पुनीत बालन यांच्या कार्याचे केले कौतुक
पुणे-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.१०) श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पुनीत बालन यांच्या कार्याचे कौतुकही केले.पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर या वेळी त्यांच्या समवेत होते. माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “कसबा मानाचा पहिला गणपती … अन … मानाच्या गणपतीत या गणपतीचा समावेश होतो ..खरंतर मी मधल्या काळात पुनीत बालन यांनी लक्ष देऊन ज्या पद्धतीने हेरिटेजचे काम झाले, मी स्वतः त्याचे काम बघितले, मला ते मनापासून आवडलं.आपल्या पूर्वजांनी आपल्या बापजाद्यांनी काही गोष्टी त्याकाळात सुरु केलेल्या आहेत. त्या पुढे तशाच पद्धतीने जतन झाल्या पाहिजेत. त्यावेळचे लाकूड, किंवा हेरिटेजचे कोरीव काम वैगरे तसंच ते ठेवलं गेलं पाहिजे या मताचा मी नेहमी राहिलो आहे.
मधल्या काळात मी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात भेट दिली. ज्यावेळी काही गोष्टी बघितल्या त्या खरोखरच सर्व पुणेकरांना महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशा पद्धतीच्या आहेत. त्यामुळे भाविकही मोठ्या प्रमाणावर येत असतात. ही एक चांगली परंपरा आहे, जातीय सलोखा निर्माण होतो, एकोपा निर्माण होतो, सर्वजण आनंदाने या उत्सवात सहभागी होतात, असेही अजित पवार म्हणाले.