Home Blog Page 700

दुचाकीवरील स्टीकरवरुन शोध, हनुमान टेकडीवरील लुटेरे पोलिसांनी पकडले

पुणे : हनुमान टेकडीवर महाविद्यालयीन युवतीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्याकडील सोनसाखळी चोरून पसार झालेल्या चोरट्यांना डेक्कन पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी गेल्या काही दिवसात हनुमान टेकडी परिसरात लूटमारीचे चार गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.हनुमान टेकडीवर लूटमार करणारे चोरटे गुन्हा करताना वाहन क्रमांकाची पाटी नसलेली दुचाकी वापरली होती. आरोपी दुचाकी वरून पसार झाले होते. सीसीटीव्ही चित्रीकरणात वाहन क्रमांक नसलेली दुचाकी पांडवनगर पोलीस चौकीवर आढळून आली होती. दुचाकीवर एक स्टीकर होते. स्टीकरवरुन पोलिसांनी माग काढला.आणि लुटेरे पकडले .
स्वप्नील शिवाजी डोंबे (वय ३२, रा.जनता वसाहत, पर्वती पायथा), अनिकेत अनिल स्वामी (वय २१, मूळ रा. जनता वसाहत,पर्वती पायथा, सध्या रा. किरकटवाडी, सिंहगड रस्ता) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. डोंबे आणि स्वामी सराइत चोरटे आहेत. यापूर्वी त्यांच्याविरुद्ध डेक्कन आणि सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात लूटमारीचे गुन्हे दाखल झाले होते, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चार दिवसांपूर्वी हनुमान टेकडीवर मित्राबरोबर फिरायला आलेल्या महाविद्यालयीन युवतीला कोयत्याचा धाक दाखवून डोंबे आणि स्वामी यांनी तिच्याकडील सोनसाखळी चोरली होती. याबाबत युवतीने पोलिसांकडे तक्रार दिली होती. डेक्कन पोलिसांच्या पथकाकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत होता. आरोपी गुन्हा करुन दुचाकीवरुन पसार झाले होते. सीसीटीव्ही चित्रीकरण,तसेच तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनंतर दोघांना संशयावरुन ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी हनुमान टेकडी परिसरात लूटमारीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. दोघांनी गेल्या काही महिन्यात या भागात लूटमारीचे चार गुन्हे केल्याचे तपासात निषन्न्न झाले. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रसाद राऊत, उपनिरीक्षक महेश भोसले, अजय भोसले, दत्तात्रय सावंत, सहायक फौजदार राजेंद्र मारणे, दत्तात्रय शिंदे, धनश्री सुपेकर, गभाले, सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, रोहित पाथरुट, धनाजी माळी, महेश शिरसाठ यांनी ही कारवाई केली.हनुमान टेकडीवर कोयता घेऊन लुटणारीच्या तयारीत असलेल्या आणखी एका चोरट्याला डेक्कन पोलिसांनी पकडले. माॅण्टी उर्फ तेजस खराडे (रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. खराडे साराइत चोरटा असून, त्याच्याविरुद्ध सिंहगड रस्ता, डेक्कन, दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

रिंग रोड भूमिपूजनाची तारीख लवकरच ठरणार- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे- शहराभोवती होणाऱ्या रिंग रोडसाठी पश्चिम भागात ९६ टक्के जमीन संपादित झाली आहे. त्यामुळे लवकरच एका बाजूने काम सुरू करण्यात येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांची त्याबाबत लवकरच आढावा बैठक होणार आहे. त्यात भूमिपूजनाची तारीख ठरविण्याची शक्यता आहे त्यामुळे रिंग रोडचे लवकरच भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांचा आढावा घेऊन विविध योजना, विविध उपक्रम कसे राबविता येईल, याचे सूतोवाच जिल्हाधिकाऱ्यांनी केले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराभोवती १६९ किलोमीटर लांबीचा आणि ११० मीटर रुंदीचा रिंग रोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने साकारण्यात येत आहे. रिंग रोडसाठी आवश्यक ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात पश्चिम भागात जमीन संपादित झाली आहे. निवडणुका होऊन सरकार स्थापन झाले. खातेवाटपही झाले. मात्र, अद्याप रिंग रोडच्या भूमिपूजनाचा मुहूर्त लागत नसल्याने रिंग रोडचा प्रकल्प रखडल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर टीकाटिप्पणी सुरू होत आहे.त्याबाबत विचारता जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘रिंग रोड हा पुण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी पूर्व भागात ८२ टक्के भूसंपादन झाले असून, १८ टक्के संपादन बाकी आहे. पश्चिम भागात ९६ टक्के भूसंपादन झाल्याने उर्वरित चार टक्के संपादन बाकी आहे. त्याचे काम पश्चिमेच्या बाजूने सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह आढावा बैठक लवकरच होणार आहे. त्या वेळी भूमिपूजन कधी करायचे हे निश्चित होईल.’पुरंदर विमानतळाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत कालच बैठक झाली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) भूसंपादन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच प्रक्रिया ‘एमआयडीसी’कडून सुरू होणे अपेक्षित आहे. सप्टेंबरपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून येत्या २०२९पर्यंत विमानतळ पूर्ण करण्याचे नियोजन आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने (एमएडीसी) अधिसूचना यापूर्वीच काढली आहे. मात्र, मध्यंतरी ‘एमआयडीसी’ने भूसंपादन करण्याबाबतचे सरकारने परिपत्रक काढल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.सातारा जिल्ह्यात ई-ऑफिस १०० टक्के ऑनलाइन केले आहे. पुणे जिल्ह्यात ६० टक्के ई-ऑफिस झाले आहे. आता जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, प्रांत कार्यालयांचा कारभार हा शंभर टक्के ‘ई-ऑफिस’च्या माध्यमातून करण्याचा मानस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केला. त्या वेळी तहसीलदार, प्रांत; तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कामासाठी हेलपाटे मारण्याची वेळ येऊ नये. त्यांचे काम सहज लवकरात लवकर कसे करता येईल, हा आपला दृष्टिकोन आहे. कोणत्या अधिकाऱ्याकडे, टेबलावर कोणत्या कारणास्तव फाइल प्रलंबित आहे, याची माहिती संबंधितांना कळू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘नवप्रेरणा‌’ सांगीतिक कार्यक्रमाचे मंगळवारी आयोजन

पुणे : नववर्ष आणि संक्रांतीनिमित्त प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनतर्फे ‌‘नवप्रेरणा‌’ या सांगीतिक कार्यक्रमाचे मंगळवार, दि. 14 जानेवारी 2024 रोजी आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियम, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रथमच दिव्यांग, अंध, स्वमग्न कलाकार गायन-वादन सादर करणार आहेत. भूषण तोष्णीवाल, गौरी गंगाजळीवाले तसेच बालकल्याण संस्थेतील दिव्यांग यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमाचा समारोप प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनच्या संचालिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या गायनाने होणार आहे. विनायक गुरव, दत्तात्रय भावे, माधव लिमये साथसंगत करणार आहेत. महाबळेश्वर परिवारातर्फे दिल्या जाणाऱ्या ‌‘मातोश्री अवॉर्ड‌’ने सुप्रसिद्ध गायिका राजश्री रानडे यांना सन्मानित केले जाणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन च्या व्हिजन डॉक्युमेंट चे राज्यपाल सी पी राधाकृष्णन जी यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे : गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन च्या व्हिजन डॉक्यूमेंट चे प्रकाशन राज्यपाल सी पी राधाकृष्णन जी यांच्या हस्ते मुंबई येथील राजभवनात झाले. या प्रसंगी गोसेवा आयोग ची स्थापना चे उद्देश व गोसेवा आयोग च्या आतापर्यंत च्या कार्याची सविस्तर माहिती आयोग चे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी राज्यपालांना दिली.
सुधारित गोवर्धन गौवंश योजना च्या माध्यमातून राज्यातील पात्र गोशाळांना २५  ते १५ लाख निधी वितरित करण्यात आला. परिपोषण योजना द्वारे राज्यातील गोशाळा मधील देशी गायीसाठी प्रतिदिन प्रति गाय ५० रु व राज्य सरकार ने नुकतेच देशी गाय ला राज्यमाता – गोमाता घोषित केले, अशी माहिती आयोग चे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.
आयोगाचे सदस्य डॉ नितीन मार्कंडेय यांनी महाराष्ट्र गोवंश प्रजनन कायदा (नियमन ) बद्दल माहिती दिली. आयोग चे सदस्य डॉ सुनील सूर्यवंशी व डॉ उद्धव नेरकर यांनी गौआधारीत कृषी प्रशिक्षण बद्दल सविस्तर माहिती दिली. आयोग चे सदस्य संजय भोसले यांनी महाराष्ट्रात गोमंत्रालय व्हावे, अशी विनंती राज्यपाल यांना केली.
आयोग चे सदस्य मनिष वर्मा व परेश शाह यांनी राज्यपालांचा गोमाता ची विग्रह ,प्रतिमा देऊन आभार प्रकट केले. राज्यपालांनी  गो आधारित कृषी साठी राज्य सरकार व गोसेवा आयोग मिळून निर्णायक व परिणामकारक कार्य व्हावे या विषयी सविस्तर चर्चा केली. गोसेवा आयोग च्या आतापर्यंत च्या कार्यप्रणालीवर सी पी राधाकृष्णन यांनी भरभरून कौतुक केले व भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

