Home Blog Page 707

ट्रम्प यांना 10 जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार:पॉर्न स्टारला गप्प राहण्यासाठी पैसे दिल्याचे प्रकरण

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने 50 राज्यांमधील 538 जागांपैकी 312 जागा जिंकल्या आहेत. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांना कडवी झुंज देऊनही केवळ 226 जागा जिंकता आल्या. निवडणुकीत एकूण 538 जागा होत्या. बहुमतासाठी 270 चा आकडा आवश्यक आहे.आता डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी सोहळा 20 जानेवारी रोजी वॉशिंग्टन डीसी येथील कॅपिटल बिल्डिंगमध्ये होणार आहे. परंपरेनुसार, कॅपिटल इमारतीत येण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेण्यासाठी व्हाईट हाऊसला भेट देतील.

वाशिंग्टन –अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी नव्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. NYTच्या म्हणण्यानुसार, पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला सायलेंट करण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी ट्रम्प यांना 10 जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. शुक्रवारी, या प्रकरणातील न्यायाधीश, जुआन मार्चेन यांनी सांगितले की, शिक्षेच्या वेळी ट्रम्प वैयक्तिकरित्या किंवा व्हर्च्युअली न्यायालयात हजर राहू शकतात.
गेल्या वर्षी मे महिन्यात मॅनहॅटन कोर्टाने ट्रम्प यांच्यावर 34 आरोप निश्चित केले होते, ज्यात पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गप्प करण्यासाठी पैसे देण्याच्या आरोपाचा समावेश होता. हे पैसे 2016 मध्ये देण्यात आले होते जेणेकरून स्टॉर्मीने तिचे ट्रम्पसोबतचे लैंगिक संबंध सार्वजनिक करू नयेत.

ट्रम्प यांनी मर्चंटला कट्टरपंथी आणि पक्षपाती म्हणून वर्णन केले आणि म्हटले-हा बेकायदेशीर राजकीय हल्ला आणि फसवणुकीशिवाय काहीही नाही. हे आपल्या संविधानाच्या विरोधात आहे.ट्रम्प यांचे प्रवक्ते स्टीव्हन चेउंग यांनी या निर्णयाचा निषेध केला आणि म्हटले की हा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिकारशक्तीच्या निर्णयाचे आणि न्यायशास्त्राचे थेट उल्लंघन आहे. हे बेकायदेशीर प्रकरण कोर्टात कधीच आणायला हवे होते. ती तत्काळ फेटाळण्यात यावी, अशी संविधानाची मागणी आहे.या प्रकरणात कोणतीही शिक्षा होऊ नये, असे च्युंग म्हणाले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे सर्व संपेपर्यंत या फसवणुकीशी लढत राहतील.

सोन्याची तस्करी करणाऱ्या विमानतळ कर्मचाऱ्यांना केली अटक: 6.05 किलो सोने जप्त

मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्युटी फ्री दुकानात काम करणाऱ्या आणि सोन्याची तस्करी करणाऱ्या टोळीशी संबधित विमानतळ कर्मचाऱ्यांच्या गटाला  महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ताब्यात घेतले. हे कर्मचारी आंतरराष्ट्रीय ट्रान्झिट टर्मिनलमधून छोट्या गटांमध्ये आणलेले सोने विमानतळाबाहेर पोहोचवून त्याची तस्करी करत होते. विमानतळाबाहेर तस्करीचे सोने घेऊन जात असताना डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या दोन कर्मचाऱ्यांना अडवले. त्यानंतर केलेल्या कारवाईत ते सोने ताब्यात घेणाऱ्या दोन जणांना देखील ताब्यात घेतले. तपासणी दरम्यान 5 अंडाकृती आकाराच्या कॅप्सूल आणि मेणाच्या स्वरूपातील सोन्याच्या भुकटीची 2 पाकिटे आढळून आली. चौकशी नंतर, 4.84 कोटी रुपये किमतीचे 6.05 किलो सोने जप्त करण्यात आले. मेणाच्या स्वरूपातील (6.05 किलो) 4.84 कोटी रुपये किमतीची सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली, आणि सीमा शुल्क कायदा 1962 च्या तरतुदींनुसार चारही जणांना अटक करण्यात आली.

