पुणे ः पुणेकर रसिकांनी ‘श्रीराम कथा संगीतिका’ या आगळ्यावेगळ्या नाट्यप्रयोगाचा नुकताच अनुभव घेतला. रसिकांची त्याला उत्स्फूर्त दाद मिळाल्याने हा प्रयोग उत्तरोत्तर रंगतच गेला. नगरची अग्रगण्य संस्था श्रुती संगीत निकेतनतर्फे येथील टिळक स्मारक मंदिरात या खुल्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.
संगीतिका हा नाटक आणि संगीत या दोन कलांचा एकात्म आविष्कार साधणारा नाट्यप्रकार आहे. संगीतात रचनाबद्ध केलेली व गायक नटांनी सादर केलेली पद्यात्म नाट्यकृती म्हणजे संगीतिका. यात गीतांबरोबरच पात्रांचे संवादही गायनातूनच सादर केले गेले. या संगीतिकेचे लेखन डॉ. मधुसूदन बोपर्डीकर यांनी केले असून, तिचे दिग्दर्शन डॉ. धनश्री खरवंडीकर यांनी केले आहे. मकरंद खरवंडीकर यांनी तिला संगीत दिले असून, कल्याणी कामतकर यांनी नृत्य दिग्दर्शन केले होते. अनुजा कुलकर्णी आणि कुमूदिनी बोपर्डीकर यांचे विशेष सहाय्य लाभले. आहे. यात मुख्यतः ५० शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भूमिका केल्या. हे सर्व विद्यार्थी नगर येथे श्रुती संगीत निकेतन मध्ये संगीत व नाट्य प्रशिक्षण घेत आहेत.
संगीतिकेच्या प्रथम भागात श्रीरामांच्या राज्याभिषेक प्रसंगापासून सीता अपहरणापर्यंत आणि दुसऱ्या भागात रावणवधापासून सीता भूमीत जाऊन आपला अवतार संपवते इथपर्यंतच्या कथानकाचा समावेश होता. प्रासादिक गीते, काव्यमय संवाद असे या संगीतिकेचे लक्षवेधी स्वरूप होते. अनेक प्रसंगांना रसिकांची उत्स्फूर्त दाद लाभली. श्रीरामांच्या जयजयकाराने सभागृह दुमदुमले. पं. विकास कशाळकर, पं. यादवराज फड, मधुवंती दांडेकर, वर्षा जोगळेकर, मानसी खांडेकर, रवींद्र कुलकर्णी, माधुरी डोंगरे, साधना घुगरी, चिन्मय जोगळेकर, अस्मिता चिंचाळकर आदी संगीत आणि नाट्यक्षेत्रातील मान्यवरांनी या प्रयोगाला दाद दिली.
संगीतिकेतून पुणेकरांना रामायणाची अनुभूती
”घात’ हॉलिवूडच्या चित्रपटांशी केली जातेय तुलना!
मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या शुक्रवारीप्रदर्शित झालेल्या ‘घात’ चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अत्यंत मनोवेधक आणिथरारक मांडणी, नेत्रसुखद लोकेशन्स आणि चित्ताकर्षक छायाचित्रण, उत्कंठावर्धक संगीतआणि उत्कृष्ठ कथाबीज हे सारं एकाच चित्रपटात म्हणजे सोने पे सुहागा! अस्सल अभिनय आणित्यातील बिनचे कलावंत……! असं सबकुछ असलेला हा चित्रपट साऱ्या विश्वात कुतूहल निर्माणकरण्यात यशस्वी झाला आहे. मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई, पनवेल, पुणे,सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर, नागपूर अश्या शहरामध्ये या चित्रपटाला वाढता प्रतिसादलाभतोय. चित्रपटाला मिळत असलेलं यश समाधान देत असून खास विदर्भात चित्रित झालेल्या या चित्रपटाची तुलना प्रेक्षक हॉलिवूडच्या चित्रपटांशी करीत आहेत. नागपूर येथील एका शोला चित्रपटात भूमिका केलेली विदर्भातील कलावंतांनी अचानक उपस्थिती दर्शविली आणि रसिकांच्याआनंदाला उधाण आले. चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका जिवंत करणाऱ्या या कलावंतांना पाहून प्रेक्षक अगदी भारावून गेले होते. काहींनी हा चित्रपट मराठीतला शोले असल्याचे सांगितले तर काहींनी थेट हॉलिवूडच्या चित्रपटांसोबत तुलना करून कलावंतांचे कौतुक केले.
आपल्या मुंबई पुण्यात चित्रपटांतील कलावंत नेहमीच प्रेक्षकांना भेटत असतात, त्यांच्याशी संवाद साधत असतात, छायाचित्रे – सेल्फी घेत असतात, परंतु मराठवाडा विदर्भात असं अभावानेच घडताना दिसते. मात्र विदर्भातील दुर्गम ठिकाणी चित्रीकरण करण्याचा धाडसी विचार दिग्दर्शक छत्रपाल निनावेंनी नुसता केलाच नाही तर तो तडीसही नेला. प्रेक्षकांना जे द्यायचे ते उत्तमच असावे या विचाराने, कुठलीही तडजोड न करता या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्यांनी थेट गडचिरोलीचे घनदाट जंगल निवडलं. आपल्या गोष्टीसाठी हवं ते शोधून, अनेक अडथळे पार करून त्यांनी गडचिरोली – छत्तीसगडच्या दुर्गम भागात अनेक दिवस संपूर्ण चित्रपटाच्या युनिटसोबत अगदी दुर्गम भागात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचे धाडस केले आणि त्यात ते यशस्वीही झाले…त्यांनी या चित्रपटासाठी निवडलेला घनदाट नक्षली जंगलाचा बॅगड्रॉप आणि त्यासाठी सर्वांनी जीवावर उदार होऊन घेतलेल्या मेहनतीचे कौतुक प्रेक्षक चित्रपट पाहून करतात ते समाधान लेखक दिग्दर्शक, कलावंत निर्माते यांच्या चेहऱ्यावर लकाकत आहे. महाराष्ट्रात सर्वत्र या चित्रपटाची विशेष चर्चा होत असून चित्रपटाला वाढता प्रतिसाद मिळत आहे.
माओवादी बंडखोरांनी घेरलेल्या जंगलात हा सिनेमा आकाराला येतो. माओवादी बंडखोर, सामान्य नागरिक, पोलिस यांच्यातील तणावपूर्ण आणि रहस्यपूर्ण पार्श्वभूमीवर सिनेमा रंगत जातो. शिलादित्य बोरा यांची ”प्लॅटून वन’, मनीष मुंद्रा यांची ‘दृश्यम फिल्म्स’ आणि मिलापसिंह जडेजा, संयुक्ता गुप्ता आणि कुणाल कुमार यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘घात’ सिनेमात मराठीतील अत्यंत संवेदनशील अभिनेता जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे, सुरुची आडारकर, जनार्दन कदम आणि धनंजय मांडवकर यांंच्या मुख्य भुमिका आहेत. त्यांच्यासह या चित्रपटात स्थानिक कलाकार संग्रामसिह ठाकूर, विकास मुडकी, काजल रंगारी, राहुल गावंडे, अजय लोणारे, विनोद राऊत, गिरीधर फताळे, निरज धानी, महेंद्र मस्के, गणेश देशमुख, अदित्य बुलकुंदे, रतन सोमवारे, पवन ठाकरे, शैलेश पाटील, अतुल खंदारे यांच्याही लक्षवेधी भूमिका आहेत.
