Home Blog Page 699

स्थानिक स्वराज्य संस्थांवरील ‘प्रशासकीय राज’ हटवा-डॉ.हुलगेश चलवादी 

पुणे:-देशाच्या लोकशाहीचा मुलगाभा असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (स्थास्वसं) खोळंबल्या आहेत. गेल्या दोन ते चार वर्षांपासून राज्यातील अनेक महानगर पालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका न झाल्याने येथे ‘पंचायती राज’ ऐवजी ‘प्रशासन राज’ सुरू आहे.स्थानिक जनक्षोभ त्यामुळे वाढत असून प्रशासकीय राज हटवण्याचे आवाहन करीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहिर करण्याची मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी आज, गुरूवारी (ता.९) केली आहे.

वस्ती, गल्लीबोळासह महानगराच्या विकासाचा मुख्य आराखडा अंमलात आणण्याची जबाबदारी ‘स्थास्वसं’वर असते. ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ या विचारानूसार बहुजनांसह सर्वजनांना सुखी करण्यासाठी त्यांच्या स्थानिक समस्यांची सोडवणूक तात्काळ होण्याची गरज असते.पंरतु,निवडणूका रखडल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार जनतेकडून हिरावून घेतला असल्याचे चित्र उभे झाले असल्याची खंत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली.

प्रशासनाला लोकप्रतिनिधींची जोड मिळाल्यावरच विकासाला वेग मिळता.सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागाशिवाय शक्य नाही. नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य खऱ्या अर्थाने लोकभावना प्रशासनापर्यंत पोहचवत असतात. अशात लोकप्रतिनिधीच नसल्याने लोकभावना, त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहचत नाहीत. नागरिकांना त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

विविध कारणांमुळे आणि कायदेशीर अडचणींमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना विलंब होत आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार, अशा निवडणुका सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ पुढे ढकलता येऊ शकत नसल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.सर्वोच्च न्यायालयात २२ जानेवारी रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुनावणी आहे. ओबीसी आरक्षण अंमलबजावणीसंदर्भात सध्या अनेक अडचणी आहेत. राज्य सरकारने त्यामुळे न्यायालयात योग्य बाजू मांडून निवडणुकीचा मार्ग सुकर करावा,अशी मागणी डॉ.चलवादी यांनी केली आहे. 

आपल्या माणसांनी भरलेल्या घराची, दाभाडे कुटुंबाची इरसाल गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला!

‘फसक्लास दाभाडे’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी यांच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘फसक्लास दाभाडे’चा जबरदस्त ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोनू आणि कोमलच्या हळदी समारंभात धमाल केल्यानंतर आता दाभाडे कुटुंब ट्रेलर लाँचच्या निमित्ताने सगळ्यांच्या भेटीला आले. हा धमाकेदार ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला असून यावेळी दाभाडे कुटुंबियांकडून मीडियासह सगळ्या प्रेक्षकांना आग्रहाचे निमंत्रण होते. या दिमाखदार सोहळ्यात दाभाडेंनी ट्रॅक्टरमधून जबरदस्त एंट्री करत सर्वांसोबत धमाल केली. या सोहळ्याला क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे, तृप्ती शेडगे, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्यासह दाभाडे कुटुंबाचा भाग असलेले अनेक जण उपस्थित होते.

हेमंत ढोमेचा चित्रपट म्हंटला की त्यात धमाल ही असतेच. कौटुंबिक विषय अतिशय हलक्याफुलक्या, मजेदार आणि तितक्याच प्रभावीपणे मांडण्यात त्याचा हातखंडा आहे. हा चित्रपटही त्यापैकीच एक आहे. ‘फसक्लास दाभाडे’च्या घोषणेपासून प्रेक्षकांची उत्सुकता ताणली होती. त्यात आता ट्रेलरने भर टाकली आहे. ट्रेलरमध्ये दाभाडे कुटुंबातील सदस्यांची आंबट गोड केमिस्ट्री पाहायला मिळत असून तायडी, सोनू आणि पप्पू यांच्यातील मजेदार नोकझोक दिसत असतानाच त्यांच्यातील भावनिक नातंही उलगडत आहे. विनोदासह हृदयस्पर्शी भावनांचा संगम असलेली दाभाडे कुटुंबाची कहाणी पाहाण्यासाठी प्रेक्षक आता खूप उत्सुक आहेत.

चित्रपटाबद्दल निर्माते भूषण कुमार म्हणतात, “ हेमंत ढोमेने यापूर्वी मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार, सुपरहिट चित्रपट दिले आहेत. प्रेक्षकांची कथेसोबत नाळ जोडणारे चित्रपट तो बनवतो. त्यामुळेच त्याचे चित्रपट प्रेक्षकांना जवळचे वाटतात. ‘फसक्लास दाभाडे’मधील प्रत्येक व्यक्तिरेखा अनेकांना आपल्या घरातील, आजूबाजूची वाटेल. या टीमसोबत काम करण्याचा अनुभव कमाल होता. ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सोहळाही अतिशय कमाल झाला असून ‘फसक्लास दाभाडे’ची धमाकेदार एंट्री पाहून चित्रपट देखील फर्स्टक्लास असेल याचा अंदाज प्रेक्षकांना आला असेलच. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाभाडे कुटुंबाच्या प्रवासाची झलक पाहायला मिळतेय. हा कौटुंबिक प्रवास सर्वांना आपलासा वाटेल याची खात्री आहे.”