***

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नो युवर आर्मी’मेळाव्याचे उद्धाटनराष्ट्रीय सुरक्षिततेच्याबाबत भारतीय सैन्यदल सक्षम- मुख्यमंत्री

पुणे, दि. ३: भारत देश राष्ट्रीय सुरक्षिततेच्या अनुषंगाने अंतर्गत आणि बाह्यबाजूने मजबूत आहे; भारतीय सेना जगातील उत्तम सेनेपैकी एक असून भू, जल व वायू अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्यास प्रतिकार करण्यास सैन्यदल सक्षम आहे, असे गौरवोउद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

‘समर्थ भारत सक्षम सेना’ या प्रेरक संकल्पनेअंतर्गत दक्षिण कमांडच्यावतीने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब येथे आयोजित ‘नो युवर आर्मी’ मेळाव्याच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, आमदार सुनील कांबळे, दक्षिण कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगर पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक आंचल दलाल, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले.कर्नल सतीश हंगे, माजी राज्य मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार विलास लांडे,आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, या मेळाव्यात भारतीय सैन्यदलाच्या क्षमता आणि संरक्षण क्षेत्रात चाललेल्या स्टार्टअप आणि नवोन्मेषाचे सुरू असलेले प्रचंड काम पाहायला मिळत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांना भारतीय सैनिकांशी संवाद साधता येणार आहे, शिवाय युवकांना भारतीय सैन्यदलात भरती होण्याच्यादृष्टीने प्रेरणा मिळणार आहे. भारत देशाने सरंक्षण क्षेत्रात सुरक्षितेच्यादृष्टीने निर्माण केलेल्या विविध अत्याधुनिक उपकरणांची माहिती देणारे प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भारतीय सैन्यदलाचे यांनी अभिनंदन केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केंद्रीय संचार ब्युरोच्यावतीने भारतीय सैन्याचे साहस, शौर्याच्या क्षमतेचे दर्शन घडविणाऱ्या छायाचित्रांचे बहुमाध्यम प्रदर्शनास भेट देवून माहिती जाणून घेतली. तसेच परिसरातील विविध संरक्षण विषयक अत्याधुनिक शस्त्रे, रणगाडे, उपकरणाची पाहणी करुन माहिती घेतली.

सार्वजनिक आरोग्य सेवा अधिकाधिक दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करणार

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची औंध जिल्हा रुग्णालय आणि
येरवडा मनोरुग्णालयाला भेट

पुणे, दि.3: – आरोग्य सेवा अधिकाधिक दर्जेदार होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून गरजू रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी नेहमी तत्पर रहावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

औंध जिल्हा रुग्णालय आणि येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. भेटी दरम्यान त्यांनी थेट रुग्णांशी संवाद साधून त्यांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेविषयी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी आरोग्य भवन येथील राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत पुण्यातील विभागवार आरोग्य सेवांचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना रुग्णालयातील स्वच्छता आवश्यक त्या चांगल्या आरोग्यविषयक सोयी सुविधा पुरविण्याच्या सूचना दिल्या.

आरोग्य मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांनी औंध येथील जिल्हा रुग्णालयाला अधिकारी समवेत भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांशी थेट संवाद साधून रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधेबाबत प्रतिक्रिया जाणून घेतल्या. जिल्हा रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सेवा, सुविधा, रुग्णालयातील विविध विभाग, बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, माता बाल आरोग्य सेवा, नवजात विशेष काळजी कक्ष, डायलिसीस सेंटर, अस्थिरोग विभाग तसेच विविध सेवा विभाग यांना भेट देऊन आरोग्य सेवांची प्रत्यक्ष पाहणी केली.

श्री. अबिटकर यांनी येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाला भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली. महिला व पुरुष कक्ष, आहार कक्ष, पुनर्वसनात्मक सेवा विभागाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील रुग्णांशी संवाद साधला. यावेळी रुग्णालयाच्यावतीने विविध विभागांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवांबाबत माहितीचे सादरीकरण करण्यात आले. प्रादेशिक रुग्णालय बंगलोरच्या निम्हांस रुग्णालयाच्या धर्तीवर हे रुग्णालय साकारण्यात येणार असून याविषयी बांधकाम विभागाने सादरीकरणाव्दारे माहिती दिली.

प्रादेशिक मनोरुग्णालय आदर्श कसे करता येईल याविषयी आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पुणे येथील मलेरिया, कुष्ठरोग, माता व बाल संगोपन, परिवहन, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, आरोग्य प्रयोगशाळा, जन्म मृत्यू नोंदणी विभाग, कुटुंब कल्याण, जलजन्य आजार, हत्तीरोग या विभागांच्या कार्याविषयी राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग येथेही झालेल्या बैठकीत विविध आरोग्य सेवांचा आढावा घेतला.

बैठकीला संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त संचालक डॉ. विजय बाविस्कर, सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर आदि उपस्थित होते.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला पुण्यातून बेड्या; कृष्णा आंधळेचा शोध जारीच

पुणे-बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार आरोपींपैकी दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे,
दरम्यान फरार तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अजून पोलिसांना सापडलेला नाही. प्रयत्न करून सुद्धा तिसरा आरोपीला पोलिसांना ताब्यात घेता आले नाही.

