेच नव्याने समाविष्ट झालेले गावांमध्ये सुद्धा नागरिकांच्या सोयीकरिता विसर्जन हौद, टाक्या, व संकलन केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

शिवाजीनगर- घोलेरोड  क्षेत्रिय कार्यालय –

१)मुळारोड घाट २) संगमवाडी घाट ३) स्फुर्ती सोसायटी घाट ४) वृध्देश्वर घाट, ५) पतंगा घाट ६) पांचाळेश्वर घाट,

हडपसर , मुंढवा  क्षेत्रिय कार्यालय –

१)मुंढवा गाव नदीकिनार २) भोसले गार्डन-हडपसर, स.नं. १५ लक्ष्मी कॉनर, ३) स.नं. १६ सातव प्लॉट, ४) इंग्लिश मिडीयम शाळा, डीपी रोड, ५) हिंगणे मळा, कॅनॉल घाट, ६) ननावरे बिल्डींग समोर कॅनॉल घाट, ७) उन्नतीनगर, कॅनॉल घाट, ८) हनुमान सेवा ट्रस्ट, बालउद्यान वाडी, काळेपडळ, ९) श्रीराम चौक, रुणवाल सोसयाटी, हांडेवाडी रस्ता, १०) संकेत पार्क समोर, तरवडे वस्ती, महंमद रोड, ११) कुंभारवाडा नदीलगत, केशवनगर, १२) साडेसतरा नळी उद्यानात, १३) गंगानगर महात्मा फुले वसाहत, फुरसुंगी, १४) नवमहाराष्ट्र तरुण मंडळ, पवार आळी जवळ, फुरसुंगी १५) पाणीपुरवठा तळे जुन्या पुलाशेजारी, फुरसुंगी, १६) मारुती मंदिराजवळ, उरुळी देवाची

कै. बा.स. ढोलेपाटील क्षेत्रिय कार्यालय –

१)क्वालिटी बेकरी कॅनॉल २) बहिरोबा पंपिंग स्टेशन नदीपात्रातील घाट ३) बंडगार्डन हौद ४) संगम घाट ५) शाहू तलाव (टँक) हौद ६) पिंगळे वस्ती (लक्ष्मी माता मंदिरा शेजारी).

येरवडा कळस  क्षेत्रिय कार्यालय-

१)श्री संत माळी महाराज २) चव्हाण चाळ ३) कळसगाव घाट ४) भारतनगर घाट ५) शांतीनगर घाट  ६)  धानोरी विहीर

येरवडा क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने अनंत चतुर्दशीच्या दिवशी चिमा गार्डन घाट येरवडा येथे एक अम्बुलंस मेडिकल टीमची व्यवस्था करणेत येणार आहे.

कसबा विश्रामबागवाडा  क्षेत्रिय कार्यालय –

५ विसर्जन घाट, ४३ टाक्या, ची सोय करणेत आलेली असून कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्वच्छतेचे व कचरा साफसफाईची कामे तसेच प्रमुख रस्त्यावर १९ पोलीस मदत केंद्रे, ३२ वाचटॉवर, ३ स्वागत कक्ष हिरकणी कक्ष ई. ची सोय करण्यात आलेली आहे.

कोथरुड बावधन   क्षेत्रिय कार्यालय –

१)गुरु गणेश नगर, शांतीबन चौक, २) लोकमान्य कॉलनी, जीत ग्राऊंड, ३) उजवी भुसारी कॉलनी, ४) बावधन शाहा, ५) मराठा मंदिरामागे, ६) भारती विद्यापीठ कन्याशाळेमागे, ७) सुतार दरा- हजेरी कोठी, ८) यशवंतराव चव्हाण  नाट्यगृह, ९) लोढा पेट्रोल पंप, १०) मयुर डीपी रोड, ११) तेजस नगर ग्राऊंड, १२) कमिन्स कंपनी गेट नं. १, १३) गांधी भवन ग्राऊंड, १४) गोपीनाथ नगर