राज्यातील राष्ट्रीय ज्यूदोपटूंच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सहकार्य करू- पुनीत बालन

राज्यस्तरीय सबज्युनियर्स ज्यूदो स्पर्धेत यवतमाळच्या वेदांत पारधसह, नमन काला (ठाणे), आँकार काकड (संभाजीनगर), मुवराज चौधरी (नागपूर), संस्कार लौकरे (सोलापूर), अर्जुन चौडणकर (मुंबई), शौर्यजित माळी (सांगली) आणि नागेश लुटे (नांदेड) यांनी आपापल्या वजन गटात बहारदार खेळी करत सुवर्णपदकावर नांव कोरले.

पुणे-राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेमध्ये पदकप्राप्त खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील यशप्राप्तीसाठी लागणारे उच्च प्रशिक्षण आणि तदर्य सुविधा मिळवून देवून त्यांच्या सर्वार्थ प्रगतीसाठी आम्ही खेळाडूंच्या पाठीशी उभे राहू असे प्रतिपादन प्रसिद्ध उ‌द्योगपती पुनीत बालन यांनी केले. दिल्ली येथे सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय सिनीयर्स गटातील स्पर्धेमध्ये महाराष्ट्रच्या श्रद्धा चोपडे हिने कालच प्राप्त केलेल्या सुवर्ण पदकाचा उल्लेख करत बालन म्हणाले की, राज्यातील नैपुण्यप्राप्त ज्यूदोपटू केवळ आधुनिक सुविधा आणि उच्च प्रशिक्षणाच्या अभावाने मागे पडू नयेत ही आमची इच्छा आहे. खेळाडूंच्या समर्थनार्थ पुढे येणारे आमच्यासारखे प्रायोजक लक्षात घेता पालकानीही मोबाईलच्या जाळ्यापासून पाल्यांना दूर करत कीडांगणावर पाठवावे, राज्य ज्यूदो संघटनेचे कौतुक करताना बालन म्हणाले की, ज्यूदो या स्वसंरक्षण शिकवणाऱ्या खेळाच्या संपूर्ण प्रसारासाठी केले जाणारे कार्य प्रशंसनीय असून या‌द्वारे राज्यातील युवायुवतीना खेळाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्तीसह नोकरीतील 5 टक्के आरक्षणाचे महत्व जनमानसात पटवून देण्याचे अथक परिश्रम राज्य ज्यूदो संघटना करत आहे, त्यामुळे संघटनेचे अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकत आहेत आणि शासनाच्या सेवेत रुजू होत आहेत.

दिनांक 06 ते 08 जानेवारी 2025 दरम्यान बालेवाडी-महाळुंगे येथील शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित 51 व्या राज्यस्तरीय सबज्युनियर्स गटाच्या खुल्या ज्यूदो स्पर्धेच्या उद्‌घाटन समारंभावेळी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष धनंजय भोंसले, महासचिव शैलेश टिळक, कोषाध्यक्ष रवींद्र मेटकर, तांत्रिक सचिव दता आफळे, शेखर साखरे, विश्वास जोशी, मुकुंद डांगे या पदाधिकाऱ्यांसह स्पर्धा निरीक्षक अनिल सकपाळ उपस्थित होते. स्पर्धेचे उद्द्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश गोयथळे, तर प्रास्ताविक शैलेश टिळक आणि आभार दत्ता आफळे यांनी मानले. राज्य संघटनेचे अध्यक्ष धनंजय ऑसले यांनी संघटनेतर्फे प्रमुख पाहुणे आणि खेळाडूंकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. या स्पर्धेतील विजेते पुढे होणाऱ्या राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेसाठी राज्यातील 26 जिल्ह्यामधून पावणेतीनशे मुले आणि मुली खेळाडूंसह 25 पंच आणि व्यवस्थापक तसेच संघटनेचे पदाधिकारी क्रीडानगरीत दाखल झाले आहेत. स्पर्धेसाठी साई प्रशिक्षक सुशील गायकवाड (अमरावती) है

प्रमुख सामनाधिकारी असून त्यांना तुषार सांगळे (पुणे) आणि मंगेश भोसले (ठाणे) हे सहकार्य करत आहेत तर ठाण्याच्या शैलेश देशपांडे यांची ज्यूरीपदी आणि दर्शना लखाणी यांची स्पर्धेच्या तांत्रिक संचालन प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

रोहन मापुस्करांचे दिग्दर्शनात पदार्पण!

सध्या चित्रपटसृष्टीत एक नवीन चर्चा सुरू आहे. या नवं वर्षात मापुस्कर ब्रदर्स प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन येणार आहेत. चित्रपटसृष्टीतील अव्वल दर्जाचे दिग्दर्शक व निर्माते राजेश मापुस्कर आणि कास्टिंगच्या दुनियेतलं नावाजलेलं नाव रोहन मापुस्कर हे दोघे एक नवीन प्रकल्प घेऊन येत आहेत.

राजेश मापुस्कर यांना ‘व्हेंटिलेटर’, ‘फरारी की सवारी’, आणि अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘येक नंबर’ सारख्या हिट चित्रपटांसाठी ओळखलं जातं, तर रोहन मापुस्कर यांनी प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्यासोबत ‘लगे रहो मुन्नाभाई’ व ‘३ इडियट्स’ या चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मापुस्कर ब्रदर्स ‘एप्रिल मे ९९’ हा आगामी चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रोहन मापुस्कर दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत.

तर आता प्रश्न असा आहे की, चित्रपटाची कथा काय असेल? कलाकार कोण असतील? यांसारख्या अनेक गोष्टी अद्याप गोपनीय असल्या तरी या नवीन वर्षात मापुस्कर ब्रदर्स एकत्र येऊन मोठ्या पडद्यावर धमाका करणारअशी आशा आहे !

महाराष्ट्राच्या ५८व्या निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी उत्साहपूर्वक

संत समागम स्थळी भक्तीभावनेने प्रेरित निष्काम सेवांचा अभूतपूर्व नजारा

पिंपरी: महाराष्ट्राच्या ५८व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य आयोजन दिनांक २४, २५ व २६ जानेवारी २०२५ ला परम पूज्य सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात मिलिट्री डेरी फार्म, शास्त्री नगर, पिंपरी हाऊसच्या जवळ, पिंपरी, पुणे (महाराष्ट्र) येथील विशाल मैदानावर केले जात आहे.

