Home Blog Page 658

हरियाणातून विनेश फोगट विजयीविनेश फोगटला बजरंग पुनियाने दिल्या विजयाच्या शुभेच्छा

हरियाणाच्या जुलानामधून काँग्रेस उमेदवार आणि ऑलिम्पियन विनेश फोगाट विजयी झाली आहे. भाजपाने कॅप्टन योगेश बैरागी, यांना उमेदवारी दिली होती. भाजपाने जुलानामध्ये एक दलित चेहरा दिला होता. इंडियन नॅशनल दलने सुरेंद्र लाठर, आम आदमी पार्टीकडून कविता देवीसह एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. विनेश फोगट हिने भाजपच्या बैरागी यांना ६०१५ मतांनी धोबीपछाड दिली आहे.

पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील ‘मॅन ऑफ द मॅच’

हरियाणा विधानसभा निवडणूक निकाल

एकूण जागा ९०/ हाती आलेले कल ९०

भाजप – ४८
काँग्रेस – ३६
आप – ०
लोक दल – ३
इतर – ३

उत्तर भारतातील महत्त्वाचं राज्य हरयाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक असे लागले आहेत. येथे सत्ताधारी भाजपाच्या पराभवाचं भाकित करण्यात येत असताना पक्षाने अनपेक्षित मुसंडी मारत आतापर्यंतच्या कलांमध्ये स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे.

तर ज्या काँग्रेसला एकतर्फी बहुमत मिळेल, असा दावा करण्यात येत होता. त्या काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहेत. दरम्यान, भाजपाला हरयाणामध्ये मिळालेल्या यशाचं श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच हरयाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी यांनाही दिलं जात आहेत. अगदी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेल्या नायाब सिंह सैनी यांनी पक्षाविरोधात असलेली शेतकरी, सैनिक आणि कुस्तीपटूंची नाराजी तसेच दहा वर्षांची अँटी इन्कम्बन्सी हे सर्व यशस्वीरीत्या थोपवून भाजपाला विजय मिळवून दिल्याने या निवडणुकीतील मॅन ऑफ द मॅच असा उल्लेख सैनी यांचा केला जात आहे. नायाब सिंह सैनी यांना मागच्या काही महिन्यांमध्ये भाजपासाठी प्रतिकूल असलेलाी परिस्थिती अनुकूल कशी काय केली, हे आपण आता पाहुयात.

२०१४ मध्ये हरयाणामध्ये पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर भाजपाने मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्री केले होते. मात्र खट्टर यांच्या कारभाराविरोधात असलेली नाराजी सातत्याने वाढत होती. त्यात शेतकऱ्यांचं आंदोलन हाताळण्यात अपयश आल्याने खट्टर यांच्याबाबत असलेली नाराजी अधिकच वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीला अवघे २ महिने असताना आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला असताना भाजपाने नायाब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रिपदावर बसवले होते. या नायाब सिंह सैनी यांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी डमी मुख्यमंत्री म्हणून खिल्ली उडवली होती. मात्र हेच सैनी आजच्या निकालांमध्ये भाजपासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसले.

नायाब सिंह सैनी यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यावर लगेचच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला हरियाणामध्ये दहा पैकी ५ जागांवर पराभव पत्करावा लागला होता. तसेच राज्यातील वारे काँग्रेसच्या दिशेने वाहत असल्याचे दावे केले जाऊ लागले होते. मात्र या निवडणुकीत भाजपाने सैनी यांनाच पक्षाचा चेहरा म्हणून पुढे केले होते. सैनी यांनीही हे आव्हाना आणि राज्यातील भाजपाविरोधातील अँटी इन्कम्बन्सी यांचा यशस्वीरीत्या सामना करत पक्षाला विजय मिळवून दिला.

सैनी यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यावर त्यांच्या हातात अवघे २१० दिवस होते. या काळात सरकारची आणि पक्षाची जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासाठी त्यांनी अनेक पावलं उचलली. त्यांनी ग्रामपंचायतींच्या खर्चाची मर्यादा २१ लाखांपर्यंत वाढवली. त्याशिवाय विजेच्या बिलामध्ये घट करण्यासाठी प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना यासाठी कुटुंबांना सब्सिडी देण्यास सुरुवात केली. त्याबरोबरच मतदारांमध्ये अधिकाधिक मिसळून राहण्यास त्यांनी प्राधान्य दिलं. त्यामुळे त्यांची लोकप्रियता अधिकच वाझली होती.

लोकसभा निवडणुकीत हरयाणामध्ये भाजपासाठी अग्निवीर योजना ही अडचणीची ठरली होती. त्यावर मात करण्यासाठी नायाब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हरयाणा अग्निवीर पॉलिसी सुरू केली. त्य माध्यमातून अग्निवीरांना कार्यकाळ संपल्यानंतर नोकरी आणि उद्योगधंदे करण्यास सहाय्य करण्याची व्यवस्था करण्यात आली.
याशिवाय हरयाणामध्ये ओबीसी समाज हा ४० टक्के आहे. त्या पार्श्वभूमीवर नायाब सिंह सैनी हे ओबीसी समाजामधील असल्याने त्यांना मुख्यमंत्रिपद देणं भाजपासाठी जातीय समिकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाचं ठरलं. तसेच काँग्रेसच्या बाजूने जाट समाजामधून होत असलेल्या एकजुटीला बिगरजाट एकजूट उभी करणंही शक्य झालं.

आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की… निवडणुका येत आहेत. कोणतीही निवडणूक हलक्यात घेऊ नये. ते म्हणाले की, आजच्या निवडणुकीतील सर्वात मोठा धडा म्हणजे कधीही अतिआत्मविश्वास ठेवू नये. प्रत्येक निवडणूक, प्रत्येक जागा अवघड असते. कष्ट करावे लागतात. आप प्रमुख म्हणाले की कोणत्याही प्रकारची अंतर्गत भांडणे होऊ नयेत… या निवडणुकीत तुमची भूमिका सर्वात महत्त्वाची असेल, कारण आता आम्ही एमसीडी (दिल्ली महानगरपालिका) मध्ये आहोत. स्वच्छतेसारख्या मूलभूत गोष्टींची जनतेला अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. केजरीवाल म्हणाले की, आपण आपापल्या भागात स्वच्छता राखली पाहिजे. जर असे केले तर आपण निवडणूक नक्कीच जिंकू… आपले मुख्य उद्दिष्ट निवडणुका जिंकणे असले पाहिजे

शेतकऱ्यांपर्यंत वीज पोहचविण्यासाठी २७७३ कोटींच्या कामांचा शुभारंभ

उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात

सोलापूरदि०८ ऑक्टोबर २०२४: राज्यातील २४२ शासकीय व सहकारी उपसा जलसिंचन योजनांच्या सौर ऊर्जीकरण प्रकल्पांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या हस्ते सोलापूर येथे करण्यात आले. त्याचसोबत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतील वीज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पायाभूत वीज वितरण यंत्रणेच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी २७७३ कोटी रुपयांच्या विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. 