कोंढवा येवलेवाडी  क्षेत्रिय कार्यालय –

१)उत्कर्ष सोसायटी, पेशवे कात्रज तलावालगत, २) राजस सोसायटी कात्रज, अॅमिनिटी स्पेस कमला सिटी समोर, ३) कै. चिंतामणराव देशमुख उर्दू शाहा, बिबवेवाडी, ४) काकडे वस्ती, कोंढवा बु. ५) शरद पवार गार्डन हौंद, कोंढवा बु. ६) गोकुळनगर हौद कात्रज कोंढवा रोड कोंढवा बु. ७) आरोगय् कोठी, येवलेवाडी जि.प. शाळा प्र.क्र. ४१ ८) येवलेवाडी तलाव गारवा हॉटेल समोर, ९) उंड्री गाव

औंध क्षेत्रिय कार्यालय-

१)राजीव गांधी विसर्जन घाट, औंध नदीकिनार, २) मलिंग घाट, औंध नदीकिनार, ३) शांता आपटे औंध नदीकिनार ४) महादेव घाट, औंध नदीकिनार, ५) सुतारवाडी जलतरण तलाव, ६) जयभवानीनगर, ७) वाकेश्वर मंदिर, पाषाण, ८) आयटीआय मैदान पाषाण, ९) सोमेश्वर मंदिर, १०) बालेवाडी गावठाण नदीकिनार

            वरीलप्रमाणे सर्व घाटांच्या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकरिता बसण्यासाठी खुर्च्या, टेबल, मांडव, हिरकणी कक्ष, विद्युत, कॅमेरे व व्यवस्था करण्यात आली आहे. हौदांची दुरुस्ती करुन त्यात स्वच्छ पाणी ठेवण्यात आले आहे. सदर घाटांवर दैनंदिन स्वच्छता, साफसफाई करण्यात येत असून निर्माल्य कलश ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व घाटांवर ३ पाळ्यांमध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी जीवरक्षक, सुरक्षा रक्षक व अग्निशमनचे कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

सांस्कृतिक केंद्र विभागाकडून यावर्षी पुणे महानगरपालिका सेवक वर्ग गणेशोत्सव समिती मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत महापालिकेच्या कर्मचारी वर्गाबरोबर चित्रपट, रंगभूमी, दूरचित्रवाणी या क्षेत्रातील  कार्यरत असणारे कलाकार व तंत्रज्ञ हे वादक म्हणून सहभागी होणार आहेत. तसेच विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जवळपास १५०-२०० सिने कलाकार पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने मंडई चौक ते अलका चौक पर्यंत सफाई अभियान राबविणार आहेत.  

अग्निशमन दलाकडून गणेशोत्सव काळात करण्यात येत असलेली व्यवस्था-

गणेशोत्सवाचे काळात विविध दिवशी गणपती विसर्जन करण्यात येते, अशाप्रकारे प्रामुख्याने गणपती विसर्जन होणाऱ्या मुठा नदीकाठच्या घाटांवर भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पुणे मनपा अग्निशमन दलाच्या वतीने दलाचे जवान तसेच खासगी जीवरक्षक तैनात करण्यात आलेले आहेत.

घाटांवर नेमलेल्या जीवरक्षकांना त्यांचे काम अधिक सुरक्षिततेने व कार्यक्षमतेने करता येण्याच्या उद्देशाने लाईफ जॅकेटस, लाईफ बॉय व रात्रीचे वेळेस जीवरक्षक पटकन नजरेस पडण्याच्या दृष्टीने फ्लोरोसेन्ट जॅकेटस उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

प्रत्येक घाटावर नदीकिनारी नागरिक व त्यांचे समवेत येणाऱ्या लहान मुलांनी गर्दी करु नये, म्हणून नदी किनारी आडवा दोरखंड लावण्यात आलेले आहे. तसेच काही घाटांवर नदीचे पात्रामध्ये आडवा दोर बांधण्यात आलेला आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती चुकून प्रवाहाबरोबर वाहून गेल्यास,  या दोरखंडास धरुन आपला जीव वाचवू शकते. नटराज घाटावर लाईफ मास्ट बसविण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपत्कालीन प्रसंगी नदीच्या पात्रामध्ये मोठा उजेड उपलब्ध करुन बुडणाऱ्या व्यक्तीस वाचविता येणे शक्य होणार आहे.

