Home Blog Page 3870

एक्झिट पोलने अचंबित होण्याची वेळ

0

शिवसेनेलाच सर्वाधिक जागा मिळतील असे वाटणाऱ्या अनेकांवर वृत्त वाहिन्यांच्या एक्झिट पोलने अचंबित होण्याची वेळ आली आहे . अनेकांना असे वाटते आहे कि या पोल मध्ये भाजपला ज्या जागा दाखविल्या जातात त्या शिवसेनेला मिळतील आणि शिवसेनेला ज्या जागा दाखविल्या जातात त्या भाजपला मिळतील .
भाजपच नंबर एकचा पक्ष ठरणार असल्याचे भाकित सर्वच प्रमुख एक्झिट पोलने वर्तवले आहे. एकीकडे मतदानाचा टक्का वाढत असतानाच त्याचा भाजपलाच लाभ होणार असल्याचे ही आकडेवारी दर्शवते. २००९च्या विधानसभा निवडणुकीत ४७ जागांवरच थांबलेला भाजप तब्बल १०० ते १५० जागांवर झेप घेतील, असा अंदाज आहे. तर ४५ जागा मिळवलेली शिवसेना यंदा ७१ ते ८८ जागा मिळवेल, अशी अपेक्षा या चाचण्यांतून वर्तवण्यात येत आहे. भाजपखालोखाल दुसऱ्या स्थानी शिवसेनाच असेल, असे या पोलचे भाकित आहे. तर गेल्या वेळी ८२ जागा मिळवून पहिल्या स्थानी असलेला काँग्रेस यंदा तिसऱ्या स्थानी घसरून २७ ते ४५ जागा मिळवेल, तर २००९मध्ये ६२ जागा जिंकून दुसऱ्या स्थानी असलेला राष्ट्रवादी काँग्रेस थेट चौथ्या क्रमांकावर घसरून केवळ २८ ते ३७ जागा जिंकेल, अशी शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत १२ जागा जिंकणाऱ्या मनसेचीही अवस्था यंदा बिकट असून हा पक्ष केवळ तीन जागांवरच जिंकेल असे चिन्ह आहे.
टाइम्स नाउ- सी-वोटर
‘टाइम्स नाउ’ आणि ‘सी-वोटर’ यांनी केलेल्या सर्वेमध्ये महाराष्ट्रात २८८ पैकी १२९ जागा जिंकून भाजप हा सर्वांच्या पुढे दाखवलाय. दुपारी तीन वाजेपर्यंतच्या मतदानाच्या टक्केवारीवर आधारित या सर्वेक्षणात शिवसेनेला ५६ जागा देण्यात आल्या आहेत. तर कॉग्रेस पक्षाला ४३ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ३६ जागा जिंकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज ठाकरे यांचा मनसे एकूण १२ जागा जिंकणार असल्याचे टाइम्स नाउच्या सर्वेमध्ये म्हटलंय. इतर पक्ष एकूण १२ जागा जिंकतील असंही या सर्वेमध्ये म्हटलेलं आहेत.
एबीपी माझा- नेल्सन
एबीपी माझा आणि नेल्सनने केलेल्या सर्वेमध्ये भाजपला १२७ जागा देण्यात आलेल्या आहेत. या सर्वेनुसार शिवसेना ७७; कॉंग्रेस- ४०; राष्ट्रवादी ३४; मनसे ५ आणि इतर पक्ष- ५ जागा जिंकणार आहेत.
टुडेज चाणक्य
दरम्यान, टुडेज चाणक्यच्या सर्वेमध्ये एकूण २८८ जागांपैकी भाजपला १५१ जागा देण्यात आल्या आहेत. या सर्वेनुसार शिवसेना ७१, काँग्रेस २७, राष्ट्रवादी २८ आणि मनसे व अन्य पक्षांना ११ जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

महावितरण ने मंगळवारी पुरविली सर्वाधिक वीज

0

गेले काही दिवस सातत्याने १६ हजार मेगावॉटपेक्षा अधिक वीज पुरवठा करणाऱ्या महा​वितरणने मंगळवारी ३७०.९८ दशलक्ष युनिट एवढी वीज पुरवली. आजवरचा हा सर्वाधिक वीज पुरवठा आहे. ऑक्टोबर हिटमुळे विजेच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

यापूर्वी, पाच ऑक्टोबर रोजी महावितरणने ३६४.५७ युनिट एवढ्या वीज पुरवठ्याचा विक्रम केला होता. तो मंगळवारी मोडला. दिवसभरात १७ हजार २०० मेगावॉट वीज पुरवण्यात आली, तर मागणी १७ हजार ५७३ मेगावॉट एवढी होती. ३७३ मेगावॉट एवढी तूट असल्याने काही प्रमाणात लोडशेडिंग करण्यात आले.

वातावरणातील बदल, कृषी पंपाचा वाढता वापर यामुळे या काळात विजेची मागणी वाढते. गेल्या वर्षी ती १७६९० मेगावॉटपर्यंत गेली होती. परंतु महावितरणने प्रथमच १७२०० मेगावॉटपर्यंत वीज पुरवठा केला. त्यात सर्वाधिक मागणीच्या वेळी महा​निर्मितीच्या औष्णिक प्रकल्पातून ५००० मेगावॉट, कोयना प्रकल्पातून १५०० मेगावॉट, उरणच्या गॅस प्रकल्पातून ४०० मेगावॉट, केंद्रीय कोट्यातून ५ हजार मेगावॉट, खासगी कंपन्यांबरोबरच्या करारातून ३४००मेगावॉट आणि आयत्या वेळी पॉवर एक्स्चेंजमधून खरेदी केलेली १५०० मेगावॉट राज्यास उपलब्ध झाल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

सर्वसाधारणपणे सुमारे ८० टक्के राज्य लोडशेडिंगमुक्त करण्यात आले आहे. २० टक्के भागात वीज बील वसुलीचे प्रमाण कमी असून विजेच्या गळतीचे किंवा चोरीचे प्रमाण अधिक असल्याने तेथे नियमानुसार लोडशेडिंग करण्याचे धोरण महा​वितरणने स्वीकारले आहे.