हा विशाल आध्यात्मिक संत समागम यशस्वी करण्यासाठी २५ डिसेंबर, २०२४ रोजी विधिवत रूपात स्वैच्छिक सेवांचा शुभारंभ झालेला आहे. तेव्हापासूनच पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवादलाचे सदस्य, स्वयंसेवक व भाविक भक्तगण मोठ्या तन्मयतेने, निष्ठेने आणि निष्काम भावनेने समागम स्थळावर पोहचून पूर्वतयारीमध्ये आपले योगदान देत आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि भक्ति व सेवाभावनेच्या इतिहासाची महान परंपरा लाभलेल्या पुण्यनगरी ला प्रथमच महाराष्ट्राचा प्रादेशिक संत समागम आयोजित करण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आहे. आध्यात्मिकतेचा आधार घेऊन या समागमामध्ये प्रेम, शांति आणि एकत्वाचा संदेश दिला जातो जो नि:संदेह समस्त मानवतेच्या कल्याणार्थ असतो. सर्वविदित आहे, की या संत समागमाची भव्यता ही केवळ त्याच्या क्षेत्रफळाने अधोरेखित होत नाही, तर याठिकाणी देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविक भक्तगणांच्या भावनेमध्ये साठलेली आहे.

निरंकारी संत समागम मानवतेचा असा एक दिव्य संगम असतो जिथे धर्म, जात, भाषा, प्रांत तसेच गरीब-श्रीमंत आदि बंधनांच्या पलीकडे जाऊन सकळजन मर्यादेत राहून प्रेम आणि सौहार्दपूर्ण भावाने सेवा, सिमरण आणि सत्संग करतात. हे त्याच संदेशाचे अनुसरण आहे जो समस्त संतांनी, गुरु-पीरांनी वेळोवेळी दिलेला आहे. या तीन दिवसीय संत समागमामध्ये भक्तिच्या अनेक पैलुंवर गीत, विचार आणि कविता आदि माध्यमातून भक्तगण आपले शुभ भाव प्रकट करतील. सदगुरू माताजी आणि निरंकारी राजपिताजी यांच्या प्रवचनरुपी अमूल्य उपहाराचा देखील सर्वांना लाभ होणार आहे. यावर्षी सदगुरू माताजींनी समागमाचा विषय दिलेला आहे – ‘विस्तार – अनंताच्या दिशेने’ (विस्तार, असीम की ओर) , त्यानंतर यंदाच्या सर्व संत समागमाची हीच थीम असेल.

महाराष्ट्राच्या वार्षिक निरंकारी संत समागमात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विविध संस्कृती, सभ्यतांचा एक अनुपम संगम दृष्टीगोचर होईल ज्यामध्ये सहभागी होऊन भाविक भक्तगण आणि प्रभुप्रेमी सज्जन अलौकिक आनंदाची अनुभूती प्राप्त करतील. यावरुन आपण म्हणू शकतो, की या दिव्य संत समागमाचा उद्देश मानवता व विश्वबंधुत्वाची सुंदर भावना सदृढ करणे हा आहे जो केवळ ब्रह्मानुभूतीद्वारेच शक्य आहे.

संत निरंकारी मंडळाचे समागमाचे चेअरमन श्री.शंभुनाथ तिवारी यांनी सांगितले, की सर्व संतांच्या निवासाची, भोजनाची, स्वच्छता गृहांची, आरोग्याची, सुरक्षेची, आगमन-प्रस्थानाची व इतर सर्व मूलभूत सुविधांची तयारी केली जात आहे. यासाठी राज्य शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य लाभत आहे. समागमाच्या आयोजनाशी संबंधीत सर्व वैधानिक पैलू लक्षात घेऊन सारी व्यवस्था करण्यात येत आहे. थोड्याच दिवसांत हे मैदान ‘भक्तीच्या नगरी’चे रूप धारण करेल जिथे देशभरातून लाखोंच्या संख्येने भक्तगण येऊन सहभागी होतील. मानवतेच्या या महासंगमामध्ये समस्त धर्म-प्रेमी बंधु-भगिनींचे हार्दिक स्वागत आहे.

गायक शानने मिशन ग्रे हाऊसचे संगीत लाँच केले

मुंबई,: संगीतमय सस्पेन्स थ्रिलर, मिशन ग्रे हाऊस या चित्रपटाच्या म्युझिक लाँचमध्ये प्रतिष्ठित पार्श्वगायक आणि संगीतकार शान यांची उपस्थिती होती, ज्यांनी मधुर साउंडट्रॅकचे अनावरण केले. या कार्यक्रमात त्याच्यासोबत मुख्य कलाकार अबीर खान, पूजा शर्मा आणि दिग्दर्शक नौशाद सिद्दीकी होते.

या चित्रपटात दोन संस्मरणीय ट्रॅक आहेत जे त्याचे रहस्यमय कथानक वाढवण्याचे वचन देतात. पहिला, यारियां-यारियान, शानने सुंदरपणे सादर केलेला एक भावपूर्ण राग आहे, ज्यामध्ये सौहार्द आणि उत्कटतेचे सार आहे. लहू आवाज देता है हा दुसरा ट्रॅक सुखविंदर सिंगच्या सूफी शैलीत गायलेला आहे, जो कथेत भावनिक खोली आणतो. अमिताभ रंजन आणि रवी यादव यांच्या गीतांसह एच. रॉय यांनी संगीतबद्ध केलेली दोन्ही गाणी चार्ट-टॉपर्स ठरणार आहेत.
म्युझिक लॉन्चच्या वेळी, शानने यारियां-यारियानच्या लाईव्ह परफॉर्मन्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि सर्वांना मंत्रमुग्ध केले. संगीताविषयी बोलताना तो म्हणाला, “या चित्रपटातील गाणी केवळ चाल नसून त्याच्या कथनाचा अविभाज्य भाग आहेत. थ्रिलर्समधील संगीताचे भाग बहुतेक वेळा कमी असतात, तर मिशन ग्रे हाऊस अविस्मरणीय संगीतासह सस्पेन्सचे मिश्रण करून मोल्ड तोडतो.”

नौशाद सिद्दीकी दिग्दर्शित आणि रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत, रफत फिल्म्स एंटरटेनमेंट बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. अबीर खान आणि पूजा शर्मा सोबत, कलाकारांमध्ये इंडस्ट्रीतील दिग्गज राजेश शर्मा, रझा मुराद, निखत खान आणि किरण कुमार यांचा समावेश आहे, ज्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने कथाकथन उंचावण्याचे वचन दिले आहे.
बॉलीवूडमध्ये पदार्पण करत असलेल्या अबीर खानने आपला उत्साह शेअर करत म्हटले की, आम्ही या प्रकल्पासाठी आमचे मन आणि आत्मा ओतले आहे. शान आणि सुखविंदरसारख्या दिग्गजांच्या संगीताने हा चित्रपट एक अनोखा सिनेमॅटिक अनुभव देतो.
चर्चेत भर घालत, पूजा शर्माने चित्रपटाच्या सस्पेन्सफुल घटकांना छेडले, असे म्हटले की, ही कथा ट्विस्ट आणि टर्नने भरलेली आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही ते शोधून काढले आहे, तेव्हा कथानक तुम्हाला आश्चर्यचकित करते. प्रेक्षकांना त्यांच्या सीटच्या काठावर ठेवण्यासाठी प्रत्येक सेगमेंट काळजीपूर्वक तयार केले गेले आहे.