निर्माते आनंद एल राय म्हणतात, “या चित्रपटात नात्यांची गुंफण आणि संघर्ष अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने सादर केला आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला असून हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांचे मन जिंकेल. एखादा चित्रपट तेव्हाच यशस्वी होतो, जेव्हा सगळे कलाकार एकत्र मनापासून आणि आपले समजून काम करतात. असाच प्रत्यय ‘फसक्लास दाभाडे’च्या दरम्यान आम्हाला आला. पडद्यावर हे एक कुटुंब दिसत असले तरी पडद्यामागेही त्यांची केमिस्ट्री तितकीच छान होती. त्याचाच सकारात्मक परिणाम तुम्हाला पडद्यावर दिसणार आहे. नवीन वर्षात एक जबरदस्त चित्रपट पाहिल्याचा आनंद प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर चित्रपटगृहातून बाहेर पडताना असेल.”

दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, “ हा चित्रपट माझ्या गावात माझ्या मातीत शुट झाला असल्याने माझ्या खूप जवळचा आहे. आपल्या गावात आपला चित्रपट शुट करावा, असे खूप मनात होते आणि अखेर हे स्वप्न ‘फसक्लास दाभाडे’च्या निमित्ताने पूर्ण झाले. या माझ्या कुटुंबात भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल राय हे सुद्धा सहभागी झाल्याचा मला आनंद आहे. सगळ्यांचेच मनापासून आभार. या चित्रपटात भावंडांची मस्ती आणि त्यांच्या कुटुंबाचं प्रेम पाहायला मिळेल तसेच दाभाडे कुटुंबाची ही कथा प्रेक्षकांना त्यांच्या रोजच्या जीवनाशी कनेक्ट होईल. हा चित्रपट प्रेक्षकांना कधी खळखळून हसवणारा आहे तर कधी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक करणारा सुद्धा आहे.”

‘फसक्लास दाभाडें’चे हे कुटुंब २४ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेमंत ढोमे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग आहेत. चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे.

महिलांसाठी भारतातील पहिल्या फिरत्या स्नानगृहाचे उद्घाटन

मुंबई  : कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि आमदार अतुल भातखळकर यांच्या उपस्थितीत आज कांदिवली पूर्व येथे महिलांसाठी भारतातील पहिल्या अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या फिरत्या स्नानगृहाचे उद्घाटन करण्यात आले. कांदिवली पूर्व येथील हनुमान नगर येथे स्नानगृह उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.

मंत्री श्री. लोढा यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून स्नानगृहांची निर्मिती करण्यात आली आहे. झोपडपट्टीमधील भगिनींना स्नानगृहांचा अतिशय फायदा होणार असून, यामुळे स्वच्छ भारत घडवण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे जात आहोत, असे मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले. कांदिवली विधानसभा क्षेत्रात १२ तासांसाठी हे फिरते स्नानगृह महिलांना वापरासाठी सुरू राहील.

मंत्री श्री. लोढा म्हणाले, “झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी स्नानगृहाची समस्या अतिशय त्रासदायक ठरते, हे आम्ही जाणतो. तो त्रास कमी करण्यासाठीच आम्ही जिल्हा नियोजन समितीमार्फत भारतात फिरत्या स्नानगृहाचा पहिला प्रकल्प राबवला आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मंगल प्रभात लोढा यांनी महिलांसाठी फिरते स्नानगृह असावे यासाठी कार्य सुरू केले होते. त्यांच्या संकल्पनेप्रमाणे एका बसमध्ये अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या सुविधा असलेले स्नानगृह उभारण्यात आले. या बसमध्ये एकूण ५ स्नानगृहे आहेत, शॉवर आहेत, २१०० लिटर इतकी पाण्याची क्षमता आहे, बेसिन आणि इतर आवश्यक सुविधा आहेत. विशेष म्हणजे या बसमध्ये महिलांना आपले कपडे वाळवण्यासाठी २ ड्रायर मशीन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्युत पुरवठ्यासाठी येथे जनरेटर्सचा वापर करण्यात येणार आहे.

पाण्याचा आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच योग्य नियोजनातून सर्वांना स्नानगृहाचा वापर करण्याची संधी मिळावी यासाठी या स्नानगृहात महिला कर्मचारी सुद्धा नियुक्त करण्यात येणार आहेत.

काकांचे 7 खासदार फोडून केंद्रात मंत्रिपद घेण्याचा अजित पवारांचा प्रयत्न, चर्चेने सुप्रिया संतापल्या अन् थेट तटकरेंना झापले ?