नागरिकांना शक्यतो नदीच्या पात्रात आतपर्यंत जाऊ न देता, काठावरच गणपती विसर्जन करण्यास सांगण्यात येते. बऱ्याचदा दलाकडील जवान व भोई लोकांकडूनच गणपतींचे विसर्जन करण्यात येते.अग्निशमन दलाकडील सर्व अधिकारी व जवानांच्या सर्व प्रकारच्या रजा व आठवडा सुट्या बंद करण्यात येऊन या कालावधीत वरील १८ घाटांवर अग्निशमन दलाकडील अधिकारी स्वत: उपस्थित रहाणार आहेत.संपूर्ण गणेशोत्सव कालावधीत मुठा नदीकिनारीचे विसर्जन घाट वगळता शहरातील अन्य विसर्जनाच्या ठिकाणी संबंधित क्षेत्रिय कार्यालयांकडून त्यांचे स्तरावर जीवरक्षकांची नेमणूक करण्यात येते.

पुणे अग्निशमन दलाचे विनम्र आवाहन

अग्निशमन दल आपल्या सुरक्षेसाठी कटीबध्द असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाच्या दुरध्वनी क्र. १०१ वर संपर्क साधावा.गणेश मुर्तीचे विसर्जन करताना लहान मुलांना नदी, कॅनॉल, विहीरी, तळे यापासून दूर उभे करुन त्यांचेजवळ जबाबदार व्यक्तीने थांबावे.नाव/होडीतून गणपती विसर्जन करताना त्यात क्षमतेपेक्षा अधिक व्यक्तींनी बसू नये, तसेच बसलेल्या व्यक्तींनी नाव/होडीस अपघात होईल असे वर्तन करुन नये.

          पुणे मनपाच्या वतीने नदीकाठी नेमण्यात आलेल्या ‘‘जीवरक्षक सेवकांकडून शक्यतो गणेश मुर्तीचे विसर्जन करवून घ्यावे.

          एखादी व्यक्ती पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास, त्याची कल्पना नदीकाठी नेमलेल्या जीवरक्षकांना तातडीने द्यावी.

          मद्यपान केलेल्या अवस्थेत नदीपात्र, तलाव, कॅनॉल, विहीर, तळे इत्यादींजवळ जाऊ नये.

          पावसामुळे नदीकाठचा परिसर निसरडा झालेला असल्यास अशा ठिकाणी काळजीपूर्वक वावरावे.

          अनुचित प्रकार, अनुचित घटना टाळण्यासाठी कृपया अधिकृत घाट, मनपाने विविध ठिकाणी बांधलेले विसर्ज़न हौद व मनपाच्या क्षेत्रिय कार्यालयांनी गणेश विसर्जनासाठी केलेल्या व्यवस्थेच्या ठिकाणी कृपया गणेश मुर्तीचे विसर्जन करावे.

          मिरवणूकीच्या मार्गावर दोन ठिकाणी अग्निशमन दलाची ‘‘बिनतारी संदेश मदत केंद्र उभारण्यात आले आहेत.

          वरील घाटांपैंकी महत्वाच्या गणपतीचे विसर्जन होणाऱ्या व गर्दी होणाऱ्या नटराज सिनेमा मागील घाट, संगम घाट, वृध्देश्वर घाट, गरवारे कॉलेज कॉजवे येथे नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना देण्यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी ध्वनीक्षेपण यंत्रणा बसविण्यात आली असून, त्यावरुन नागरी संरक्षण दलाच्या स्वयंसेवकांकडून सूचना देणेची व्यवस्था करण्यात आली आहे.

कॉमनवेल्थ इमारत येथील बिनतारी संदेश मदत केंद्रात आवश्यक ते फायर एक्स्टिंग्वीशर्स व ते हाताळण्यास दलाचे सेवक उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.

अग्निशमन दलाकडील सर्व अधिकारी व जवानांच्या सर्व प्रकारच्या रजा व सुट्ट्या बंद करण्यात येऊन या कालावधीत वरील १५ घाटांवर अग्निशमन दलाकडील अधिकारी स्वत: उपस्थित रहाणार आहेत.

आपत्कालीन संपर्क दुरध्वनी क्रमांक

१)      ०२०-२५५०/१२६९ 

२)      ०२०-२५५०/६८००/१/२/३

आगामी विधानसभेत रिपाइंला योग्य प्रतिनिधित्व मिळाल्यास तीनही पक्षांना फायदा-रामदास आठवले

पुणे – लोकसभा निवडणुकीत एनडीएला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. जर आम्हाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळाल्यास त्याचा फायदा महायुतीमधील तीनही पक्षांना निश्चित होईल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
रामदास आठवले यांनी मंगळवार १० सप्टेंबर रोजी पुण्यातील व्हीआयपी विश्रामगृहात एक पत्रकार परिषद घेतली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, राज्य संघटक परशुराम वाडेकर, सूर्यकांत वाघमारे, गौतम सोनवणे, शैलेश चव्हाण, अशोक शिरोळे, श्याम सदाफुले, मोहन जगताप, महिपाल वाघमारे, वसंत बनसोडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आठवले पुढे म्हणाले की, सध्या पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव हा सर्व धर्मीयांच्या एकतेचे आज प्रतीक बनला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार देशातील नागरिकांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे आज देशातील २५ कोटी लोकांना आम्ही गरीबीच्या बाहेर आणू शकलो. शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून आम्ही १३ हजार कोटी रुपये आजवर दिलेले आहेत. दहा लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये एसी-एसटीच्या उमेदवारांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळालेले आहे.
आठवले यांनी सांगितले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित जागा प्राप्त झाल्या नाहीत. संविधान बदलाचा मुद्दा विरोधकांनी जोरदारपणे लावून धरल्यामुळे जनतेत एक वेगळा संदेश गेला. तसेच मराठा आंदोलनाचाही फटका महायुतीला बसला होता. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र उलटे दिसून येईल.
राज्यातील महायुती सरकारने जनतेसाठी अनेक चांगल्या योजना राबवल्या आहेत. लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची एक मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगल्या जागा मिळतील, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
दरम्यान, इंदू मिल येथील भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारक पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारच्या वतीने साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. हे भव्य स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मी व्यक्तीशः प्रयत्नशील आहे. येत्या दोन वर्षांमध्ये हे स्मारक पूर्ण झालेले सर्वांना दिसून येईल.
सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून मोठे रणकंदन होते आहे. परंतु मराठा समाजाला आरक्षण प्राप्त व्हावे, ही केंद्र व राज्य सरकारची खूप इच्छा आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी उठसूठ आंदोलनाची धमकी देण्याऐवजी त्यांनी सरकारला योग्य ते सहकार्य करावे. त्यातून मराठा समाजाच्याच समस्या सुटतील. सवर्णांच्या आरक्षणाबाबत मोदी सरकार आधीपासूनच सकारात्मक असल्या कारणामुळेच १० टक्के आरक्षण हे सवर्णांना देण्यात आलेले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपाइंच्या वतीने महायुतीतील पक्षांकडे १२ जागांची मागणी केली आहे. ही मागणी त्यांनी पूर्ण करावी, त्याचे कारण हे की, रिपाइंमुळे महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांना चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे या सर्व पक्षांनी आपापल्या कोट्यातील चार-चार जागा आम्हाला द्याव्या, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

जात पडताळणी प्रमाणपत्र तात्काळ मिळावेत ; आठवले
जात पडताळणी प्रमाणपत्राची प्रकरणे लवकर निकाली लागत नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. मी त्यावर गांभीर्याने विचार करतो आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र न मिळाल्याने मेडिकलसह विविध ठिकाणांहून एससी-एसटीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होत असल्याच्याही तक्रारी येत आहेत. त्यामुळे यासंदर्भात मी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करेन व यासंदर्भात अधिकाऱ्यांची एक बैठक घेईल. कुणाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, या दृष्टीने कटाक्षाने प्रयत्न केले जातील.