भाजपला ११८ जागा – पुणे प्राब चा अंदाज

0

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेसब्युरो’’(प्राब) च्या एक्झिट पोलमध्ये भाजप- 118, शिवसेना-79, काँग्रेस-42, राष्ट्रवादी-36 ,मनसे-7 आणि इतरांना 6 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एबीपी माझा- नेल्सन पोल :
नेल्सनच्या आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या पोलनुसार भाजपला 127, शिवसेना- 77, काँग्रेस-40, राष्ट्रवादी-34 आणि मनसेला पाच जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. तर अपक्षांचा वाट पाच जागांचा असेल अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सी वोटर-टाईम्स एक्झिट पोल :
टाईम्स गृप आणि सी वोट यांनी केलेल्या एक्झिट सी वोटरच्या सर्व्हेनुसार भाजप-129, शिवसेना- 56, काँग्रेस-43, राष्ट्रवादी-36 आणि मनसेला 12 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर अपक्षांना देखील 12 जागांवर विजय मिळेल असा अंदाज सी वोटरनं व्यक्त केला आहे.

टुडेज चाणक्य एक्झिट पोल :
चाणक्यनं भाजप- 151, शिवसेना-71 , काँग्रेस- 27 , राष्ट्रवादी – 28 तर मनसे आणि इतरांना- 11 जागांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

इंडिया न्यूज :
इंडिया न्यूजनं केलेल्या एक्झिट पोलमधून पुन्हा एकदा भाजपच्या बाजुनं कौल देण्यात आला आहे. या पोलनुसार देखील कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नसलं तरी, भाजप हाच सर्वात मोठा पक्ष बनेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
भाजप – 103, शिवसेना-88, काँग्रेस-45, राष्ट्रवादी-35, मनसे-3 आणि अपक्षांना 14 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टीव्ही-9 चा एक्झिट पोल :
टीव्ही 9 गृपच्या एक्झिट पोलमध्ये भाजप- 98-110, शिवसेना-84-93, काँग्रेस-43-48, राष्ट्रवादी-33-38 मनसे-3 आणि अपक्षा आणि इतरांना 10 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुण्यात 61 टक्के तर पश्चिम महाराष्ट्रात 70 टक्केपर्यंत मतदान, कोल्हापूरात उच्चांकी

0

पुणे-
महाराष्ट्रातील ऐतिहासिक विधानसभा निवडणुकीचे मतदान सायंकाळी 6 वाजता संपले आहे. राज्यात साधारण साठ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी चकमक झाली असून उर्वरित महाराष्ट्रात किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान पार पडले.
पुणे शहर व जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात आज शांततेत मतदान पार पडले. पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघातील एकूण ६४.०२ टक्के मतदान झाले आहे.सांगलीत अंदाजे 70 टक्के, साता-यात 65 टक्के, कोल्हापूरात 70 टक्के, तर सोलापूरात 65 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चुरशीच्या लढतींमुळे उच्चांकी मतदानाची नोंद झाली, तर पुणे व पिंपरी चिंचवडमधील अकरा मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या मतदानाच्या आसपास मतदान झाले. इंदापूरमध्ये सर्वाधिक 79 टक्के, तर पुणे शहरामध्ये कसबापेठेत 68 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील 21 मतदारसंघांमध्ये 61 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी बुधवारी मतदान झाल्यानंतर व्यक्त केला होता.
पुणे शहरात पंचरंगी लढती होत असताना, मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात काही ठिकाणी त्याचे रूपांतर तिरंगी लढतीत झाले होते. ग्रामीण भागात चुरशीच्या लढती आणि गावपातळीवरील सक्रिय कार्यकर्त्यांमुळे मतदानाची टक्केवारी वाढली. सर्व मतदारसंघांत 70 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदान झाले. ग्रामीण भागातील मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानामध्ये सरासरी पाच टक्‍क्‍यांनी, तर लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत दहा टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.

शिवसेना नेते साबीरभाई शेख यांचे निधन

0

मुंबई- भगवत गीता ज्यांना तोंडपाठ होती , भगवत गीतेचे श्लोक आणि उत्तुंग म्हणता येईल असा वक्ता; ज्याने सुरुवातीच्या काळातच शिवसेना ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याचे सामर्थ्यवान काम केले ते , शिवसेनेचे नेते व माजी कामगारमंत्री साबीर शेख यांचे आज दुपारी ठाण्याजवळील कल्याणच्या कोणगावात राहत्या घरी निधन झाले. साबीर शेख मागील तीन-चार वर्षापासून आजारी होते.शिवसेना हि मुस्लिम आणि दलित विरोधी नाही तर ती देशद्रोही मुस्लिम आणि तमाम देशद्रोह्यांच्या विरोधात डरकाळी फोडणारी संघटना आहे असा यशस्वी प्रचार करून १९७५ ते १९८५ या दशकात शिवसेना महाराष्ट्रभर पोहोचविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता . पुण्याशी आणि अहमदनगर जिल्हयाशी त्यांची फारच जवळीक होती . ते मूळ पुणे जिल्ह्यातील रहिवासी होत
1995 मध्ये महाराष्ट्रात प्रथमच सत्तेत आलेल्या शिवसेना-भाजपच्या युतीच्या काळात शेख कामगार मंत्री होते. साबीर शेख शिवसेनेचा मुस्लिम चेहरा होते. बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून साबीर शेख यांची ओळख होती. साबीर शेख यांचे पुतणे अराफत शेख यांनी मनसेतून नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेनेचे लढवय्ये नेते आणि माजी कामगार मंत्री साबीरभाई शेख गेल्या तीन-चार वर्षापासून आजारी होते. पत्नीच्या निधनानंतर साबीर भाई एकटे पडले होते. एकुलती एक मुलगी आहे पण तिचे लग्न झाल्याने ती सासरी असते. त्यामुळे भाईंना पुतण्याशिवाय व शिवसैनिकांशिवाय आधार नव्हता. त्यामुळे त्यांची काळजी घेण्यासाठी कोणीही नसल्याने मध्यंतरी त्यांना औरंगाबादच्या कल्पतरू युवाविकास मंचने औरंगाबाद येथील मातोश्री वृद्धाश्रमात हलवले होते. त्यांची काळजी कल्पतरू मंचने घेतली होती. मात्र शेख लगेच कल्याणमध्ये परतले होते. माझे शिवसैनिक माझी काळजी घेतील असे शेख यांनी त्यावेळी म्हटले होते.
आयुष्यभर शिवसेनेसाठी लढणा-या साबीरभाईंना उतारवयात मधुमेहाने त्रस्त केले होते. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून साबीरभाईंनी शिवसेना उभारणीसाठी जीवाचे रान केले. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा आजार असल्याने तीन-चार वर्षापासून ते अंथरूणाला खिळून होते. कल्याणजवळील कोनगावात सध्या पुतण्या अराफतकडे ते राहत होते. प्रकृतीकडे विशेष लक्ष देण्यासाठी कोणी नसल्याने त्यांची प्रकृती खूपच खालावली होती.ज्ञानेश्वरीचे भाष्यकार, कीर्तन व प्रवचनात रमणारे, सह्याद्रीभ्रमण भूषणकार अशी अनेक बिरूदे साबीरभाईंना मिळाली होती. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून ते निवडून आले. 1995 मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात बाळासाहेबांनी साबीरभाईंना कामगार खात्याचे मंत्री केले. बाळासाहेबांनी साबीरभाईंना ‘शिवभक्त’ ही पदवी दिली होती