मुंबई – शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे राज्यात आठ खासदार आहेत. त्यापैकी ७ खासदारांना फोडून केंद्रात कॅबिनेट पद मिळवण्यासाठी अजित पवारांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. थेट बाप-लेकींना सोडून दादांच्या राष्ट्रवादीत सामील होण्याचे प्रलोभन देण्यात आल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. दिल्लीत खासदारांच्या भेटी होतात, पण असा कोणताही प्रयत्न केला गेला नसल्याचे स्पष्टीकरण खा. सुनील तटकरे यांनी दिले आहे. आजपर्यंत बाप-लेकी हा शब्द उच्चारला नसल्याचेही तटकरे यांनी सांगितले. दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार अमर काळे यांनी सातही खासदारांशी सोनिया दुहान यांनी संपर्क केल्याचा गौप्यस्फोट केल्याने पुन्हा अनेक चर्चांना उधाण आले आहे.सात खासदारांना फोडण्याच्या चर्चेमुळे सुप्रिया सुळे यांनी संतापून थेट प्रफुल्ल पटेल यांना फोन केला. सुनील तटकरेंबद्दल नाराजी व्यक्त केली. पुन्हा तुम्ही आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहात का, असा जाबच सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांना विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तिरुपतीमध्ये वैकुंठद्वार दर्शनमचे टोकन घेण्यासाठी चेंगराचेंगरी:6 भक्तांचा मृत्यू

आंध्र मधील ख्यातनाम, जगप्रसिद्ध अशा
तिरुपती मंदिरापासून २२ किमीवरील विष्णू निवासम येथे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला. तर ४० वर भाविक जखमी झाले, मृतांत ५ महिला आहेत. यातील एका महिलेची ओळख पटली असून ती तामिळनाडूची रहिवासी असून मल्लिका असे नाव आहे.वैकुंठ एकादशी आणि वैकुंठद्वार दर्शनाचे टोकन घेण्यासाठी सुमारे चार हजार भाविक येथे जमले होते. हे टोकन दरवर्षी चालणाऱ्या भगवान तिरुपतीच्या नऊ दिवसांच्या विशेष उत्सवासाठी दिले जातात, जेणेकरून दर्शन व्यवस्थेत अडथळा येऊ नये. हा महोत्सव १० जानेवारीला पहाटे ४.३० वाजता सुरू होणार असून १९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. सध्या दर्शनापूर्वीच या दुर्घटनेने तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाच्या (टीटीडी) व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जखमींना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती टीटीडीचे प्रमुख बी.आर. नायडू यांनी दिली.

रांग लावण्यासाठी धावले, एकमेकांना चिरडत गेले

टीटीडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोकनसाठी वैकुंठ गेटवर गर्दी जमलेली होती. दरम्यान, पोलिसांनी तिरुपतीमध्ये वैकुंठद्वार दर्शनमचे टोकन घेण्यासाठी चेंगराचेंगरी:6 भक्तांचा मृत्यू, बालाजी मंदिरापासून 22 किमी दूर दुर्घटना, 4 हजार भाविकांची गर्दी

तिरुपती2 तासांपूर्वी

आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती मंदिरापासून २२ किमीवरील विष्णू निवासम येथे झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला. तर ४० वर भाविक जखमी झाले, मृतांत ५ महिला आहेत. यातील एका महिलेची ओळख पटली असून ती तामिळनाडूची रहिवासी असून मल्लिका असे नाव आहे.

वैकुंठ एकादशी आणि वैकुंठद्वार दर्शनाचे टोकन घेण्यासाठी सुमारे चार हजार भाविक येथे जमले होते. हे टोकन दरवर्षी चालणाऱ्या भगवान तिरुपतीच्या नऊ दिवसांच्या विशेष उत्सवासाठी दिले जातात, जेणेकरून दर्शन व्यवस्थेत अडथळा येऊ नये. हा महोत्सव १० जानेवारीला पहाटे ४.३० वाजता सुरू होणार असून १९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. सध्या दर्शनापूर्वीच या दुर्घटनेने तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाच्या (टीटीडी) व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जखमींना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती टीटीडीचे प्रमुख बी.आर. नायडू यांनी दिली.

रांग लावण्यासाठी धावले, एकमेकांना चिरडत गेले

टीटीडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोकनसाठी वैकुंठ गेटवर गर्दी जमलेली होती. दरम्यान, पोलिसांनी भाविकांना बैरागी पट्टिडा पार्कवर रांगा लावण्यास सांगितले. वैकुंठ गेटबाहेरून जमाव उद्यानाकडे धावला. त्यामुळे एकच धावपळ सुरू झाली. लोक एकमेकांवर पडले. यामुळे अनेकांचा श्वास गुदमरला. मल्लिका नावाच्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

वैकुंठ एकादशी आणि वैकुंठद्वार दर्शनाचे टोकन घेण्यासाठी सुमारे चार हजार भाविक येथे जमले होते. हे टोकन दरवर्षी चालणाऱ्या भगवान तिरुपतीच्या नऊ दिवसांच्या विशेष उत्सवासाठी दिले जातात, जेणेकरून दर्शन व्यवस्थेत अडथळा येऊ नये. हा महोत्सव १० जानेवारीला पहाटे ४.३० वाजता सुरू होणार असून १९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. सध्या दर्शनापूर्वीच या दुर्घटनेने तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाच्या (टीटीडी) व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जखमींना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती टीटीडीचे प्रमुख बी.आर. नायडू यांनी दिली.

आय टी कंपन्यांतील महिला नोकरदारांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घ्या

पुणे:- पुणे शहरातील विविध IT कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी काम करत आहेत. नुकतीच खराडी येथील आय टी कंपनीतील एका महिला कर्मचाऱ्याचा तिच्या सोबत काम करणाऱ्या पुरुष कर्मचाऱ्यांनेच अत्यंत निर्घृणपणे खुन केल्याची घटना घडली आहे. ह्या पार्श्वभूमीवर पुणे शहर भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या शिष्टमंडळाच्या वतीने पुणे पोलीस आयुक्त श्री.अमितेशकुमार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या

1) आपण शहरातील सर्व IT कंपन्यांना तातडीने स्वतंत्र महिला कर्मचारी सुरक्षा विषयक धोरण तयार करण्याबाबत निर्देश द्यावेत.