लोणावळा आणि पुण्याच्या आसपासच्या नयनरम्य ठिकाणी चित्रित केलेल्या जबरदस्त व्हिज्युअल्ससह, मिशन ग्रे हाऊस आकर्षक कथाकथन, नेल-बिटिंग सस्पेन्स आणि अपवादात्मक संगीत एकत्र करते. चित्रपटाच्या पोस्टर, टीझर आणि ट्रेलरने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे, ज्यामुळे तो जानेवारीच्या सर्वाधिक प्रतीक्षेत असलेल्या रिलीजपैकी एक बनला आहे.
17 जानेवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे, मिशन ग्रे हाऊस केवळ चित्रपट नसून आणखी काही बनण्याचे वचन देतो – हा एक संगीतमय आत्मा असलेला एक रोमांचक प्रवास आहे. त्याची रहस्ये उलगडण्यासाठी तयार व्हा आणि त्याच्या सुरांमध्ये मग्न व्हा. तुम्ही मिशन स्वीकाराल का?
लिंक: https://www.youtube.com/watch?v=Wr6GgM6r5Ds

महिंद्रातर्फे प्रीमियम ईव्ही तंत्रज्ञान अधिक सुलभ, BE 6 आणि XEV 9e च्या टॉप व्हेरियंटच्या किंमती जाहीर

·   BE 6 पॅक तीन: 26.9 लाख रु.; ईएमआय 39,224 रु. पासून (पॅक वनसारखाच)

· XEV 9e पॅक तीन: 30.5 लाख रु; ईएमआय 45,450 रु पासून (पॅक वनसारखाच)

· आपली पसंती 7 जानेवारी 2025 पासून नोंदवा

· चाचणी ड्राइव्ह 14 जानेवारी 2025 पासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार

· BE 6 आणि XEV 9e साठी नोंदणी 14 फेब्रुवारी 2025 रोजी एकाच वेळी सुरू होणार

पुणे, 8 जानेवारी 2025: महिंद्राने आज आपल्या ‘अनलिमिट इंडिया टेक डे’ दरम्यान BE 6 आणि XEV 9e या प्रमुख इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्हीच्या टॉप-एंड (पॅक थ्री) व्हेरियंटच्या किंमती जाहीर केल्या. ही घोषणा 26 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या ‘अनलिमिट इंडिया’ कार्यक्रमाच्या यशस्वी सादरीकरणाच्या आधारावर करण्यात आली. याच कार्यक्रमात BE 6 आणि XEV 9e सादर करण्यात आल्या होत्या.

महिंद्राचे प्रीमियम तंत्रज्ञान अधिकाधिक लोकांसाठी सुलभ करण्याचे ध्येय पॅक थ्री द्वारे साकारले जाते. पॅक थ्री लक्झरी, अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि अतुलनीय कामगिरी यांचे प्रतीक आहे. प्रीमियम ईव्हींकडे वाढत चाललेली ग्राहकांची प्रवृत्ती लक्षात घेऊन महिंद्रा BE 6 आणि XEV 9e या दोन्ही गाड्यांसाठी प्रारंभिक टप्प्यात फक्त पॅक थ्री चे सादरीकरण करेल. पॅक थ्री अधिक सहज उपलब्ध करून देण्यासाठी महिंद्राने ‘थ्री फॉर मी’ नावाचा अभिनव कार्यक्रम सादर केला आहे. महिंद्रा फायनान्सद्वारे चालवला जाणारा हा कार्यक्रम सहा वर्षांनंतर बॅलून पेमेंटसह पॅक थ्री व्हेरियंट पॅक वनसारख्या मासिक ईएमआयवर खरेदी करण्याची संधी देतो.

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष आणि महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय नाकरा म्हणाले, “आमच्या इलेक्ट्रिक ओरिजिन एसयूव्हीला ग्राहकांकडून विलक्षण प्रतिसाद मिळाला आहे. ग्राहकांनी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि प्रीमियम वैशिष्ट्यांसाठी मजबूत आवड दाखवली आहे. म्हणूनच, आम्ही BE 6 आणि XEV 9e या दोन्ही गाड्यांसाठी फक्त 79 kWh पॅक थ्रीची नोंदणी व्हॅलेंटाईन डे दिवशी म्हणजेच 14 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू करू. 79 kWh क्षमतेची बॅटरी 500 किमीपेक्षा जास्त प्रत्यक्ष रेंज देते. त्यामुळे ग्राहकांची रेंजबाबतची चिंता कमी होईल. प्रीमियम ईव्ही मुख्य प्रवाहात आणण्याचे आमचे ध्येय आहे आणि आमच्या “थ्री फॉर मी” अर्थसहाय्य कार्यक्रमाद्वारे आम्ही ही वाहने अधिक सुलभ करत आहोत. पहिल्या टप्प्यात आमचे मासिक विक्री लक्ष्य 5000 युनिट्स आहे.”

पॅक थ्री सह उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचे सुलभीकरण

तंत्रज्ञान, सुरक्षा आणि आराम यांचा समतोल हवा असणाऱ्यांसाठी 26 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या अनलिमिट इंडिया कार्यक्रमात BE 6 आणि XEV 9e या दोन्ही गाड्यांसाठी पॅक वन सादर करण्यात आला.  प्रगत सुरक्षा, अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि प्रीमियम डिझाइन यांचा उत्तम मिलाफ साधत पॅक थ्री आरामदायी अनुभव आणि कामगिरीला नवीन उंचीवर नेतो. महिंद्राच्या अत्यंत कार्यक्षम INGLO इलेक्ट्रिक स्केटबोर्ड आर्किटेक्चरवर आधारित, या व्हेरियंटमध्ये 210 kW मोटर आहे. ती BE 6 ला 0-100 किमी/तास वेग 6.7 सेकंदांत, तर XEV 9e ला 6.8 सेकंदांत मिळवून देते. BE 6 साठी 683 किमी (MIDC भाग 1 आणि 2) आणि XEV 9e साठी 656 किमी (MIDC भाग 1 आणि 2) अशी प्रमाणित रेंज उत्कृष्ट उपयुक्तता सुनिश्चित करते.  175 kW डीसी चार्जरसह 20-80% चार्जिंग केवळ 20 मिनिटांत करण्याची जलद चार्जिंग क्षमता उपलब्ध आहे.

या एसयूव्हींच्या केंद्रस्थानी आहे MAIA—महिंद्रा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्किटेक्चर असून ते  प्रति सेकंद 50 ट्रिलियन ऑपरेशन्स करण्यास सक्षम आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8295 द्वारे समर्थित आणि 24 GB RAM आणि 128 GB स्टोरेजसह, हे जगातील सर्वात वेगवान ऑटोमोटिव्ह ब्रेन आहे. भविष्यातील ड्रायव्हिंगचा अनुभव सुनिश्चित करत WiFi 6.0, ब्लूटूथ 5.2, Quectel5G आणि ओव्हर-द-एअर अपडेट्ससह, हे तंत्रज्ञान रियल टाईम अपडेट्स, अखंड कनेक्टिव्हिटी आणि अत्यंत वेगवान प्रक्रिया शक्ती पुरविते.

पॅक थ्रीची प्रमुख वैशिष्ट्ये:

·         XEV 9e मधील वाइड सिनेमा-स्कोप: 110.08 सेंमीचा दृश्य अनुभव

·         BE 6 मधील रेस-रेडी डिजिटल कॉकपिट

·         VisionX: ऑग्मेंटेड रिअॅलिटी हेड्स अप डिस्प्ले (AR-HUD)

·         इन्फिनिटी रूफ आणि लाइटमीअप अॅम्बियंट लाइट

·         महिंद्रा सोनिक स्टुडिओ अनुभव: डॉल्बी अॅटमॉससह 16-स्पीकर हार्मन कार्डन साऊंड सिस्टम

·         LiveYourMood: ए आर रहमान यांनी सिग्नेचर ध्वनी ट्यूनसह तयार केलेल्या Calm, Cozy आणि Club थीम्स. यात कस्टम ड्रायव्हर सीट, अॅम्बियंट लाइट आणि क्लायमेट कंट्रोल अॅडजस्टमेंट्स आहेत.

·         मल्टी-ड्राईव्ह मोड्स: रेंज, एव्हरीडे, रेस आणि बूस्ट मोड

·         5 रडार्स आणि 1 व्हिजन सिस्टमसह ADAS स्तर 2+: प्राणी, पादचारी, बॅरिकेड्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांना ओळखण्याची क्षमता

·         आय डेंटिटी: ड्रायव्हर आणि ऑक्युपंट मॉनिटरिंग सिस्टम (DOMS) चालकाला थकवा आला आहे का हे ट्रॅक करते. हे सेल्फी कॅमेरा आणि व्हिडिओ कॉलसाठीही वापरले जाऊ शकते.

·         Secure360: 360-डिग्री कॅमेरा आणि इन-केबिन कॅमेरासह सभोवताल ओळखतो व नोंद करतो. हे वाहनाच्या मोबाइल अॅपद्वारे लाइव्ह व्ह्यूसुद्धा पुरवते.