आमटे कुटुंबियांच्या उपस्थितीत रंगलाप्रिमीयर सोहळा

0

‘डॉ. प्रकाश बाबा आमटे- द रिअल हिरो’
1w

चित्रपटगृहाच्या रूपेरी पडद्यावर आपल्या हिरोची कथा ते अवाक् होऊन बघत होते… प्रत्येक प्रसंगाशी ते स्वतःला जोडत होते… त्याच्यासोबत हसत होते, त्याचा संघर्ष बघून भावूक होत रडतही होते.. चित्रपट संपला आणि त्या सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात आपल्या या नायकाचं कौतुक केलं… चित्रपटगृहातील ही भारावून गेलेली प्रेक्षक मंडळी होती हेमलकसा व आनंदवनातील शेकडोंच्या संख्येचा आमटे परिवार आणि पडद्यावरील नायक होता,डॉ. प्रकाश बाबा आमटे. प्रसंग होता त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो’ या चित्रपटाच्या प्रिमीयरचा. एस्सेल व्हिजन प्रस्तुत आणि समृद्धी पोरे निर्मित दिग्दर्शित ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे- द रिअल हिरो’ हा चित्रपट १० ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. मुंबई, पुणे येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रपटाचा प्रिमीयर सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. त्यानंतर १३ ऑक्टोबरला नागपूरमध्येही या चित्रपटाचा विशेष प्रिमीयर सोहळा रंगला तोही लोकबिरादरी प्रकल्प आणि आनंदवन परिवारातील सदस्य आणि आमटे कुटुंबियांच्या उपस्थितीत यावेळी डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटें, डॉ. अनिकेत आमटे, डॉ. समिक्षा आमटे, आरती आमटेंसह चित्रपटातील स्थानिक कलाकार आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

गडचिरोली जिल्हयातील हेमलकसा येथील आदिवासींना आरोग्य सुविधा देण्याचं शिक्षणाच्या माध्यमातून आत्मभान जागृत करत मुख्य प्रवाहात आणण्याचं काम गेल्या ४० वर्षांपासून डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे आणि सहकारी अविरतपणे करत आहेत. त्यांचा हाच जीवनप्रवास मांडणारा डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो चित्रपट मागील आठवड्यात प्रदर्शित झाला. पहिल्या तीनही दिवशी चित्रपटाने बहुतेक सर्वच ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड झळकवले. विशेषतः तरूण वर्ग या चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत आहे आणि सोशल नेटवर्क साइट्सवरही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रत्येकजण चित्रपटाबद्दल भारावून बोलत आहे. काहीशा अशाच वातावरणात नागपूरचा प्रिमीयर सोहळाही पार पडला. यासाठी विशेष आमंत्रित होते आनंदवनातील सदस्य आणि हेमलकसामधील आदिवासी बांधव. यातील बहुतेकांसाठी तर चित्रपटगृहात येण्याचा पहिलाच प्रसंग. पण सर्वजण आले होते ते एकाच ओढीने…. आपल्या भाऊंची म्हणजेच डॉ. प्रकाश यांची जीवनगाथा बघण्यासाठी. एस्सेल व्हिजन प्रोडक्शनने पुढाकार घेत नागपूरमध्ये या विशेष शोज् चे आयोजन केले होते. याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. प्रकाश म्हणाले की, “आजचा दिवस माझ्यासाठी खूप विशेष आहे. आज प्रत्येक क्षणाला मला आई-बाबांची आठवण येत आहे. आज ते असते तर हा चित्रपट बघून त्यांना खूप आनंद झाला असता. माझ्यावर चित्रपट करणं हे खरं तर खूप धाडसाचं काम होतं. कारण त्यात मनोरंजन, नाच गाणी यांना अजिबात स्थान नव्हतं. पण समृद्धी पोरे यांनी हे आव्हान पेललं. नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी उत्तम अभिनय करत आमचं जगणं योग्य प्रकारे पोचवलंय याचा आनंद आहे.” डॉ. मंदाकिनी आमटे म्हणाल्या की, “जिवंतपणी आपल्यावर सिनेमा तयार होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. आपला प्रवास मोठ्या स्क्रीनवर येतोय याचा विशेष आनंद आहे.”

यावेळी चित्रपटाच्या निर्माती-दिग्दर्शिका समृद्धी पोरे, सहनिर्माती उज्ज्वला हावरे, एस्सेल व्हिजनचे बिझनेस हेड निखिल साने उपस्थित होते. याशिवाय पूजा पिंपळकर, प्रसाद ढाकूलकर, योगेश राऊत, विनोद राऊत, मुग्धा देशकर हे चित्रपटातील स्थानिक कलावंतही उपस्थित होते.