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना 9 डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात सुदर्शन चंद्रभान घुले, कृष्णा शामराव आंधळे, सुधीर ज्ञानोबा सांगळे, महेश सखाराम केदार, जयराम माणिक चाटे, प्रतिक भीमराव घुले, विष्णू महादेव चाटे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील गुन्हेगारांना न्यायालयातून फाशीची शिक्षा होईपर्यंत वाट पाहण्यात थांबण्यापेक्षा अशा या फाळकुट दादांना भर चौकात गोळ्या घालून त्यांचे एन्काऊंटर करायला हवे. म्हणजे राज्यांमध्ये अशा प्रकारचे गुन्हेगारी डोके वर काढणार नाही. अशी मागणी शेतकरी नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी केज तालुक्यातील मस्साजोग येथे केली.

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याने न्यायालयात आपल्याला 24 तास मदतनीस मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. यामध्ये आपल्याला स्लीप ॲप्निया या नावाचा आजार असल्याचे त्याने म्हटले होते. या आजारात रुग्णाला रोज रात्री ऑक्सिजन सारखी एक मशीन लावली जाते. मात्र ही मशीन ऑक्सिजन नसून रुग्णाला झोप येण्यासाठी लावली जाते. ही मशीन लावण्यासाठी आणि इतर कामासाठी आपल्याला 24 तास मदतनीस मिळावा, अशी मागणी वाल्मीक कराडने न्यायालयाकडे केली होती. मात्र, त्याची ही मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.
मस्साजोगचे संतोष देशमुख हत्याकांडातील फरार तीन आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवून योग्य बक्षीस देण्याचे पोलिस विभागाने दोन दिवसांपूर्वी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले होते .

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर कुटूंबीयांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष बाब म्हणून 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. शुक्रवारी 10 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला.

सुदर्शन घुलेला मदत करणाऱ्या डॉक्टरला अटक:वकील पत्नीलाही बेड्या

नांदेड -बीडच्या सरपंच हत्याकांडातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले यांना आर्थिक मदत करणाऱ्या एका डॉक्टरला त्याच्या वकील पत्नीसह विशेष तपास पथकाने नांदेड येथून अटक केली आहे. या अटकसत्रामुळे संतोष देशमुख हत्याकांडाच्या तपासाला चांगलाच वेग आला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता मोठ्या घडामोडी घडत आहेत. बीड पोलिसांनी पुण्यातून या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह सुधीर सांगळेला अटक केली. त्यानंतर आता एसआयटीने नांदेड येथून सुदर्शन घुले याला अटक करणाऱ्या एका डॉक्टरला त्याच्या वकील पत्नीसह अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संभाजी वायबसे असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी वायबसे यांनी सुदर्शन घुलेशी संपर्क साधला होता. विशेषतः त्यानेच आरोपींना पळून जाण्यात मदत केली होती. एवढेच नाही तर आरोपींना पळून जाण्यासाठी त्यानेच पैसे पुरवल्याचा आरोप आहे.

बीड पोलिसांनी वायबसे दाम्पत्याला शुक्रवारी रात्री उशिरा नांदेड येथून ताब्यात घेतले. त्यानंतर लगेच त्यांच्या चौकशीला सुरुवात केली. त्यातून सुदर्शन घुले व सुधीर सांगळेच्या पुण्यातील वास्तव्याची माहिती मिळाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

दुसरीकडे, संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास करणाऱ्या एसआयटीने शनिवारी पहाटे सुदर्शन घुले व त्याचा सहकारी सुधीर सांगळे याला अटक केली आहे. या दोघांना सध्या पुण्याहून बीडला आणले जात आहे. बीडचे पोलिसि अधीक्षक नवनीत कॉवत एका पत्रकार परिषदेद्वारे या कारवाईची विस्तृत माहिती देणार आहेत.

सुदर्शन घुले व सुधीर सांगळेसह पोलिसांनी सिद्धार्थ सोनवणे नामक अन्य एका संशयिताला मुंबईतून ताब्यात घेतले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी सिद्धार्थ सोनवणे बीडमध्ये होता. त्यानंच संतोष देशमुख यांच्या लोकेशनची माहिती मारेकऱ्यांना दिल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आता पोलिसांच्या हाती लागल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा आता उलगडा होण्याची शक्यता आहे.

कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरण:बदला घेण्यासाठी २ पिस्तुल घेऊन तयारीत असलेले दोनजण जेरबंद

पुणे दि १३-कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पिस्तूल आणून बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या दोन जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथक दोनने अटक केली आहे. शरद शिवाजी मालपोटे (29, रा. सुतारदारा, कोथरूड ) आणि संदेश लहू कडू (24, काळूबाई कॉलनी, कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून यांना दोन पिस्तुल आणि 7 जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहेत.