·         ऑटोपार्क: 12 अल्ट्रासोनिक सेन्सर्ससह परपेंडिक्युलर, अँग्युलर आणि पॅरलेल पार्किंगची सुविधा, रिव्हर्स असिस्टसह रिमोट-कंट्रोल पर्याय.

नाविन्यपूर्ण अर्थसहाय्य योजना:

‘थ्री फॉर मी’ कार्यक्रमाद्वारे BE 6 पॅक थ्री 39,224 रु. च्या मासिक ईएमआयवर उपलब्ध असेल, तर XEV 9e पॅक थ्री 45,450 रु. च्या मासिक ईएमआयवर उपलब्ध असेल. पॅक वन व्हेरियंट्सच्या ईएमआयसारखीच योजना आहे.

मॉडेलबॅटरीएक्स-शोरूम किंमतविशेष EMI योजना
BE 6 पॅक थ्री79 kWh26.9 लाख रु *39 224 रु / महिना ^
XEV 9e पॅक थ्री79 kWh30.5 लाख रु *45 450 रु / महिना ^^

^15.5% पर्यंत डाउन पेमेंट आणि सहा वर्षांच्या शेवटी 4.65 लाख रु.चे बलून पेमेंट
^^15.5% पर्यंत डाउन पेमेंट आणि सहा वर्षांच्या शेवटी 4.35 लाख रु.चे बलून पेमेंट

उपलब्धता आणि नोंदणी

BE 6 आणि XEV 9e पॅक तीन व्हेरियंटसाठीची नोंदणी 14 फेब्रुवारी 2025 रोजी सुरू होईल, तर चाचणी ड्राइव्ह 14 जानेवारी 2025 पासून टप्प्याटप्प्याने सुरू होतील. डिलिव्हरी मार्च 2025 च्या सुरुवातीला अपेक्षित आहे.
इतर पॅक्स आणि पुढील टप्प्यातील नोंदणीसंबंधी माहिती मार्च 2025 च्या शेवटपर्यंत अद्ययावत केली जाईल.

महत्त्वाचे टप्पेदिनांक
आपली पसंती नोंदवा7 जानेवारी 2025
चाचणी ड्राइव्ह टप्पा 1: 6 शहरांमध्ये14 जानेवारी 2025
चाचणी ड्राइव्ह टप्पा 2: 15 शहरांमध्ये24 जानेवारी 2025
चाचणी ड्राइव्ह टप्पा 3: 45 शहरांमध्ये7 फेब्रुवारी 2025
बुकिंग सुरू (पॅक तीन)14 फेब्रुवारी 2025
डिलिव्हरीमार्च 2025 सुरुवात

*अस्वीकरण:

  • किंमतींमध्ये चार्जर आणि त्याच्या जोडणीचा खर्च समाविष्ट नाही. 7.3 kW किंवा 11.2 kW पैकी कोणत्याही चार्जरचे बिलिंग स्वतंत्रपणे केले जाईल.
  • लाइफटाइम बॅटरी वॉरंटी: उच्च-व्होल्टेज बॅटरी पॅकसाठी. केवळ प्रथम नोंदणीकृत मालकांसाठी वैध आणि खासगी नोंदणीवर लागू. मालकीत बदल झाल्यास, उच्च-व्होल्टेज बॅटरीवरची वॉरंटी पहिल्या डिलिव्हरीच्या तारखेपासून 10 वर्षे किंवा 200,000 किमी (जे आधी असेल) पर्यंत मर्यादित असेल. अधिक तपशील बुकिंगवेळी उपलब्ध केले जातील.

१० जानेवारी पासून ‘सांस्कृतिक व्याख्यानमाला’

पुणे – ८ जानेवारी २५
भारतीय संस्कृती संगम, पुणे गेल्या ४० वर्षांपासून विविध सामाजिक आणि अध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करीत आली आहे.
ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता, उपनिषदे अशा धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रंथ आणि संतसाहित्यावर आधारित सर्व वयोगटांसाठी अभ्यासवर्ग आणि कार्यशाळा असे उपक्रमांचे स्वरूप असते. या व्रतातूनच ‘दास-नवमी’ उत्सवा समावेत कीर्तन आणि व्याख्यानमाला सुरु झाली आणि ती अविरत गेली ३४ वर्षे सुरु आहे.

ह्या उत्सवाच्या व्याख्यान मालिकेत महाराष्ट्रातील प्रतिथयश व्याख्याते आणि जाणकार श्रोतृ वर्गाची मांदियाळी असते, अशी माहिती भारतीय संस्कृती संगमचे विश्वस्त गोविंद बेडेकर यांनी दिली.

यंदापासून ‘दासनवमी’ व्याख्यानमाले बरोबर ‘सांस्कृतिक व्याख्यानमाला’ आयोजित केली आहे, जी येत्या १० जानेवारी पासून तीन दिवस सायंकाळी ५:३० ते ७:३० पर्यंत चालेल,अशी माहिती भारतीय संस्कृती संगमचे विश्वस्त गोविंद बेडेकर व सुहास क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

ही सांस्कृतिक व्याख्यानमाला आयडियल सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने घेतली जाणार असुन आयडील कॉलनी क्रीडांगणावर होणार आहे. यामध्ये भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणारी व्याख्याने होणार आहेत.

या व्याख्यानमालेचे स्वरूप खालीलप्रमाणे असेल:-.

पुष्प पहिले:
शुक्रवार, दि. १० जानेवारी
हिंदू संस्कृती परंपरा आणि विज्ञान
वक्ते: श्री. राहुल सोलापूरकर (सुप्रसिद्ध अभिनेते व व्याख्याते)
अध्यक्ष: श्री संजय चोरडिया (चेअरमन सूर्यदत्त इन्स्टिट्यूट)

पुष्प दुसरे:
शनिवार, दि. ११ जानेवारी
संतांची सामाजिक समरसता
वक्ते: विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर
अध्यक्ष: प्रा.डॉ. सुरेश गोसावी (मा.कुलगुरू, पुणे विद्यापीठ)

पुष्प तिसरे:
रविवार, दि. १२ जानेवारी
स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत
वक्ते: श्री. अविनाश धर्माधिकारी (माजी सनदी अधिकारी)
अध्यक्ष: श्री जयंत उमराणीकर (निवृत्त पोलीस महासंचालक).

ही व्याख्यानमाला आयडील कॉलनी क्रीडांगणावर होणार आहे.

भारतीय संस्कृती संगम

पूर्व सेना अधिकारी शिवाजीराव चौधरी यांच्या प्रेरणेने सुरु झालेली भारतीय संस्कृती संगम, पुणे, या संस्थेने गेल्या ४० वर्षांपासून ‘दासबोध’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘गीता’ आणि ‘उपनिषद’ यावर व्याख्याने व वर्ग आयोजित केले आहेत.

या संस्थेचे उद्दिष्ट भारतीय संस्कृतीचे सखोल ज्ञान समाजात रूजवणे आणि त्यावर ठराविक विचारधारांचे आदान-प्रदान करणे आहे.

त्याचप्रमाणे, ह्या संस्थे कडून अत्यंत प्रेरणादायी आणि शास्त्रज्ञान वर्धक व्याख्यानमाला शृंखलेचे आयोजन गेली ३४ वर्षे होत आहे. या व्याख्यानमालेत भारतीय संस्कृती,तत्त्वज्ञान, आणि धर्माशी संबंधित विविध गोष्टींवर अद्वितीय आणि सखोल संवाद साधला जातो.

संस्थेला गोविंद बेडेकर, विद्यावाचस्पती डॉ कल्याणी नामजोशी सारखे विद्वान विश्वस्त लाभले आहे.

संस्था श्री दासनवमी उत्सव व्याख्यानमाला व्यतिरिक्त शारदीय देशभक्तीपर व्याख्यानमाला, समर्थांची तत्त्वज्ञानावर आधारित हेमंतीय व्याख्यानमाला, आणि कीर्तन मालिका सारखे उपक्रम वेळो-वेळी घेत असते.
त्यातच आता ‘सांस्कृतिक व्याख्यानमालेचे’ भर पडली आहे.