‘कन्नड बोल, हा भारत आहे चीन नाही’-मणिपूरी विद्यार्थ्याला मारहाण’

0

बंगळुरु – कन्नड बोलण्याची सक्ती करुन येथे एका मणिपुरी विद्यार्थ्यावर हल्ला करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मंगळवारी उशिरा रात्री ही घटना घडली. मारहाण झालेला मणिपुरी युवक हा विद्यार्थी नेता असल्याचे कळते. हल्लेखोरांनी त्याला कन्नड बोलण्याची सक्ती केली. हा चीन नाही भारत आहे, असे म्हणत त्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे, मात्र त्यांची ओळख अजून पटलेली नाही.हल्लेखोरांना स्थानिक नेत्यांची चिथावणी असल्याचे बोलले जाते
विद्यार्थी नेता टी मायकल लम्झाथांग हाऊकिप (वय २६) याच्यावर मंगळवारी उशिरा रात्री कोथानूर भागात हल्ला करण्यात आला. कोथानूर या भागात प्रामुख्याने परदेशातील आणि परराज्यातील विद्यार्थी राहातात. येथे आधीही असे हल्ले झाले आहेत. जखमी विद्यार्थी हाऊकिप मणिपूरी विद्यार्थी संघटना ‘थाडाऊ’चा नेता असल्याचे सांगितले जात आहे. त्याचा डोक्याला आणि पाठीला जबर मार लागला आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असून त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या नगमखोलन हाउकिप आणि रॉकी किपजेन या दोन विद्यार्थ्यांनाही मारहाण झाली आहे. नगमखोलन (वय २८) या विद्यार्थ्यावर गेल्या महिन्यातच असा हल्ला झाला होता. तेव्हाही पोलिसांनी गुन्हा दाखल करुन काही जणांना ताब्यात घेतले होते. मात्र, परप्रांतियांवर होणारे हल्ले वाढल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.

मतदानाबाबत सलमान खान – अमोल पालेकर यांची भिन्न मते

0

मुंबई – मतदान न करणारेच नंतर सरावाधिक तक्रारी करतात असे आज सलमान खान ने म्हटले आहे तर अमोल पालेकर यांनी मात्र चांगले उमेदवार दिसत नसल्याने लोक मतदान करण्यास उत्साही नसतात असे विधान केले आहे
पाहू यात मतदान केल्यानंतर कोण काय म्हणाले …
सलमान खान : मतदान करून तुम्ही तुमचा मतदारसंघ, शहर, राज्य आणि देशाविषयी एकप्रकारे प्रेमच व्यक्त करत असता. निव्वळ राजकारण करण्यापेक्षा तुमच्या मतदारसंघामध्ये काम करणाऱ्याला मत द्या. आज मतदान न करता सहलीला गेलेले लोकच नंतर सर्वाधिक तक्रारी करतात.
अमोल पालेकर : मतदानाची टक्केवारी घसरतेय किंवा शंभर टक्के मतदान होत नाही, अशी नाराजी आपण नेहमीच व्यक्त करतो; पण राजकीय पक्ष उमेदवारांच्या रूपाने चांगला पर्याय जनतेसमोर आणतात का? हा खरा प्रश्‍न आहे. सध्या चांगले उमेदवार नसल्यानेच मतदानाची टक्केवारी घसरलेली आहे.
रणबीर कपूर : आपल्या शहराचा कारभार कुणाच्या हाती असावा, हे तुम्हालाच निवडावे लागणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडा आणि मतदान करा.

पुण्यात दुपारी ३पर्यंत ४६ तर कोल्हापुरात ५८ टक्के मतदान

0

पुणे- पुणे शहर व जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात आज सकाळपासून शांततेत मतदान सुरु आहे. पुणे जिल्ह्यात दुपारी 3 पर्यंत 46 टक्के मतदान झाले आहे. दुपारी तीनपर्यंत सांगलीत ५२ टक्के, साता-यात ५० टक्के, कोल्हापूरात ५८टक्के, सोलापूरात ४५ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक अधिका-यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत दुपारी ३ वाजेपर्यंत झालेलं मतदान
वाशिम ३९.८ टक्के नांदेड ४८ टक्के औरंगाबाद ४३ टक्के भंडारा ४४ टक्के पुणे ४५.२९ टक्के सांगली ५२.५९ टक्के अकोला ३६ टक्के वर्धा ४१ टक्के बीड ४९.३० टक्के सातारा ४९.९४ टक्के सोलापूर ४५.४६ टक्के धुळे ४०.३३ टक्के

विदर्भात मुसळधार पाऊस -एकाचा मृत्यु

0

नागपूर- विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाल्याने मतदारांची धांदल चांगलीच उडाली आहे. रामटेकमधील सावनेर मतदान केंद्रावर वीज कोसळून एकाचा मृत्यु झाला असून जवळपास 10 जण जखमी झाल्याची माहिती म‍िळाली आहे. रामटेकमधील सावनेर येथील एका मतदान केंद्रावर वीज कोसळून पोलिंग पार्टीचा पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यु झाला. तसेच 10 जण जखमी झाल्याची माहिती म‍िळाली आहे.
आज (15 ऑक्टोबर) विधानसभेसाठी मतदान होत आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. राज्यात सर्वत्र मतदान सुरु असताना विदर्भात मात्र मतदानावर पावसाचे सावट आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु झाला. त्यामुळे विदर्भात मतदानाला सुरूवातीच्या टप्प्यात अल्प

महाराष्ट्राची शान ; तोच आमुचा अभिमान

0

राज ठाकरे यांनी आपल्या पत्नी समवेत जावून मतदान केले —

10609484_10202573320764486_6512912765038245476_n
-मतदान केल्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबासमवेत

117526-sharad-pawwar
-शरद पवार यांनी सकाळी सकाळी मतदान केले

supriya
-खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या परिवारासह मतदान केले