मालवण पुतळ्या प्रकरणी कठोरात कठोर कारवाई करावी
स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथे उभारण्यात आलेला पुतळा वाऱ्यामुळे पडला, त्याबाबत सध्या राज्यभरात मोठे रणकंदन होते आहे. झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. महापुरुषांचे पुतळे बनवताना मोठी काळजी घेणे गरजेचे आहे, कारण त्यांच्याशी जनतेच्या भावना जुळलेल्या असतात. त्यामुळे महाराजांचा पुतळा पडणं ही घटना मनाला वेदना देणारी आहे. हे काम देताना योग्य त्या व्यक्तीला दिले गेले नाही. परंतु ज्यांनी-ज्यांनी हे काम केले आहे आणि ज्याने पुतळा बनवला आहे, त्या सर्वांवर कायदेशीरदृष्ट्या कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.

कोथरुड मधील वाहतूक समस्यांसंदर्भात दर आठवड्याला बैठक

वाहतूक समस्यांसंदर्भात सर्वांना एक व्हॉट्सॲप नंबर द्या!

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

पुणे –कोथरुड मधील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य क्रम ठरवून जलदगतीने उपाययोजना कराव्यात. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने व्हॉट्सॲप नंबर उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून त्याद्वारे ही वाहतूक नियमन करणे शक्य होईल असे निर्देश नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले. कोथरुड मधील वाहतूक समस्यांसंदर्भात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पुणे शहर वाहतूक शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, कार्यकारी अभियंता अभिजीत डोंबे यांच्या सह वाहतूक पोलीस अधिकारी, विविध सामाजिक कार्यकर्ते आणि नागरीक उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी कोथरूड मधील मुख्य रस्त्यांवरून प्रतिदिन एक लाख ४० हजार वाहने फिरत असल्याचे सांगून वाहतूक नियमनासाठीच्या उपाययोजनांचे सादरीकरण केले. यामध्ये प्रामुख्याने पौड रोड आणि कर्वे रोड येथील अभिनव चौकच्या दोन्ही बाजूचा रस्ता रुंद करणे, आनंद नगर मेट्रो स्टेशन जवळ पौड रोड रुंद करणे, कर्वे पुतळा पौड रस्त्याचे डावे वळण रुंद करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक कर्वेनगर ते वारजे पर्यंतचा रस्ता रुंद करणे किंवा सदर ठिकाणी उड्डाणपूल उभारणे, कमीन्स गेट समोरील डी.पी. रस्ता रुंद करणे, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोरील रस्ता रुंद करणे, यांसह वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी कोथरुड मधील मिसिंग लिंक शोधून त्या पूर्ण करणे. तसेच, रस्ता रुंदीकरणासाठी अनेक ठिकाणी जमीन हस्तांतरण आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस आणि महापालिकेच्या रस्ते विभाग आणि पथ विभागाने समस्यांचे निराकरण करावे आदी उपाययोजना सुचविल्या.

त्यावर, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुड मधील वाहतूक कोंडीची समस्या अतिशय गंभीर असून, प्रशासनाने दोन पर्यायांवर काम करावे. त्यामध्ये दीर्घ कालीन उपाययोजनांचा सविस्तर अभ्यास करुन अहवाल सादर करावा. त्यातील निष्कर्षांच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी चर्चा करुन मार्ग काढू.‌ त्यासोबतच तातडीने पूर्ण होऊ शकणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य क्रम ठरवून काम करावे. तसेच, नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने व्हॉट्सॲप नंबर उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून त्याद्वारे ही वाहतूक नियमन करणे शक्य होईल, असे निर्देश दिले.त्याशिवाय कोथरुड मधील वाहतूक समस्यांसंदर्भात दर आठवड्याला प्रशासनासोबत आढावा बैठक घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

तसेच, वाहतूक शाखेला मनुष्यबळ कमी पडत असल्याने वॉर्डनची संख्या वाढवावी. त्याशिवाय वाहतूक नियमनासंदर्भात जनजागृतीसाठी एनएसएसची मदत घ्यावी अशीही सूचना केली. तसेच, कोथरुड मधील वाहतूक समस्या सोडविण्यासंदर्भात प्रशासन आणि नागरीक यांच्या मधील दुवा म्हणून संदीप खर्डेकर यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कर्वे रस्त्यावरील पौड फाट्याजवळ अपघाताचाही घटना घडली. एका टेम्पो चालकाने दारूच्या नशेत गाडी चालवून अनेक गाड्यांना धडक दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे यांच्या पत्नी गीतांजली यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर श्रीकांत अमराळे हे गंभीररित्या जखमी झाले. त्याबद्दल दु:ख व्यक्त करुन गीतांजली अमराळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

