पुणे- सध्याच्या डिजिटल युगामध्ये लहान मुलांमधील वाढते मोबाईलचे प्रमाण आरोग्यास हानिकारक आहे. लहान मुलांना व्यायाम आणि योगा याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी क्रीडा सेल आणि सीएफसी योगा कमिटीतर्फे भव्य राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धांमध्ये केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल ला प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक कोथरूड येथील भारतीय विद्या भवनला, तर सिद्धिविनायक योग प्रसारक संस्थेला तिसरा क्रमांक मिळाला.
पुण्यातील शिवाजी मराठा सोसायटीच्या महाविद्यालयामध्ये या स्पर्धा भरवल्या होत्या. योगाचा प्रचार आणि प्रसार व्हावा मुलांना निरोगी आणि मोबाईलच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी योगामध्ये आवड निर्माण व्हावी असा हा या स्पर्धेचा उद्देश होता.
यामध्ये योगाचार्य योग साधक आणि पालक वर्ग सहभागी झाले होते. आठ वर्षापासून ते साठ वर्षापर्यंत या वयोगटातील स्पर्धा आयोजित केल्या होत्या.सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र अण्णा देशमुख,अरविंद साळवे,योगाचार्य विनायक मुसळे शिवाजी घोडके, नितीन बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेमध्ये लॉटरी पद्धतीने तसेच ऐच्छिक योगासने सादर करण्यात आली.