मुंबई-बॉलिवूड अभिनेता गोविंदा (60) याच्या पायात गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. त्याच्याच रिव्हॉल्वरमधून मिसफायर झाले. मंगळवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास ही घटना घडली. ऑपरेशननंतर त्याच्या पायातली गोळी काढण्यात आली आहे. अभिनेता सध्या धोक्याबाहेर आहे.गोविंदाने 2004 मध्ये उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपच्या राम नाईक यांचा ४८,२७१ मतांनी पराभव केला. अभिनेता 2004 ते 2009 पर्यंत खासदार होता.आता गोविंदा ने कॉंग्रेस सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे गोविंदाने 28 मार्च रोजी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला होता. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते. पक्षात प्रवेश केल्यानंतर गोविंदा म्हणाला होता- मी 2004 ते 2009 या काळात राजकारणात होतो. 14 वर्षांनंतर मी पुन्हा राजकारणात आलो हा योगायोग आहे. माझ्यावर जो काही विश्वास ठेवला आहे, तो मी पूर्ण करेन.
गोविंदाने हॉस्पिटलमधून एक ऑडिओ मेसेज जारी करून सांगितले,‘तुमच्या आशीर्वादाने मी बरा आहे. चुकून गोळी लागली होती, जी ऑपरेशननंतर काढून टाकण्यात आली आहे. तुमच्या प्रार्थनेबद्दल डॉक्टरांचे आणि तुम्हा सर्वांचे आभार.
पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितले की, घटना घडली तेव्हा गोविंदा घरात एकटाच होता. त्याच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर आहे. रिव्हॉल्व्हरमधून चुकून गोळी झाडली गेली, जी त्याच्या पायाला लागली. याप्रकरणी कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. या प्रकरणात संशयास्पद काहीही नाही.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिव्हॉल्व्हर साफ करताना गोविंदाला गोविंदाला गोळी लागली. मुंबई पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याचे रिव्हॉल्व्हर जप्त केले.
मिळालेल्या माहितीनुसार, गोळी लागल्याने त्याच्या पायातून खूप रक्तस्त्राव झाला होता. त्यांना उपचारासाठी अंधेरीच्या कृती केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक उपचारानंतर गोविंदाची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांची मुलगी टीना (नर्मदा) सध्या त्यांच्यासोबत रुग्णालयात आहे. तर त्याची पत्नी सुनीता कोलकातामध्ये आहे, जिथे गोविंदाचा कार्यक्रम होणार होता.गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी सांगितले की, ते एका कार्यक्रमासाठी कोलकात्याला जात होते. फ्लाइट 6 वाजता होती. पिस्तूल कपाटात ठेवत असतानाच गोळीबार झाला आणि त्याच्या गुडघ्याखाली गोळी लागली. त्यांना तातडीने अंधेरीच्या रुग्णालयात नेण्यात आले. गोळी बाहेर काढण्यात आली आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. घाबरण्याची गरज नाही.
कुली नंबर 1, हिरो नंबर 1, राजा बाबू, छोटे सरकार, हद कर दी आपने यांसारख्या चित्रपटांचा भाग असलेला गोविंदा गेल्या 5 वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे. 2019 चा रंगीला राजा हा त्याचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट आहे.