2) या कंपन्यांमधील कर्मचारी सुटण्याच्या वेळी संबंधित परिसरात महिला पोलीसांची गस्त सुरु करावी.

3) सर्व कंपन्यांच्या आवारातील CCTV यंत्रणेचे ॲाडीट करण्यात यावे व हे कॅमेरे चालू स्थितीत आहेत का? त्यांची संख्या पुरेशी आहे का? ते योग्य ठिकाणी लावले गेले आहेत का? याचा तपास करण्यात यावा.

4) या सर्व कंपन्यांना त्यांच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेमध्ये पूर्ण वेळ महिला सुरक्षा रक्षक तैनात करण्याचे निर्देश द्यावेत.

तरी आमची आपणांस या निवेदनाद्वारे नम्र विनंती आहे की आपण वरील मागण्यांबाबत सकारात्मक विचार करुन याबाबत लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी
या बाबत ठोस पावले उचलण्याचे आश्वासन पोलीस आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले या शिष्टमंडळात महिला शहराध्यक्ष हर्षदा फरांदे, प्रियंका शेंडगे शिंदे स्वाती मोहोळ, गायत्री खडके नेहा गोरे अश्विनी कोसरीकर,मनीषा मोरे आणि खुशी लाटे यांचा समावेश होता

राज्यातील लोककलाकारांचे सर्व्हेक्षण व्हावे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी.


मुंबई (प्रतिनिधी )- शासन दरबारी कुठे नोंद नसलेल्या राज्यातील दुर्लक्षित आणि उपेक्षित लोककलाकारांचे सर्व्हेक्षण व्हावे. अशी जोरदार मागणी लोककला क्षेत्रातील तज्ञानी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली आहे.

सध्या महाराष्ट्रात अंदाजे पंधरा हजार कलावंत आपल्या कलाच्या उपजिविकेवर जगत आहेत. मात्र शासन दरबारी त्याची कुठेच नोंद नाही. तमाशा -लावणी,भारूड दशावतार, कीर्तन, खडीगंमत,शाहिरी, झाडीपट्टी, वासुदेव,जागरण गोंधळ, वही गायन,जाखडी नृत्य, दंडार, सर्कस,अशा विविध प्रमुख असणाऱ्या कला क्षेत्रातील काम करणारे कलाकार आज ही विविध योजनेपासून उपेक्षित आहेत. त्यांच्याकडे शासनाच्या योजना वेळेत पोहचत नाही. म्हणूनच सांस्कृतिक कार्य विभागाने या लोककलाकारांचे सर्व्हेक्षण करावे. अन त्यांना ओळखपत्र दयावे. अशी जोरदार मागणी सध्या कला क्षेत्रातून होत आहे.
त्यानुसार राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना एका लेखी पत्राच्या माध्यमातून सदर मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने लाखो रुपये खर्च करून राज्यातील लोककलेचे सर्व्हेक्षण केले आहे. परंतु हे काम समाधानकारक झाले नाही.आता पर्यत संपूर्ण राज्यातील सुमारे 85लोककला प्रकाराचे सर्व्हेक्षण झाले आहे. अशी माहिती लोककलेचे अभ्यासक खंडूराज गायकवाड यांनी दिली.
राज्य सरकारने जर लोककलाकारांचे सर्व्हेक्षण केले तर निश्चितच सांस्कृतिक कार्य विभागाला कलाकारांसाठी नवीन योजना अंमलात आणायला सोपे जाईल. असे त्यांचे मत आहे.
सध्या मानधन योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 37 हजार जेष्ठ कलावंतांची अधिकृत नोंद सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे असल्याचे कळते.

विद्यार्थिनींच्या चेंजिंगरूममध्ये ठेवला व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी कॅमेरा,आरोपी शिपायाला अटक

0

नामांकित शाळेत खेळाचा तास संपल्यानंतर मुलींचे कपडे बदलताना ….
पुणे-पुण्यातील एका शाळेतील शिपायानेच मुलींच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेऊन रेकॉर्डिंग केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार पुणे येथील पाषाण भागात असलेल्या एका नामांकित शाळेत घडला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिपायाला अटक करण्यात आली आहे.आरोपी शिपायाने त्याचा गुन्हा कबूल केल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत शिपाई सरोदे याला अटक केली आहे. आरोपींच्या विरोधात पोक्सो सह बी.एन.एस कलम 77 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे येथील एका नामांकित शाळेत मुलींच्या चेंजिंग रूममध्ये स्विच बोर्डवर मोबाईल ठेऊन मुलींचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले आहेत. हा सगळा प्रकार शाळेतीलच शिपाई तुषार सरोदे याने केला आहे. 6 जानेवारी रोजी शाळेत खेळाचा तास संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी शाळेतील किचन रूममध्ये ड्रेस बदलण्यास गेल्या. तिथे आरोपी शिपाई उपस्थित होता. विद्यार्थिनींनी त्याला तिथून जाण्यास सांगितले असता त्याने त्याचा मोबाईल कॅमेरा सुरू ठेऊन रूममध्येच एका स्विच बोर्डवर ठेवला. हा प्रकार काही मुलींच्या लक्षात आला आणि तातडीने त्यांनी व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट केला.