गौरी आल्या घरी ,सोन्या -मोत्यांच्या पावलाने

पुणे :
घरोघरी आज,मंगळवारी दुपारी महिलांनी गौरायांचे थाटात, परंपरा राखत आवाहन,आगमन साजरे केले. गौरी आवाहनाच्या पहिल्या दिवशी अंगणातील तुळशीपासून घरात गौरायांचे आगमन होते.गौरींची पूजा केली जाते.गौरींची पूजा-आरती करून केलेल्या फुलोरा आणि फराळाचा नैवेद्य दाखवला जातो. सर्वांना धन, धान्य, ऐश्वर्य, आरोग्य मिळो अशी प्रार्थना आगमनानंतर महिलांनी गौरीकडे केली.अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी,धन,धान्य,ऐश्वर्य,आरोग्याची प्रार्थना करण्यासाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन करतात.गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ज्येष्ठागौरी असेही संबोधले जाते.पहिला दिवस गौरी आवाहनाचा असतो. माहेरवाशिणींना हा मान दिला जातो. आपापल्या पद्धत आणि परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढले जातात. हातात गौरी घेऊन आलेल्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुवून आणि त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढले जातात. आता येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणले . गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत केले जाते. गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध-दुभत्याची जागा अशा गोष्टी दाखवल्या जातात. आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो, अशी प्रार्थना केली जाते. अशा या प्रथेला गौरी आवाहन करणे, असे संबोधतात.गौरी पूजन बुधवार ११ सप्टेंबर २०२४ रोजी आहे. हा दुसरा दिवस गौरी पूजनाचा असतो. दुपारी गौरीला नैवेद्य दाखवला जाणार आहे. जेष्ठा गौरी पूजन नेहमी जेष्ठा या बुधाच्या नक्षत्रावरच केले जाते, बुधवार दिनांक 11 सप्टेंबर ला जेष्ठा रात्री 9 वाजून 22 मिनिटापर्यंतच  आहे  रात्री व अष्टमी तिथी रात्री 11 वाजून 47 मिनिटां पर्यंत आहे त्यामुळे जेष्ठा गौरी प्राणप्रतिष्ठा तसेच पूजन व महा नैवेद्य रात्री  9 वाजून 22 मिनिटांपर्यंत करावा.गौरी विसर्जन नेहमी  मूळ नक्षत्रावर असते गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर या दिवशी सकाळ पासून ते रात्री 9 वाजून 53 मिनिटांपर्यंत गौरी विसर्जीत कराव्या ,असे जाणकारांनी सांगितले.

एसएमएफजी इंडिया क्रेडिटद्वारे 1000व्या शाखेचा आरंभ

 विशेष आवरण आणि माय स्टँप प्रकाशनाद्वारे या मैलाच्या टप्प्याचा सोहोळा

मुंबई एसएमएफजी इंडिया क्रेडिट कं. लि., भारताची गैर-बँकींग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी असून, त्यांनी वाशी, नवी मुंबई इथे आपल्या 1000व्या शाखेच्या आरंभाची घोषणा केली आहे. या लक्षणीय प्रसंगामुळे देशभरातील आपला विस्तार करण्यामागील आणि अद्याप शिरकाव न झालेल्या बाजारपेठांपर्यंत वित्तीय सेवा पोहोचवण्यातील कंपनीची अढळ निष्ठा दृग्गोचर झाली आहे. या लक्षणीय मैलाच्या टप्प्याच्या निमित्त, एमएमएफजी इंडिया क्रेडिटनं इंडिया पोस्टसोबत सहयोग करुन एक विशेष आवरण आणि माय स्टँप प्रकाशित केले. या अधिकृत अनावरण प्रसंगी श्री. योगी कोजी, कॉन्सुल-जनरल, जपानचे मुंबईतील कॉन्सुलेट-जनरल, श्री. अभिजीत बनसोडे, संचालक – टपाल सेवा (मुख्यालय) महाराष्ट परिमंडळ, सोबत श्री. शांतनु मित्रा, सीईओ आणि एमडी, एसएमएफजी इंडिया क्रेडिट हे मान्यवर उपस्थित होते.