या कार्यक्रमाला आ. सुभाष देशमुख, आ. विजय देशमुख, आ. शहाजी पाटील, आ. संजयमामा शिंदे, आ. समाधान आवताडे, आ. सचिन कल्याणशेट्टी आणि आ. राम सातपुते, माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी तसेच महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपसा जलसिंचन योजनांना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा व्हावा आणि किफायतशीर दरात वीज उपलब्ध व्हावी यासाठी या योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्याच्या कामाला आज सुरुवात झाली. यासाठी राज्य सरकारने ३३६६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. उपसा जलसिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण करण्यासाठी राज्याचा ऊर्जा विभाग, महावितरण आणि जलसंपदा विभाग सहकार्याने काम करत आहे. जलसंपदा विभागाने सौर ऊर्जीकरण प्रकल्पांसाठी साडेतीन हजार एकरपेक्षा अधिक जमीन उपलब्ध करून दिली आहे. या योजनेत ९०५ मेगावॅट इतकी सौर ऊर्जानिर्मिती क्षमता निर्माण होणार आहे.

टेंभू, जिहे कठापूर, ताकारी, लोअर वर्धा, अप्पर प्रवरा अशा सर्व लहानमोठ्या उपसा सिंचन प्रकल्पांना आता सौर ऊर्जेद्वारे निर्माण झालेली वीज उपलब्ध केली जाईल. विशेष बाब म्हणजे १२० सहकारी उपसा सिंचन योजनांचेही सौर ऊर्जीकरण या योजनेत करण्यात येणार आहे. आगामी दोन वर्षात ही कामे पूर्ण होतील. राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील आणि सिंचन क्षेत्रातील हे ऐतिहासिक पाऊल आहे. 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत सध्या ९२०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या योजनेतून मोठ्या प्रमाणात वीज निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांपर्यंत वीज पोहचविण्यासाठी आरडीएसएस योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा बळकटीकरण करण्यासाठी शासनाने ३००० कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण व उत्तर महाराष्ट्रातील १६९७ कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ आज झाला. यामध्ये ९० नवी वीज उपकेंद्रे उभारणे, २३८ ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मर क्षमता वाढ आणि १,७०५ किलोमीटर लांबीच्या ३३ केव्हीच्या उच्च दाब वाहिन्या बसविणे अशा कामांचा समावेश आहे.

याखेरीज एआयआयबी योजनेअंतर्गत १०७६ कोटी रुपयांची पायाभूत सुविधा बळकटीकरणाची कामेही सुरू करण्यात येत आहेत. त्यामध्ये ६० नवीन वीज उपकेंद्रे, ३१ पॉवर ट्रान्सफॉर्मर क्षमतावाढ, १४३३ किलोमीटर लांबीच्या ३३ केव्हीच्या उच्च दाब वाहिन्या बसविणे, अशीही कामे हाती घेण्यात येत आहेत.

या कार्यक्रमात सोलापूर तालुक्यातील महिला शेतकरी महानंदा तेली व द्वारकाबाई गुरव यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून कृषिपंपांचे वीजबिल शासनाने भरल्याची पावती उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्याहस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी महावितरणचे कार्यकारी संचालक सुनील पावडे, पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता अंकुश नाळे आणि अधीक्षक अभियंता सुनील माने उपस्थित होते.

सोबत फोटो –

स्वच्छ सुंदर पुण्यासाठी स्वच्छता कर्मचार्‍यांचे मोठे योगदान- संदीप कदम

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे पुणे महानगरपालिकेतील स्वच्छ फाउंडेशनच्या ५१ महिला कर्मचार्‍यांचा सन्मान
पुणे : उच्चभ्रू सोसायटी किंवा कमर्शियल ठिकाणी स्वच्छता करताना कोणी पैसे दिले नाही म्हणून कचरा घ्यायचा नाही असे कर्मचार्‍यांनी करू नये. त्यांचा कचरा घेतल्यास नंतर त्यांना तुमच्या कष्टाची जाणीव होईल आणि ते पैसे देण्यास सुरवात करतील. शहर स्वच्छ ठेवण्याचे काम कष्टकरी महिला वर्गाकडून करण्यात येते. शहर स्वच्छ व सुंदर राहण्यामध्ये स्वच्छता कर्मचार्‍यांचे मोठे योगदान आहे, असे मत पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांनी व्यक्त केले. 
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात स्वच्छ कर्मचार्‍यांचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, डॉ. तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर  उपस्थित होते. यावेळी महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली. प्रवीण चोरबेले यांनी प्रास्ताविक करीत मंदिराविषयी माहिती सांगितली. 

सुषमा अंधारेंकडून हडपसरचा उमेदवार परस्पर जाहीर:सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली नाराजी

म्हणाल्या – सुषमाताई त्या मीटिंगमध्ये होत्या का?
पुणे–ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काल पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा करत माजी आमदार महादेव बाबर यांना उमेदवारी देखील जाहीर केली. महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटप पूर्णपणे ठरले नाही. त्यात हडपसर जागेचा पेच देखील सुटला नाही. मात्र त्याआधीच सुषमा अंधारे यांनी उमेदवारी जाहीर केली. यावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली असून सुषमाताई त्या बैठकीत होत्या का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.

सुषमा अंधारे यांनी हडपसर मतदारसंघातून महादेव बाबर यांना उमेदवारी जाहीर केल्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आले. त्यावर सुषमाताई त्या मीटिंगमध्ये होत्या का? असा सवाल सुळे यांनी केला. माझ्या माहितीनुसार काल झालेल्या बैठकीत त्या उपस्थित नव्हत्या. तरी मी त्यांना एकदा फोन करुन विचारेन, असा टोला सुप्रिया सुळे यांनी अंधारे यांना लगावला आहे. पुढे बोलताना सुळे म्हणाल्या की, मी एक जबाबदार खासदार आहे. जागावाटप फायनल होईपर्यंत मी आऊट ऑफ लाईन बोलणार नाही. महाविकास आघाडीत गैरसमज होईल, असे वक्तव्य मी करणार नाही, असेही सुळे म्हणाल्या.

काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे
सुषमा अंधारे काल एका कार्यक्रमात बोलताना म्हणाल्या की, हडपसर हा मतदारसंघ आम्हाला सुटला असून या मतदारसंघातून माजी आमदार महादेव बाबर हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये कोणताही मनमुठाव नाही, सगळ्याच जागांवर एकमत होत आले आहे. हडपसरची जागा देखील क्लिअर झाली असून आता केवळ 15 ते 18 जागांवर चर्चा सुरू आहे.