हा संपूर्ण प्रकार मुलींनी आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी शाळेतील मुख्याध्यापिका यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिपाई सरोदे याला विचारले असता त्याने देखील त्याच्या चुकीची कबुली दिली. हा सगळा प्रकार शाळेच्या व्यवस्थापनाला समजला तेव्हा त्यांनी शिपायची चौकशी केली तेव्हा त्याने त्याचा मोबाईल हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठीच ठेवला असल्याचे त्याने कबूल केले.

येरवडा कारागृहात कैद्यांसाठी “बेड साईड केअर गिव्हर्स” हा २० दिवसांचा प्रशिक्षण व मार्गदशन उपक्रम

पुणे-कर्नल क्युब फाऊंडेशन, पुणे या सेवाभावी संस्थेमार्फत सामाजिक बांधिलकी जपत येरवडा मध्यवती कारागृह व येरवडा महिला कारागृहातील बंद्यांसाठी वयोवृद् माणसाचे आजारपणात कशी काळजी घ्यावी, यावावत “बेड साईड केअर गिव्हर्स” हा २० दिवसांचा प्रशिक्षण व मार्गदशन उपक्रम राबविण्यात येत आहे. सदर उपक्रम व प्रशिक्षण शिबिरात एकुण १२० पुरुष व महिला बंद्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यातील पहिल्या टप्यात २० पुरुष व १३ महिला बंद्यांनी यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यानुसार सदर बंद्यांना आज दि.०८.०१.२०२५ रोजी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. सदर प्रशिक्षणाचा फायदा कारागृहातील वयोवृध्द बंद्यांच्या आजारपणात काळजी घेण्यासाठी निश्चितपणे होईल.
सदर उपक्रम अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक प्रशांत बुरडे ,विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह)डॉ. जालिंदर सुपेकर यांचे संकल्पनेतुन व कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.
सदर उपक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी सुनिल ढमाळ, अधीक्षक, पल्लवी कदम, अति. अधीक्षक, आर ई गायकवाड, उपअधीक्षक, ए एस कांदे, वरीष्ठ तुरुंगाधिकारी, अंगद गव्हाणे, शिक्षक, श्रीमती त्रऋनाक्षी गवळी, शिक्षक संबंधीत संस्थेचे प्रतिनिधी कर्नल फुले, अनिरुध्द् देशमुख, शेखर नवाथे, सुनिल मोरे, नरेंद्र डांगी, सावन पोंक्षे, कमलिनी कानेटकर, श्रीमती. विनिता फुले, स्मिता गोखले, स्निग्धा देशमुख वसाधना डांगी यांनी कामकाज पाहीले.

अद्विक, अमन,सिद्धराज यांची विजयी सलामी

योनेक्स सनराईज पीवायसी एचटीबीए अमनोरा कप १५ वी जिल्हा मानांकन बॅडमिंटन स्पर्धा हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजन
पुणे : अद्विक काळे, अमन वर्मा, सिद्धराज पवार, बुरहनुद्दीन अगाशिवाला आणि कबीर कुलकर्णी यांनी पीवायसी एचटीबीए-अमनोरा कप १५ व्या जिल्हा सुपर-५०० मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत १३ वर्षांखालील मुलांच्या गटात विजयी सलामी दिली.
पीवायसी येथील बॅडमिंटन कोर्टवर बुधवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन पीवायसीचे सारंग लागू आणि तन्मय आगाशे, कॉर्पोरेट अॅथलिट्सचे संस्थापक अभिजित चांदगुडे, रेफ्री सिद्धार्थ पळनिटकर यांच्या उपस्थितीत झाले. या वर्षीच्या स्पर्धेतील खेळाडूंनी १५ व्या वर्षीच्या अमनोरा कपच्या लोगोचे उद्‌घाटन केले. पहिल्यांदाच स्पर्धेतील खेळाडूंनी उद्‌घाटनाचा मान मिळवला आहे. 

स्पर्धेतील १३ वर्षांखालील मुलांच्या सलामीच्या लढतीत अद्विक काळेने राऊ जाधव वर २१-१३, २१-१२ अशी, तर अमन वर्माने कार्तिक रोंगेवर २१-१३, २१-११ असा विजय मिळवला. यानंतर अव्युक्त बेंगेरीने शौर्य वर्माला २१-१७, २१-१० असे, तर वरद निपसेने आर्यन मेहताला २१-८, २१-४ असे नमविले.  सिद्धराज पवारने आदित्य शिंदेवर २१-१५, २१-१३ अशी तर बुरहनुद्दीन  अगाशिवालाने अद्विक वर्मावर २१-४, २१-१० अशी मात केली. कबीर कुलकर्णीने सोहम मांडेवर  २२-२०, २१-१९ अशी मात केली.

निकाल – पहिली फेरी – १९ वर्षांखालील मुली – कैरा मदन वि. वि. रावी कदम १८-२१, २१-१५, २१-१७,

१९ वर्षांखालील मुले – प्रायन महाशब्दे वि. वि. ईशान जोशी २२-२४, २१-१३, २१-१९, अगस्थ्या कुंदन तितार वि. वि. हर्षित वाणी २१-१६, २१-६, रेयांश पानसरे वि. वि. पिनाक गोऱ्हे २१-१०, २१-१०.