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर ५ जानेवारी २०२४ ला साथीदार असल्याचा बहाणा केलेल्या आरोपींनी गोळ्या झाडून खून केला होता. या घटनेला एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत असताना, शरद मोहोळ याच्या हत्येचा बदला घेण्याच्या तयारीत असणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे. दोघांना अटक केली असली तरीही या गुन्ह्यात आणखी काही साथीदारांचा समावेश असून त्यांचा देखील पोलीस तपास करत आहे. अटक करण्यात आलेल्या दोन जणांनी शरद मोहोळ हत्येचा बदला घेण्याची पूर्ण तयारी केली होती. त्यासाठी संबंधित दोघांनी पिस्तूल देखील आणले होते. आणि हे दोघे खुनाचा कट इतर साथीदार यांच्यासोबत करत होते. मात्र त्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या पोलिसांना याबाबत या कटाची कुणकुण लागली आणि त्यांनी संशयित दोघांना सापळा रचून अटक केली.

मागील वर्षी पाच जानेवारी रोजी कुख्यात गुंड शरद मोहोळचा भरदुपारी त्याच्या सुतारदरा येथील घरासमोर गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला होता. शरद मोहोळ याचे सहकारी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व दोन साथीदारांनी गोळ्या झाडून हा खून केला होता. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होता. तपासा दरम्यान या गुन्ह्यात १७ आरोपी निष्पन्न झाले. मुळशीतील सराईत गुन्हेगार विठ्ठल शेलार टोळी या खुनामागे असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर गुंड विठ्ठल शेलारसह १७ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये ( मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-०१) गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक, नितीन कांबळे, पोलीस अंमलदार अमोल सरडे, ओमकार कुंभार, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, विजय पवार, संजय आबनावे, पुष्पेंद्र चव्हाण, नागनाथ राख, साधना ताम्हाणे, शंकर नेवसे, संजय जाधव, गणेश थोरात, निखिल जाधव, विनोद चव्हाण, राहूल शिंदे, हनुमत कांबळे यांनी केलेली आहे.

‘विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड शिष्यवृत्ती’ योजना जाहीरमहाराष्ट्रातील ५ विभागात २७ जानेवारी रोजी होणार परीक्षा

पुणे, दि. ३ जानेवारी : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शक्षिण संस्था समूह, पुणे, भारततर्फे १०वींच्या (एसएससी व सीबीएसई) हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड शिष्यवृत्ती’ (स्कॉलरशीप) ही अभिनव योजना जाहीर करण्यात आली आहे. या वर्षी ही परीक्षा सोमवार दि. २७ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. अशी माहिती  नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व परीक्षेचे समन्वयक डॉ. एस.एन.पठाण आणि माईर संस्थेच्या महासचिव प्रा. स्वाती कराड चाटे यांनी दिली.
आयोजित परीक्षा दोन भागामध्ये म्हणजे पहिला पेपर स. ११ ते दुपारी १ आणि दुसरा पेपर दुपारी ३ ते ५ या दरम्यान होईल. या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल ३ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. ही परीक्षा इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या १०वीं च्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणार आहे. महाराष्ट्रातील कोकण (मुंबईसह), उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या पाच विभागात २७ जानेवारी रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्यातील वरील पाच विभागातील, प्रत्येक विभागातून गुणानुक्रमे पहिल्या नऊ विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती स्कॉलरशिप २ वर्षासाठी (११वीं आणि १२वीं साठी) असेल.
यशस्वी विद्यार्थ्यांतील पहिला क्र. २५,००० प्रतिवर्ष, दुसरा क्र. २०,००० प्रतिवर्ष , तिसरा क्र. १५,००० प्रतिवर्ष, चौथा  क्र. १०,००० प्रतिवर्ष, आणि उत्तेजनार्थ पुरस्कारामध्ये सहावा क्रमांक ५ हजार, सातवा क्रमांक ३ हजार, आठवा क्रमांक २ हजार आणि नववा क्रमांक १५०० प्रतिवर्ष देण्यात येणार आहे.
शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी १०वीं आणि ११वीं मध्ये किमान ७० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. अन्यथा शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल. प्रत्येक विभागातील ९ यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि पदक देण्यात येईल. विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड शिष्यवृत्ती परीक्षा ही आपापल्या मान्यताप्राप्त शाळेत घेतली जाईल. परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यास मुख्याध्यापकांची शिफारस असणे आवश्यक आहे. सदरील परीक्षा घेणार्‍या प्रत्येक शाळेतर्फे त्या केंद्रावर किमान ३० विद्यार्थी बसणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी नोंदणी फी नाममात्र १०० रूपये आहे.  या शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी ठरवण्यासाठी मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण यशस्वी व्यक्तिमत्व विकास परीक्षा दरवर्षी घेतली जाणार आहे.
ही शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यामागील संकल्पना, हेतू व भावना ही वैश्विक मूल्यांचा अंगिकार करून, विद्यार्थ्यांनी विश्वशांती आणि मानव कल्याणासाठी कार्य करावे आणि  वसुधैव कुटुंबकम्  या मूळ भारतीय परंतु वैश्विक कल्याणासाठी असलेल्या संकल्पनेसाठी कार्यरत राहून, स्वामी विवेकानंदांनी उच्चारलेल्या विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय साधण्याचे कार्य करावे असा आहे.
या संदर्भातील विस्तृत माहिती  या  https://wpcvalue-education.com  संकेतस्थळावर तसेच, मो. नं. ९४०३१३१२३१ वर संपर्क साधू सकता.

निरंकार प्रभूला प्रत्येक कार्यामध्ये अंतर्भूत करून आध्यात्मिक जागृति आणि शाश्वत आनंदाचा विस्तार शक्य -निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

दिल्ली:- ‘‘निरंकार प्रभूला प्रत्येक कार्यात सहभागी करून आध्यात्मिक जागृती आणि शाश्वत आनंदाचा विस्तार शक्य आहे.’’ असे प्रेरणादायक प्रतिपादन निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी नववर्षाच्या शुभ प्रसंगी दिल्लीतील ग्राउंड नम्बर 8, निरंकारी चौक, बुराड़ी रोड येथे आयोजित विशेष सत्संग समारोहात केले. या सत्संगात दिल्ली, एन.सी.आर. सह विभिन्न प्रदेशातून हजारो भक्तगण सहभागी झाले होते. नव वर्षाच्या प्रथम दिनी सतगुरु माताजी व निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात त्यांच्या दिव्य दर्शनाचा आणि अमृतवाणीचा लाभ घेत आध्यात्मिक ऊर्जेचा सुखद आनंद प्राप्त केला.
सतगुरु माताजींनी आपल्या सम्बोधनामध्ये सांगितले की नववर्ष हे केवळ 2024 चे 2025 असे आकड्यातील परिवर्तन आहे. वास्तविक पाहता मानवी बुद्धीने तयार केलेली धारणा आहे. निरंकार प्रभूने काळ आणि सृष्टिची रचना केली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या गृहांवर वेळेचे गणित वेगवेगळे असते. म्हणूनच प्रत्येक क्षण सार्थकी लावणे हाच नववर्षाचा अर्थ आहे.

खराखुरा शाश्वत आनंद केवळ निरंकार ईश्वरात सामावला आहे. हे नववर्ष आपण असे घडवायचे आहे ज्यायोगे प्रत्येक मानवा पर्यंत आपण हे सत्य पोहचवू शकू. जीवनात सेवा, सुमिरण आणि सत्संगचा वास्तविक अर्थ तेव्हाच प्रकट होईल जेव्हा आपण त्याचा हृदयापासून स्वीकार करु. केवळ मित्रता अथवा सामाजिक दबावाखाली आपण आपली आध्यात्मिकता बदलू नये. शुद्ध बभावना आणि जागरूक राहूनच आपण आपले जीवन निरंकार प्रभूशी जोडू शकतो.
आपल्या कर्त्यव्यांचे पालन करत प्रत्येक कार्यात निराकाराला अंतर्भूत करणे गरजेचे आहे. जीवनात आध्यात्मिकता आणि समाधान देणारा हाच मार्ग आहे. या नववर्षात आपल्या पूर्वानुभवातून धडा घेऊन आपल्या अंतरातील उणिवा सुधारून चांगुलपणाचा अंगीकार केला पाहिजे. मानवी गुणांनी युक्त जीवन हेच खरे जीवन होय.

सतगुरु माताजींच्या प्रवचना अगोदर आदरणीय निरंकारी राजपिताजी यांनीही समस्त भक्तगणांना सम्बोधित करताना सांगितले, की वर्तमान समयाला मानव समाजातील परमात्म्याची जिज्ञासा हळूहळू समाप्त होत चालली आहे. लोक परमातम्याच्या अस्तित्वावरच शंका व्यक्त करात आहेत. सत्याचा मार्ग शोधण्या ऐवजी तो नाकारू लागले आहेत. ही स्थिति उद्भवण्याचे कारण म्हणजे कित्येक लोक परमात्मा प्राप्तीचा दावा तर करतात पण त्यासाठी योग्य प्रयत्न करत नाहीत. सतगुरू कृपेने आम्हाला जे सत्य प्राप्त झाले आहे ते केवळ सांगण्या ऐकण्या पुरते मर्यादित राहू नये. ते आमच्या जीवनातून जाणवले पाहिजे. त्याचा सुगंध असा दरवळवत राहून समाजासाठी वरदान बनावा. आमचे जीवन परमात्म्याच्या प्रति प्रेरित करणारे व्हावे केवळ दिखावा नको.

सेवा, सुमिरण आणि सत्संग यांच्याअभावी भक्ती सदैव अपुरी आहे. परमात्म्याचा ज्यामध्येवास आहे तेच खरे जीवन होय. आपण प्रेम, समर्पण आणि जबाबदारीने मानव परिवाराला सोबत घेऊन जायचे आहे. सत्संगाच्या या अमूल्य पैलुला सजवून आपल्या जीवनाला असे साधन बनवावे ज्ययोगे आपण प्रभूच्या निकट जाऊ आणि इतरेजणांसाठी प्रेरणा स्रोत बनू.