ॲक्सिस बँकेने मुथूट कॅपिटलला विस्तारित केले 1 अब्ज रुपये कर्ज
पुणे-30 सप्टेंबर 2024: प्राइवेट इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट ग्रुप (PIDG) चा एक भाग असलेल्या GuarantCo सह भागीदारीत, भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या अॅक्सिस बँकेने भारतातील सर्वात वेगाने वाढणारी एनबीएफसी मुथूट कॅपिटलला 1 अब्ज रुपयांची (c. USD 12 दशलक्ष समतुल्य) हमी दिली आहे. ही हमी एनबीएफसीला भारतातील ग्रामीण आणि मेट्रो नसलेल्या भागातील ग्राहकांना इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करण्यासाठी कर्ज देण्याचे सक्षम करेल.
GuarantCo ने या व्यवहारासाठी अॅक्सिस बँकेला 65 टक्के मागणीनुसार क्रेडिट गॅरंटी प्रदान केली आहे, जी GuarantCo आणि अॅक्सिस बँकेने स्वाक्षरी केलेल्या व्यापक USD 200 दशलक्ष (INR समतुल्य) इलेक्ट्रिक वाहन (EV) फ्रेमवर्क कराराचा भाग आहे. भारतातील ई-मोबिलिटी इकोसिस्टमला वित्तपुरवठा करण्यासाठी USD 300 ते 400 दशलक्ष (रुपये समतुल्य) निधीची जमवाजमव सक्षम करण्यासाठी या फ्रेमवर्कची स्थापना करण्यात आली.
मुथूट कॅपिटलसोबतचे हे सहकार्य विशेषतः ग्रामीण आणि मेट्रो नसलेल्या प्रदेशांना वाहतूक उपाय प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करेल ज्यात प्रामुख्याने कमी उत्पन्न असलेल्या लोकसंख्येचा समावेश आहे. या व्यवहारामुळे EV इकोसिस्टममध्ये कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांना INR ०.८ अब्ज (c. USD 10 दशलक्ष) पेक्षा जास्त फायदा होईल आणि पुरवठा साखळीतील उपकरणे उत्पादक, वाहन विक्रेते आणि विमा कंपन्या या स्थानिक व्यवसायांवर परिणाम होईल.
1 अब्ज रुपयांमुळे इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांची तरतूद वाढेल. EV व्यवहारात SDG 9.4 मध्ये योगदान दिले जाणार असल्याने वाढीव संसाधन-वापर कार्यक्षमतेसह आणि स्वच्छ आणि पर्यावरणास अनुकूल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अवलंब करून इन्फ्रास्ट्रक्चर आणि संबंधित उद्योगांचा चिरंतन विकास होईल. तसेच SDG 11.2 मुळे सर्वांसाठी सुरक्षित, परवडणारी, प्रवेशयोग्य आणि टिकाऊ वाहतूक प्रणालींमध्ये प्रवेश प्रदान करण्यासाठी मोलाची भर घातली जाणार आहे.
EV फ्रेमवर्क कराराअंतर्गत GuarantCo आणि अॅक्सिस बँकेचा हा तिसरा व्यवहार आहे. डिसेंबर 2023 मध्ये, भारतातील ई-मोबिलिटी इकोसिस्टममध्ये कंपनीच्या विस्तार धोरणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी प्रथम INR 2.5 बिलियन (c. USD 30 दशलक्ष) कर्जाद्वारे विव्रिती कॅपिटल्सला सक्षम केले आणि त्यानंतर INR 1 अब्ज (c. USD 12 दशलक्ष) एव्हरेस्ट फ्लीटला भारतात कमी प्रदूषण उत्सर्जित करणाऱ्या टॅक्सी म्हणून तैनात केल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक कारच्या खरेदीसाठी कर्ज म्हणून उपलब्ध करून दिले.
ॲक्सिस बँकेचे डेप्युटी मॅनेजिंग डिरेक्टर राजीव आनंद म्हणाले: “ॲक्सिस बँक भारतातील ई-मोबिलिटी उद्योगाच्या वाढीला पाठिंबा देण्यासाठी आणि गती देण्यासाठी वचनबद्ध आहे. देशातील अग्रगण्य कांपैकी एक म्हणून, आम्ही सकारात्मक पर्यावरणीय आणि सामाजिक प्रभाव निर्माण करणाऱ्या उपक्रमांसाठी समर्पित आहोत. इलेक्ट्रिक वाहनांच्या अवलंबनाला प्रोत्साहन देऊन, आम्ही उत्सर्जन कमी करण्यासाठी, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि देशव्यापी परवडणारी आणि सुलभ वाहतूक उपाय प्रदान करण्यासाठी काम करत आहोत. आम्ही EV डीलर्स, उत्पादक आणि इतर खेळाडूंसोबत आमची भागीदारी आणि प्रतिबद्धता सक्रियपणे वाढवली आहे आणि ते पुढेही करत राहू. हे सहकार्य केवळ भारतातील हरित पायाभूत सुविधांच्या विकासास समर्थन देत नाही तर सर्वसमावेशक भविष्याला चालना देण्याच्या आमच्या व्यापक दृष्टीकोनाशी सुसंगत आहे जिथे शाश्वत पद्धतींचा समाजातील सर्व घटकांना फायदा होतो.”
मुथूट कॅपिटलचे चीफ एक्जीक्यूटिव ऑफिसर मॅथ्यूज मार्कोज म्हणाले: “GuarantCo सोबत भागीदारी म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या अवलंबनाला गती देण्यासाठी आणि आपल्या देशात विशेषतः ग्रामीण आणि निम-शहरी बाजारपेठांमध्ये शाश्वत वाहतूक उपायांना गती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या निधीमुळे MCSL ला विविध ग्राहक आणि व्यवसायांसाठी इलेक्ट्रिक वाहने अधिक सुलभ आणि परवडणारी बनविण्याच्या उद्देशाने नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार वित्तपुरवठा पर्याय उपलब्ध करून देण्यात सक्षम होतील. परवडणारी आणि सोयीची खात्री करून सामान्य माणसाला स्वत:ची दुचाकी वाहने घेण्यास सक्षम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. हे आर्थिक वर्ष 25 मध्ये आमच्या ईव्ही 200 कोटींनी वाढवण्याच्या आमच्या निर्धारित उद्दिष्टाला पंख देईल.”
GuarantCo चे सीईओ लेथ अल–फलाकी म्हणाले: “आम्ही मे 2022 मध्ये ॲक्सिस बँकेसोबत स्वाक्षरी केलेल्या इलेक्ट्रिक व्हेईकल फ्रेमवर्क हमी करारांतर्गत मुथूट कॅपिटलसोबतचे व्यवहार पूर्ण केल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. आम्ही विवृत्ती कॅपिटल आणि आणि एव्हरेस्ट फ्लीटसोबत केलेल्या एकूण INR 4.5 अब्ज (c USD ५४ दशलक्ष) च्या करारानंतर आम्ही केलेला हा तिसरा व्यवहार आहे. फ्रेमवर्क अंतर्गत हा पहिला व्यवहार आहे जो क्रेडिटच्या तरतुदीद्वारे ईव्ही व्यवसायाच्या मागणीची बाजू कव्हर करेल जेणेकरून ग्राहक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करू शकतील. या व्यतिरिक्त, या व्यवहाराचा बाजारातील परिवर्तनाचा प्रभाव अपेक्षित आहे आणि आम्हाला आशा आहे की ते भारतात अधिक इलेक्ट्रिक वाहनांच्या तैनातीला उत्प्रेरित करण्यास मदत करेल. GuarantCo, खाजगी पायाभूत सुविधा विकास गटाद्वारे, भारतातील ई-मोबिलिटी इकोसिस्टमला पुढे नेण्यासाठी आणि PIDG 2030 धोरणाशी संरेखित केलेल्या आमच्या हवामान कृतीच्या उद्दिष्टांना सामोरे जाण्यासाठी अॅक्सिस बँकेसोबत क्लायमेट मिटिगेशन गॅरंटी वापरणे सुरू ठेवेल.”
स्वामी अविमुक्तेश्वरानंद मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर
मुंबई- बद्रीनाथ ज्योतिर्मठ पिठाचे शंकराचार्य जगद्गुरू स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कुटूंबियांना आशिर्वाद दिले. यावेळी शिंदे यांच्यासह संपूर्ण परिवाराने उपस्थित राहून त्यांचे मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने स्वागत करत त्यांचे पूजन करून त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. तसेच त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करून त्यांचे मार्गदर्शन घेतले. तसेच आयुष्यभर त्यांनी हिंदू धर्माच्या प्रचार प्रसारासाठी केलेल्या कार्य आमच्यासाठी पथदर्शी असल्याचे सांगितले.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,’ यापुढेही माझ्या हातून कायम अशीच जनसेवा घडत राहो, असे शुभाशिर्वाद त्यांनी यावेळी दिले.

पुन्हा पक्षात येऊ पाहणाऱ्या आयारामांच्या बद्दल सुप्रिया सुळे म्हणाल्या ..तेव्हा आमचं आयुष्य उध्वस्त करून ते गेले …
पुणे- पवार साहेब २ दिवस पुण्यात आहेत ,भाजपा किंवा दादा गटातून किवा अन्य कुठून अनेक जण तुमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दोन प्रकारे मत प्रदर्शन केले आहे प्रथम त्या म्हणाल्या , मी विनम्र पणे सांगते,महार्ष्ट्राच्या जनतेसमोर नतमस्तक होते ,माय बाप जनतेने दाखवून दिले कि पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाला , तेव्हा ते लोक आमदार, खासदार, सत्तेची पदे एवढेच नाही तर पक्ष व चिन्हही घेऊन गेले. आमचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. माझ्यावर माझ्या मुलीचा वाढदिवस कोर्टात साजरा करण्याची वेळ आली. पण सत्य परेशान हो सकता आहे, मगर पराजित नही. दिल्लीच्या अदृश्य शक्तीला दिल्लीतून काहीही करता येते हे वाटत होते. पण मायबाप जनतेनेने दिल्लीतून असे काहीही करता येत नाही हे अदृश्य शक्तीला दाखवून दिले. हा देश केवळ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच चालतो आणि चालेल.
आम्ही अदृश्य शक्तीवाले नाही. आम्ही संविधानवाले आहोत. आम्ही संविधान केंद्रस्थानी ठेवून राजकारण करतो. सशक्त लोकशाहीत विरोधक दिलदार असला पाहिजे. शरद पवारांना रोखा, उद्धव ठाकरे यांना रोखा आणि वेळ पडली तर त्यांचे पक्ष व कार्यकर्ते फोडून सत्तेत या अशी या नेत्यांची विचासरणी असल्याचेही सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.प[उन्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या
त्या म्हणाल्या ,कार्यकर्त्यांची इच्छा होती म्हणून दोन तीन महिन्यांनी अशी शिबिर घेतोच आमचा राजकीय पक्ष आहे जो विचारधारेने चालतो पॉलिसी लेवलला सरकार काय निर्णय घेत त्याचे प्लस पॉइंट मायनस पॉईंट देशात राज्यात होणारे गोष्टीवर मनमोकळी चर्चा होते
लाडकी बहिण अजित दादांचा दावा आणि नितीन गडकरींचे विधान यावर बोलताना त्या म्हणल्या
डेटा फार महत्वाचा आहे,जो महारष्ट्र सरकारकडून येतो तुम्ही किती लोन घेऊ शकतात केंद्र किंवा राज्यला काही लिमिट अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात घातले होते, एफ आर बी एम कायदा कायद्याबद्दल सर्वांचे एक मत आहे,जास्त लोन घेणं,हा कायदा फॉलो केला जातं नाही,यावर जयंत पाटील यांनी डेटा वाईज यावर बोलले होते,गडकरी,राज ठाकरे हे तेच म्हणतं आहे, अभ्यासाची तसेच म्हणतात त्यामुळे डेटा सगळं सांगतो.निर्णय रेटला आहे, ऑब्जेक्शन असताना,लोकशाही मध्ये सगळयांना बोलयाचा अधिकार आहे.
सातारा रस्त्यावरील प्रश्नाबाबत त्या यावेळी असेही म्हणाल्या ,’गडकरी साहेब विकासाच्या मुद्द्यात राजकारण करत नाहीत ते म्हटले की वेळ पडली तर पूर्ण कॉन्ट्रॅक्ट रद्द करू नवीन निर्णय घेऊ आणि लवकरात लवकर रस्ता पूर्ण करू
अमित शहांना कितीही वेळा येऊ द्यात त्यांचे स्वागतच करा -अमित शहांच्या वाढत्या दौऱ्यावर बोलताना त्या म्हणाल्या ,’
अतिथी देवो भव पाहुण्यांचे स्वागत झालंच पाहिजे, आम्ही अदृश्य शक्ती वाले नाही आम्ही संविधान वाले आहोत, संविधान केंद्र बंधू ठेवून आम्ही राजकारण करतो, सशक्त लोकशाहीमध्ये दिलदार विरोधक असला पाहिजे, शरद पवार यांना रुका उद्धवजींना रोखा आणि वेळ पडली तर पक्ष फोडा कार्यकर्ते फोडा आणि सत्तेमध्ये या अस म्हंटले, भाजप जुना पक्ष आहे तरीही आजही त्यांच्या पक्षात आज ही टॅलेंट दिसत नाही, चांदीच्या ताटात जेव्हा वेळ आहे जेवायची वेळ येते तेव्हा भाजपचे कार्यकर्ते बसत नाहीत तर बाहेरून आलेले बसतात, काही केलं तर महाराष्ट्राची जनता तुमच्या पाठीशी आहे फार त्यांना यश मिळेल असं वाटत नाही
फास्ट ट्रॅक कोर्टातकेस चालवून भर चौकात फाशी द्या पण… एन्काऊंटर नकोच :नायर रुग्णालय अत्याचार घटना संदर्भातील प्रश्नावर त्या म्हणाल्या,’बी एम सी हॉस्पिटलमध्ये वारंवार घटना घडत आहेत,पारदर्शकपणे निर्णय प्रक्रिया करून कोणीही अत्याचार करणाऱ्या व्यक्ती असतील फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा,एन्काऊंटर वगैरे करू नका व्यवस्थित काम करा अशी माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे भर चौकात फाशी द्या सगळ्यांसमोर त्याशिवाय हा विषय संपणार नाही वर्दीचा धाक देशात राहिला नाही
पक्षात होणार्या इनकमिंग बाबत शेवटी बोलताना त्या म्हणाल्या …
माझा फोन इनकमिंग साठी सदैव चालू असतो,ब्लॉक करून बंद करून त्याला.लोकशाही म्हणत नाही, माझी वैचारिक लढाई आहे वैयक्तिक लढाई नाही कोणाशी, डायलॉग माझा गेलेल्या सर्वांशी होता ते बोलत नाही त्यांचा प्रश्न आहे,मी कोणाशी कधीही संबंध तोडले नाहीत,
गाईला राज्य माता दर्जा दिल्याच्या संदर्भातील प्रश्नावर त्या म्हणाल्या ,’आपण नेहमी गोमाताच म्हणतो गाईला माता म्हणणारी आपली संस्कृती आहे अन्नपूर्णेची ही आपण पूजा करतो अन्नाची पूजा होते त्यामुळे मला नवीन वाटत नाही जे आपल्यावर संस्कार झालेले आहेत बैलपोळा करतोच, आम्ही सगळे शेतकरी आहोत,
गोविंदाच्या पायात गोळी लागली:स्वतःच्या रिव्हॉल्वरमधून मिसफायर
मुंबई-बॉलिवूड अभिनेता गोविंदा (60) याच्या पायात गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. त्याच्याच रिव्हॉल्वरमधून मिसफायर झाले. मंगळवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास ही घटना घडली. ऑपरेशननंतर त्याच्या पायातली गोळी काढण्यात आली आहे. अभिनेता सध्या धोक्याबाहेर आहे.गोविंदाने 2004 मध्ये उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपच्या राम नाईक यांचा ४८,२७१ मतांनी पराभव केला. अभिनेता 2004 ते 2009 पर्यंत खासदार होता.आता गोविंदा ने कॉंग्रेस सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे गोविंदाने 28 मार्च रोजी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला होता. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. पक्षात प्रवेश केल्यानंतर गोविंदा म्हणाला होता- मी 2004 ते 2009 या काळात राजकारणात होतो. 14 वर्षांनंतर मी पुन्हा राजकारणात आलो हा योगायोग आहे. माझ्यावर जो काही विश्वास ठेवला आहे, तो मी पूर्ण करेन.
गोविंदाने हॉस्पिटलमधून एक ऑडिओ मेसेज जारी करून सांगितले,‘तुमच्या आशीर्वादाने मी बरा आहे. चुकून गोळी लागली होती, जी ऑपरेशननंतर काढून टाकण्यात आली आहे. तुमच्या प्रार्थनेबद्दल डॉक्टरांचे आणि तुम्हा सर्वांचे आभार.
पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितले की, घटना घडली तेव्हा गोविंदा घरात एकटाच होता. त्याच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर आहे. रिव्हॉल्व्हरमधून चुकून गोळी झाडली गेली, जी त्याच्या पायाला लागली. याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. या प्रकरणात संशयास्पद काहीही नाही.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिव्हॉल्व्हर साफ करताना गोविंदाला गोविंदाला गोळी लागली. मुंबई पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याचे रिव्हॉल्व्हर जप्त केले.
मिळालेल्या माहितीनुसार, गोळी लागल्याने त्याच्या पायातून खूप रक्तस्त्राव झाला होता. त्यांना उपचारासाठी अंधेरीच्या कृती केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक उपचारानंतर गोविंदाची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांची मुलगी टीना (नर्मदा) सध्या त्यांच्यासोबत रुग्णालयात आहे. तर त्याची पत्नी सुनीता कोलकातामध्ये आहे, जिथे गोविंदाचा कार्यक्रम होणार होता.गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी सांगितले की, ते एका कार्यक्रमासाठी कोलकात्याला जात होते. फ्लाइट 6 वाजता होती. पिस्तूल कपाटात ठेवत असतानाच गोळीबार झाला आणि त्याच्या गुडघ्याखाली गोळी लागली. त्यांना तातडीने अंधेरीच्या रुग्णालयात नेण्यात आले. गोळी बाहेर काढण्यात आली आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. घाबरण्याची गरज नाही.
कुली नंबर 1, हिरो नंबर 1, राजा बाबू, छोटे सरकार, हद कर दी आपने यांसारख्या चित्रपटांचा भाग असलेला गोविंदा गेल्या 5 वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. 2019 चा रंगीला राजा हा त्याचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट आहे.
अटल सेतूवर एमएमआरडीए तर्फे उभारलेली आयटीएमएस प्रणाली योग्य परिवहन आयुक्त कार्यालयाचे स्पष्टीकरण
मुंबई, दि. ३० : अटल सेतूवर एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) तर्फे उभारण्यात आलेली आयटीएमएस (एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली) योग्य असल्याचे स्पष्टीकरण परिवहन आयुक्त कार्यालयाच्यावतीने देण्यात आले आहे.
शासनाच्या ११जुलै २०२४ रोजीच्या पत्रान्वये केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम १६७ (ए) मध्ये नमुद केल्यानुसार राज्यातील आयटीएमएस (इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम /एचटीएमएस(हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) प्रकल्पाकरीता राज्याचे परिवहन आयुक्त, मुंबई यांना नामनिर्देशित करण्यात आले आहे.
त्यानुसार या कार्यालयातील सह परिवहन आयुक्त (अंमल-२) मुंबई यांनी एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) तर्फे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) प्रकल्पाअंतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूवर लावलेल्या उपकरणांची तपासणी २५ सप्टेंबर २०२४ रोजी प्रादेशिक परिवहन पनवेल कार्यालयाच्या पथकासह केली.
या तपासणीमध्ये टोलनाक्यावर ओव्हरस्पीड वाहनांची व टोलनाक्यावर टोल न भरलेल्या वाहनांची तपासणी केली. तसेच उरण येथील एमएमआरडीएच्या कमांड व नियंत्रण कक्षामधील उपकरणांची तपासणी केली. या तपासणीमध्ये दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांसाठी तेथील उपकरणे योग्य असल्याचे आढळले.
त्यानुसार आज ३० सप्टेंबर २०२४ रोजी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मधील नियम १६७ (ए) नुसार परिवहन आयुक्त, मुंबई यांनी अटल सेतुवर उभारलेली आयटीएमएस (एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली) योग्य असल्याबाबत प्रमाणपत्र जारी केले आहे. याबाबत प्रकाशित झालेले वृत्त निराधार आहे, असे स्पष्टीकरण सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.