विविध शैलींनी नटलेले ‘रंगोत्सव’ चित्रप्रदर्शन’आर्टफॅन्स’ या हौशी चित्रकारांच्या समूहातर्फे आयोजन

पुणे : विविध रंगाची उधळण करीत साकारलेली निसर्गचित्रे…दिग्गज व्यक्तिमत्त्वाच्या चेहऱ्यावरील बारीक भाव टिपत काढलेली व्यक्तीचित्रे…पेन्सिल शेडिंग सारख्या माध्यमांमध्ये साकारलेली विविध वस्तूंची मनमोहक चित्रे…अशा विविध चित्रांचा चित्राविष्कार आणि विविध शैलींनी नटलेले चित्रप्रदर्शन बघण्याची संधी पुणेकरांना मिळाली.

‘आर्टफॅन्स’ या हौशी चित्रकारांच्या समूहाचे ‘रंगोत्सव’ हे प्रदर्शन घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये भरविण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन मोनिका मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 

प्रदर्शनात १४ कलाकारांच्या ७० कलाकृती सादर केल्या जातील. या कलाकृतींमध्ये निसर्गचित्रे, म्युरल्स आणि स्टिल लाईफसारख्या विविध शैलींचा समावेश असून, त्या ऑइल, ऍक्रेलिक, तसेच पेन्सिल शेडिंगसारख्या माध्यमांमध्ये साकारण्यात आल्या आहेत. मागील  आठ वर्षे चित्रकलेत नवनवे प्रयोग करणाऱ्या या चित्रकारांमध्ये २२ वर्षांच्या तरुणांपासून ७५ वर्षांच्या अनुभवी चित्रकारांचा समावेश आहे.

प्रदर्शनात वैदेही दाबक, नितीन महानव, शैला कारखानीस, उल्हास भानू, आल्हाद नाईक, मृदुला धोंगडे, हेमांगी गोरे, जयश्री बेडेकर, स्वाती कुट्टे, संगीता ताकवले, कविता ठाकरे, नेहा पाटील, माधवी दिवेकर, मिताली देशपांडे आणि श्रीकला राव या कलाकारांची चित्रे आहेत.  दिनांक १२ जानेवारी पर्यंत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ यावेळेत राजा रविवर्मा आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन रसिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

‘आर्टफॅन्स’ – चित्रकलेवरील प्रेमाने एकत्र आलेल्या वेगवेगळ्या वयोगटातील आणि क्षेत्रातील कलाकारांनी ‘आर्टफॅन्स’ हा समूह स्थापन केला. सुरुवातीला एकत्र येऊन चित्रे पाहणे, त्यावर चर्चा करणे, आणि आपल्यालाही अशा प्रकारे चित्र काढता येईल का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करताना या कलाकारांचा प्रवास सुरू झाला. सन २०१८ मध्ये मुंबईतील नेहरू आर्ट गॅलरीत समूहाला स्वतःचे पहिले प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. या प्रदर्शनाच्या यशात उल्हास भानू यांचे मोलाचे योगदान होते. त्यानंतर पुण्यातील पी.एन. गाडगीळ औंध, ग्लिंप्स, बालगंधर्व कलादालन यांसारख्या ठिकाणीही ‘आर्टफॅन्स’ ने आपली कला सादर केली. मात्र, ही प्रदर्शने इतर कलाकारांच्या समूहासोबत होती. तेव्हापासून आर्टफॅन्स ला पुण्यात आपले स्वतंत्र प्रदर्शन सादर करण्याची इच्छा होती. त्या प्रमाणे यंदाचे चित्रप्रदर्शन पार पडणार आहे.

पर्यावरणीय मंजुरीचे उल्लंघनप्रकरणी एमपीसीबीचा वेंकटेश लॅन्डमार्कला दणका

  • काम थांबविण्याचे दिले आदेश, छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्पेश यादव यांच्या तक्रारीवर कार्रवाई
  • प्रकल्पाचे बांधकाम नकाशे, भोगटवा प्रमाणपत्र, गार्डन एनओसी, फायर एनओसी रद्द करण्याचे मनपाला निर्देश

पुणे :

लोहगांव येथील सिम्बायोसिस लाॅ स्कूलच्या पाठीमागे सर्वे नंबर 24/1/1 आणि 214/1/4 येथे सुरु असलेल्या वेंकटेश लॅन्डमार्क बांधकाम प्रकल्पाला महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणीय मंजुरीचे उल्लंघन केल्याप्रकरणी काम थाबविण्याचा आदेश देत चांगलाच दणका दिला आहे. प्रकल्पाला पर्यावरण मंजुरी देताना निर्धारित करण्यात आलेल्या अटीं व शर्तींनुसार काम न केल्याने एमपीसीबीने कार्रवाईचा बडगा उगारला आहे. पर्यावरणीय मंजुरीनुसार ग्रीन बेल्ट विकसित न करणे, जास्तीच्या क्षेत्रावर बांधकाम करणे, सुधारित प्लॅनच्या मंजुरीनंतर पर्यावरणीय मंजुरी न घेतल्याप्रकरणी वेंकटेश लॅन्डमार्कला काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर मंडळाने पुणे महापालिकेला संबंधित प्रकल्पाला दिलेले बांधकाम नकाशे, भोगवटा प्रमाणपत्र, गार्डन एनओसी, फायर एनओसी रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.

लोहगाव येथील सर्वे नंबर 24/1/1 आणि 214/1/4 येथे सुरु असलेल्या वेंकटेश लॅन्डमार्क बांधकाम प्रकल्पाकडून पर्यावरणीय मंजुरीचे उल्लंघन केल्याची तक्रार छावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्पेश यादव यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे केली होती। या प्रकल्पाला 30 अगस्ट 2020 रोजी बांधकाम परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार प्रकल्पास सरकारच्या पर्यावरण, वने व वातावरणीय बदल विभागाकडून 30 एप्रिल 2021 रोजी पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली आहे. सदर पर्यावरणीय मंजुरीनुसार प्रकल्पाच्या ठिकाणी 1561.8 चौ. मी क्षेत्रावर ग्रीन बेल्ट विकसित करणे अनिवार्य होते। दरम्यान, त्यानंतर संबंधित विकसकाद्वारे प्रकल्पांच्या प्लॅनमध्ये अनेकदा बदल करण्यात आला। या सुधारित प्लॅनला पर्यावरणीय मंजुरी घेणे आवश्यक होते। दरम्यान, पर्यावरणीय मंजुरी न घेता कायद्याचे उल्लंघन केल्याची तक्रार यादव यांनी केली होती।

त्यानुसार महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी प्रकल्पाच्या साईटवर जात निरीक्षण केले। यावेळी प्रकल्पाच्या ठिकाणी लेबर कॅम्पच्या ठिकाणी तात्पुरते सीवेज आणि सोलिड वेस्टचा नसल्याचे दिसून आले। त्याचबरोबर पर्यावरणीय मंजुरी घेताना दाखविण्यात आलेला ग्रीन बेल्ट विकसित केला नसल्याचे दिसून आले। भुजल प्रशासनाकडून एनओसी न घेणे, मंजुर जागेपेक्षा जास्त जागेवर बांधकाम करणे, सुधारित प्लॅननुसार सुधारीत पर्यावरणीय मंजुरी न घेणे, नैसर्गिक नाल्यांवर बांधकाम करणे, मंजुर प्लॅननुसार व पर्यावरणीय मंजुरीनुसार निर्धारित केलेल्या उंचीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले. पर्यावऱणीय मंजुरीचे उल्लंघन केल्याचे दिसून आल्यानंतर वेंकटेश लॅन्डमार्कला सुरु असलेले आणि पुढील काम थांबविण्याचे आदेश प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत।

याप्रकरणी मंडळाने महापालिकेच्या बांधकाम विभागाला 19 डिसेंबर 2024 रोजी संबंधित प्रकल्पाला दिलेली बांधकाम परवानगी, बांधकाम नकाशे, गार्डन एनओसी, फायर एनओसी, पार्शियल भोगवटा प्रमाणपत्र रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, तब्बल 20 दिवसानंतरही महापालिका प्रशासनाकडून याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबत महापालिका बांधकाम विभागाच्या झोन क्रमांक 4 चे कार्यकारी अभियंता राजेश भुतकर यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत माहिती घेऊन सांगू, असे उत्तर दिले.