ध्यास आमचा विकास ; मतदान करून सारे , महाराष्ट्र बनवू झकास ।

0

कसबा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार दीपक मानकर यांनी आपल्या परिवारासह मतदान केले

117515-dilipvalsepatil
शिरूर -आम्बेगावचे उमेदवार दिलीप वळसे पाटील आपल्या पत्नी समवेत

117524-vinod-tawde
विनोद तावडे आपल्या पत्नी समवेत

117529-ajit
अजितदादा पवार

abhay
पर्वती विधानसभा मतदार संघातील उमेदवार अभय छाजेड

117513-devendra-fadanvis-wife-amrita
भाजप चे देवेंद्र फडणवीस पत्नी अमृता समवेत

nim
शिवाजीनगर चे उमेदवार विनायक निम्हण

bapat
कसबा मतदारसंघाचेचउमेदवार गिरीश बापट

tilak
कसब्याचे उमेदवार रोहित टिळक तसेच प्रणिती आणि दीपक टिळक

गंध पसरवू इथल्या मातीचा ; नक्कीच बजावू हक्क आमचा

0

मराठी अभिनेता संतोष जुवेकर याने मतदान केले –

dimpal chopde
दक्षिणेत गाजणारी मराठी अभिनेत्री डिम्पल चोपडे हिने मतदानानंतर उत्स्फूर्ततेने अशी पोझ दिली
bhargavi chirmule
मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले
manasi kulkarni
मराठी अभिनेत्री मानसी कुलकर्णी
10384908_777425975655832_3060017254464530339_n
मराठी कलाकार संतोष चोरडिया
mahesh kothare
अभिनेता महेश कोठारे

gulshan grover1
अभिनेता गुलश ग्रोव्हर
tejaswini
अभिनेत्री तेजस्विनी पंडित
amol palekar
अभिनेता अमोल पालेकर आपल्या कुटुंबा समवेत
10454298_10152486343194001_6663062765507723325_n
अभिनेता अतुल कुलकर्णी आणि सोबत IBN लोकमत ची नीलिमा कुलकर्णी
1610817_10152345436262204_4084682454621655805_n

अभिनेता स्वप्नील जोशी
ajay naik
दिग्दर्शक अजय नाईक
10294427_813003545419320_130416134874378203_n
निर्माता एकनाथ जावीर
pushkar kshotri
अभिनेता पुष्कर श्रोत्री
tushar kapur
अभिनेता तुषार कपूर

ankush choudhari
अभिनेता अंकुश चौधरी

mrunmayee

पुण्याची मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे

poonam shende
निर्मात्या पुनम शेंडे

pooja paawar

अभिनेत्री पूजा पवार

मोदींचा अवमान सहन करणार नाही – फडणवीस ; गडकरी

0

नागपूर-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना त्यांच्या वडिलांचाही अवमानकारक उल्लेख करणाऱ्या शिवसेनेवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. ‘शिवसेनेच्या या वर्तनाला महाराष्ट्राची जनताच उत्तर देईल,’ असे फडणवीस यांनी म्हटले आहे.तर नरेंद्र मोदींचा अपमान कदापि सहन करणार नाही असा इशारा भाजप नेते नितीन गडकरी यांनी हि दिला आहे
भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या फडणवीस यांनी बुधवारी सकाळी नागपुरात मतदान केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. ‘कोणावरही व्यक्तिगत हल्ले करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. भारताच्या पंतप्रधानांच्या वडिलांचा अनादरपूर्वक उल्लेख करणे हे अयोग्यच आहे. शिवसेनेच्या या उद्योगांना भाजपने उत्तर देण्याचे गरज नाही, जनताच त्यांना काय द्यायचे ते उत्तर देईल,’ असे फडणवीस म्हणाले. ‘महाराष्ट्रात भाजपचेच सरकार पूर्ण बहुमताने येईल,’ असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.दरम्यान ‘नरेंद्र मोदींचा अपमान कदापि सहन करणार नाही. भाजप हा लाचारांचा पक्ष नाही. तुम्हाला आमचा सन्मान करणे जमत नसेल तर अपमान तरी करू नका,’ अशा शब्दांत भाजप नेते नितीन गडकरी यांनी शिवसेनेला सुनावले आहे.