मीरा-भाईंदरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि. ३० :- मीरा-भाईंदर महानगरपालिकेतर्फे विविध विकासकामांचे उद्घाटन होत आहे, याचा मला आनंद होत आहे. मीरा-भाईंदर शहर स्वच्छ व सुंदर व्हावे, यासाठी शासन विविध विकास प्रकल्प प्रकल्प राबवित आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते घोडबंदर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण, भाईंदर पूर्व येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे लोकार्पण, घोडबंदर किल्ला जतन व संवर्धन, निरूपणकार डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृह इमारत लोकार्पण, भाईंदर नवघर येथील तलावातील म्युझिकल फाउंटनचे लोकार्पण, काशी गाव जरीमरी तलावातील म्युझिकल फाउंटनचे लोकार्पण, शासन निधीतून मंजूर झालेल्या विविध कामांचे ऑनलाईन पद्धतीने भूमीपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, रवींद्र फाटक, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर, मीरा-भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अतिरिक्त आयुक्त डॉ.संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, शहर अभियंता दीपक खांबित, उपायुक्त कल्पिता पिंपळे, उपायुक्त सचिन बांगर, उपायुक्त प्रसाद शिंगटे, उपायुक्त संजय दोंदे आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, प्रताप सरनाईक यांच्या कल्पनेतून मीरा-भाईंदरमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत आणि ते पूर्णही होत आहेत. मीरा-भाईंदर मधील लोकप्रतिनिधी सर्व संस्कृती जपून सर्वधर्मियांना सोबत घेऊन चालत आहेत. मिरा-भाईंदर हे मुंबई आणि ठाण्याच्या मध्यभागी आहे. त्यानुषंगाने येथील विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या घरांचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, अशा सूचनाही दिल्या. चोरी झालेले दागिने संबंधितांना परत मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाचेही विशेष अभिनंदन केले.
पुढील पाच वर्षात क्रूझ कॉल्स आणि प्रवाशांची संख्या दुप्पट करण्यासाठी ‘क्रूझ भारत’ मोहिमेचा प्रारंभ
देशातील पुनर्रचित क्रूझ क्षेत्रात 4 लाख नोकऱ्या निर्माण करण्याचे मोहिमेचे उद्दिष्ट : सर्बानंद सोनोवाल
मोहीम तीन टप्प्यात आणि महासागर व हार्बर क्रूझ, नदी व बेट क्रूझ, बेट क्रूझ अशा तीन भागात राबवण्यात येणार
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2024
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुंबईत ‘क्रूझ भारत’ मोहिमेचा प्रारंभ केला. देशातील क्रूझ पर्यटनाच्या प्रचंड क्षमतेला चालना देण्यासाठी, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने ही मोहीम आखली आहे. या मोहिमेचा उद्देश येत्या पाच वर्षांत म्हणजेच 2029 पर्यंत क्रूझ प्रवासी संख्या वाहतूक दुप्पट करून देशाच्या क्रूझ पर्यटन उद्योगाला चालना देण्याचा आहे, असे सर्बानंद सोनोवाल यांनी यावेळी सांगितले. या ऐतिहासिक प्रसंगी सोनोवाल यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूरही उपस्थित होते.

सोनोवाल यांनी ‘एम्प्रेस’ या क्रुझवरून या मोहिमेचा प्रारंभ केला. क्रूझ पर्यटनाचे जागतिक केंद्र बनण्याचा भारताचा संकल्प पुढे नेणे आणि देशाला आघाडीचे जागतिक क्रूझ स्थळ म्हणून नावारूपाला आणणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. क्रूझ इंडिया मोहीम 1 ऑक्टोबर 2024 पासून 31 मार्च 2029 पर्यंत तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे. टप्पा 1 (01.10.2024 – 30.09.2025) मध्ये अभ्यास आयोजित करणे, मुख्य नियोजन आणि शेजारील देशांसोबत क्रूझ आघाडी तयार करणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल. क्रूझ सर्किट्सची क्षमता वाढविण्यासाठी विद्यमान क्रूझ टर्मिनल्स, मरीना आणि गंतव्यस्थानांचे आधुनिकीकरण देखील या टप्प्यात केले जाईल. टप्पा 2 (01.10.2025 – 31.03.2027) उच्च क्षमतेची क्रूझ स्थाने आणि सर्किट कार्यान्वित करण्यासाठी नवीन क्रूझ टर्मिनल, चौपाटी आणि गंतव्यस्थान विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करेल. टप्पा 3 (01.04.2027 – 31.03.2029) भारतीय उपखंडातील सर्व क्रूझ सर्किट्स एकत्रित करण्यावर लक्ष केंद्रित करेल, तसेच क्रूझ टर्मिनल्स, चौपाटी आणि गंतव्यस्थानांचा विकास सुरू ठेवताना क्रूझ परिसंस्था विकसित करण्याकडे लक्ष पुरवेल.

टप्प्याटप्प्यांवरील प्रमुख कामगिरी उद्दिष्टांमध्ये टप्पा 1 मधील 0.5 दशलक्ष सागरी क्रूझ प्रवासी संख्या टप्पा 3 पर्यंत 1 दशलक्षावर नेणे, त्याचसोबत सागरी क्रूझ कॉल्सची संख्या 125 वरून 500 वर नेणे, यांचा समावेश आहे. टप्पा 1 मधील नदी क्रूझ प्रवासी संख्या 0.5 दशलक्षवरून टप्पा 3 पर्यंत 1.5 दशलक्षावर पोहोचेल. टप्पा 1 मधील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल्सची संख्या 2 वरून टप्पा 3 पर्यंत 10 पर्यंत विस्तारेल, तर रिव्हर क्रूझ टर्मिनल्सची संख्या 50 वरून 100 पर्यंत पोहोचेल. त्याचप्रमाणे मरीना ची संख्या 1 वरून 5 पर्यंत वाढेल आणि रोजगार निर्मिती 0.1 दशलक्षावरून अंतिम टप्प्यापर्यंत 0.4 दशलक्षावर पोहोचलेली असेल.
देशातील क्रूझ क्षेत्राच्या पुनर्रचनेत ‘क्रूझ भारत मोहीम’ महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी यावेळी सांगितले. देशाच्या नील अर्थव्यवस्थेत अपार वाव असून त्याचा उपयोग करून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सरकार कटिबद्ध आहे. क्रूझ पर्यटनात आपल्या देशात प्रचंड वाव असून हे क्षेत्र प्रदीर्घ काळ उपेक्षित राहिले. मात्र या दूरदर्शी मोहिमेसह आपल्या सागरी पर्यटनात परिवर्तन घडवून आणण्याचे आणि क्रूझ पर्यटनाद्वारे देशाच्या विशाल किनारपट्टी आणि जलमार्गांच्या संभाव्यतेचा उपयोग करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाच्या महत्त्वाच्या आधारस्तंभांवर आधारित, तीन टप्प्यातील मोहीम जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास करेल आणि समुद्रपर्यटन आणि सागरी व्यापाराच्या वाढीस पोषक ठरेल.
हे भारतीय उपखंडाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांना प्रोत्साहन देईल, बंदरे, क्रूझ लाइन्स, जहाज चालक, सहलींचे आयोजक, सेवा प्रदाते आणि स्थानिक समुदायांसह सर्व हितधारकांसाठी सर्वसमावेशक आणि समान विकास सुनिश्चित करेल. याव्यतिरिक्त, हे अभियान सीमाशुल्क, इमिग्रेशन, सीआयएसएफ, राज्य पर्यटन विभाग, राज्य सागरी संस्था, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पोलिस यासारख्या सर्व नियामक संस्थांचा जबाबदार सहभाग सक्षम करेल.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे 2014 पासून क्रूझमधील प्रवासी संख्येत 400 टक्के इतकी उल्लेखनीय वाढ झाली आहे. ‘क्रूझ भारत मिशन’ ने फेऱ्यांची संख्या यापुढे आणखी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्वित केले आहे. 2024 मध्ये क्रूझ कॉल्सची संख्या 254 वरून 2030 पर्यंत 500 आणि 2047 पर्यंत 1,100 नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. क्रूझ प्रवासी संख्या 2024 मधील 4.6 लाख वरून 2047 पर्यंत पन्नास लाखांपर्यंत वाढेल अशी आमची अपेक्षा आहे. या कालावधीत क्रूझ क्षेत्रात रोजगाराच्या 4 लाख संधी निर्माण करण्याचेही मिशनचे उद्दिष्ट आहे”, असे सर्बानंद सोनोवाल यावेळी म्हणाले.
क्रूझ इंडिया मिशनमध्ये तीन प्रमुख क्रूझ विभागांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. एक, महासागर आणि बंदर क्रूझ विभागात बंदर-आधारित नौकाविहार आणि सेलिंग क्रूझसह खोल-समुद्र आणि किनारपट्टीवरील समुद्रपर्यटनांचा समावेश आहे. दुसरे, नदी आणि अंतर्देशीय समुद्रपर्यटन विभागात नदी आणि कालवे, बॅकवॉटर, खाड्या आणि तलावांवरील पर्यटनांवर लक्ष केंद्रित केले आहे. शेवटी, आयलँड- व्दीप क्रूझ विभाग आहे. यामध्ये आंतर-व्दीप समुद्रपर्यटन, दीपस्तंभ पर्यटन-सहल, थेट जहाजावरील अनुभव, एक्सपीडीशन क्रूझ आणि ज्याविषयी लोकांना खूपच कमी माहिती आहे, अशा दुर्मिळ, दुलर्क्षित गंतव्यस्थानांसाठी बुटीक क्रूझ आहे.
यावेळी बोलताना बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री शंतनू ठाकूर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, हे मिशन भारताला क्रूझ पर्यटन क्षेत्रामध्ये जागतिक दर्जाचे केंद्र बनविण्याप्रति सरकारची वचनबद्धता दर्शवते. या मिशनचे उद्दिष्ट शाश्वत आणि लवचिक परिसंस्था निर्माण करणे आहे जे क्रूझ चालक, पर्यटक आणि समुदायांसाठी फायदेशीर ठरेल. हे दूरदर्शी मिशन भारताच्या सागरी क्षेत्राला सामर्थ्यवान बनवेल जे पर्यटन क्षेत्रात नवीन संधी निर्माण करेल आणि नील अर्थव्यवस्थेचा उपयोग करेल.”

मिशनने पाच धोरणात्मक स्तंभांमध्ये प्रमुख उपक्रम चिह्नीत केले आहेत. शाश्वत पायाभूत सुविधा आणि भांडवल स्तंभ, डिजिटलायझेशन (उदाहरणार्थ – चेहऱ्याची ओळख) आणि सागरी किना-यावर कार्बन उत्सर्जन कमी करणे याबरोबरच जागतिक दर्जाचे टर्मिनल्स, मरीना – वॉटर एरोड्रोम आणि हेलीपोर्ट विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. यामुळे पायाभूत सुविधांमधील त्रुटी दूर होतील.
‘क्रूझ प्रमोशन आणि सर्किट इंटिग्रेशन’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय विपणन आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. क्रूझ सर्किट्सना जोडणे, “क्रूझ इंडिया समिट” सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करणे आणि शेजारी देशांबरोबर आघाडी करणे यात समाविष्ट आहे. नियामक, वित्तीय आणि आर्थिक धोरण, कर परिस्थिती, क्रूझ नियमन आणि राष्ट्रीय क्रूझ पर्यटन धोरण जाहीर करण्यावर लक्ष केंद्रित करून, अनुकूल आर्थिक आणि वित्तीय धोरणे तयार करण्यावर केंद्रित आहे. शेवटी, क्षमता निर्मिती आणि आर्थिक संशोधन स्तंभ कौशल्य विकास, क्रूझ-संबंधित आर्थिक संशोधनासाठी उत्कृष्टता केंद्र तयार करणे आणि क्रूझ उद्योगात तरुणांच्या रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानके तयार करणे यावर भर देतो.
’राहुल गांधी ४ व ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर,काँग्रेस पक्ष ‘हाउस फुल्ल!
राहुल गांधींच्या हस्ते कसबा बावड्यातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण; ‘संविधान सन्मान संमेलना’लाही उपस्थिती.
मुंबई/कोल्हापूर, दि. ३० सप्टेंबर
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार असून कोल्हापूर येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली.
राहुल गांधी शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात येत असून त्या दिवशी त्यांचा मुक्काम असेल. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता कसबा बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे. या अनावरण सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे. ५ ऑक्टोबरला सायंकाळी कसबा बावड पॅव्हेलियन मैदानावर २००१ कलाकार नाटय सादर करणार आहेत, यामध्ये १ हजार कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत दिसणार आहेत. महाराजांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न या मध्यमातून केला जाणार आहे असे पाटील यांनी सांगितले.
५ ऑक्टोबर रोजी सकाळी राहुल गांधी हे राजर्षी शाहू समाधी स्थळाला भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर कोल्हापुरात होत असलेल्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात १ हजाराहून अधिक निमंत्रित सहभागी होणार आहेत. यामध्ये सर्व धर्मीय लोक तसेच विविध NGO च्या प्रतिनिधींचा सहभाग आहे. राहुल गांधी या सर्वांशी संवाद साधणार आहेत. या संमेलनासाठी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस पक्ष ‘हाउस फुल्ल!’
राज्यातील मोठे नेते कोल्हापुरात असल्याने काँग्रेस मध्ये इनकमिंग होणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर कॉग्रेस भरगच्च आहे, ऑलरेडी हाउसफुल आहे. मात्र येणाऱ्यांचे स्वागतच असेल असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये सर्वाना न्याय देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या पत्रकार परिषदेला खासदार शाहू महाराज, आमदार राजू आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळचे संचालक चेतन नरके, करणसिंह गायकवाड आदी उपस्थित होते.
