Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील ‘मॅन ऑफ द मॅच’

Date:

हरियाणा विधानसभा निवडणूक निकाल

एकूण जागा ९०/ हाती आलेले कल ९०

भाजप – ४८
काँग्रेस – ३६
आप – ०
लोक दल – ३
इतर – ३

उत्तर भारतातील महत्त्वाचं राज्य हरयाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक असे लागले आहेत. येथे सत्ताधारी भाजपाच्या पराभवाचं भाकित करण्यात येत असताना पक्षाने अनपेक्षित मुसंडी मारत आतापर्यंतच्या कलांमध्ये स्पष्ट बहुमताच्या दिशेने आगेकूच केली आहे.

तर ज्या काँग्रेसला एकतर्फी बहुमत मिळेल, असा दावा करण्यात येत होता. त्या काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली आहेत. दरम्यान, भाजपाला हरयाणामध्ये मिळालेल्या यशाचं श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच हरयाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी यांनाही दिलं जात आहेत. अगदी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रिपदावर विराजमान झालेल्या नायाब सिंह सैनी यांनी पक्षाविरोधात असलेली शेतकरी, सैनिक आणि कुस्तीपटूंची नाराजी तसेच दहा वर्षांची अँटी इन्कम्बन्सी हे सर्व यशस्वीरीत्या थोपवून भाजपाला विजय मिळवून दिल्याने या निवडणुकीतील मॅन ऑफ द मॅच असा उल्लेख सैनी यांचा केला जात आहे. नायाब सिंह सैनी यांना मागच्या काही महिन्यांमध्ये भाजपासाठी प्रतिकूल असलेलाी परिस्थिती अनुकूल कशी काय केली, हे आपण आता पाहुयात.

२०१४ मध्ये हरयाणामध्ये पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर भाजपाने मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्री केले होते. मात्र खट्टर यांच्या कारभाराविरोधात असलेली नाराजी सातत्याने वाढत होती. त्यात शेतकऱ्यांचं आंदोलन हाताळण्यात अपयश आल्याने खट्टर यांच्याबाबत असलेली नाराजी अधिकच वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीला अवघे २ महिने असताना आणि हरयाणामधील विधानसभा निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला असताना भाजपाने नायाब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रिपदावर बसवले होते. या नायाब सिंह सैनी यांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी डमी मुख्यमंत्री म्हणून खिल्ली उडवली होती. मात्र हेच सैनी आजच्या निकालांमध्ये भाजपासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसले.

नायाब सिंह सैनी यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यावर लगेचच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला हरियाणामध्ये दहा पैकी ५ जागांवर पराभव पत्करावा लागला होता. तसेच राज्यातील वारे काँग्रेसच्या दिशेने वाहत असल्याचे दावे केले जाऊ लागले होते. मात्र या निवडणुकीत भाजपाने सैनी यांनाच पक्षाचा चेहरा म्हणून पुढे केले होते. सैनी यांनीही हे आव्हाना आणि राज्यातील भाजपाविरोधातील अँटी इन्कम्बन्सी यांचा यशस्वीरीत्या सामना करत पक्षाला विजय मिळवून दिला.

सैनी यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यावर त्यांच्या हातात अवघे २१० दिवस होते. या काळात सरकारची आणि पक्षाची जनमानसातील प्रतिमा उंचावण्यासाठी त्यांनी अनेक पावलं उचलली. त्यांनी ग्रामपंचायतींच्या खर्चाची मर्यादा २१ लाखांपर्यंत वाढवली. त्याशिवाय विजेच्या बिलामध्ये घट करण्यासाठी प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना यासाठी कुटुंबांना सब्सिडी देण्यास सुरुवात केली. त्याबरोबरच मतदारांमध्ये अधिकाधिक मिसळून राहण्यास त्यांनी प्राधान्य दिलं. त्यामुळे त्यांची लोकप्रियता अधिकच वाझली होती.

लोकसभा निवडणुकीत हरयाणामध्ये भाजपासाठी अग्निवीर योजना ही अडचणीची ठरली होती. त्यावर मात करण्यासाठी नायाब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हरयाणा अग्निवीर पॉलिसी सुरू केली. त्य माध्यमातून अग्निवीरांना कार्यकाळ संपल्यानंतर नोकरी आणि उद्योगधंदे करण्यास सहाय्य करण्याची व्यवस्था करण्यात आली.
याशिवाय हरयाणामध्ये ओबीसी समाज हा ४० टक्के आहे. त्या पार्श्वभूमीवर नायाब सिंह सैनी हे ओबीसी समाजामधील असल्याने त्यांना मुख्यमंत्रिपद देणं भाजपासाठी जातीय समिकरणांच्या दृष्टीनेही महत्त्वाचं ठरलं. तसेच काँग्रेसच्या बाजूने जाट समाजामधून होत असलेल्या एकजुटीला बिगरजाट एकजूट उभी करणंही शक्य झालं.

आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की… निवडणुका येत आहेत. कोणतीही निवडणूक हलक्यात घेऊ नये. ते म्हणाले की, आजच्या निवडणुकीतील सर्वात मोठा धडा म्हणजे कधीही अतिआत्मविश्वास ठेवू नये. प्रत्येक निवडणूक, प्रत्येक जागा अवघड असते. कष्ट करावे लागतात. आप प्रमुख म्हणाले की कोणत्याही प्रकारची अंतर्गत भांडणे होऊ नयेत… या निवडणुकीत तुमची भूमिका सर्वात महत्त्वाची असेल, कारण आता आम्ही एमसीडी (दिल्ली महानगरपालिका) मध्ये आहोत. स्वच्छतेसारख्या मूलभूत गोष्टींची जनतेला अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. केजरीवाल म्हणाले की, आपण आपापल्या भागात स्वच्छता राखली पाहिजे. जर असे केले तर आपण निवडणूक नक्कीच जिंकू… आपले मुख्य उद्दिष्ट निवडणुका जिंकणे असले पाहिजे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भरतनाट्यम्‌ नृत्यकलेतून साकारलेल्या गीतरामायणाने रसिक मंत्रमुग्ध…

पुणे : गीत-संगीतासह भरतनाट्यम्‌ नृत्याद्वारे साकारलेले रामायणातील विविध रोमांचक...

मतचोरी लपवण्यासाठीच ४५ दिवसात सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय.

मुख्यमंत्री फडणविसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ,...

बेरोजगारांना रोजगार मिळो आणि महिला अत्याचार कमी व्होवो”

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पांडुरंगाकडे प्रार्थना. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन...

वारीच्या सोहळ्यात चोरट्यांच्या टोळ्या पकडून ४३ लाखाचा ऐवज हस्तगत

पुणे- श्री. संत ज्ञानेश्वर महाराज व श्री. संत तुकाराम...