१३ वर्षांखालील मुली – अन्वी कुलकर्णी वि. वि. आरोही शिंदे २१-४, २१-१२, हीदा केडिया वि. वि. प्रशांती नाळे २१-१८, २१-१८, राजलक्ष्मी परदेशी वि. वि. आराध्या कोयते २१-५, २१-८, निधी गायकवाड वि. वि. सृष्टी कुलकर्णी २१-७, २१-२, केयारा साखरे वि. वि. आराध्या डोंगरे २१-१३, २१-१४, अस्मी मेहेर वि. वि. काव्या बेजगमवार २१-१९, २१-१५, स्वरा जाधव वि. वि. मृणाली बडगुजर २१-७ २१-२३, २१-१४, आरोही देसाई वि. वि. युगंधरा कुंभार २१-५, २१-११.

१३ वर्षांखालील मुले – सिद्धान्त धमा वि. वि. वेदांत चौधरी २१-१९, २१-१४, दियान पारेख वि. वि. क्रिनाय शाह २१-६, २१-४.

१५ वर्षांखालील मुले – खुश दीक्षित वि. वि. स्निथिक दास २१-३, २१-८, सम्वित देशमुख वि. वि. नैतिक जोशी २१-१४, २१-९, आरव सिन्हा वि. वि. गौरव ठाकूरदास २१-१४, २१-१९, आरुष दुग्गल वि. वि. स्वराज सोनावणे २१-१५, २१-११, मिर शाहझर अली वि. वि. तनीश देवरे २१-११, २१-११, आर्यन नागवडे वि. वि. सर्वज्ञ माने २१-७, २१-८, स्मीत थोकल वि. वि. यश मोरे २७-२५, २१-१६, २१-१७, अर्णव पाटील वि. वि. अदित कानेटकर २१-११, २१-१७, स्वरीत पवार वि. वि. सुधान्व कुलकर्णी २१-१५, १७-२१, २१-१६, शरव जाधव वि. वि. दिवित मुथा २१-१३, २१-३, अक्षत नायक वि. वि. आर्यन पानसे २१-१६, २१-१८, वेदू रेड्डू मल्लू वि. वि. ओजस पाटकर २१-१६, २१-११७, आर्यन भोसले वि. वि. आदित्य सिंग २१-८, २१-१६.  

११ वर्षांखालील मुले- ओजस जगताप वि. वि. चैतन्य प्रभू २१-७, २१-४ साहिर तुरांबेकर वि. वि. सोहम कुलकर्णी २१-१२, २१-५, ईशान बापट वि. वि. अव्यांश श्रीवास्तव २१-२, २१-६, अद्वय केळकर वि. वि. मीत झोलाने २१-८, २१-६, शौनक केळकर वि. वि. आर्यंश लोंढे २१-१०, १५-२१, २१-१५, अद्वैत भोंडवे वि. वि. किआन गाडगीळ २१-१६, २१-८, अनय पिसे वि. वि. रुचिर कुंटे २३-२१, २१-६.

भविष्यासाठी स्वतःला सज्ज बनवण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेची वाटचाल सुरु,

प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि जागतिक दर्जाचा प्रवासाचा अनुभव देण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 76% रक्कम क्षमता विकासावर केले खर्च

नवी दिल्‍ली, 8 जानेवारी 2025

कोट्यवधी भारतीयांना वाजवी दरात जलद, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचा प्रवासाचा अनुभव देणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र, भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण भारताला सेवा देणारी भविष्यासाठी सज्ज असलेली संस्था म्हणून स्वत:मध्ये परिवर्तन घडवून, भारतीय रेल्वेने हे काम मिशन मोडमध्ये हाती घेतले आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीशी मेळ साधत, भारतीय रेल्वेने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिने आणि चार दिवसांमध्ये अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 76 टक्के रक्कम खर्च केली आहे. भारतीय रेल्वेने 5 जानेवारी 2025 पर्यंत केलेल्या खर्चाच्या ताज्या अहवालानुसार, भारतामध्ये रेल्वे प्रवासाचा अनुभव जागतिक दर्जाचा बनवण्याचे उद्दिष्ट लक्षात घेऊन, या काळात रेल्वेने क्षमता विकासाकरता मोठी गुंतवणूक केली.

गेल्या दशकभरात केलेल्या सातत्त्यपूर्ण भांडवली खर्चाची फळे दृष्टीपथात आली असून, 136 वंदे भारत गाड्या, ब्रॉडगेजचे 97 टक्के विद्युतीकरण, नवीन मार्गांचे बांधकाम, गेज रूपांतरण, रेल्वे मार्गांचे  दुहेरीकरण, वाहतूक सुविधांची कामे, सार्वजनिक सुविधा आणि महानगर वाहतुकीमधील गुंतवणूक, हे याचे उदाहरण आहे. या भांडवली खर्चामुळे कोट्यवधी भारतीयांना वाजवी दरात जलद, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचा प्रवासाचा अनुभव मिळत आहे. ‘वंदे भारत’ स्लीपर ट्रेन (शयनयान गाड्या) स्पीड टेस्टिंग (वेगाची चाचणी) आणि सेफ्टी सर्टिफिकेशनच्या (सुरक्षा प्रमाणपत्र) टप्प्यावर आल्या असून, भारतातील रेल्वे प्रवाशांना लवकरच लांब पल्ल्याच्या प्रवासात जागतिक दर्जाचा अनुभव मिळेल. यामुळे एकूणच प्रवासाच्या अनुभवात क्रांती घडेल. भारतीय रेल्वेचे हे परिवर्तन विकसित भारताचा दृष्टीकोन आणि भारतीय रेल्वेने मिशन मोड मध्ये आधुनिकीकरण प्रकल्पांवर खर्च करून या दृष्टीकोनाची त्वरित अंमलबजावणी केल्यामुळे शक्य झाले.  