चौथी राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा-पुण्याची समृद्धी कुलकर्णी उपांत्यपूर्व फेरीत दाखल
जळगाव दिनांक ३० सप्टेंबर
पुण्याच्या समृद्धी कुलकर्णी हिने रिशा मिरचंदानी (टीएसटी मुंबई) हिचा सरळ तीन गेम्समध्ये पराभव केला आणि आमदार चषक चौथ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील महिलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिच्याबरोबरच संपदा भिवंडीकर, श्रेया देशपांडे, आर्या सोनगडकर, काव्या भट्ट यांनीही विजयी घोडदौड कायम राखली.
जळगाव जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा एकलव्य क्रीडा संकुल एम.जे. कॉलेज येथे सोमवारपासून सुरू झाली.
सहाव्या मानांकित समृद्धी हिने रिशा मिरचंदानीविरुद्ध १२-१०,११-६,११-९ असा विजय मिळवताना टॉप स्पिन फटक्यांचा बहारदार खेळ केला. तृतीय मानांकित संपदा भिवंडीकर (टीएसटी मुंबई) हिने रायगडच्या अनिशा पात्रा हिचे आव्हान ५-११,११-५,११-२,१२-१० असे संपुष्टात आणले. ठाण्याच्या श्रेया देशपांडे या सातव्या मानांकित खेळाडूने श्वेता पार्टे- नायक (मुंबई महानगर जिल्हा) हिला अटीतटीच्या लढतीनंतर पराभूत केले. हा सामना दोन्ही खेळाडूंनी केलेल्या अष्टपैलू खेळामुळे रंगतदार झाला. अखेर देशपांडे हिने हा सामना ११-७,७-११,१०-१२, १२-१०, ११-० असा जिंकला. ठाण्याची आर्या सोनगडकर या द्वितीय मानांकित खेळाडूने नाशिकच्या मिताली पूरकर हिच्यावर ११-७,११-२,११-७ असा एकतर्फी विजय मिळविला. हा सामना जिंकताना तिने काउंटर अटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला.
तेरावी मानांकित खेळाडू काव्या भट्ट (ठाणे) हिने मुंबई महानगर जिल्हा संघाची खेळाडू सेनहोरा डिसूझा हिच्यावर सनसनाटी विजय मिळविला. हा सामना तिने ५-११,८-११,११-९,११-९,१३-११ असा संघर्षपूर्ण लढतीनंतर जिंकला आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली.
धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार श्री महालक्ष्मी मंदिरातील ‘सार्वजनिक नवरात्रोत्सव’
श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे आयोजन ; मंदिरातर्फे नारीशक्तीचा होणार सन्मान
पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवाचा प्रारंभ गुरुवार, दिनांक ३ आॅक्टोबर पासून होणार आहे. दिनांक ३ ते १२ आॅक्टोबर दरम्यान धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. संपूर्ण उत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या हस्ते आरती व त्यांचा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्त व उत्सवप्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, अमिता अग्रवाल, अॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते.

गुरुवारी (दि.३) सकाळी ८ वाजता पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. तसेच, सायंकाळी ६ वाजता मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते होईल. याशिवाय दहा दिवसात श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत. सर्व धार्मिक कार्यक्रमांचे पौरोहित्य मिलिंद राहुरकर यांच्या मार्गदर्शना खाली होतील.
याशिवाय ढोल-ताशा वादनसेवा, पुणे मनपा महिला कर्मचारी सन्मान, नामांकित कंपन्यांमधील महिला एचआर यांचा सन्मान, महिला न्यायाधिशांचा सत्कार, लेखिका-कवयित्री सन्मान, पुणे मनपा स्वच्छता कर्मचारी सत्कार, कन्यापूजन, विविध शाळांतील शिक्षकांद्वारे भोंडला, वीरमाता-वीरपत्नी सन्मान, नारी तू नारायणी सन्मान सोहळा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये शिव-पार्वती विवाह सोहळा, कथकली नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाटय व पोवाडा सादरीकरण, सामुहिक गरबा आणि प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम हे यंदाचे वैशिष्टय असणार आहे. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा ‘सार्वजनिक नवरात्र उत्सव’ महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होणार आहे.
शुक्रवारी (दि.४) पहाटे ५ वाजता महिलांचे सामुहिक श्रीसूक्त पठण होणार आहे. यावेळी पारंपरिक वेशात ५ ते ७ हजार महिला सहभागी होणार आहेत. तर, सायंकाळी ५ वाजता पुणे महानगरपालिकेतील महिला कर्मचा-यांचा सन्मान सोहळा कार्यक्रम मंदिरात होईल. रात्री ८.३० वाजता शिव-पार्वती विवाह सोहळा नाटयरुपात सादर होणार आहे. शनिवारी (दि.५) सायंकाळी ५ वाजता विविध नामांकित कंपन्यांमधील महिला एचआर यांच्या हस्ते आरती व त्यांचा सन्मान सोहळा होईल.
रविवारी (दि.६) सायंकाळी ५ वाजता महिला न्यायाधिशांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून रात्री ८.३० वाजता देवी आणि श्रीकृष्णावर आधारित कथकली नृत्य सादरीकरण होणार आहे. सोमवारी (दि.७) ललिता पंचमीच्या दिवशी दुपारी ४ वाजता पुणे महानगरपालिकेतील महिला स्वच्छता कर्मचा-यांच्या हस्ते आरती होईल. त्यानंतर साहित्य क्षेत्रातील लेखिका व कवयित्री यांच्या हस्ते आरती व त्यांचा सन्मान सोहळा सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.
मंगळवारी (दि.८) सायंकाळी ५ वाजता वंचित विशेष घटकातील मुलींचे कन्यापूजन हा आगळावेगळा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विविध सामाजिक संस्थेतील मुलींचे कन्यापूजन होईल. तसेच रात्री ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाटय व पोवाडा सादरीकरण होणार आहे. बुधवारी (दि.९) सायंकाळी ५ वाजता पुण्यातील शाळांतील शिक्षकांचा भोंडला होणार आहे.
गुरुवारी (दि.१०) सैन्यदलातील भारतीय जवानांच्या वीरमाता व वीरपत्नी आणि महिला लष्करी अधिका-यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.११) विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा गौरव सोहळा नारी तू नारायणी या कार्यक्रमात होईल. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच रात्री ८.३० वाजता सामुहिक गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दस-याच्या दिवशी शनिवारी (दि.१२) श्री महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात येणार आहे. उत्सवात इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी महिला सबलीकरण याविषयावरील आयोजित चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सायंकाळी ५.३० वाजता मंदिरात होईल. सायंकाळी ६ वाजता हळदी कुंकू व ओटीचा कार्यक्रम, तर रात्री ९.३० वाजता समाजातील महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम होणार आहे. उत्सवात महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहेत. भाविकांचा ५ कोटी रुपयांचा विमा देखील काढण्यात आला आहे. मंदिर व आजूबाजूच्या परिसरात ५० सीसीटिव्ही कॅमेरे आणि २५ हून अधिक सुरक्षारक्षक असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून पुणेकरांनी मोठया संख्येने उत्सवात सहभागी व्हावे.