नियमबाह्य काम करणार्या वेंकटेश लॅन्डमार्क बांधकाम प्रकल्पावर कार्रवाई करण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे। एमपीसीबीने बांधकाम प्रकल्पास क्लोजरचे आदेश देतेवेळी प्रस्तावित निर्देशाप्रमाणे पर्यावरणीय मंजुरी रद्द करणे, कंनसेंट रद्द करणे, वीज पाणीपुरवठा बंद करणे, बॅंक गॅरंटी जमा करणे आदी पुढील कारवाई करण्यास जाणीपूर्वक दिरंगाई केली जात आहे। कारवाई करण्यास दिरंगाई करणार्या अधिकार्यांवर एमआरटीपी अॅक्ट नुसार कार्रवाई जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसू देणार नाही। जर प्रशासनाने संबंधित प्रकल्पावर कार्रवाई न केल्यास येत्या दोन दिवसांत झोन क्रमांक 4 च्या कार्यालयाचे व प्रदुषण नियंत्रण मंडळाचे कारनामे उघडकीस आणणार आहे.

  • कल्पेश यादव, अध्यक्ष, छावा प्रतिष्ठान

वाकडसह एचडीएफसी म्युच्युअल फंड तर्फे भारतात २५ नवीन शाखांचे उद्घाटन

पुणे-एचडीएफसी म्युच्युअल फंड या भारतातील आघाडीच्या म्युच्युअल फंड कंपनीने देशाच्या विविध भागांत मिळून २५ नव्या शाखांचे उद्घाटन केले आहे. हा उपक्रम कंपनीच्या सध्या सुरू असलेल्या व्याप्ती वाढवण्याच्या आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सोपी करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या नव्या शाखा म्हणजे बिझनेस सेंटर्स भरतपूरभुसावळ, वाराचाबोपाळवाकड (पुणे), चित्तोडगढजालनाअझमगढपुर्णियासीतापूरबस्तीअराह, बदलापूरकाशीपूरफिरोझपूरबरसातब्रम्हपोर (मुर्शीदाबाद)बोलापूरकोल्लम, खमामहोसूरहसननागेरकॉइलविझानागरम आणि तंजावर येथे सुरू करण्यात येणार आहेत.

नव्या शाखांमुळे एचडीएफसी एएमसी भारतातील सर्वाधिक प्रमाणात सहज उपलब्ध असलेल्या वेल्थ क्रिएटर्सपैकी एक असून त्यातून कंपनीचे – भारतातील प्रत्येकासाठी संपत्ती निर्मिती करण्याचे उद्दिष्ट अधोरेखित झाले आहे. या विस्तारामुळे एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे नेटवर्क देशभरात २५० शाखांपर्यंत पसरलेले असून त्यामुळे शहरी व निम- शहरी भागातील नागरिकांना आर्थिक सेवा जवळ उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. लहान शहरे व उदयोन्मुख आर्थिक केंद्रांत शाखा सुरू करत कंपनीने आर्थिक साक्षरता वाढवण्याचे आणि दुर्लक्षित बाजारपेठांमध्ये सेवा उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवले आहे. हा उपक्रम सेबीच्या भारतात आर्थिक सर्वसमावेशकता वाढवण्याच्या ध्येयाशी सुसंगत आहे.

या महत्त्वाकांक्षी विस्ताराविषयी एचडीएफसी एएमसी लि. चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नवनीत मुनोत म्हणाले, ‘एचडीएफसी एएमसीमध्ये आम्ही प्रत्येक भारतीयासाठी संपत्तीचे निर्माते होण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. देशभरात नव्या २५ शाखा सुरू करण्यातून कंपनीची या उद्दिष्टाशी असलेली बांधिलकी दिसून आली आहे. प्रत्येक भारतीयाला सक्षम करणाऱ्या गुंतवणुकीच्या योजना उपलब्ध करत आर्थिक चित्र बदलण्यासाठी आणि त्यांना देशाच्या आर्थिक विकासगाथेत सहभागी होण्यास सक्षम करण्यासाठी आम्ही बांधील आहोत.’

भारतीयांना कुटुंबीयांच्या तसेच मित्रपरिवाराच्या आरोग्यासाठी ऑनलाईन डॉक्टरांची मदत हवीहवीशी

४० टक्के डॉक्टरांच्या ऑनलाईन बुकींग कुटुंबीय तसेच मित्रपरिवाराच्या आरोग्य तपासणीसाठी राखीव: मेडीबडीच्या ऑनलाईन डेटाची माहिती

सायंकाळी सहानंतर ऑनलाईन डॉक्टर सल्लामसलतकरिता ३७ टक्के बुकींग होत असल्याचे मेडिबडीच्या अभ्यासाअंती उघडकीस आले. ही वेळ रुग्णांना जास्त सोयीस्कर असल्याचेही यात नमूद करण्यात आले. दिवसरात्र ऑनलाईन डॉक्टरांशी सल्लमसलत करत चांगली वैद्यकीय सुविधेची मागणी वाढत असल्याचेही यातून निष्पन्न झाले.

पुणे –डिजीटल माध्यमातून देशभरात सर्वात मोठी आरोग्यसेवा पुरवणारी कंपनी म्हणून ओळखल्या जाणा-या मेडिबडी कंपनीने गेल्या वर्षी आगळावेगळा विक्रम रचला. २०२४ साली मेडिबडीच्या ऑनलाईन डॉक्टर सल्लामसलत सेवेचा तब्बल १.२७ कोटी भारतीयांनी लाभ घेतला. यातून देशातील असंख्य रुग्ण आता ऑनलाईन आरोग्यसेवेचा लाभ घेण्याला पसंती दर्शवत असल्याचेही सिद्ध झाले. मेडिबडीने या डेटाच्या माध्यमातून गोळा केलेल्या माहितीच्या आधारे भारतीयांमध्ये आरोग्याविषयक वाढती जागरुकता तसेच बदलत्या आरोग्य व्यवस्थेबद्दल आश्चर्यकारक माहिती उपलब्ध झाली.

प्रत्येक भारतीय कुटुंबीयांमध्ये आपापल्या घरातील सदस्यांच्या आरोग्याविषयक काळजीबाबतचा महत्त्वाचा पैलू या डेटाच्या माध्यमातून उघडकीस आला. गेल्या वर्षभरात तब्बल ४० टक्के ऑनलाईन डॉक्टरांशी होणा-या सल्लामसलत बुकींग या संबंधितांना स्वतःच्याऐवजी आपल्या कुटुंबीयांतील सदस्य तसेच मित्रपरिवारासाठी केल्याची आश्यर्यकारक माहिती या डेटातून समोर आली. ऑनलाईन माध्यमाचा प्रभावीपणे वापर करुन आपल्या आप्तेष्ठांची काळजी घेण्याचा नवा ट्रेण्ड यानिमित्ताने दिसून आला. ४० टक्के बुकिंगपैकी ४४ टक्के बुकिंग या पालकांसाठी राखीव केल्या गेल्या. ऑनलाईन विश्वात रमलेल्या तरुणाईला या माध्यमाचा सुयोग्य वापर करत आपल्या आईवडिलांची काळजी घेण्यातील आत्मीयता यातून स्पष्ट झाली. आपल्या जोडीदारासाठी ३३ टक्के बुकिंग नोंदवल्या गेल्या. आपल्या लहान मुलांसाठी ११ टक्के बुकिंगची नोंद झाली .