1000व्या शाखेचा आरंभ म्हणजे भव्य आणि वैविध्यपूर्ण भारतीय बाजारपेठेच्या अंतर्गत आपली उपस्थिती आणखी खोलवर नेण्याच्या एसएमएफजी इंडिया क्रेडिटच्या धोरणात्मक दृष्टिकोनाची ही पावती आहे. 2007 मध्ये स्थापना झाल्यापासून, कंपनीने निरंतर वृद्धिचा पाठपुरावा करत, एक अखिल-भारतीय संस्थेत रुपांतर केले आहे जी आता 670 हून अधिक शहरं आणि 70,000 गावांमध्ये कार्यरत असून, 23,000 हून अधिक कर्मचाऱ्यांचं पाठबळ तिला लाभलं आहे.

मागील दोन वर्षांमध्ये, एमएमएफजी इंडिया क्रेडिटने अंदाजे 300 नवीन शाखांची भर घातली असून, यापैकी लक्षणीय 95% शाखा स्तर-2+ शहरं आणि अर्ध-ग्रामीण भागांमध्ये स्थापन केलेल्या आहेत. हा विस्तार संपूर्ण भारतातील वैविध्यपूर्ण लोकसंख्येला औपचारिक पत पुरवठा देण्यासाठी कंपनीच्या मोहिमेशी सुसंगत आहे, त्याद्वारे त्यांना वित्तीय स्वातंत्र्य साध्य करण्याची शक्ती मिळाली आहे.

श्रीशांतनु मित्रासीईओ आणि एमडीएसएमएफजी इंडिया क्रेडिट, यांनी या भव्य प्रसंगाबाबत बोलताना सांगितलं, आमच्या 1000व्या शाखेचं उद्घाटन एक लक्षणीय टप्पा आहे जो संपूर्ण भारतातील लोकांना औपचारिक पत पुरवठा करण्यातील आणि त्यांना वित्तीय स्वातंत्र्य साध्य करण्यात मदत करण्यामधील आमची सखोल वचनबद्धता दर्शवतोआम्ही ही कामगिरी साजरी करत असतानाटपाल विभागाच्या सहयोगाने एक विशेष आवरण आणि माय स्टँप प्रकाशित करताना आम्हाला अभिमान वाटत आहेही घटना कंपनीने आजवर साध्य केलेल्या वृद्धिची आणि भारताच्या वित्तीय सेवा क्षेत्रातील योगदानाची द्योतक आहेआमचा प्रवास निरंतर बदलत राहण्याचाग्राहकांच्या बदलत्या गरजांशी जुळवून घेण्याचा त्याचबरोबर सर्वांसाठी वित्तीय सेवा उपलब्ध करणे आणि समाधानी वृद्धी गाठण्यासाठी सक्षम करण्याच्या आमच्या मोहिमेशी जुळणारा आहे.

हा मैलाचा टप्पा न केवळ कंपनीच्या वृद्धि धोरणाचे यश ठळकपणे मांडत नाही तर भारताच्या वित्तीय सेवा क्षेत्रातील एक अत्यावश्यक योगदानकर्ता म्हणून आपल्या भूमिकेची पुन्हा पुष्टि देखील करतो. 1000व्या शाखेच्या उद्घाटनाद्वारे, एसएमएफजी इंडिया क्रेडिटने प्रत्येक भारतियासाठी पसंतीची वित्तीय भागीदार बनण्याच्या आपल्या ध्येयामध्ये आणखी यश गाठण्यासाठी मंच निर्माण झाला आहे.

५० फूट लांबीच्या कॅन्व्हासवर पर्यटनस्थळांच्या पेंटिंग्जचे प्रदर्शन

पुणे

मानवी विचारातून चित्रकला, शिल्पकला, संगीत साकारले जाते. पुणे फेस्टिव्हलमध्ये आकृती ग्रुपच्या  महिला चित्रकारांनी ५० फुट कॅन्व्हासवर महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे चितारली ही कौतुकास्पद बाब आहे.  कलेला राजाश्रय आणि लोकाश्रयही मिळाला पाहिजे असे उदगार खा. मेधा कुलकर्णी यांनी आज व्यक्त केले. ३६व्या पुणे फेस्टिव्हलअंतर्गत केसरी वाडा येथील लोकमान्य सभागृह येथे ५० फुट लांब व ३ फुट रुंदीच्या कॅन्व्हासवर महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे चितारण्याचा अभिनव उपक्रम पार पडला. त्यावेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या पुणे विभागाच्या  उपसंचालिका सौ. शमा पवार, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे प्रमुख श्री. किरण ठाकूर, डॉ. प्रणिती टिळक, पुणे फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अॅड. अभय छाजेड, समन्वयक अॅड. अनुराधा भारती, प्रसन्न गोखले आदी उपस्थित होते.

पुणे फेस्टिव्हलमध्ये देशातील महिला चित्रकारांच्या आकृती ग्रुपतर्फे गेली १५ वर्षे महिला चित्रकारांचे पेंटिंग्ज प्रदर्शन भरवले जात असून यंदा पर्यटनवृद्धीसाठी ‘महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे’ हा विषय निवडण्यात आला. पर्यटननगरी बनलेल्या पुणे शहरात अधिकाधिक देशी-परदेशी पर्यटक यावेत व पुण्याचे ब्रँडींग जगभर व्हावे यासाठी, पुणे फेस्टिव्हलतर्फे महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या सहयोगातून हा उपक्रम राबवला गेला आहे, असे या उपक्रमाचे समन्वयक अनुराधा भारती यांनी सांगितले.

दि. १४ ते १६ सप्टेंबर या कालावधीत बालगंधर्व कलादालनात पुणे फेस्टिव्हलअंतर्गत देशातील चित्रकारांचे पेंटिंग्ज प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. त्यामध्ये ‘महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे’ विषयावरील ५० फूट लांबीचा हा कॅन्व्हास प्रेक्षकांसाठी ठेवला जाणार आहे. त्यानंतर हे ५० फूट लांबीचे कॅन्व्हास पेंटिंग महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाकडे पुणे फेस्टिव्हलतर्फे भेट दिले जाईल. ३२ महिला चित्रकारांनी ५० फूट लांबीच्या कॅन्व्हासवर एकाच वेळी महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे रंगवण्याचा विक्रम वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाकडे नोंदवला गेला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा कुलकर्णी यांनी केले.

शनिवार वाडा, अष्टविनायक, विंचुरकर वाडा, भिडे वाडा, शिवनेरी किल्ला, जेजुरी, तुळजाभवानी, मुंबई चित्रनगरी, ज्योतिबा मंदिर, भीमाशंकर, पंढरपूर, सिंधुदुर्ग किल्ला, सिद्धेश्वर मंदिर, कास पठार, रायगड किल्ला, माथेरान, चांद बिबी महल, शिर्डी, अजंठा लेणी, एलोरा, बहिणाबाईची कुटी, श्री क्षेत्र पद्मालय, लोणार तळे, बापूंची कुटी, गीताई मंदिर, ताडोबा, एलिफंटा गुफा, त्रिमूर्ती स्टॅच्यू इत्यादी पर्यटनस्थळे महिला चित्रकारांनी साकारली .  

कॅन्व्हासवर अॅक्रेलिक कलर, वॉटर कलर्स, खडू, पेन्सिल, कोळसा इत्यादी माध्यमातून पेंटिंग्ज रंगवली गेली. जेजुरीचे पेंटिंग संपूर्ण हळदीने चितारले गेले होते. यासाठी लागणारे कॅनव्हास रोल, रंग, ब्रशेस, एप्रन इत्यादी सर्व साहित्य फेविक्रील (पिडिलाईट इंडिया) पुणे शाखा यांच्याकडून उपलब्ध झाले. त्याचप्रमाणे फेविक्रीलकडून संपूर्ण सभागृह डेकोरेशन केले गेले होते.