देशी गाईला राज्य मातेचा दर्जा:प्रतिदिन चाऱ्यासाठी ५० रुपयांप्रमाणे अनुदान -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई- राज्य सरकारने देशी गायीला मातेचा दर्जा दिला आहे. सोमवारी (30 सप्टेंबर) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने हा निर्णय घेतला. महायुती सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशी गायींसाठी प्रतिदिन 50 रुपये अनुदान योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. कमी उत्पन्नामुळे गोशाळांना हा खर्च परवडत नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या बाबतची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदर येथील कार्यक्रमात केली तर कोल्हापूरच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली
सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने देशी गायीला राज्यमाता- गोमाता घोषित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. भारतीय संस्कृतीतील गायीचे अनन्यसाधारण महत्व पाहता गायीला विशेष दर्जा देण्यात आला.देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टीकदृष्ट्या अधिक मुल्य आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पुर्णअन्न आहे. देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान, आयुर्वेद चिकित्सा पध्दतीत पंचगव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पध्दतीत देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे महत्व आहे.
राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात. मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ अशा जाती आहेत. वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक व आर्थिक महत्वामुळे गायीला कामधेनू संबोधले जाते. परंतू मागील काही काळापासून देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे. यामुळे देशी गायींचे संगोपन व संवर्धन करणे गरजेचे असल्याने देशी गायींच्या पालनपोषण करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाने देशी गायीला यापुढे राज्यमाता- गोमाता घोषित करण्यास मान्यता दिली.

समितीच्या विद्यार्थिनींनी अनुभवले ‘माहेरपण’
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा उत्साहात
पुणे: वसतिगृहातील जुन्या आठवणींना उजाळा देत सुखी-संसाराच्या, करिअरच्या अन मुलाबाळांच्या गप्पागोष्टी करत विद्यार्थिनींनी पुन्हा एकदा माहेरपण अनुभवले. माहेरच्या प्रेमाने, आपुलकीने भारावलेल्या या माहेरवासिनींच्या चेहऱ्यावर आनंदाचा गोडवा पाहायला मिळाला.
निमित्त होते, विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने माजी विद्यार्थिनींच्या मेळाव्याचे! ‘मिळुनी साऱ्याजणी, पुन्हा समितीच्या अंगणी’ म्हणत वेगवेगळ्या बॅचमधील सुमारे १०० माजी विद्यार्थिनींनी स्नेहमेळाव्यात सहभागी होत समितीतील जगण्याचा आनंद घेतला. गाणी, सामूहिक खेळ, गप्पाटप्पा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.
समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष गणेश काळे, उपाध्यक्ष अनिल खेतमाळीस, सचिव मनीषा गोसावी, विद्यार्थी विकास केंद्राचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, मंडळाचे ऍड. देविदास टिळे, निस्सार चौघुले, सुनील चोरे, माजी विद्यार्थिनी व पुणे नगरपालिकेच्या सहायक आयुक्त सुरेखा भणगे यांच्यासह समितीचे व मंडळाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत माजी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तुषार रंजनकर यांनी समितीच्या विस्ताराविषयी माहिती देतानाच विद्यार्थ्यांमागील तूट भरून काढण्यात माजी विद्यार्थ्यांनी योगदान देण्याचे आवाहन केले. तसेच पाल्य-पालक योजनेत माजी विद्यार्थ्यांनी सहभाग वाढवून आजी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करायला हवे, असे सांगितले.
गणेश काळे म्हणाले, “समितीतून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांची संख्या दहा हजारांवर माजी विद्यार्थ्यांची संख्या आहे. मात्र, मंडळाची सदस्य संख्या फक्त ८०० आहे. त्यामुळे सदस्य वाढवण्यासाठी काम करावे लागेल. यासह मंडळाने सर्वांचे लाडके पर्यवेक्षक रमाकांत तांबोळी यांच्या स्मरणार्थ पुढील तीन वर्षात पाच कोटी रुपयांचा निधी उभारून समितीला देणगीरूपात देण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. यामध्ये प्रत्येक माजी विद्यार्थ्याने योगदान द्यावे.”
विशेष प्राविण्य, पुरस्कार मिळवलेल्या व उल्लेखनीय कामगिरी केलेल्या माजी विद्यार्थिनींचा, तसेच निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. अनिता देशपांडे व ऍड. प्रार्थना सदावर्ते यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता पाटील यांनी आभार मानले.
लोककलावंतांसाठी महापालिकेने हक्काची जागा द्यावी-शाहीर हेमंतराजे मावळे
: शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी तर्फे युवा कलागौरव पुरस्कार प्रदान
पुणे : शाहिरीसह अनेक लोककला या महाराष्ट्राच्या संस्कृतीच नव्हे तर देश विदेशामध्ये महाराष्ट्राची ओळख आहे. ही ओळख टिकवण्यासाठी अनेक लोककलावंत जीवाचे रान करून कष्ट करत आहे. परंतु या लोककलावंतांना सराव करण्यासाठी तसेच कार्यक्रम सादर करण्यासाठी हक्काची जागा मिळत नाही. अशा लोककलावंतांच्या सोयीसाठी महापालिकेने हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शाहीर हेमंतराजे मावळे यांनी केली.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी तर्फे देण्यात येणारा शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार युवा संगीतकार हर्ष विजय यांना शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पुणे महापालिकेचे उपायुक्त माधवराव जगताप, संस्कार भारतीचे पश्चिम प्रांत प्रतिनिधी दिलीप क्षीरसागर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. युवा संगीतकार हर्ष विजय यांची पुरस्कार वितरण समारंभानंतर होनराज मावळे यांनी मुलाखत घेतली. बालरंगभूमी आयोजित लोककला स्पर्धेतील प्रबोधिनीतील विजेत्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, पुणे महापालिकेतर्फे लोककलावंतांना विविध पुरस्कार देण्यात येतात, परंतु काही तांत्रिक कारणास्तव या पुरस्काराच्या रोख रक्कम लोक कलावंतांना मिळत नाही या रोख रकमा जर लोक कलावंतांना मिळाल्या तर त्यांना निश्चितच लोककला जतनासाठी ते जे प्रयत्न करत आहेत त्यासाठी उपयोग होऊ शकेल.
माधवराव जगताप म्हणाले, लोककला जिवंत ठेवण्यासाठी पुणे महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करेल. लोककलावंतांना महापालिकेच्या नाट्यगृह किंवा कलादालन यापैकी एक जागा विनामूल्य सादरीकरणासाठी मिळावी यासाठी महापालिका आयुक्तांकडे चर्चा करण्यात येईल. तसेच महापालिका पठ्ठे बापूराव पुरस्कार इतर खाजगी संस्थांच्या माध्यमातून पुन्हा सुरू करण्यात येईल.
दिलीप क्षीरसागर म्हणाले, लोककलावंतांची पिढी जर घडली तरच खऱ्या अर्थाने लोककला जिवंत ठेवण्यासाठी सुरू असणाऱ्या प्रयत्नांना यश मिळाले असे म्हणावे लागेल. ही लोककलावंतांची पिढी घडविण्याचे काम शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी करत आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या माऱ्यामुळे सैरभैर झालेल्या तरुणांपर्यंत महाराष्ट्राची खरी ओळख म्हणजेच लोककला पोहोचण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रयत्न करणे गरजेचे आहे.