ऊठ मर्‍हाठ्या ऊठ, ‘उंदीर’ म्हणणा-यांना धडा शिकव- उद्धव ठाकरे

0

पुणे- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र सामनाला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीतील सगळा रोख भाजपविरोधी व मराठी अस्मिता जागवणाराच आहे. ‘‘होय, मी जबाबदारीपासून पळणार नाही. जनतेचा निर्णय सर्वोच्च आहे. एक सामान्य माणूस जर का पंतप्रधान बनू शकतो तर जनतेने ठरवले तर ‘ठाकरे’ मुख्यमंत्री का नाही बनू शकणार? असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले. ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे. महाराष्ट्राला ‘उंदीर’ म्हणून हिणवणार्‍यांना जनता पूर्ण गाडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र आज एकवटला आहे. महाराष्ट्राला ‘उंदीर’ म्हणणार्‍यांविरुद्ध तो पेटून उठला आहे. हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. शिवसेनेला कुणाचीही बटीक बनविणार नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राची जनता ठरवेल. दिल्ली ठरवू शकत नाही. ही लढाई शिवसेना महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणून जिंकणारच आहे, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत व्यक्त केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’साठी कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. जी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात उद्धव ठाकरे यांनी भाजप, अखंड महाराष्ट्र, मराठी अस्मिता, दिल्लीपुढे कदापी झुकणार नाही असा रोख ठेवत मराठी माणसांना जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
काय आहे हि मुलाखत ? – जशीच्या तशी वाचकांसाठी देत आहोत ।
प्रश्न- ही लढाई नक्की कुणाबरोबर आहे? कारण महाराष्ट्रात महाभारत सुरू आहे.
उद्धव- युद्ध जर का आपण मानलं तर राजकीय युद्ध हे राजकीय पक्षांबरोबर आहे. राजकीय पक्षांच्या नाकर्तेपणामुळे जे प्रश्‍न निर्माण झाले त्या प्रश्‍नांशी आणि खासकरून महाराष्ट्राच्या अस्मितेची ही लढाई आहे.
प्रश्न- म्हणजे काय?
उद्धव- महाराष्ट्राच्या अस्मितेला आजपर्यंत जे कोणी उंदीर म्हणाले, त्यांचा पूर्ण नि:पात महाराष्ट्राने केलेला आहे. पुन्हा एकदा बर्‍याच वर्षांनंतर कुणाचे तरी धाडस हे महाराष्ट्राला उंदीर म्हणायचं झालेलं आहे आणि तो जो राग आहे तो मला पावलोपावली दिसत होता. सभेतील गर्दीतून ज्या काही घोषणा होत होत्या त्या घोषणा अंगावरती रोमांच उभ्या करणार्‍या होत्या. लोक पेटलेत आता. महाराष्ट्राचा अपमान कधीच सहन केला जात नाही.
म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जे चित्र दिसलं. संपूर्ण महाराष्ट्र अपमानाविरोधात एकवटला होता.
प्रश्न- होय. तसाच महाराष्ट्र आज एकवटला आहे. महाराष्ट्राला ‘उंदीर’ म्हणणार्‍यांविरुद्ध तो पेटून उठला आहे. हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. मुळात महाराष्ट्राला ‘उंदीर’ म्हणण्याचं हे धाडस झालंच कसं?
उद्धव- याचं कारण ज्यांना महाराष्ट्राच्या शौर्याची कल्पना नाही. तेच असं धाडस करू शकतात. मध्ये असं बोललं गेलं की, शिवाजी महाराज ही कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही. त्याच बरोबरीने आमचे शिवाजी महाराज म्हणजे बाजारात उघड्यावर पडलेला मालसुद्धा नाही की कधीही जावा आणि विकत घ्यावा. पैसे फेकावे आणि विकत घ्यावा असा उघड्यावर पडलेला मालसुद्धा नाहीय. शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या रोमारोमांत भिनलेला एक विचार आहे. एक तेज आहे आणि शिवाजी महाराज हे दैवत आहेत.
प्रश्न- पंचवीस वर्षांची शिवसेना-भाजपची युती तुटली
उद्धव- तुटली नाही, भाजपने ती तोडली.
प्रश्न- हे आपल्यासाठी वेदनादायक आहे काय?
उद्धव- नक्कीच. मी परवाच्या सभेत अटलजींच्या चार ओळी ऐकवल्या. ती एक भावना होती, युतीच्या मागची. त्या युतीच्या मागे खुर्च्यांचे राजकारण नव्हते. सत्तेची स्वप्नं नव्हती. आपला देश, हिंदुत्व, महाराष्ट्र या एका पवित्र भावनेतून झालेली ती युती होती. त्याच्यामध्ये कधी सत्तेचे खेळ आणि चाळे हे लक्षात घेतले गेले नव्हते. आता पिढी बदललेली आहे. माझ्यावरती घराणेशाहीचे आरोप झाले. ठीक आहे नं. घराणेशाहीबरोबर घराण्याची परंपरा जी आहे, जो वारसा आहे तो मी पुढे चालवतोय आणि ते संस्कार घेऊन मी पुढे चाललेलो आहे. अशावेळेला आता जो बुद्धिबळाचा खेळ सुरू झालेला आहे तो क्लेशदायक आहे.
दोन-पाच जागांसाठी ‘महान’ महायुती तुटावी हेसुद्धा क्लेशदायकच आहे.
प्रश्न- होय, पण दोन-पाच जागा नक्की कुठून मोजणार तुम्ही? मोजायला कुठून सुरुवात करणार? १८ जागा दिल्यानंतर पुन्हा दोन-पाच जागा हव्यात. म्हणजे पंचविसेक जागा द्यायच्या आम्ही. आधी तर ते ३४ जागा शिवसेनेकडून मागत होते. शेवटी शिवसेना ही शिवसेना आहे हो.
तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे?