आरोग्याविषयक लोकांमध्ये सतर्कता बाळगली जात असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण गेल्यावर्षी दिसून आले. सायंकाळी सहानंतर ३७ टक्के बुकिंग केल्या जात होत्या. चांगल्या दर्ज्याच्या आरोग्यसुविधा दिवसरात्र उपलब्ध असाव्यात, ही मागणी आता जोर धरु लागली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत कार्यालयीन वेळा सांभाळत आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता ऑनलाईन आरोग्यसेवेचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी ब-यापैकी प्राधान्य दिले जात असल्याचे मेडिबडीच्या डेटातून स्पष्ट झाले.

आपल्या घरातील सदस्यांच्या आरोग्याबदद्ल माहिती मिळावी म्हणून या ऑनलाईन माध्यमावर सर्वात जास्त बुकिंग पोटविकारतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि त्वचाविकारतज्ज्ञांच्या झाल्या. पचनक्रिया हा उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाची मानली जाते. पचनक्रियेतील बिघाड झाल्यास अनेकांनी तातडीने पोटविकारतज्ज्ञांनी मदत घेतली. यातून लोकांमध्ये पोटाशी संबंधित आजारांबद्दल ब-यापैकी जनजागृती झाल्याचे मेडिबडीच्या प्रसिद्धीपत्रकातून सांगण्यात आले. आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास कसा साधला जावा, त्यांच्या आरोग्याची जपणूक करण्याबद्दल अनेक पालकांना उत्सुकता होती. आपल्या त्वचेची काळजी घेणे हे आता सर्वांसाठी प्राधान्यक्रमाचे झाल्याचेही ऑनलाईन बुकिंगच्या माध्यमातून समोर आले. ब-याचजणांनी आपल्या चेह-यावरील पुटकुळ्या तसेच इतर त्वचाविकारांवर ऑनलाईन उपचार घेण्यास पसंती दर्शवली.

डिजीटल माध्यमांचा सर्वतोपरी वापर केल्याने आता रुग्णांचा रिपोर्टही डिजीटल स्वरुपात नोंदवला जात आहे. तब्बल १ हजार १९५ झाडांची कत्तल रोखता आली. या झाडांच्या मदतीने वातावरणातील ३० हजार किलो कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन कमी करता आले. मेडिबडीकडून या नव्या शाश्वत आणि पर्यावरणस्नेही भविष्याच्या वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. ऑनलाईन स्वरुपातील मदतीमुळे आता पर्यावरणाचा   -हास कमी होत चालला आहे. इंधनाच्या जाळण्यातून वातावरणात तब्बल २.७५ दशलक्ष कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन आता बंद झाले आहे. केवळ रुग्णाचेच आरोग्य नव्हे तर पर्यावरणाचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी आता डिजीटलचा पर्याय उपयोगी ठरला.

गेल्या वर्षी मेडिबडीच्या पॅथालॉजिस्टकडून रक्तसंकलनाची घरगुती सेवा देण्यासाठी तब्बल ८० लाख किलोमीटरपर्यंतचा प्रवासाचा टप्पा पार पडला. हे अंतर काश्मीर ते कन्याकुमारीच्या एकूण अंतराचा विचार केल्यास २ हजार १९२ वेळा पार केले गेले. रक्त संकलनासाठी तब्बल २५ टक्के महिला पॅथालॉजिस्टनी पुढाकार घेतला. यातून महिला सक्षमीकरणाचेही ज्वलंत उदाहरण पाहायला मिळाले. मेडिबडीच्या सर्वोत्तम आरोग्यसेवेची वचनबद्धता राखण्यात या महिलांनी मोलाची भूमिका बजावली.

वरील माहितीच्या आधारे भारतीय आता आपल्या आरोग्याच्या हिताबाबत सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी वैयक्तिक पातळीवर लक्ष केंद्रीत करत असल्याचे संपूर्ण डेटा तपासणीच्या अंती दिसून आले. आरोग्याची माहिती मिळावी म्हणून सहज उपलब्ध होणारे माध्यम वापरण्याचा कल वाढत असून, त्यातून पर्यावरणाची निगा राखण्यावरही पुढाकार घेतला जात आहे, असे मेडिबडीकडून सांगण्यात आले. लोकांनी कार्यालयीन कामकाजाच्या वेळा सांभाळत डिजीटल माध्यमांना आरोग्यतपासणीसाठी पसंती दिली. मेडिबडी उच्च प्रतीच्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सदैव कटीबद्ध आहे. या डेटातून माणसाच्या वैयक्तिक निवडीतून सामूहिक तसेच सकारात्मक परिणाम कसा होऊ शकतो याबद्दल तपशीलवार माहिती मिळाली. माणसाचे स्वतःचे आरोग्य आणि पर्यावरणाचे संवर्धन ऑनलाईन जगतातून शक्य झाल्याचेही दिसून आले. 

HMPV विषाणूचा 9वा रुग्ण:मुंबईत 6 महिन्यांच्या मुलीला लागण

मुंबई-महाराष्ट्रात बुधवारी कोरोना सदृश एचएमपीव्ही विषाणूचा तिसरा रुग्ण आढळून आला. मुंबईतील पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात 6 महिन्यांच्या मुलीला संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. मुलीला 1 जानेवारी रोजी गंभीर खोकला, छातीत जडपणा आणि ऑक्सिजनची पातळी 84% पर्यंत घसरल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि, चिमुकली आता बरी झाली आहे.

मुंबईतील या विषाणूची ही पहिलीच घटना आहे. मंगळवारी, महाराष्ट्रातील नागपूरमध्ये 2 रुग्ण नोंदवले गेले. येथे 13 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षाचा मुलगा संक्रमित आढळले. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले नाही. उपचारानंतर त्यांची प्रकृती नियंत्रणात आहे.

देशातील एकूण रुग्णांची संख्या 9 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात 2 रुग्ण आढळल्याच्या एक दिवस आधी, व्हायरसचे एकूण 6 रुग्ण नोंदवले गेले, ज्यात कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 2, पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये प्रत्येकी एक रुग्ण समाविष्ट आहेत. त्यापैकी बहुतेक मुले आहेत.

HMPV ची लागण झाल्यावर, रुग्ण सर्दी आणि कोविड-19 सारखी लक्षणे दाखवतात. त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होतो. यापैकी 2 वर्षांखालील मुलांना सर्वाधिक त्रास होतो. केंद्राने राज्यांना ‘इन्फ्लूएंझा सारख्या आजार’ आणि ‘गंभीर तीव्र श्वसन समस्या’ यांसारख्या श्वसन आजारांवर देखरेख वाढवण्याचा आणि HMPV बद्दल जागरूकता पसरवण्याचा सल्ला दिला आहे.
आरोग्य मंत्री नड्डा म्हणाले – एचएमपीव्ही हा नवीन विषाणू नाही
एचएमपीव्ही हा नवीन विषाणू नसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. हा 2001 मध्ये पहिल्यांदा ओळखला गेला. त्यानंतर तो जगभर पसरला. हा श्वासोच्छवास आणि हवेद्वारे पसरतो. हा सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करतो. WHO परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि लवकरच अहवाल आमच्याशी शेअर करेल.

केंद्र सरकारने म्हटले होते – HMPV संसर्ग हिवाळ्यात सामान्य आहे
चीनमध्ये एचएमपीव्हीच्या वाढत्या प्रकरणांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा होती. मात्र, भारत सरकारने 4 जानेवारीला जॉइंट मॉनिटरिंग ग्रुपची बैठक घेतली होती. यानंतर सरकारने म्हटले होते की, थंडीच्या मोसमात फ्लूसारखी परिस्थिती असामान्य नाही. आम्ही चीनच्या घडामोडींवरही लक्ष ठेवून आहोत आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी सरकार तयार आहे-

श्वासोच्छवासाच्या आजारांच्या बाबतीत कोणत्याही वाढीला सामोरे जाण्यासाठी देश पूर्णपणे तयार आहे. RSV आणि HMPV ही चीनमध्ये फ्लूच्या वाढत्या प्रकरणांची कारणे आहेत. या हंगामात हे सामान्य इन्फ्लूएंझा विषाणू आहेत. सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच, WHO ला चीनमधील परिस्थितीबद्दल वेळोवेळी अपडेट देण्यास सांगितले आहे.