या नववर्षाच्या प्रारंभी सतगुरु माताजी यांनी सकळजनाना सुख, समृद्धि आणि आनंदमय जीवनासाठी शुभकामना व्यक्त केल्या.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पुणे शहराच्या वतीने अभिवादन.

पुणे :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी शिवसेना पक्षाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अजून तळागाळापर्यंत नेण्यासाठी, महिला सक्षमीकरणासाठी, शिक्षणासाठी,महिला सुरक्षेसाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने काम केले जाणार असल्याचे शिवसेना महिला आघाडीच्या विद्याताई होडे यांनी सांगितले .
यावेळी अभिवादनासाठी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी नगरसेवक अशोक हरणावळ, उपशहर प्रमुख भरत कुंभारकर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, युवासेना शहर संघटक राम थरकुडे, शहर संघटक किशोर रजपूत, बाळासाहेब भांडे, परेश खांडके,विधानसभाप्रमुख उत्तम भुजबळ, विभागप्रमुख मुकुंद चव्हाण, राजेश मोरे, संदीप गायकवाड, रुपेश पवार, पराग थोरात, नंदू येवले, दत्तात्रय घुले, प्रसाद चावरे, योगेश पवार, नितीन निगडे, बकुळ डाखवे, विकी तळेकर, राहुल शेडगे, रमेश परदेशी, प्रवीण कोळपकर, जुबेर तांबोळी, सचिन मोहिते, सचिन चिंचवडे, शरद गुप्ते, नागेश खडके, अजय कवडे, महेश चव्हाण, बाळासाहेब गरुड, कैलास दरवाटकर, दिपक कुंजीर, गणपत साळुंखे, दिनेश पोटे, संजय साळवी, संतोष होडे, नितीन दलभंजन, चिंतामणी मुंगी, गणेश हनमघर तसेच महिला आघाडीच्या उपशहर संघटिका विद्या होडे, पद्मा सरोटे, स्वाती कथलकर, रोहिणी कोल्हाळ, युवती सेनेच्या जिल्हा अधिकारी, निकिता मारटकर, मृण्मयी लिमये, स्नेहल पाटोळे, सीमा मगर, गौरी चव्हाण, वैशाली कापसे, शीतल जाधव, उपस्थित होते.

लाडकी बहिण योजेनेबाबत आम्ही ओरडून सांगत होतो ..

पुणे-लाडकी बहिण योजेनेबाबत आम्ही ओरडून सांगत होतो .निवडणुकीपुरती हि योजना होती, .पण आता अशा लाडक्या बहिणींनी काहीही ठरवून काय उपयोग ?पुण्याचे ५ नाही तर ३ नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत त्यांची आम्ही हकालपट्टी केलेली आहे. काही यु ट्यूब वाल्यांनी आमच्या शिवसेनेला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे. फडणवीस यांचा न्याय केवळ त्यांच्यापुरता आहे कि सिलेब्रिटी पुरता न्याय आहे ते आता त्यांनी दाखवून दिले पाहिजे असे येथे उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुले वाडा येथे शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी त्यांना याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी उत्तरे दिली.यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या की, ‘एखादे चांगल काम केले असेल तर कौतुक करायला काय हरकत आहे. राजकारण म्हणजे हातात भाले तलवारी घेऊनच उभे राहील पाहिजे असे काही नाही. ज्या मुख्यमंत्र्यांचा कौतुक केले जात आहे, त्या मुख्यमंत्र्यांकडून सगळ्यांसाठी सारख्या गोष्टींची अपेक्षा आहे. या निमित्ताने राज्य सरकारकडे अपेक्षा आहेत. ते महिलांच्या प्रश्नांकडे पाहतील, ज्या महिला खऱ्या अर्थाने पीडित आहे अशाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे अंधारे म्हणाल्या.पुण्यातील उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, याबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या, तीन नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांची शुक्रवारी पक्षातून हकालपट्टी देखील करण्यात आली आहे. काही लोक हे संकट काळात देखील सोबत असतात. पण काही जणांना संघर्षाचा काळ नको असतो, म्हणून ते सत्तेत सहभागी होतात. त्यामुळे आत्ता जे गेले त्यांना शुभेच्छा, असे अंधारे म्हणाल्या.