उद्धव- शिवसेना ही शिवसेनाप्रमुखांनी रक्त आटवून, शिवसैनिकांनी रक्त सांडून, मर मर मेहनत करून, महाराष्ट्राच्या हितासाठी निर्माण केलेली ही संघटना आहे. कुणाला गुलाम म्हणून किंवा बटीक बनून राहण्यासाठी शिवसेनेची निर्मिती नाही झालेली. आम्ही तुमचे मित्र बनून राहू इच्छित होतो, गुलाम बनून नाही राहणार. मित्र म्हणाल तर मैत्रीसाठी आम्ही काहीही करू. प्रेमाखातर काही करू पण बटीक बनून गुलाम म्हणून फक्त सत्तेसाठी आम्ही तुमची पालखी वाहणार नाही. शिवसेनेला कुणाचीही बटीक बनविणार नाही.
प्रश्न- मित्रच जेव्हा शत्रू बनून उभा ठाकतो व वार करतो तेव्हा तुमची भूमिका काय असते?
उद्धव- दुर्दैव आहे, पण शेवटी लढाई तर जिंकायलाच पाहिजे. आजपर्यंत त्यांना शिवसेनाप्रमुखांनी संकटकाळात सांभाळलं. पंचवीस वर्षे फक्त संकटं आणि संकटंच झेलली. मग ते तुमचे चांगले दिवस. ‘अच्छे दिन’ फार थोडे आले वाट्याला. साडेचार वर्षांचं राज्यातलं सरकारसुद्धा ओढाताणीचं सरकार होतं. केंद्रामध्ये अटलजींचं सरकार होतं तेव्हा चांगली अशी युती होती. बर्‍याचदा अटलजींचे फोन यायचे बाळासाहेबांना. मग बाळासाहेब फोन करायचे अटलजींना. प्रत्येक वेळेला काही कामच नव्हती. एका उंचीवरची ती नेतेमंडळी होती. एकमेकांशी विचारपूस आणि विचारविनिमय व्हायचा. सल्लामसलत व्हायची. शिवसेनाप्रमुख कधी दिल्लीला गेले नव्हते, पण अटलजी कधीही त्यांना फोन करीत होते. ते एक वेगळं नातं होतं.
प्रश्न- तुम्हाला आज अटलजी आणि आडवाणी यांची आठवण येते का?
उद्धव- येतेच ना. आज दुर्दैवाने अटलजी तर कारभार पाहू शकत नाहीत. आडवाणींकडे आता काय कारभार शिल्लक राहिलाय मला त्याची कल्पना नाही, परंतु युतीची बोलणी ज्यावेळा युती तुटण्याच्या दिशेने जाताहेत अशी लक्षणं दिसायला लागली तेव्हा मी आडवाणीजींना फोन केला. त्यांना मी सांगितलं की, आडवाणीजी जिस तरीके से बातचीत चल रही है, मुझे नहीं लगता की बीजेपी युती कायम रखना चाहती है. तर ते पण उडाले. म्हणाले, नहीं नहीं शिवसेना के साथ तो युती बने रहना चाहिए. कौन कर रहा है आप से चर्चा? मैं किसके साथ बात करू? मी म्हणालो, आडवाणी साब मैंने आपको परेशान करने के लिए फोन नही किया है। फक्त मी एवढंच सांगायला फोन केलाय की, दुर्दैवाने असं घडलंच आणि जर का भाजपने युती तोडली तर आप मुझे माफ करिए. आप लोगों ने बनायी हुई ‘युती’ मैं आगे नहीं ले जा सकता आणि दुर्दैवाने तसंच घडलं.
परश्न- का घडलं? हा प्रश्‍न आहेच.
उद्धव- भाजपने युती तोडली. कारण काय हे त्यांचं त्यांनाच माहीत. कदाचित त्यांना महाराष्ट्र तोडायचा असेल. त्यांना असं वाटलं असेल की आता केंद्राप्रमाणे इकडेही आपलं एकहाती सरकार येतेय. आपण बहुमताच्या जोरावरती महाराष्ट्राची फाळणी करू. विदर्भाचा तुकडा पाडू. अशा वेळेला सरकारमध्ये शिवसेना नसलेली बरी, असं त्यांना वाटलं असेल. पण आता त्यांच्या लक्षात आलंय की त्यांचं सरकार येतच नाही. अखंड महाराष्ट्र टिकविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र हा शिवसेनेलाच मतदान करेल.
प्रश्न- बाळासाहेबांची कमतरता जाणवतेय का?
उद्धव- मी नेहमीच सांगतोय की, कमतरता ही केवळ शिवसेनाप्रमुख म्हणून नाही तर आई-वडील हे आईवडील असतात. प्रत्येक मुलाला ही त्याच्या आईवडिलांची कमतरताही जाणवतेच. लढताना आता मला कमतरता जाणवत नाही. कारण त्यांनी मला पुरेसे आशीर्वाद दिले आहेत, पण आज जे धाडस मी केलेलं आहे, जो स्वाभिमान मी दाखवलेला आहे, तो बघायला ते हवे होते हे नक्कीच. मला आतून असं वाटतंय की त्यांनासुद्धा आपल्या पुत्राचा अभिमान वाटला असता की, हा झुकला नाही. हे तत्त्व त्यांनी आयुष्यभर पाळलं. मैत्रीसाठी वाट्टेल ते करीन, पण मी झुकणार नाही. तोच बाणा कायम ठेवून मी पुढे चाललेलो आहे. आणि त्यांना अभिमान वाटला असता की आपली शिवसेना आपला पुत्र अशीच पुढे नेतोय.
प्रश्न- भारतीय जनता पक्षाचे अनेक मित्र होते ते दूर झाले.
उद्धव- दूर झाले की गरज संपल्यावर दूर केले? ते पहा.
प्रश्न- होय. दूर केले, पण भाजपशिवाय त्यांनी एकाकी लढून राज्याराज्यात स्वबळावर सत्ता आणली.
उद्धव- बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. तशीच एकहाती सत्ता महाराष्ट्रात शिवसेना मिळविणार आहे. महाराष्ट्रात मला तेच चित्र दिसतंय.
प्रश्न- एकाकी लढण्याचा रोमांचक अनुभव तुम्ही घेताय.
उद्धव- होय, नक्कीच हा मोठा अनुभव आहे. हे मी संकट नाही मानत, तर संधी मानतोय. नवीन पटनायकांनी तर पाच-दहा वर्षांपूर्वीच भाजपशी युती तोडलीय. असेच चाळे भाजपने त्यांच्याशी केले. युती तोडून पटनायकांनी ओडिशा काबीज केले. आतासुद्धा ऐन मोदी लाटेत ते पुन्हा प्रचंड बहुमताने सत्तेत आले. ममता असतील, जयललिता असतील, मायावती असतील. हार-जीत झालीय. जयललिता आता तुरुंगात आहेत. मायावती आता हारल्यात. पण आधी मायावती एकट्याच लढल्या ना. ममता एकट्याच लढल्या, पण त्या महिला असून जिंकलेल्या आहेत. चंद्राबाबू आज पंधरा वर्षांनंतर पुन्हा सत्तेवर आले. त्यांचे राजकारण असे चाललंय की प्रादेशिक पक्षांना नाहीसे करायचं.
प्रश्न- म्हणजे राज्याची अस्मिताच नष्ट करायची.
उद्धव- राज्यांची अस्मिता नष्ट करायची आणि दिल्लीतून कठपुतळ्यांसारखी माणसं नेमून दिल्लीतून केंद्रशासित असल्याप्रमाणे राज्यांचा कारभार करायचा. अशा दिशेने यांची पावलं पडत आहेत.