या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या चार दिवसांत केलेल्या 1198 कोटी भांडवली खर्चासह, आर्थिक वर्षाचे केवळ तीन महिने शिल्लक असताना भारतीय रेल्वेने केलेला एकूण भांडवली खर्च सुमारे 76 टक्के इतका आहे.

2024-25 च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात रेल्वेचा एकूण भांडवली खर्च 2,65,200 कोटी रुपये असून एकूण अर्थसंकल्पीय सहाय्य 2,52,200 कोटी रुपये इतके आहे. त्यापैकी 192446 कोटी रुपये यापूर्वीच खर्च झाले आहेत.

देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात किफायतशीर दरात दररोज सरासरी ‘2.3  कोटी भारतीयांची’ वाहतूक करणाऱ्या भारतीय रेल्वेला जागतिक दर्जाची संस्था बनवणे, हे सरकारचे प्राधान्य आहे.

विकासाच्या या मार्गावर पुढे जात, येणाऱ्या पिढ्यांसाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने भारतीय रेल्वे करदात्यांचा पैसा भांडवली खर्चात गुंतवत आहे. अशा प्रकारे विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत  भारतीय रेल्वेला  “फ्यूचर रेडी” बनवण्यासाठी योगदान देत आहे.  

जमाना बदललाय .. पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या

पुणे- विवाहानंतर पत्नी सतत त्रास देत असल्याने तसेच पत्नीसाेबत सासू आणि मेहुणी देखील त्रास देऊन मानसिक छळ करत असल्याने तरुणाने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विश्रांतवाडी परिसरात घडली आहे. प्रफुल्ल हरिश्चंद्र कदम (वय ३२, रा. सत्यम राजयोग सोसायटी, धानोरी, विश्रांतवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नी, सासू, मेहुणीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी मयत प्रफुल्ल कदम यांचे वडील हरिश्चंद्र गोविंद कदम (वय ६०) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात सूनेसह इतर आराेपी विराेधात फिर्याद दिली आहे. याबाबत प्रफुल्ल याची पत्नी, सासू, मेहुणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रफुल्ल हा एका खासगी कंपनीत काम करत हाेता त्याचा विवाह झाल्यानंतर पत्नी, सासू, मेहुणीने प्रफुल्ल यांना वेळाेवेळी जाणीवपूर्वक त्रास देण्यास सुरुवात केली. ‘तुम्ही आम्हाला फसवले आहे. तू मेला तर मी दुसरा विवाह करुन सुखी राहिल’, असे त्यांनी प्रफुल्ल यांना वारंवार सांगितले होते. पत्नी, सासू, मेहुणीच्या या बाेलण्यामुळे त्यानी धानाेरीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी प्रफुल्ल यांनी चिठ्ठी लिहिली होती. चिठ्ठीत पत्नी, सासू, मेहुणीच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे प्रफुल्ल यांनी नमूद केले आहे. याबाबत मयताचे वडील हरिश्चंद्र यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले पुढील तपास करत आहेत.

समाजघडणीत विश्वबंधुता लोकचळवळीचे मोलाचे योगदान- प्रा. शंकर आथरे

विश्वबंधुता लोकचळवळीच्या प्रेरणाशिल्पाचे लोकार्पण

पुणे: “बहुधर्मीय, बहुजातीय, बहुप्रांतीय, बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक धर्मनिरपेक्षवादी राष्ट्र अशी आपल्या देशाची ओळख आहे, तर समाजसुधारकांच्या पुरोगामी आणि परिवर्तनशील सामाजिक विचारसरणीचा महाराष्ट्र अशी आपल्या राज्याची ओळख आहे. ही ओळख अधिक दृढ करण्यामध्ये विश्वबंधुता लोकचळवळीचे योगदान अधिक मोलाचे आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध कादंबरीकार प्रा. शंकर आथरे यांनी केले.
पिंपळे गुरव येथील बंधुता भवनमध्ये साई प्रिंटर्सचे संचालक विश्वास राजवडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या विश्वबंधुता साहित्य परिषदेच्या प्रेरणाशिल्पाचे लोकार्पण प्रा. शंकर आथरे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे होते. प्रसंगी बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे, लेखिका मधुश्री ओव्हाळ, डॉ. बंडोपंत कांबळे, कवयित्री संगीता झिंजूरके, सुरेश पारंगे आदी उपस्थित होते.
प्रा. चंद्रकांत वानखेडे यांनी अध्यक्षीय मनोगतात बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या कार्याची प्रशंसा केली. बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांचे कार्य समाजबांधणीसाठी उल्लेखनीय असून, बंधुता चळवळीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील हा उपक्रम स्तुत्य आहे, असे ते म्हणाले.
प्रकाश रोकडे यांनी देशहिताच्या या चळवळीमध्ये सातत्याने विधायक साथ देणाऱ्या साहित्यिक, विचारवंत, कलावंत, कवी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. प्रा. प्रशांत रोकडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले.

रुग्णाच्या मृत्यूनंतर भारती हॉस्पिटल मध्ये राडा – रुग्णाच्या नातलगांवर गुन्हे दाखल .