जर्मन नाटकासाठी ध्रुव ग्लोबलने प्रथम पारितोषिक पटकावले

पुणे, दि.३ जानेवारी : ‘शाश्वत’ या विषयाला अनुसरून ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावले आहे . या नाटकास सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
गोएथे इन्स्टिट्यूट मॅक्स म्यूलर भवन, पुणे आणि एमईएस सिनियर कॉलेज, पुणे यांच्या तर्फे आयोजित आंतरशालेय जर्मन नाट्य स्पर्धेत नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलने ‘शाश्वततेबद्दल टॉक शो’ (पथनाट्या) चे सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटाकावले. पुणे, कोल्हापूर आणि आष्टा येथील ९ शाळांमधील १५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदे येथील ८ वीं ते १० वर्गातील १० विद्यार्थ्यांनी ‘शाश्वततेबद्दल टॉक शो’ चे सादरीकरण केले. या नाटकाचे सादरीकरण सई कुलकर्णी, शांभवी काळे, तनिश कांसारा, इशानवी बरपांडा, अचल गुप्ता, म्रिधीनी गुप्ता, खुशी देशमुख, ओवी सोंज, त्रिषा कोतलवाल आणि महिका पटवर्धन यांनी केले. अहीर यांनी रंगमंचासाठी मदत केली आहे.
जर्मन विभाग प्रमुख धनश्री महाजनी यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या शाश्वततेबद्दल टॉक शो चे विद्यार्थ्यांनी अप्रतिम सादरीकरण केले. या विद्यार्थी कलाकारांना शाळेतील जर्मन विभागाने पाठिंबा दिला.
प्राचार्या संगीता राऊतजी यांनी उल्लेखनीय यशासाठी टीम आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी जर्मन भाषेतील त्यांची प्रावीण्यता सिद्ध करत ध्रुव स्कूलचा गौरव वाढविला आहे.

पुण्याच्या पालकमंत्री पदावरून :केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ म्हणाले …

पुणे -पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून सत्ताधारी महायुतीत कोणताही वाद नसल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी दिली.पुण्याच्या पालकमंत्री पदावरुन महायुतीत काेणताही वाद नाही. आम्ही निवडणुक एकत्रित लढलाे असून महायुतीच्या नेत्यात चांगल्याप्रकारे समन्वय आहे. कार्यकर्त्यांत समज देखील आहे. त्यामुळे ते पक्ष नेतृत्व जाे निर्णय घेताे त्याची अंमलबजावणी करतात. पक्ष नेतृत्व जे सांगताे ते ऐकणे ही आमच्या पक्षात शिस्त आहे. मनपा निवडणुकीच्या जागांबाबत त्यावेळी निर्णय घेतला जाईल. मागील दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वात देश विकासाच्या वाटेवर जात अाहे. जगात देखील देशाची पत वाढली आहे. माेदी यांच्यावर विश्वास ठेऊन अनेक नेते भाजपात येत आहेत. पुण्यात देखील शिवसेनेचे काही माजी नगरसेवक भाजपात येत आहेत. आम्ही काेणाला त्रास देत नाही किंवा या म्हणून सांगत नाही, आमचे चांगले काम सुरु असल्याने लाेक साेबत येत आहेत. जागा लढणे व जागा जिंकणे यात फरक असताे, असे मुरलीधर माेहाेळ म्हणाले.पुण्यातील भिडेवाडा येथे फुले दाम्पत्यास अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत हाेते. यावेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, फुले दाम्पत्याचे नाव देशभर प्रवास करताना सर्वत्र घेत असल्याचे जाणवते. सातत्याने आम्ही महापुरुषांना पूजन करण्यासाठी तसेच कर्तृत्वाची जाणीव ठेवण्याकरिता येत असताे. अनेक सामाजिक बांधलिकी उपक्रम देखील आम्ही करताे.माेहाेळ म्हणाले, देशातून दरवर्षी सव्वादाेन काेटी भाविक शिर्डीला येतात. परंतु त्याठिकाणी विमानसेवा २४ तास तिथे सुरु नाही. नाईट लँडिंगचे काही प्रश्न हाेते, सीआयएसएफ, एटीसी मनुष्यबळचा विषय हाेता, त्यामुळे त्याबाबत मी बैठक घेऊन दाेन ते तीन महिन्यात सर्व प्रश्न मार्गी लागतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा देखील शिर्डी विमानतळासाठी पाठपुरावा हाेता. तीन महिन्यानंतर शिर्डीचे विमानतळ २४ तास सुरु राहिल असे नियाेजन करण्यात आले आहे. पुरंदर विमानतळबाबत जागा निश्चित झाली आहे. रविवारी राज्यातील सर्व विमानतळ संर्दभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साेबत मुंबईत बैठक पार पडणार आहे. केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील बैठक मुंबईत हाेणार असून त्यात पुण्यातील पुरंदर विमानतळाचा प्रश्न असणार आहे.मुंब्र्यात मराठी अस्मितेचा विषय ऐरणीवर आला आहे. याबाबत माेहाेळ म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे, अशाप्रकारे काेणता प्रकार राज्यात चालू देणार नाही. संबंधितांवर कारवाई देखील झाली आहे. मागीलवेळी देखील असाच एक प्रकार घडला हाेता. राज्यात कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री चांगल्याप्रकारे प्रश्न हाताळत आहे. राज्यात कुठेही मराठी भाषेच्या अस्मितेला धक्का लागणार नाही ही जबाबदारी मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतली आहे.

लाडकी बहिण योजना निवडणुकीपुरती हे आता स्पष्ट होईल -खासदार सुप्रिया सुळे

सरकारमध्ये ॲक्शन फक्त फडणवीसांची ..अन्य कोणाची नाही

पुणे-लाडकी बहीण याेजना केवळ निवडणुकीपुरती हाेती. आरबीआयचा एक रिपाेर्ट माझ्याकडे आला आहे त्यानुसार राज्यात येणारे पैसे व खर्च हाेणारी रक्कम यात माेठी तफावत आढळून आली आहे. चालू वर्षात मी मागील वर्षात बाेलले त्या अनेक गाेष्टी पाहवयास मिळतील.असेराष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.सरकारला भरभरुन मते मिळूनही सरकार ॲक्शन माेडवर दिसून नसून केवळ मुख्यमंत्री एकटेच ॲक्शन माेडवर दिसतात. एकच माणूस मिशन माेडवर दिसून येत आहे. सरकार येऊनही दीड महिन्यानंतर मंत्री पदे स्वीकारत नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला .सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवगंत नेते आर.आर. पाटील हे प्रथम नेते हाेते ते उपमुख्यमंत्री असताना गडचिराेली जिल्हा दत्तक घेऊन काम करत हाेते. त्याचनुसार देवेंद्र फडणवीस गडचिराेली काम करत आहे ही चांगली गाेष्ट आहे. नक्षलवाद, दहशतवाद विराेधात सर्व पक्ष एकत्रित आहे असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी शुकवारी व्यक्त केले. भिडेवाडा येथे सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या पुतळयाला अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधलासुप्रिया सुळे म्हणाल्या की, आज महिला आम्ही तुमच्यासमाेर उभे आहे त्यामागे माेठी ताकद फुले दाम्पत्य व इतर समाज सुधारक यांचे याेगदानाची आहे. बारामती मध्ये पवार कुटुंबात ज्याप्रकारे दुरावा निर्माण झाला त्यावर अजित पवार यांचे माताेश्री यांनी शरद पवार व अजित पवार यांनी एकत्रित यावे भावना व्यक्त केली.याबाबत सुळे म्हणाल्या, मी लाेकप्रतिनिधी व राजकारणात असून माझे कुटुंब कधी वेगळे आहेत. माझे व्यैक्तिक आयुष्य व राजकीय आयुष्य मी कधीच एकत्र करत नाही. लाेकसभा निवडणूक पार पडल्यावर मी प्रथम अजित पवार यांच्या माताेश्री यांना भेटण्यास गेले.बीड प्रकरणाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सरकारने याबाबत एसआयटी लावली आहे.अशाप्रकरणात गुन्हया मागील आर्थिक कारण समजून घेणे गरजेचे आहे. माणुसकी विरुद्ध विकृती मानसिकता अशी घटना बीडची असून ती केवळ बीड पुरती मर्यादित नाही. ज्यावर अन्याय झाला त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे.परभणी, बीडचा विषय राजकीय नाही त्याविराेधात सर्वांनी एकत्रित यावे. प्रशासनाने ही घटना का व कशी घडली याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. शरद पवार यांचे काळात ज्या मंत्र्यावर आराेप झाले त्यांनी राजीनामे दिले. परंतू ती नितिमत्ता आता ठेवयाची की नाही हे संवेदनशील सरकारने ठरवावे. नैतिकता सरकार मध्ये असावी सारखे विराेधकांनी सांगणे याेग्य नाही. राजीनाम्याचा निर्णय नैतिक पातळीवर व्हावा. गुन्हे वाढण्यासाठी आर्थिक कारणे देखील आहे. काही सामाजिक प्रश्नाबाबत सत्तेमधील लाेकांनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय बैठक घेतली पाहिजे ती महाराष्ट्राला करण्याची गरज आहे.

मी धनकवडीचा भाई … कोयते उगारुन टोळक्याने केली चार मोटारी, तसेच दुचाकींची तोडफोड

पुणे : धनकवडीत कोयते उगारुन टोळक्याने चार मोटारी, तसेच दुचाकींची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.तोडफोड प्रकरणात साहिल दुधाणे याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पियुष मोहन चव्हाण (वय २०, रा. ओम शिवशंभो हाईट्स, मोहननगर, धनकवडी) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दुधाणे याच्याशी चव्हाण याचा वाद झाला होता. बुधवारी रात्री आरोपी दुधाणे आणि साथीदारांनी चव्हाणला धनकवडी परिसरात अडवले. चव्हाण आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना कोयत्याचा धाक दाखविला. मला धनकवडीचा भाई म्हणतात, असे सांगून त्याने त्यांच्यावर कोयते उगारले. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.आरोपींनी धनकवडीतील बसथांब्याजवळ रस्त्यावर लावलेल्या चार मोटारींच्या काचा फोडल्या, तसेच दोन दुचाकींची तोडफोड केली. चव्हाण याला धमकावून आरोपी मोटारीतून पसार झाले. या घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार चव्हाण तपास करत आहेत.