प्रश्न- कॉंग्रेसचे हेच धोरण होतं. राज्यातील नेत्यांना मानायचे नाही.
उद्धव- संपवूनच टाकायचं. कठपुतळीचे खेळ दिल्लीत बसून करायचे. त्यांना सर्व राज्यांच्या मुख्यमंत्रीपदी आपल्या कठपुतळ्याच पाहिजेत.
प्रश्न- महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय संदेश द्याल?
उद्धव- महाराष्ट्राची जनता शहाणी आहे. शिवराय आणि बाळासाहेबांच्या विचाराने भारलेली आहे. भीमशक्ती सोबत आहे. कारण डॉ. आंबेडकर हे तर दैवतच आहे. त्यामुळे महाराष्ट्र वेड्यावाकड्या दिशेने जाणार नाही. एकही भगवं मत फुटणार नाही याची काळजी महाराष्ट्र घेईल. अनेकजण मला विचारताहेत की ही तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे काय? माझ्या कसल्या अस्तित्वाची लढाई? मी उभा राहिलोय तो महाराष्ट्राच्या जनतेच्या भरवशावरती उभा राहिलोय. संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ पंतप्रधानांसह इकडे प्रचार करून गेले. आता कोण कुठे कुठे गेलेत ते फोन करून बघा. महाराष्ट्राच्या अडल्यानडल्याला पुन्हा इकडे येतात काय पहा. कोणीही येणार नाही. जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा कोणी येत नाही. संकट येतं तेव्हा कोणी येत नाही. येतात आणि आपले घोड्यावर बसून निघून जातात. परंतु आपण इथलेच आहोत. शिवसेनेला थोडीथोडकी नाही तर ४८ वर्षं झालेली आहेत. शिवसेना हा इथल्या मातीत जन्माला आलेला पक्ष आहे. तो कोणत्याही पक्षातून तुटून फोडून शिवसेनाप्रमुखांनी स्थापन केलेला नाही. मराठी माणसांच्या आणि हिंदुत्वाच्या अस्मितेसाठी जन्माला आलेला हा पक्ष आहे. अशा वेळेला जे आपल्या अस्मितेच्या आणि महाराष्ट्राच्या मुळावर येताहेत, विकासाच्या बुरख्याआडून महाराष्ट्र तोडण्याची स्वप्नं घेऊन येताहेत त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल.
रश्न- मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांबरोबर इतर भाषिक मोठ्या प्रमाणावर आहेत. विशेषत: गुजराती बांधव.
उद्धव- होय. गुजराती बांधव, माता-भगिनी आमच्याबरोबर आहेतच. गुजराती तर आहेतच. मारवाडी, जैन, शीख समाज, हिंदी भाषिक. शीख समाज तर संपूर्णपणे घरी आला होता. त्यांचे ते पुजारी येऊन त्यांच्या भाषेत प्रार्थना करून त्यांनी मला आशीर्वाद दिले आहेत. युती तोडली हे गुजराती बांधवांना आवडलेलं नाहीय. हिंदुत्वासाठी ते ठीक झालं नसल्याची त्यांची भावना आहे. त्यांनी मला वचन दिलंय, ‘साब आप चिंता मत करिए, मुंबई में तो हमे शिवसेना चाहिए.’ याचं कारण असं की मोदींना मराठी माणसानं पण मतं दिलीत. मोदींना मीसुद्धा मत दिलंय. तुम्हीसुद्धा मत दिलंय. त्यावेळेला आपण हे बघितलं नाही की गुजराती, मराठी. ते काही जरी असलं तरी येथील गुजराती समाजातील भावना आहे की, आम्हाला शिवसेनाच पाहिजे. कारण मुंबईत आम्हाला फक्त शिवसेनाच मदतीला येते. बर्‍याच ठिकाणी ख्रिश्‍चन आणि मुस्लिम समाजसुद्धा मला पाठिंबा देतोय. हे एक वेगळं घडतंय यावेळेला.
प्रश्न- तुमचं मिशन काय?
उद्धव- माझं मिशन महाराष्ट्राला सर्वोत्तम राज्य बनवणं. ते व्हिजन मी दाखवलेलं आहे. माझं तर आव्हान आहे. इतर सर्व पक्षांनी त्यांचे जे काही जाहीरनामे असतील, दृष्टीपत्रे असतील. घेऊन माझ्यासमोर यावं. मी त्यांच्यासोबत येतो. जनतेसमोर जाऊ. मी माझ्या तयार असलेल्या योजना दाखवतो. तुमच्या तयार असल्याच तर योजना दाखवा. एकही गोष्ट अशी नाही की मी जी हवेत बोललेलो आहे.
प्रश्न- महाराष्ट्राच्या जनतेला तुम्हाला मुख्यमंत्रीपदी बसलेलं पाहायचंय.
उद्धव- ही त्यांची इच्छा! शेवटी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राची जनता ठरवेल. दिल्ली ठरवू शकत नाही.
प्रश्न- पण महाराष्ट्राला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले पाहायचेत.
उद्धव- आजपर्यंत असं म्हटलं जातंय की ठाकरे घराण्यात कोणी निवडणूक लढलेलं नाही. बरोबर आहे ते. पण ठाकरे कधी जबाबदारी सोडूनही पळालेले नाहीत. त्यामुळे जनता ही सर्वोच्च आहे. सर्वसामान्य माणसाची ताकद फार मोठी आहे. याच सामान्य माणसाने अनेकांना सत्तेवर बसवले आणि सत्तेवरून उतरविलेदेखील आहे. जनतेचे पाठबळ मिळाले तर सामान्य माणूसही लोकशाहीत सर्वोच्चपदी बसू शकतो. नरेंद्र मोदी यांनी जीवनाची सुरुवात चहा विकण्यापासून केली. त्यांना कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नव्हती. तरीही त्यांनी आधी गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधानपदापर्यंत झेप घेतली ती सामान्य माणसाच्या पाठबळावरच. या देशाने कष्टकर्‍यांचा नेहमीच सन्मान केला आहे. शिवसेनादेखील कष्टकरी-कामकर्‍यांच्या पाठीशी कायम उभी राहिली आहे. महाराष्ट्रातील कष्टकरी-कामकरी जनतेनेही शिवसेनेला नेहमी भरभरून प्रेमच दिले आहे. आताही महाराष्ट्रातील जनता शिवसेनेच्या बाजूने उभी राहणार याविषयी आम्हाला खात्री आहे. सामान्य माणसातून आलेल्या नरेंद्र मोदींना याच जनतेने पंतप्रधान केले. तेव्हा जनतेने ठरवले तर ठाकरे मुख्यमंत्री का नाही बनू शकणार?