पुणे : वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या सिंहगड एपिक ट्रेल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत ४२ किलोमीटर गटात रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील निलेश कुळये आणि पुण्याच्या तृप्ती भोसले यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात प्रथम क्रमांक पटकावत विक्रमी विजेतेपदावर नाव कोरले. सिंहगडाच्या पायथ्याशी शनिवारी (२७ जून) पार पडलेल्या या स्पर्धेत जगातील ५ देश, भारतातील २६ राज्ये आणि ६५ शहरांतील सुमारे १२०० धावपटूंनी सहभाग घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे, श्रीमंत कान्होजीराजे जेधे देशमुख, सरनोबत नरवीर पिलाजी गोळे तसेच सर्व शूर मावळ्यांना ही स्पर्धा समर्पित करण्यात आली होती. इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसिएशनशी संलग्न असलेल्या या स्पर्धेत ११, २१, ३० आणि ४२ किलोमीटर अशा चार गटांमध्ये धावपटूंनी सिंहगडाच्या पाच विविध वाटांवरून आव्हानात्मक धाव पूर्ण केली.
डोंगर-दऱ्या, चिखल, कडे-कपाऱ्या आणि दुर्गम वाटांमधून पार पडणाऱ्या या माउंटन ट्रेल मॅरेथॉनद्वारे पर्यावरण संरक्षण, गड-किल्ल्यांचे संवर्धन, पुरातन वास्तूंचे जतन आणि नियमित व्यायामाचा संदेश देण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दिग्विजय जेधे यांनी दिली.
स्पर्धेची सुरुवात आणि समारोप सिंहगड रोपवे कार्यालयाजवळ झाला. उद्घाटन पुणे जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, वन विभागाचे महादेव मोहिते, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे, सिंहगड रोपवेचे अध्यक्ष उदयराज शिंदे, पुणे ग्रामीण पोलीस, पर्यटन विभागाचे अधिकारी, घेरा सिंहगड ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झाले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी वेस्टर्न घाट्स रनिंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिग्विजय जेधे, विश्वस्त अनिल पवार, मंदार मते, महेश मालुसरे, राजेश सातपुते, अमर धुमाळ, मारुती गोळे तसेच दौंड, मुळशी, हवेली, वेल्हा आणि पुणे शहरातील ‘टीम डब्ल्यूजीआरएफ’च्या सुमारे ३५० स्वयंसेवकांनी दोन दिवस परिश्रम घेतले.
स्पर्धेचा निकाल
११ कि.मी. विजेते
पुरूष विजेता
पहिला क्र. – अनिकेत पवार १:००:०९दुसरा क्र. – नितीश कुमार १:०१:४५तिसरा क्र. – सुरत यादव १:०१:५८
महिला विजेता
पहिला क्र. – प्रिय चिखलकर १:४४:११दुसरा क्र. – शिल्पा फडके १:४८:१३तिसरा क्र. – प्रियांका नौकुडकर १:५४:५४
२१ कि.मी. विजेते
पुरूष विजेता
पहिला क्र. – निखिल साहानी २:०५:४४दुसरा क्र. – इनेश वसवा २:१२:०९तिसरा क्र. – ज्ञानेश्वर नाईक २:४८:२७
महिला विजेता
पहिला क्र. – निशा मिश्रा ३:०९:१७दुसरा क्र. – आलेना जाबालोवा ३:२७५६तिसरा क्र. – श्रीया लवांडे ३:४४:०९
३० कि.मी. विजेते
पुरूष विजेता
पहिला क्र. – थॅामस लाबाया ३:११:५४दुसरा क्र. – विशाल राजभर ३:१६:२६तिसरा क्र. – आदीश दलाल ३:५८:३८
महिला विजेता
पहिला क्र. – भक्ती खक्कर ४:५०:३८दुसरा क्र. – प्रवेश यादव ५:४७:०५तिसरा क्र. – आकांक्षा ७:०८५०
४२ कि.मी. विजेते
पुरूष विजेता
पहिला क्र. – निलेश कुलये ४:४८:२१दुसरा क्र. – प्रीतम राय ५:२३:२०तिसरा क्र. – योगेश सानप ५:३४:३२
महिला विजेता –
पहिला क्र. – तृप्ती भोसले ७:४४:१८दुसरा क्र. – विणा तडसरे ८:१०:५२तिसरा क्र. – निकिता मंडलोई ८:३४:४८