बोपदेव घाटात बलात्कार करणारे नराधम आजही मोकाट फिरत आहेत-गृहमंत्री काय करत आहेत ?

सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचेआंदोलन -राज्यावर दोन लाख कोटींचे कर्ज

पुणे -शहर व परिसरात गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचारांच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेबाबत राज्यातील सरकार टोकाचे उदासीन आहे. एकीकडे महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात प्रत्येक गावात कुठेतरी महिलांवर अत्याचार सुरू असताना राज्यातील सरकार मात्र स्वतःची जाहिरात करण्यात मग्न आहे.या सरकारला शुद्धीवर आणण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेबाबत त्यांना जाब विचारण्यासाठी खा.सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या वतीने अलका चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले.

गृहमंत्री राजीनामा द्या, मुख्यमंत्री राजीनामा द्या, अशा घोषणांनी संपूर्ण डेक्कन परिसर दणाणून गेला.

या आंदोलनास याप्रसंगी माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप,अरविंद शिंदे ,संगीता तिवारी, अजीत दरेकर, संजय मोरे, गजानन थरकुडे, रवींद्र धंगेकर,स्वाती पोकळे, मंजीरीताई घाड़गे, मनाली भिलारे, गणेश नलावडे, रोहन पायगुड़े, राजश्री पाटील तनया साळुंखे यांच्यासह महाविकास आघाडीचे शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना मार्गदर्शन करताना महायुती सरकार महिला सुरक्षेबरोबरच पोलीसांचेही मनोबल खच्ची करत असल्याचे सांगितले. बोपदेव घाटात बलात्कार करणारे नराधम आजही मोकाट फिरत आहेत,त्यामुळे त्यांना अटक होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहिल असा इशारा दिला. तसेच येत्या दोन दिवसात पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. राज्याची आर्थिक स्थिती डळमळीत असतानाही राज्यातील सरकार मोठे मोठे कंत्राट संमत करत आहे. आज राज्यावर दोन लाख कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे हे सरकार महिला सुरक्षेबरोबरच आर्थिक आघडीवरही अपयशी ठरल्याचा आरोप केला. तसेच राज्यातील आर्थिक स्थितीवर महायुतीतील कोणत्याही नेत्याबरोबर चर्चा करण्यास तयार असल्याचे आव्हान दिले. त्याचबरोबर आज महागाई देखील वाढली आहे. त्यामुळे अपयशी ठरलेल्या सरकारमधील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

थेट नागरिकांशी संपर्कात राहण्यासाठी केंद्रीय मंत्री मोहोळ यांचा उपक्रम

पुणे (प्रतिनिधी)

एकीकडे कोणाची वैयक्तिक समस्या तर कोणाची सार्वजनिक नागरी समस्या, दुसरीकडे काहींच्या विधायक सूचना तर कोणाच्या शहराच्या विकासाबाबत अभिनव कल्पना ! हे चित्र पाहायला मिळाले केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित केलेल्या ‘खासदार जनसंपर्क सेवा अभियाना’त ! खासदार म्हणून थेट नागरिकांचे प्रश्न समजून घेता यावेत आणि ते सोडवता यावेत यासाठी मोहोळ यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. त्याचा दुसरा टप्पा कसबा विधानसभा मतदारसंघात पार पडला.

नागरीकांनी केवळ त्यांच्या तक्रारी प्रश्नांचा पाढा न वाचता मतदारसंघातील विविध समस्यांसह वाहतुकीच्या समस्येसारख्या जिव्हाळ्याच्या काही विषयात विधायक सूचनाही केल्याने या अभियानात वेळगळेच चित्र बघायला मिळाले. यावेळी शेकडो नागरिकांनी या अभियानात सहभाग नोंदवला. यावेळी महापालिका आणि शासनाच्या विविध विभागासह पोलिस खात्याचाही स्टॉल लावत अधिकारी उपस्थित होते. हा उपक्रम विधानसभानिहाय प्रत्येक महिन्याला राबविला जाणार आहे.

यासंदर्भात माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचा अध्यक्ष, नंतर शहराचा महापौर असतानाही अशा अभियानव्दारे नागरीकांशी थेट संवाद साधण्याचा उपक्रम केलेला होता. त्याला पुणेकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आताही केंद्रीय राज्यमंत्रीपदाची जबाबदारी असली तरी पुण्याचा खासदार या नात्याने थेट नागरिकांना भेटून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा माझा प्रयत्न सातत्याने सुरु राहील’

‘वैयक्तिक समस्या घेऊन जसे नागरीक अभियानात सहभागी झाले, तसे सार्वजनिक हिताचे प्रश्न आणि त्यावरील उपाययोजनांच्या सूचना घेऊन नागरीक आले होते. तसेच काहीजण विकासाबद्दलच्या नवीन संकल्पना घेऊन आले होते. या सर्वांना लोकप्रतिनिधीबद्दल असलेला विश्वास यातून अधोरेखीत होत होता. काही नागरिकांच्या समस्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होत्या, मात्र, या अभियानाव्दारे त्यांचा काही तासातच निपटारा झाल्याबद्दल नागरीकांनी आवर्जून भेटून धन्यवादही दिल्याने काम करण्याचा उत्साह वाढला’, असेही मोहोळ म्हणाले.

‘काही प्रश्न हे ठराविक कालावधीतच सुटले पाहिजेत, अशी लोकप्रतिनीधी म्हणून आपली भूमिका आहे. त्या दिशेने पाठपुरावाही करण्यात येत आहे. केवळ तक्रारी किंवा प्रश्न सोडवणे इतका मर्यादित हेतू या अभियानाचा नाही. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोचवणे, गरजूंना योजनांचा लाभ मिळवून देणे या हेतूने शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉलही लावण्यात आले होते’ असेही मोहोळ म्हणाले.

सरकार देतंय,पण बँकाची नाटकं सुरु …. हडपसर मध्ये बँक मॅनेजरला बदडले

लाडकी बहिण योजनेतून बँकांच्या कारभाराने लाभार्थी संतप्त …

पुणे- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील बँक खात्याच्या कागदपत्रांच्या पडताळणीवरून तिघांनी एका बँक व्यवस्थापकास शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना हडपसर येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या फुरसुंगी शाखेत घडली.अक्षय अनिल रासकर, गणेश मधुकर होले आणि निखिल संजय मुळीक (तिघे रा. काळेपडळ, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बँक व्यवस्थापक (वय ४०) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एकाच्या पत्नीने ‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज केला होताशनिवारी (ता. ५) सकाळी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांच्या पडताळणीचे काम सुरू होते. बँकेत काउंटरवर बरीच गर्दी होती. त्यावेळी एका आरोपीने ‘बँक व्यवस्थापक कोण आहे, तुमचे गर्दीवर काही नियंत्रण आहे की नाही,’ असे म्हणत वाद घातला. त्यावर केबिनमधून बाहेर आलेल्या शाखा व्यवस्थापकांनी ‘काय काम आहे,’ अशी विचारणा केली. त्यानंतर काही वेळाने आरोपीसह त्याच्या मित्रांनी शाखा व्यवस्थापकास शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पसार झालेल्या तिघांना ताब्यात घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत.

घरचा गणपती, गौरी सजावट स्पर्धा, हेअर स्टाईल, साडी ड्रेपिंग, मेहंदी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.

पुणे-द हिंदू फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक २९ च्या वतीने घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धा २०२४आणि प्रोफेशनल हेअर स्टाईल, साडी ड्रेपिंग आणि मेहंदी प्रशिक्षण आणि स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ एस पी कॉलेज येथील लेडी रमाबाई हॉल येथे संपन्न झाला .
पारितोषिक वितरण सोहळा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते आणि नेते केशव उपाध्ये, स्थायी समिती पुणे महानगरपालिका माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी नगरसेविका मोनिका मुरलीधर मोहोळ, भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमाला भाजपा प्रदेश चिटणीस ॲडव्होकेट वर्षा डहाळे, माजी नगरसेवक राजेश येनपुरे, माजी नगरसेवक दिपक पोटे, भाजपा पुणे शहर सरचिटणीस बाप्पू मानकर, भाजपा कसबा मतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहर अध्यक्ष करण मिसाळ, भाजपा पुणे शहर ओबीसी आघाडी अध्यक्ष नामदेव माळवदे, पतित पावन संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष दिनेश भिलारे यांची ही प्रमुख उपस्थिती होती.
द हिंदू फाउंडेशन च्या कार्याध्यक्षा जयश्री धनंजय जाधव यांनी उपस्तिथ मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी घरचा गणपती सजावट स्पर्धेचे १ ते १५ आणि गौरी सजावट स्पर्धेतील १ ते १५ विजेत्यांना १ लाख रुपयांची रोख बक्षीस ट्रॉफी प्रमाणपत्र केशव उपाध्ये यांच्या हस्ते देउन गौरवण्यात आले.

हेअर स्टाईल स्पर्धेतील १ ते १० , साडी ड्रेपिंग स्पर्धेतील १ ते १० आणि मेहंदी स्पर्धेतील १ ते १० विजेत्यांना भव्य ट्रॉफी, भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देउन हेमंत रासने, वर्षा डहाळे, मोनिका मोहोळ, संदीप खर्डेकर, कुणाल टिळक, राजेश येनपुरे, दिपक पोटे, बाप्पू मानकर, करण मिसाळ, राजेंद्र काकडे, नामदेव माळवदे, माधव साळुंके, आणि पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धेत २३० कुटुंबानी सहभाग घेतला होता.
तर मेहंदी, साडी ड्रेपिंग, हेअर स्टाईल प्रशिक्षण वर्गात आणि स्पर्धेत २५६ महिला युवतींनी भाग घेतला होता.

कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना कार्यक्रमाचे संयोजक माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांनी सांगितले की,
द हिंदू फाउंडेशन च्या वतीने आता पर्यंत तीन हजार महिलांना छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण दिले आहे. महिलांच्या सबलीकरणा बरोबर महिलांनी समाजाचं मुख्य प्रवाहात येण्यासाठी संस्था कामं करत आहे. वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करून खेळाडू यांना ही प्रोत्साहित केले जाते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केशव उपाध्ये आपल्या भाषणात म्हणाले की, ज्या पद्धतीने मेट्रोच्या माध्यमातून शहर जोडण्याचे काम होत आहे त्या पद्धतीने एका घराला दुसऱ्या घरा बरोबर जोडण्याचे काम जाधव करत आहेत. आमच्या भगिनींना जोडण्याचे काम करत आहेत, महिलांना एकत्रित जोडणं, समाजाला एकत्रित जोडणं हे या अशाच कार्यक्रमातून होत असते. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, नवरात्रीच्या आधी या विराट आदिशक्तीचे दर्शन होत आहे.
आपण जिजाऊ, सावित्रीबाई राणी लक्ष्मीबाई, यशोदेचे नाव घेतो पण येथे बसलेली महिला जेव्हा मुलाला शाळेत घेउन जाते तेव्हा सावित्रीबाई यांची भूमिका पार पाडते, मुलांवर संस्कार करताना जिजाऊंची भूमिका पार पाडते, संघर्ष करताना राणी लक्ष्मी बाईंच्या भूमिकेत असते, आणि शेजारी पाजारी लहान मुलांशी बोलताना यशोदेच्या भूमिकेत असते,
घराला सांभाळण्याचे, घराला आकार देण्याचे काम महिला घरी करत असते त्यामुळे महिला ही अबला असू शकत नाही कारण ति पुरुषा पेक्षा जास्त कामं करते. हिंदू फाउंडेशन च्या वतीने हा कार्यक्रम फक्त बक्षीस देण्यापुरता नसून महिलां प्रति त्यांचा सन्मान व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम आहे. महिला ही सुजाण असते आणि या स्पर्धे निमित्त या महिलांच्या सुजानशिलतेला अधिक सन्मान देण्याच काम धनंजय जाधव आणि द हिंदू फाउंडेशन च्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
हा खचा खच भरलेला हॉल, हॉल बाहेर थांबलेली माणसे यालाच नेता म्हणतात. उगीच कोणी असे कार्यक्रमाला गर्दी करत नाहीत तर त्या कार्यकर्त्या वर प्रेम असते म्हणून लोकं कार्यक्रमा ला गर्दी करतात.
हेमंत रासने, वर्षा डहाळे, मोनिका मुरलीधर मोहोळ, संदीप खर्डेकर, राजेंद्र काकडे यांचीही मनोगतं झाली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सीमा शिंदे, संध्या निकम, निलम चव्हाण, नीता भिसे, सुरेखा कलशेट्टी, मालती शिंदे, वनिता सोपे, लता पाटोळे, सुरेखा आल्हाट, राधिका ओव्हाळ यांनी परिश्रम घेतले. शिवा लोहकरे, रवींद्र कांबळे, तुषार ढावरे, गजानन साळी, बाबा मिसाळ, सिद्धी शिंदे, सुनील लोंढे, ओम शिंदे यांनी परिश्रम घेतले.स्पर्धेचे परीक्षण पूनम रासकर, निकिता आढाव, प्रमिला डांगरे, मृणाल शिंदे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार दिक्षित यांनी केले. रवींद्र कांबळे यांनी आभार मानले.

१) गौरी सजावट स्पर्धा विजेत्यांची नावे

पारितोषिक क्रमांक विजेत्यांची नावे

१ श्वेता मयूर देव.
२ अलका पंढरीनाथ चोरगे.
३ अर्चना निखिल वरे .
४ वंदना विलास धुमाळ.
५ हर्षद नितीन शिर्के.
६ आकाश नीलकंठ जुनावणे.
७ अजय सुनील भंडगे.
८ उषा रमेश सोंडकर.
९ संकेत सुनील मोरे.
१० पूजा केदार देवजीरकर.
११ चित्रा उमेश मडके.
१२ कल्याणी विंकी जाधव.
१३ पूनम राहुल कांबळे.
१४ शीतल अभिजित नारवेलकर.
१५ उज्वला गणपत उत्तरकर.

२) घरचा गणपती सजावट स्पर्धा विजेत्यांची नावे.

पारितोषिक क्रमांक. विजेत्यांची नावे

१ मोनाली अनिल डोके.
२ कुलदीप सुनील मोरे.
३ राहुल राम अवघडे.
४ प्रतिभा प्रकाश हर्डीकर.
५ राहुल चंद्रकांत भुवड.
६ अक्षय अभय शिंदे.
७ योगेश चंद्रकांत ठीक.
८ अनुप्रिया अशोक बाळे
९ मनीष मोहन बालकल .
१० योगिता संदीप काळे .
११ शंकर श्रावण थोरात .
१२ सिद्धी जनार्दन शेळके.
१३ पार्थ अनिल मोरे .
१४ कोमल संतोष मोरे .
१५ रागिणी सुजित निवेकर.

३) हेयर स्टाईल स्पर्धा विजेत्यांची नावे

पारितोषिक क्रमांक “विजेत्यांची नावे

१ योगिता पराग पिंपळगावकर
२ गार्गी रवींद्र खवळे
३ आसावरी कालिदास मोहोळ
४ मेघा बाबू कामाठी
५ पूजा अविनाश चौधरी
६ सिद्धी दिगंबर शेलार
७ संध्याराणी अभिजित खोमणे
८ काजल संतोष बागल
९ हेमा हेमंत ओसवाल
१० पूजा सचिन मगर

४) साडी ड्रेपिंग स्पर्धा विजेत्यांची नावे

पारितोषिक क्रमांक “विजेत्यांची नावे

१ प्रणाली निलेश शेवते साऊथ इंडियन परफेक्ट लुक
२ प्रतीक्षा दीपक आल्हाट बंगाली साडी ड्रेपिंग
३ सुरेखा शिवराज कलशेट्टी बेस्ट बंगाली लुक
४ रागिणी हर्षल फाटक परफेक्ट साऊथ लुक
५ सुवर्णा कैलास दरेकर धोती पॅटर्न
६ दीपा अशोक बाळे बेस्ट साडी ड्रेपिंग
७ शीतल अमोल हरिश्चन्द्रे बटरफ्लाय लुक
८ प्रियंका मल्हार भिलारे परफेक्ट धोती पॅटर्न
९ स्वाती आनंद शेटे मस्तानी लुक
१० मनीषा निलेश मते मराठमोळी साडी

५) मेहंदी स्पर्धा विजेत्यांची नावे

पारितोषिक क्रमांक . विजेत्यांची नावे

१ शबाना हाजू शेख
२ साक्षी शशिकांत इंगळे
३ धनश्री श्रीरंग नाटकर
४ पूर्वा नितीन शिर्के
५ लक्ष्मी सागर चव्हाण
६ अवंतिका अशोक बाळे
७ मृण्मयी पृथ्वीराज येळवंडे
८ मनाली सिद्राम चक्रे
९ प्रेरणा प्रदीप परदेशी
१० पिंकी ज्ञानेश्वर पाटोळे

नवरात्रीनिमित्त ज्येष्ठ महिलांचा “भोंडला व गरबा रास” कार्यक्रम संपन्न…!

पुणे-

वंचित विकास, एकता मित्र मंडळ ट्रस्ट, अरण्येश्वर व वीर शिवराज मित्र मंडळ, गुरुवार पेठ यांच्या सयुंक्त विद्यमाने नवरात्री निमित्त रविवार, दि. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरभी मंगल कार्यालय, तावरे कॉलनी, अरण्येश्वर, पुणे येथे एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वंचित विकास अभया (एकल) महिलांसाठी मागील १० वर्षांपासून काम करत आहे. आपली रोजची कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडण्यात गढून गेलेल्या या महिला अशा सणावारांच्या निमित्ताने बाहेर पडतात व थोडा वेळ का होईना आपल्यातील आनंद शोधतात. एकल महिला तर अजूनही अशा सामुहिक कार्यक्रमात जाणे टाळतात. चाळीशी ओलांडलेल्या व ज्येष्ठ महिला वयाची कारणे पुढे करून जाणे टाळतात. त्यामुळे खास अशा महिलांसाठी त्यांच्या मुला-मुली, नातवंडे यांसोबत या आगळ्यावेगळया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

तावरे कॉलनी, कसबा पेठ, मंगळवार पेठ, अप्पर इंदिरानगर, चव्हाण नगर, तळजाई वसाहत, इ. वस्त्यांमधील १५० हून अधिक ज्येष्ठ महिलांनी भोंडला व गरब्याचा मनसोक्त आनंद लुटला.

प्रत्येक सणावारांना वेगवेगळ्या प्रकारचे विद्रुपीकरण येत असलेले आपण दिवसेंदिवस पहातो आहे. सणवारांमध्ये धांगडधिंगा, असह्य होणारे स्पीकरचे आवाज, यात आपली परंपरा, पारंपारिक खेळ, सणांचे महत्व सांगणाऱ्या ज्येष्ठ महिला या विरळ होत चालल्या आहेत. या पारंपारिक खेळांचे, संस्कारांचे तिसऱ्या पिढीकडे संक्रमण होणे आवश्यक आहे.

तसेच विभक्त कुटुंब पद्धतीचे प्रमाण वाढल्याने नातवंड आणि आजी आजोबा यांमध्ये मोठा दुरावा निर्माण होत आहे व एकमेकांच्या प्रेमाला पारखी झालेले हे दोन जीव आपल्याला जागोजागी पहायला मिळतात. या निमित्ताने हे सर्व एकत्र आले व नवरात्रोत्सव साजरा केला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ ही साजरा करण्यात आला.

अशा प्रकारे कधीही आनंद घेता न आलेल्या या अभया महिलांना काही क्षण भक्तिभावाने व उत्साहाने भरलेल्या वेगळ्या विश्वात घेवून जाणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश्य या कार्यक्रमाने साध्य झाला..

अरण्येश्वर अखिल तावरे कॉलनी मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ, जयहिंद मित्र मंडळ, वंचित विकास वृद्धमित्र प्रकल्पाचे सर्व कार्यकर्ते तसेच सर्व गणेश मंडळातील कार्यकर्ते, मुले व महिला यांनी मोठ्या संखेने सहभाग नोंदवला. अखिल मंडई मंडळाचे विश्वस्त श्री. विश्वास भोर, हिरे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक भैइलुमे सर, जयहिंद मित्र मंडळ अध्यक्ष विजय आवाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

वीर शिवराज मित्र मंडळाचे अध्यक्ष किरण सोनिवाल यांच्या तर्फे उपस्थितांना उपवास फराळाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सुरभी मंगल कार्यालयाचे संचालक बाळासाहेब तावरे यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष सुधीर ढमाले व वंचित विकासच्या तेजस्विनी थिटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

शासकीय कत्तलखान्याविरोधात वारकरी संप्रदायाचा विराट मोर्चा

पुणे: दौंड शहरातील खाटीक गल्लीत बांधलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा कत्तलखान्याविरोधात वारकरी संप्रदायाने सोमवारी विराट मोर्चा काढला. सकल हिंदू समाज, वारकरी संप्रदायातील शेकडो युवक-युवती रस्त्यावर उतरले होते. दौंड मध्यवर्ती प्रशासकीय इमारत ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा हा मोर्चा निघाला. हा कत्तलखाना येथे होऊ नये, तो त्वरित जमीनदोस्त करावा आणि त्याठिकाणी अन्य कोणत्याही समाजोपयोगी प्रकल्पाची उभारणी करावी, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार शरद भोंग यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

दौंड नगरपालिकेने २०१७ साली दौंडच्या खाटीक गल्लीत शासकीय कत्तलखाना मंजूर केला. जवळपास सात कोटी रुपयांच्या निधीतून याचे बांधकाम व येथील अत्याधुनिक यंत्रसामुग्री उभारण्यात आली. या कत्तलखान्यामध्ये दररोज ५०० ते १००० जनावरे कापली जाणार असून, महाराष्ट्रातील लाखो जनावरांचे रक्त येथे सांडले जाणार आहे. अनेक गोमातांची कत्तल आणि हत्या होणार आहे. यासह भीमा-चंद्रभागा नदीतीरावर वसलेले पवित्र दौंड शहर धौम्य ऋषींच्या तपश्चर्येचे स्थान आहे. या कत्तलखान्यात कापलेल्या जनावरांचे रक्ताचे अशुद्ध, अपवित्र पाणी दौंड ते पंढरपूर वाहणाऱ्या भीमा नदीमध्ये सोडले जाणार असून, पुण्यासह अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यातील लाखो नागरिकांना हे अशुद्ध पाणीच नव्हे, तर जनावरांचे रक्त प्यावे लागेल. 

ही भीषण परिस्थिती रोखण्यासाठी हा कत्तलखाना सुरु होण्यापूर्वीच बंद पडण्याची गरज आहे. त्यासाठी शासनावर दबाव निर्माण करायला हवा. याठिकाणी शासनाने इतर कोणताही समाजाच्या हिताचा प्रकल्प उभारावा, अशी मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे. दौंडचा कत्तलखाना बंद केला नाही, तर उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा मठाधिपती रामगिरी महाराज यांनी दिला आहे. हभप शिरीष महाराज मोरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला.

“जिंकण्यासाठीच्या लढाईला तयार रहा, आपण स्वतंत्रच लढणार” राज ठाकरेंचे पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना आदेश…

पुणे – नाशिक नंतर आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.आपण स्वतंत्र पणे हि निवडणूक लढविणार असून, कोणाशीही युती करणार नाही याचा पुनरुच्चार करत,हरण्यासाठी, पाडण्यासाठी हि निवडणूक लढणाऱ्यानी माझ्या समोर उभे राहू नये तर केवळ जिंकण्यासाठी च्या लढाईला जे तयार आहेत त्यांना मनसेकडून उमेदवारी दिली जाईल असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील जनता सत्ता केंदित राजकारण करण्याच्या युती व आघाडीच्या वृत्तीला कंटाळली आहे, तीला मनसे हाच पर्याय वाटत आहे.तुम्ही तो पर्याय आहात ही लढाई जनता विरुद्ध आजचे आणि कालचे सत्ताधारी अशीच होणार आहे या लढाईला जिंकण्यासाठी तयार रहा.असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील या पदाधिकारी बैठकीत सांगितले.
आज सकाळ पासूनच संकल्प मंगल कार्यालयात राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठका सुरू होत्या.पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी या बैठकांना उपस्थित होते तर नेते शिरीष सावंत, अनिल शिदोरे,अविनाश अभ्यंकर,बाबू वागस्कर,अविनाश जाधव,अभिजित पानसे सहित सरचिटणीस बाळा शेडगे,किशोर शिंदे,अजय शिंदे,हेमंत संभुस, सचिव योगेश खैरे,शहर अध्यक्ष साईनाथ बाबर,सचिन चिखले सहित ग्रामीण आणि शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.दोन दिवसांचा दौरा एकाच दिवसाचा करत दुपारपर्यंत पश्चिम महाराष्ट्र, पुणे जिल्हा व पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघांच्या बैठका घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दुपारी ४ वाजताच मुंबईला रवाना झाले.मुंबईत १३ ऑक्टोबरला राज्यातील पक्षाच्या सर्व गटप्रमुखांचा मोठा मेळावा मनसेने आयोजित केला आहे. राज या मेळाव्यात निवडणूक विषयक बोलणार आहेत अशी माहिती मिळाली. सध्या त्यांचा राज्याचा दौरा सुरू आहे. राज्यातील किमान 225 ते 250 जागा लढवण्याची तयारी ते करत असल्याची चर्चा मनसे वर्तुळात आहे.

व्यवस्थेतील भ्रष्टाचारामुळे देशात घुसखोरीला प्रोत्साहन – ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय

हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान तर्फे सातुर्डेकर व मोरे महाराज यांना पुरस्कार

पिंपरी, पुणे (दि. ७ ऑक्टोबर २०२४)
भारतामध्ये सद्यस्थितीला सहा कोटी पेक्षा जास्त घुसखोरांची संख्या आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षितता, एकता, अखंडता धोक्यात आहे. याला व्यवस्थेतील भ्रष्टाचार हे मूळ कारण आहे. हा एक देशद्रोह व संघटित अपराध आहे. हे रोखण्यासाठी देशात पुरेसे कायदे आहेत, परंतु त्याची कडकपणे अंमलबजावणी होत नाही. आता सर्वसामान्य नागरिकांनीच लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण करून देशातील शिक्षण व कायदा व्यवस्था बदलण्यासाठी काम केले पाहिजे असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी केले.
रविवारी (दि.६) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सव व विजयादशमीनिमित्त हिंदू शौर्य दिन – विराट हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्व. संजय आर्य स्मृती दिनानिमित्त आद्य पत्रकार देवर्षी नारद राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांना आणि स्व. प्रा. एकनाथजी नाणेकर स्मृती समाजभूषण पुरस्कार शिवशंभो विचार मंचचे प्रांत संयोजक हभप शिरीष महाराज मोरे यांना
ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. संजय उपाध्ये, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, ॲड. उपाध्याय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव उत्तम दंडीमे, समन्वयक कैलास बारणे, सुहास पोफळे, दत्तात्रय सूर्यवंशी, अतूल आचार्य, कुमार जाधव, नामदेव शिंत्रे, विजय गुंजाळ, दिगंबर रिद्धीवाडे, मनोज बोरसे, शिवाजी रेड्डी, मनोज गोबे, दिलीप कुलकर्णी, रमेश अर्धाले आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे संस्थापक पंडित धर्मवीर आर्य आणि हरिकृष्ण वाफता यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ॲड. उपाध्याय यांनी सांगितले की, भारताला इंग्रज, मुघलांनी लुटले नाही एवढे भ्रष्टाचाऱ्यांनी लुटले आहे. त्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. भ्रष्टाचार, धर्मांतर, जनसंख्येचा विस्फोट, युवकांमध्ये व्यसनाधीनता आणि अश्लीलता यामुळे देश आतून पोखरला जात आहे. भारतातील ९ राज्य, २०० जिल्हे १५०० तालुक्यांमध्ये हिंदू लोकसंख्या अल्प प्रमाणात आहे, याला वरील कारणे जबाबदार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी कडक कायदे करून त्याची अंमलबजावणी केली होती. त्यांच्यामुळेच मुघलांना दक्षिणेवर आक्रमण करणे शक्य झाले नाही, आजही दक्षिणेमध्ये बालविवाह, घुंगटप्रथा किंव्हा रात्रीचे विवाह होत नाहीत. पाश्चात्य संस्कृतीचे प्रमाण उत्तरेत जास्त आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आता पुढार्‍यांच्या आश्वासनांना बळी न पडता शिक्षण आणि कायदा व्यवस्थेत बदल करण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे असेही ॲड. उपाध्याय म्हणाले.
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले की, जातीजातींमधला भेदभाव दूर करून सर्वांनी हिंदू म्हणून ओळख निर्माण करावी. तसेच अध्यात्मिक भेदभाव देखील संपला पाहिजे तरच देशाचा सर्वांगीण विकास होईल.
सत्काराला उत्तर देताना पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर म्हणाले की, वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुद्ध जनमत जागृत करण्यासाठी लोकमान्य टिळकांसारख्या नेत्यांनी लेखणी हाती घेतली. स्वातंत्र्योत्तर काळात वाचकांना आदर्श लोकशाहीचे धडे देण्यासाठी, देशवासीयांचे जीवन सुकर करण्यासाठी पत्रकारांनी चांगली कामगिरी केली. आणीबाणीतील अत्याचारांविरोधात जनजागृती, बोफोर्स प्रकरण, तहलका प्रकरण, शिवानी भटनागर प्रकरण, टू जी, स्पेक्ट्रम घोटाळा, आदर्श घोटाळा अशा अनेक विषयांना पत्रकारांनी वाचा फोडली. मात्र गेल्या काही वर्षापासून व्यावसायिकतेचा अतिरेक झाल्याने व चुकीच्या व्यक्ती पत्रकारितेत आल्याने पत्रकारितेचे अध:पतन होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांची पत्रकारिता व रामशास्त्री प्रभुणेंचा करारी बाणा हे आदर्श समोर ठेवून वाटचाल करावी लागेल. त्यासाठी वाचक शक्तीचा दबाव महत्त्वाचा आहे.
स्वागत कृष्णकुमार गोयल, प्रास्ताविक व मानपत्र वाचन उत्तम दंडीमे, आभार सुहास पोफळे यांनी मानले.

 तीन वर्षांत मर्स्कच्या भारतीय महिला खलाशांची संख्या  41 वरून  350 च्या वर  

मुंबई, 7 ऑक्टोबर 2024 : ए.पी. मूलर – मर्स्क (मर्स्क) ही लॉजिस्टिक्स क्षेत्रातील जागतिक इंटिग्रेटर कंपनी असून, आज भारतात त्यांच्या ‘इक्वल ॲट सी’ उपक्रमांतर्गत महत्त्वपूर्ण टप्पा पार केल्याची घोषणा कंपनीने केली. 2024 मध्ये ऑनबोर्ड केलेल्या 45% नॉटिकल आणि इंजिनीअरिंग कॅडेट्स महिला असल्याने, कंपनीने तिच्या कॅडेट प्रवेशामध्ये समान लिंग प्रतिनिधित्वाच्या 2027 च्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचले आहे.

भारतीय सागरी क्षेत्रातील लैंगिक समानतेच्या दिशेने प्रगतीचा वेग वाढविणे

2022 मध्ये सुरू झालेला ‘इक्वल ॲट सी’ उपक्रम भारतात उल्लेखनीय यश मिळवून तिसऱ्या वर्षात प्रवेश करत आहे. मर्स्क खलाशांमध्ये लैंगिक समानता प्राप्त करणे, खलाशांमध्ये महिलांचे ऐतिहासिक कमी प्रतिनिधित्वाच्या समस्येचा सामना करणे आणि लैंगिक विविधता सुधारण्यासाठी संपूर्ण भारतीय सागरी क्षेत्रासाठी एक परिसंस्था निर्माण करणे हे या कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. हा कार्यक्रम संपूर्ण उद्योगातील विविध भागधारकांना एका समान व्यासपीठावर आणतो, जो विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी, उद्योगातील आव्हाने समजून घेण्यासाठी, एकमेकांकडून शिकण्यासाठी आणि सर्वोत्तम पद्धती लागू करण्यासाठी केंद्र म्हणून काम करतो. 

डेन्मार्कचे भारतातील राजदूत महामहिम फ्रेडी स्वेन म्हणाले“समुद्राला लिंग कळत नाही. सागरी कारकीर्दीतील विविधतेला चॅम्पियन करून, मर्स्क केवळ समानतेकडेच चालत नाही तर जहाजबांधणी उद्योगात नावीन्य आणि वाढीसाठी एक आदर्श तयार करत आहे. डेन्मार्क आणि भारत या दोन्ही सागरी राष्ट्रांनी या बदलाचे नेतृत्व केले पाहिजे. ते पुढे म्हणाले, “महिलांसाठी सागरी करिअरमध्ये अधिक संधी निर्माण करण्याचा हा उद्योग-व्यापी प्रयत्न निःसंशयपणे आमच्या जागतिक शिपिंग समुदायाला बळकट करेल आणि पुढील वर्षांमध्ये प्रगती आणि टिकाऊपणा वाढवेल.”

मर्स्कच्या मरीन पीपलचे प्रमुख, आशिया करण कोचर म्हणाले, “आमच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि उद्योगाकडून मिळालेल्या प्रचंड पाठिंब्यामुळे समुद्रात महिलांच्या भरभराटीसाठी एक समान वातावरण निर्माण करण्याचे भविष्य लक्षात येऊ लागले आहे. आमच्या उपक्रमांद्वारे आम्ही भारतातील अधिकाधिक महिलांना करिअर म्हणून समुद्री प्रवास निवडण्यासाठी यशस्वीपणे प्रेरित केले आहे.” ते पुढे म्हणाले, “मर्स्क आणि संपूर्ण उद्योगात महिलांची संख्या 45% पर्यंत पोहोचणे हा एक चांगला सांघिक प्रयत्न आहे आणि आता हीच वेळ आहे की, भरती केलेल्या महिलांनाही ताफ्यात कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणे.”

मुंबईत आज झालेल्या ‘इक्वल ॲट सी’ परिषदेने लिंग विविधता आणि समावेशावर चर्चा करण्यासाठी सागरी उद्योगातील लीडर्सना एकत्र आणले. महामहिम फ्रेडी स्वान, भारतातील डॅनिश राजदूत यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. परिषदेत तीन प्रमुख विभागांचा समावेश होता: सस्टेनेबल इक्वॅलिटी : गोइंग बियाँड दी ऑन बोर्डिंग – यातून परस्परसंवादी चर्चेद्वारे कार्यस्थळ संस्कृती आणि छळवणूक शोधली; सी-साइड चॅट – नॉट ऑल सीलिंग्स आर मेड ऑफ ग्लास – यात पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात महिलांची एट्री याविषयी चर्चा झाली, याशिवाय ऑल वुमन ऑन बोर्ड : मिथ अँड रिअॅल्टी याविषयीही सविस्तर चर्चा झाली. सर्वसमावेशक सागरी उद्योगाला चालना देण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेला अधोरेखित करून, मर्स्कच्या विविधतेच्या उपक्रमांवरील प्रगती अहवालाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

भारतातील प्रमुख उपलब्धी आणि टप्पे

  1. भारतीय महिला नाविक : अलीकडील कॅडेट समावेशांसह, भारतीय महिला खलाशांची संख्या 2021 मध्ये केवळ 41 वरून 350 चा आकडा ओलांडली आहे, ज्याने भारतातील मर्स्कच्या नाविक लोकसंख्येतील विविधता सुधारण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
  2. समुद्री आणि अभियांत्रिकी प्रवाहात प्रगती: या वर्षीच्या प्रवेशातील महिला कॅडेट्सची एकूण टक्केवारी 45% वर गेली आहे आणि नॉटिकल विभागात आधीच 50% ओलांडली आहे.
  3. महिला रेटिंग कार्यक्रम: 2023 मध्ये ‘इक्वल ॲट सी’ या उपकार्यक्रमाच्या रूपात सुरू झालेल्या या उपक्रमाची सुरुवात भारतातील 22 महिला प्रशिक्षणार्थींनी केली. त्याच्या यशावर आधारित मर्स्कने त्यानंतरच्या दोन अतिरिक्त बॅचेस जोडल्या व आता एकूण 70 महिला रेटिंग प्रशिक्षण घेत आहेत.

जागतिक प्रभाव

भारतातील ‘इक्वल ॲट सी’ उपक्रमाच्या यशाने लिंग विविधता सुधारण्यात मर्स्कच्या जागतिक प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मर्स्कच्या ताफ्यातील महिला खलाशांची संख्या 2021 मध्ये 295 वरून 650 हून अधिक झाली आहे आणि 2024 मध्ये मोजली जात आहे. मर्स्कच्या जागतिक खलाश पूलमधील महिलांची टक्केवारी 2022 मध्ये 2.3% वरून 2024 मध्ये 5.5% झाली आहे.

रयत विचारवेध संमेलनाचे २१ ऑक्टोबला आयोजन

प्रकाश रोकडे यांची माहिती; ‘रयतेपासून रयतेपर्यंत’वर चंद्रकांत दळवी यांची मुलाखत
पुणे, ता. ७: विश्वबंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या रयत विचारवेध संमेलनामध्ये रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्र‌कांत दळवी यांची ‘रयतेपासून रयते‌पर्यंत’ या विषयावर प्रकट मुलाखत, विश्वबंधुता साहित्य संमेल‌नाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांचा अमृतमहोत्सवी सत्कार व डॉ. सविता पाटील लिखित ‘विश्वबंधुतेचे सुवर्णपर्व’ पुस्तकाचे प्रकाशन असा त्रिवेणी संगम अनुभवता येणार असल्याची माहिती रयत विचारवेध संमेलनाचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी दिली.

प्रकाश रोकडे म्हणाले, “नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार भवनमध्ये २१ ऑक्टोबर २०२४ रोजी हे संमेलन होत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव डॉ. शिवलींग मेनकुदळे यांच्या हस्ते सकाळी १० वाजता संमेलनाचे उद्‌घाटन होईल. डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. अरुण आंधळे आणि डॉ. सविता पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहील. चंद्रकांत दळवी यांच्या ‘रयतेपासून रयतेपर्यंत’ या मुलाखतीने संमेलनाचा समारोप होईल. दळवी यांच्याशी प्रा. शंकर आथरे आणि संगीता झिंजुरके मुक्त संवाद साधतील.”
“दुपारच्या सत्रात पल्लवी उमरे (नागपूर) यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात मराठी काव्यपंढरी होईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कवी सह‌भागी होतील. ज्येष्ठ कवी प्रा. चंद्रकांत वानखेडे, डॉ. अशोक‌कुमार पगारिया, मधुश्री ओव्हाळ, गुलाबराजा फुलमाळी यांची प्रमुख उपस्थिती असेल. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी डाॅ. प्रभंजन चव्हाण, बंडोपंत कांबळे व प्रा. प्रशांत रोकडे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे,” असेही प्रकाश रोकडे यांनी नमूद केले.