पुणे-रुग्णालयात उपचाराकरिता दाखल असलेल्या ८६ वर्षीय रुग्णाच्या अक्समात मृत्यूनंतर नातेवाईकांना याप्रकारास रुग्णालय जबाबदार असल्याचा आराेप करत रुग्णालयाची तोडफोड करुन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची घटना भारती हाॅस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी रुग्णालयाचे डाॅक्टरांनी आराेपी विराेधात पाेलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर, भारती विद्यापीठ पोलिसांनी तीन महिलांसह एकूण सहा नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.दरम्यान भारती हॉस्पिटल बाबत रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी वाढत असल्याचे दिसते आहे मात्र कायद्याने वैद्यकीय क्षेत्राला दिलेले संरक्षण आणि हतबल अवस्थेत असलेले रुग्ण अथवा नातलग भारती हॉस्पिटल मधील हम करे सो वृत्तीपुढे हताश होताना दिसत आहेत .असेही यावेळी येथे अनेकांनी नमूद केले.

दरम्यान रुग्णालयाची तोडफोड करुन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी डाॅ. अंकिता अर्पित ग्रोवर (वय- ३६) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आराेपी विराेधात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महाराष्ट्र वैद्यकीय संस्था अधिनियम, तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सातारा रस्त्यावरील भारती हाॅस्पिटल रुग्णालयात तेजराज जैन (वय ८६) यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले हाेते. परंतु उपचारादरम्यान अचानक त्यांचा मृत्यू झाला.
रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे जैन यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्यास रुग्णालय प्रशासनच जबाबदार असल्याचे सांगत मयताच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाच्या परिसरात आरडाओरड करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांना रुग्णलायातील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.परंतु नातेवाईकांनी रुग्णालयाचे सुरक्षारक्षक तृप्ती लोखंडे, श्रीदेवी डोईफोडे, निर्मला लष्कर, तसेच रुग्णलायातील कर्मचारी सुनील दाते, अतुल शिंदे, चैतन्य दधस, प्रशांत ओव्हाळ यांना दमबाजी करत शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.असा आरोप ठेवण्यात आला आहे.

रुग्णालयात आरडाओरडा करुन त्यांनी लाकडी स्टुल रुग्णलयातील इलेक्ट्रीक पॅनेल रुमच्या केबीनच्या काचेवर जाेरात फेकून मारत ताेडफाेड केली व शांततेचा भंग करुन दहशत निर्माण केली. या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट विभागाचे सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक स्नेहल थोरात याबाबत पुढील तपास करत आहेत.

हर्षवर्धन वावरेने गायलं ‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ हे गावरान प्रेम गीत

दगडी चाळ या सिनेमातील धागा धागा गाण तसेच नुकतच आलेल फसक्लास दाभाडे या सिनेमातील दिस सरले गाणं अशी अनेक गीत प्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरे याने गायली आहेत. ‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ हे गावरान प्रेम गीत लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गाण्यात अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री पूजा राठोड एकत्र झळकणार आहेत. नुकतचं त्या दोघांनी आपल्या सोशल मीडियावर बायडी गाण्याचं टीझर शेयर करत ही बातमी दिली. बायडी या गाण्याच्या टीझरमध्ये अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री पूजा राठोड ही रेट्रो लुक मध्ये दिसत आहे. त्यामुळे गाण्याच्या टीझरने प्रेक्षकांची उत्कंठा अजूनच वाढवली आहे.

हर्षवर्धन वावरे ‘बायडी’ गाण्याच्या रेकॉर्डिंग विषयी सांगतो, “अभिनेता पुष्कर जोग यांच्यासाठी मी पहिल्यांदाचं पार्श्वगायक म्हणून काम करत आहे. ‘वी आर म्युझिक स्टेशन’ या म्युझिक रेकॉर्ड लेबल सोबत मी याआधी मॅड केलयं तू, पिल्लू आणि आता बायडी ही गाणी गायली आहेत. या गाण्याचा दिग्दर्शक अभिजीत दाणी हा खूप नम्र आहे आणि त्याची विचार करण्याची पद्धत फार युनिक आहे तर गाण्याचा निर्माता विशाल राठोड हा एक अष्टपैलू हुशार माणूस आहे. त्याचा मराठी संगीतसृष्टीकडे पाहण्याचा योग्य दृष्टीकोन आहे. टीम सोबत बायडी गाण रेकॉर्ड करताना फार आनंद झाला. मी या आधी तू दिसते, जीव रंगला, तुझी माझी जोडी जमली तसेच वारीसू या साऊथ सिनेमातील रणजिथामे अशी अनेक गाणी गायली आहेत. बायडी गाण्याच्या टिझरला सोशल मीडियावर प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळतोय. ते पाहून आनंद होतोय. तुमचं असचं प्रेम कायम असू द्यात.”

‘वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ हे गावरान प्रेम गीताचे निर्माते विशाल राठोड हे आहेत. तर गाण्याचे दिग्दर्शक अभिजीत दाणी हे आहेत. प्रसिद्ध गायक हर्षवर्धन वावरे आणि गायिका कस्तुरी तांबट यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याच संगीत प्रितेश मावळे याने केले आहे. बायडी गाण्याचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. तर आता प्रेक्षकांमध्ये या गाण्याची उत्सुकता पाहायला मिळत आहे.