मुंबई – शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे राज्यात आठ खासदार आहेत. त्यापैकी ७ खासदारांना फोडून केंद्रात कॅबिनेट पद मिळवण्यासाठी अजित पवारांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. थेट बाप-लेकींना सोडून दादांच्या राष्ट्रवादीत सामील होण्याचे प्रलोभन देण्यात आल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. दिल्लीत खासदारांच्या भेटी होतात, पण असा कोणताही प्रयत्न केला गेला नसल्याचे स्पष्टीकरण खा. सुनील तटकरे यांनी दिले आहे. आजपर्यंत बाप-लेकी हा शब्द उच्चारला नसल्याचेही तटकरे यांनी सांगितले. दुसरीकडे शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार अमर काळे यांनी सातही खासदारांशी सोनिया दुहान यांनी संपर्क केल्याचा गौप्यस्फोट केल्याने पुन्हा अनेक चर्चांना उधाण आले आहे.सात खासदारांना फोडण्याच्या चर्चेमुळे सुप्रिया सुळे यांनी संतापून थेट प्रफुल्ल पटेल यांना फोन केला. सुनील तटकरेंबद्दल नाराजी व्यक्त केली. पुन्हा तुम्ही आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहात का, असा जाबच सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांना विचारल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काकांचे 7 खासदार फोडून केंद्रात मंत्रिपद घेण्याचा अजित पवारांचा प्रयत्न, चर्चेने सुप्रिया संतापल्या अन् थेट तटकरेंना झापले ?
Date: