पुणे- खून करून ७ वर्षापासून फरार असलेल्या सुनिल लक्ष्मण पवार, वय ३४ वर्षे, रा. सोमनाथ मंडळाजवळ, लालचाळ झोपडपट्टी, गोखलेनगर, पुणे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पोलिसांनी अखेरीस पकडले आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे अभिलेखावरील तसेच चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर कडील गुन्हा रजि नं ४८२/२०१७, भा.दं. वि. कलम ३०२,३०७,५०४ तसेच चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन कडील इतर चार गुन्ह्यातील रेकॉर्डवरील हा फरार आरोपी गुन्हा, केल्यापासून गेले ७ वर्षे तो फरार होता. न्यायालयाने त्याचे अटकेबाबत वॉरंट काढून तो न्यायालयात हजर झाला नाही. त्यानंतर न्यायालयाने त्यास फरार घोषित केले होते.
त्याअनुषंगाने दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस अंमलदार बाळु गायकवाड व महेश पाटील यांना वरील गुन्हयातील व मा. न्यायालयाने घोषित केलेला फरार असलेला नमूद आरोपी हा मांडवी पाडा काशिगाव तालुका जिल्हा ठाणे येथे स्वतःचे अस्तित्व लपवुन राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.त्याप्रमाणे वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकाकडील सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस अंमलदार गायकवाड, महेश पाटील व साईकुमार कारके असे मांडवी पाडा, काशिगाव, ता. जि. ठाणे येथे वेशांतर करुन सापळा रचून ०७ वर्षापासुन भा.द.वि.कलम ३०२,३०७,५०४ या गुन्हयात फरारी असलेला आरोपी नामे सुनिल लक्ष्मण पवार, हा पळुन जात असताना त्यास पाठलाग करुन पकडुन त्यास ताब्यात घेतले व त्याचेकडे चौकशी करता तो यापुर्वी छत्रपती संभाजीनगर, रांजणगाव असे वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे नाव बदलुन रहात असलेबाबत सांगितले. सदर आरोपीस पुढील कारवाईकरीता चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे १) गणेश इंगळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ नंदकुमार बिडवई, यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काकुखे, पोलीस अंमलदार बाळु गायकवाड, महेश पाटील, साईकुमार कारके, प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, रविंद्र लोखंडे, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, अजित शिंदे, गणेश गोसावी, अमित गद्रे, नारायण बनकर, म.पो.अंमलदार मनिषा पुकाळे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे