Home Blog Page 640

गोध्रा’च्या निर्मात्यांनी बलात्कार आणि मानसिक आजारांवर केंद्रित असलेला नवीन चित्रपट ‘कॅल्क्युलेटर’ जाहीर केला

मुंबई, 17 ऑक्टोबर 2024 : OTT वर लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटगृहांमध्ये अपघात किंवा षड्यंत्र गोध्रा यशस्वी झाल्यानंतर निर्मात्यांनी त्यांच्या पुढील उपक्रमाची घोषणा केली आहे. बीजे पुरोहित निर्मित आणि एमके शिवाक्ष दिग्दर्शित, नवीन चित्रपटाचे नाव आहे कॅल्क्युलेटर, मानसिक आरोग्य आणि बलात्कार या संवेदनशील विषयांना हाताळणारा एक मनोवैज्ञानिक थ्रिलर. सोशल मीडियावर एक आकर्षक घोषणेचा टीझर शेअर करण्यात आला आहे, ज्याने जोरदार चर्चा सुरू केली आहे.

ओम त्रिनेत्र फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित, हा चित्रपट भयपट, सस्पेन्स आणि सायकोलॉजिकल ड्रामाचा थरारक मिश्रण देतो. टीझरची सुरुवात तलावातील माशांच्या प्रतिकात्मक प्रतिमेने होते, जे समाज सर्व गोष्टींचा साक्षीदार कसा आहे हे दर्शविते परंतु अनेकदा शांत राहणे निवडतो. बलात्कार हे केवळ शारीरिक कृत्य नसून पीडित व्यक्तीला आयुष्यभर सहन करावा लागणारा आघात आहे. बलात्कार पीडितेचे वेड जग पाहते पण त्यामागील अपार दुःखाकडे दुर्लक्ष करते.

महिलांवरील हिंसाचार, रक्ताने माखलेले हात आणि पोलिसांच्या सायरनच्या दृश्यांसह टीझर आणखी तीव्र होतो. हे नंतर एका घाबरलेल्या महिलेच्या शॉट्समध्ये बदलते, त्यानंतर हल्ल्यानंतरच्या मनाच्या गोंधळाची त्रासदायक प्रतिमा. प्रेक्षकांना पडलेला प्रश्न मार्मिक आहे: तुम्ही तिच्या वेदना मोजू शकता का? 1-मिनिट 20-सेकंदाचा टीझर या व्हिज्युअल्ससह खोल प्रभाव सोडतो, समाजाच्या दोन सर्वात दुर्लक्षित समस्यांना स्पर्श करतो – मानसिक आरोग्य आणि बलात्कार.

कॅल्क्युलेटर या सामाजिक चिंतेचा सखोल अभ्यास करतो, मानसिक आजारांच्या आसपासच्या कलंकांवर प्रकाश टाकतो. टीझरमध्ये सुचविल्याप्रमाणे, जेव्हा लोक एखाद्या व्यक्तीला त्यांच्या मानसिक आरोग्याशी झुंजताना पाहतात, तेव्हा ते सहसा मूळ वेदना आणि आव्हानांकडे दुर्लक्ष करतात. या चित्रपटाचा उद्देश मानसिक आरोग्य विकारांबद्दल जागरुकता वाढवणे, तसेच लैंगिक हिंसाचाराच्या खोलवर रुजलेल्या आघाताचे चित्रण करणे हा आहे. बलात्कार ही केवळ एक वेगळी घटना नसून ती पीडितेसाठी आयुष्यभराची वेदना आहे यावर भर दिला आहे.

निर्माते बी.जे. पुरोहित यांनी चित्रपटाची घोषणा करताना, त्याचे महत्त्व सांगितले: कॅल्क्युलेटर मानसिक आरोग्य आणि त्याशी संबंधित आव्हाने यावर केंद्रीत असलेली कथा आणते, हा विषय समाजाकडून मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित राहतो. हा चित्रपट समाजाच्या अज्ञान, अंधश्रद्धा आणि असंवेदनशीलतेमुळे मानसिक आजाराशी लढा देणाऱ्या लाखो कुटुंबांच्या व्यथा मांडतो. मानसिक विकारांबद्दल जागरुकता पसरवणे आणि सहानुभूती आणि योग्य उपचारांशिवाय ही समस्या सोडवणे शक्य नाही हा संदेश देणे हा यामागचा उद्देश आहे.

दिग्दर्शक एमके शिवाक्ष यांनी चित्रपटाविषयी अधिक माहिती सांगताना सांगितले की, कॅल्क्युलेटर देखील बलात्काराच्या संवेदनशील मुद्द्यावर खोलवर लक्ष केंद्रित करते, सामाजिक दृष्टिकोन बदलण्याच्या आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने. हा केवळ एक चित्रपट नसून एक मोहीम आहे – ज्यांच्या वेदना समाजाच्या लक्षात आल्या नाहीत त्यांच्यासाठी एक आवाज. आम्हाला आशा आहे की कॅल्क्युलेटर दर्शकांच्या हृदयाला स्पर्श करेल आणि मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता पसरवण्यात यशस्वी होईल. ही कथा लवकरच पडद्यावर जिवंत होईल, आणि आम्ही ती तयार केली आहे तितक्याच गांभीर्याने तुम्ही त्यात सहभागी व्हाल अशी आम्हाला आशा आहे.

कॅल्क्युलेटर पुढील वर्षी हिंदी, तसेच मल्याळम, कन्नड, तमिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे, विविध भाषांच्या प्रेक्षकांपर्यंत त्याची व्यापक पोहोच दर्शवित आहे. लवकरच कलाकारांची घोषणा केली जाईल.

“चंदा रे चंदा” मैफिलीत रसिक मंत्रमुग्ध

पुणे-कोजागिरी आणि चंद्राच एक वेगळ नात आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त चंद्र व चांदण्यांवर लिहिलेली मराठीतील आणि हिंदीतील श्रवणीय सदाबहार गीते “चंदा रे चंदा” या गीतांच्या मैफलीत सादर करण्यात आली. पुणे लोकमान्य फेस्टीवल नवरात्र उत्सव २०२४ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मैफिलीला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिली. दुग्धपानाची रसिकांना सोय करण्यात आली होती. सुमधुर गीते ऐकत रसिकांनी दुग्धाचा आस्वाद घेतला.

प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक, पौर्णिमा गीते, अश्विनी कुरपे यांनी मेरे सामने वाली खिड़की में, नीले नीले अंबर पर, ओ चांद की रात, क्या खूब लगती हो, गाडी बुला रहिए, सुर नवे छेडिता, पांच रुपए बारा आना, ओ हंसिनी, अशी सदाबहार गीते सादर केली. बासरी – सचिन वाघमारे, सिंथेसायझर – रशीद शेख, तबला – रोहित साने, ऑटोपॅड – नंदू डेव्हिड, ट्रंपेट – बाबा खान या कलाकारांनी त्यांना मोलाची साथ दिली. तर कार्यक्रमाचे निवेदक महेश गायकवाड यांनी केले. 

पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे हे २७ वे वर्ष होते. फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष – ॲड. गणेश सातपुते, उत्सव-अध्यक्ष – डॉ. नरेश मित्तल, निमंत्रक – शुभांगी सातपुते यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते.

आदर्श आचारसंहितेच्या पहिल्या २४ तासात शासकीय मालमत्तेवरील साडेचौदा हजार प्रचारसाहित्य हटविले- निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम

पुणे, दि.१७: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचार संहिता जिल्ह्यात १५ ऑक्टोबर रोजी लागू झाल्यानंतर पहिल्या २४ तासात सर्व मतदारसंघात प्रशासनाच्यावतीने शासकीय इमारती आणि शासकीय मालमत्तेच्या आवारातील जाहिरात फलके, भित्तीपत्रके, भिंतीचित्रे, बॅनर, ध्वज आदी एकूण १४ हजार ५४२ प्रचारसाहित्य तात्काळ प्रभावाने हटविण्यात आले आहेत, अशी आचारसंहिता कक्षाच्या समन्वयक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली आहे.

जुन्नर विधानसभा मतदासंघात १ हजार १६९, आंबेगाव १ हजार ४३०, खेड आळंदी १ हजार ४४६, शिरूर ५६९, दौंड १ हजार ५३०, इंदापूर ८२८, बारामती ८९०, पुरंदर १ हजार ९६६, भोर १५५, मावळ १ हजार १५४, चिंचवड १ हजार ७, पिंपरी (अ.जा.) ३८, वडगांव शेरी १५८, भोसरी ६५३, शिवाजीनगर १४८, कोथरुड १८५, खडकवासला ५६७, पर्वती २४५, हडपसर २३८, पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा.) ९१, कसबा पेठ मतदार संघात ७५ असे फलके, होर्डिंग्ज, भिंतीचित्रे, बॅनर, ध्वज असे शासकीय मालमत्तेवरील एकूण १४ हजार ५४२ प्रचारसाहित्य हटविण्यात आले आहेत. यामध्ये भित्तीवरील लिखान १ हजार ९८६, भित्तीपत्रके ३ हजार ६८५, जाहिरात फलके १ हजार ६४७, बॅनर्स २ हजार ७९५, ध्वज १ हजार ४३० आणि इतर साहित्य २ हजार २९९ यांचा समावेश आहे, अशी माहिती श्रीमती कदम यांनी दिली आहे.

 वाचन प्रेरणा दिनानिमित्त जाधवर इन्स्टिट्यूटतर्फे पुस्तकांचे प्रदर्शन

पुणे : भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा वाढदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्ताने न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् मध्ये तब्बल २ हजार पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या पुस्तकांमधील एका गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचत त्यातील संदेश समजून घेण्याचा प्रयत्न केला.
प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांसह इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. वाचनाचे महत्व समजून घेण्यासोबतच विविध लेखकांची पुस्तके देखील विद्याथ्र्यांनी यानिमित्ताने वाचली. तसेच डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जीवनपट देखील समजून घेत त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले. 
अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, वाचन आपल्याला जगायला शिकवते. आज सगळे जण मोबाईलचे फॅन आहेत. मोबाइल मधून बाहेर या आणि पुस्तकांच्या सानिध्यात रहायला हवे. वाचन प्रेरणा दिन हा भारतात साजरा होतो. माणसाच्या कपडयांनी मोठेपणा दिसत नाही, तुमच्या विचार दिसतो. अशा डॉ. कलाम यांचा हा आदर्श आपण प्रत्येकाने घ्यायला हवा. डॉ. कलाम ज्या ज्या देशात जायचे तेथे त्यांना डॉक्टर पदवी मिळाली. त्यांच्याकडे २५०० पुस्तके आणि ४० डॉक्टरेट पदवी होती, बाकी संपत्ती त्यांच्याकडे नव्हती, असेही त्यांनी सांगितले.

श्री शिवाजी व्यायाम मंडळ क्रीडांगण नूतनीकरण आणि भूमिपूजन कार्यक्रम संपन्न

सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदार विशेष निधीमधून नूतनीकरण व भूमिपूजन कार्यक्रम  

पुणे : छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या आमदार विशेष निधीमधून छत्रपती शिवाजीनगर गावठाण येथील श्री शिवाजी व्यायाम मंडळ क्रीडांगण नूतनीकरण लोकार्पण सोहळा आणि या भागातील ५० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन नुकतेच (शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी) संपन्न झाले.
यावेळी शिरोळे यांच्या आमदार विशेष निधीमधून श्री शिवाजी व्यायाम मंडळ क्रीडांगणचे ६० लक्ष रुपये खर्च करीत नुतनीकरण करण्यात आले. तर शिवाजीनगर गावठाण येथील नाथगल्ली, जोशी आळी व गणपती चौक ते सेंट्रल हॉटेल पर्यंत या ठिकाणी रुपये ५० लक्ष खर्चून नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचे भूमीपूजन संपन्न झाले. यावेळी भारतीय जनता पक्ष व महायुती छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

यावेळी शिरोळे यांच्या हस्ते कोनशिला अनावरण कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थितांशी संवाद साधताना शिरोळे म्हणाले, “श्री शिवाजी व्यायाम मंडळ या वास्तूत शिवाजीनगर येथील पिढ्या घडल्या आहेत. जो येथे येऊन व्यायाम करतो त्याची तब्येत हमखास होतेच. मी नगरसेवक पदासाठी इच्छुक असताना या भागात आलो होतो. तेव्हापासून श्री शिवाजी व्यायाम मंडळ या वास्तूकडे सेवाभावनेने पाहत आलो आहे. आज याचे नूतनीकरण होत असताना कौतुक वाटते आहे. येथे आज माझ्या माध्यमातून हे काम होते आहे याचे समाधान आहे.”

शिवाजीनगर मतदार संघात मी फिरत असताना अनेक नागरिक भेटतात. या भागात मी ज्यांची ज्यांची कामे केली ते नागरिक जेव्हा कौतुक करतात तेव्हा मन भरून येते, असेही शिरोळे यांनी सांगितले. लवकरच श्री शिवाजी व्यायाम मंडळ येथे असलेल्या जीमचा कायापालट करू, असे आश्वाशन देखील शिरोळे यांनी दिले.

सह्याद्रि हॉस्पिटल्स मध्ये दुर्मिळ स्पाइनल ट्युबरक्युलॉसिस झालेल्या १३ वर्षीय मुलीवर यशस्वी उपचार

गंभीर पॅराप्लेजियावरील शस्त्रक्रियेनंतर अवघ्या १५ दिवसांतच रुग्णाच्या हालचाली पूर्ववत

पुणे१७ ऑक्टोबर २०२४  मणक्याच्या क्षयरोगाचा एक दुर्मिळ व गंभीर प्रकार असलेला ‘मणक्याचा टी.बी.’हा आजार एका १३ वर्षांच्या मुलीला झाला होता. या मुलीवर डेक्कन जिमखाना येथील ‘सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये नुकतेच यशस्वीपणे उपचार करण्यात आले. ‘सह्याद्रि हॉस्पिटल्स’चे स्पाइन सर्जन डॉ. राजेश पारसनीस यांनी हे उपचार कुशलतेने हाताळले. त्यांच्या त्वरित निदान आणि अचूक शस्त्रक्रियेमुळे या मुलीच्या प्रकृतीत केवळ तीन दिवसांत बऱ्यापैकी सुधारणा झाली.

रुग्ण मुलीला सुरुवातीला दोन महिने पाठीच्या वरच्या भागात तीव्र वेदना होत होत्या. पुण्यातील सरकारी रुग्णालयात तिने सुरुवातीला उपचार घेतले. तिला ‘मणक्याचा टी.बी’ हा आजार झाल्याचे निदान तिथे आले. तिला टी.बी. प्रतिबंधात्मक औषधे (AKT) सुरू करून संपूर्ण विश्रांती देण्यात आली. तथापि तिची प्रकृती खालावली. पुढील दोन महिन्यांत तिच्या पाठदुखीची तीव्रता आणखी वाढली आणि अखेरीस तिला ‘पॅराप्लेजिया’ झाला. या अजारामध्ये रुग्णाला अर्धांगवायू होतो, ज्यामुळे कमरेखालील शारीरिक क्षमता कमी होऊन पायांच्या हालचालींवर मर्यादा येतात.

या रुग्णाला डेक्कन जिमखाना येथील ‘सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’मध्ये आणल्यावर डॉ. पारसनीस आणि त्यांच्या टीमने तपासले. क्लिनिकल तपासण्या, ‘एमआरआय’चे निष्कर्ष आणि शस्त्रक्रियेदरम्यान केलेली ‘ओपन बायोप्सी’ यांच्या आधारे मुलीच्या आजाराचे निदान स्पष्ट झाले. निदान अधिक अचूक व्हावे म्हणून डॉक्टरांनी ‘जिनएक्पर्ट एमटीबी’ (GeneXpert MTB) ही चाचणी देखील केली. या चाचणी दरम्यान शस्त्रक्रियेच्या जागेवरून अत्यंत संवेदनशील आणि विशिष्ट पद्धतीने ‘ट्यूबरकल बॅसिली’ (टी.बी. होण्यास कारणीभूत असलेला) या माणसामधील क्षय रोगास कारणीभूत ठरणारा जीवाणूचा शोध घेतला जातो. त्यावर ‘सह्याद्रि’चे वैद्यकीय पथक व रूग्ण यांच्यात व्यवस्थित समन्वय साधून या आव्हानांवर मात केली.

मणक्याचा टी.बी. हा फुफ्फुसाच्या क्षयरोगाचा तुलनेने कमी प्रमाणात आढळणारा एक प्रकार आहे. फुफ्फुसाचा क्षयरोग झाल्यानंतर दुय्यम संसर्ग म्हणून काही व्यक्तींना याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. शहरी भागात मणक्याच्या टीबीचे प्रमाण जास्त आहे. शहरांत १ लाख लोकसंख्येमध्ये १.४३ प्रकरणे इतके प्रमाण आहे, तर ग्रामीण भागात १ लाख लोकसंख्येमध्ये ०.७६ प्रकरणे इतके प्रमाण आहे. त्वरीत उपचार न केल्यास या आजाराचे गंभीर परिणाम होऊ शकतात. या रुग्णाच्या प्रकरणातही मज्जारज्जूंवरील दाबामुळे तिला पॅराप्लेजिया झाल्याचे निष्पन्न झाले.

रूग्ण क्लिनिकमध्ये दाखल झाल्यावर परिस्थितीची निकड समजून घेऊन, डॉ. पारसनीस यांनी ताबडतोब (‘डी१ – डी६ डोर्सल डीकंप्रेशन’ (D1-D6 Dorsal Decompression) आणि ‘पेडिकल स्क्रू फिक्सेशन’) रुग्णावर ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून नसांवरील दबाव दूर करून, मणक्याला स्क्रूने नोड देऊन जंतुसंसर्ग झालेली जागा निर्जंतुक करून रुग्णाचा त्रास दूर होईल. अचूक स्क्रू बसवण्याकरिता ‘ओ-आर्म नेव्हिगेशन’ आणि ‘इंट्रा-ऑपरेटिव्ह न्यूरो-मॉनिटरिंग’ अशा प्रगत तंत्रज्ञानाचा वापर त्यांच्या सर्जिकल टीमने केला. या तंत्रज्ञानामध्ये पाठीच्या कण्याच्या कार्याचे मूल्यांकन अचूक वेळेत केले जाते ज्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान अचूकता व सुरक्षिततेची खात्री राहते.

रुग्णाची परिस्थिती पाहता तातडीने शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक होते,” असे डॉपारसनीस यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले. ते पुढे म्हणाले, आणखी कमरेखाली नसांवर दुष्परिणाम होऊ नयेम्हणून तेथील दबाव कमी करणे आणि मणक्याला स्थिर करणे हे या शस्त्रक्रियेचे प्राथमिक उद्दिष्ट होतेरूग्णाला सर्वोत्तम परिणाम मिळावेतयासाठी प्रगत शस्त्रक्रिया तंत्रांचा वापर करण्यात आला.”

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात आले. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर तिला पाठीच्या कण्याला आधार मिळावा याकरता देण्यात येणारा पट्टा (‘टेलर्स ब्रेस’ – थोराको-लंबर ऑर्थोसिस) देण्यात आला आणि तिच्यावर फिजिओथेरपीचे उपचार सुरू करण्यात आले. फिजिओथेरपीच्या टीमने रूग्णाच्या कमरेखालच्या शरीराला बळकटी आणण्यावर तसेच तिचे श्वसन कार्य सुधारण्यावर प्रथमत: लक्ष केंद्रित केले. त्यासाठी दीर्घश्वसन व्यायाम आणि ‘इन्सेन्टिव्ह स्पायरोमेट्री’ या उपकरणांची मदत घेतली. या सर्वंकष उपचारमुळे शस्त्रक्रियेनंतरच्या पाचव्या दिवशी रुग्ण उभी राहून काही पावले उचलण्यास सक्षम झाली होती. इतकेच नाही तर शस्त्रक्रियेनंतरच्या पंधराव्या दिवशी तिचे टाके काढण्यात आले.  त्यावेळी ती कोणत्याही आधाराशिवाय स्वतंत्रपणे चालू शकत होती.

एका महिन्याच्या फॉलो-अप भेटीत रुग्ण पूर्ण बरी झाली असल्याचे दिसून आले. पाठदुखी, पायाचे दुखणे किंवा अशक्तपणा अशी कोणतीही तक्रार तिने नोंदवली नाही. कमरेखालील नसांचे कार्य देखील पूर्णपणे पूर्ववत झाले होते.

मज्जारज्जूंवर दबाब आल्यामुळे पॅराप्लेजिया (अर्धांगवायू) उद्भवतो, अशा वेळी त्वरीत शस्त्रक्रिया करण्याला महत्त्व असते, असे डॉ. पारसनीस यांनी म्हटले आहे. “न्यूरोलॉजिकल रचनेमध्ये कायमस्वरुपी बिघाड होण्याआधी शस्त्रक्रिया करण्याचा आम्ही वेळेवर घेतलेला निर्णय हा या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा ठरलाअँटीबायोटिक थेरपी सुरू ठेवून शस्त्रक्रिया करायची आणि परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत राहायचेअसे धोरण आम्ही ठरवलेआणि ते यशस्वी झाले,” असे ते म्हणाले.

मणक्याच्या गुंतागुंतीच्या आजारांवर उपचार करण्यासाठी सहयोगी दृष्टीकोन आणि प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान या गोष्टी किती फलदायी ठरतात, ते ‘सह्याद्रि हॉस्पिटल’मधील या प्रकरणातून दिसून येते.

आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे आवाहन

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात राजकीय पक्षांची बैठक संपन्न

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील राजकीय पक्षांची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सर्व राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन श्री. भंडारे यांनी यावेळी केले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमांतर्गत राज्यात सर्व विधानसभा मतदार संघात २२ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात होणार असून अखेरचा दिवस २९ ऑक्टोबर आहे. ३० ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी तर ४ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन मागे घेता येणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती श्री. भंडारे यांनी दिली.

यावेळी श्री. भंडारे यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती देऊन उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज योग्य रीतीने बिनचूक भरण्याबाबत तसेच मतदार याद्या दुरुस्त्या, मतदान केंद्रावरील सोयीसुविधा, दिव्यांग मतदारांसाठीची सुविधा व मतमोजणी दरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी आदीबाबत माहिती दिली.

उच्च न्यायालय, खंडपीठांची दोन दिवसीय विशेष लोकअदालत

पुणे, दि. १७ : मुंबई उच्च न्यायालय तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठ येथे ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. या लोकअदालतीसाठी पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी (ऑनलाईन) पद्धतीने सहभागी होऊ शकतात असेही त्यांनी कळविले आहे.

या विशेष लोक अदालतीत मुंबई उच्च न्यायालय, नागपुर व औरंगाबाद खंडपीठ येथे प्रलंबित असलेले खटले पुणे विधी सेवा प्राधिकरण येथून ऑनलाईन पद्धतीने तडजोडीने मिटविण्याची संधी प्राधिकरणाने उपलब्ध करून दिली आहे

जिल्ह्यातील ज्या पक्षकारांची प्रकरणे येथे प्रलंबित आहे व ती तडजोडीने मिटवावीत, अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी संबंधीत वकीलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहिती साठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी केले आहे.
0000

कामगार कायदा सुधारणा ही काळाची गरज डॉ.श्री.एस.सी.श्रीवास्तव यांचे प्रतिपादन

डी.इ.एस.श्री.नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय येथे दोन दिवसीय कामगार कायदे परिषदेचे उदघाटन उत्साहात संपन्न.

पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे श्री.नवलमल फिरोदिया विधी,कामगार कायदे परिषद,फेडरीच इबर्ट स्टिफंग,एन.एम.आय.एम.एस.मेहता विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथे दोन दिवसीय कामगार कायदे परिषदेचे उदघाटन संपन्न झाले.या दोन दिवसीय कामगार कायदे परिषदेचे उदघाटन कामगार कायदे मंडळाचे अध्यक्ष डॉ.श्री.एस. सी.श्रीवास्तव,अंतरराष्ट्रीय विधी व संशोधन विद्यापीठ गोवा चे प्र-कुलुगरू डॉ.श्री.व्यंकटराव , डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी विद्यापीठ चेन्नई चे प्र-कुलुगरू डॉ.श्री.संतोषकुमार,पुणे येथील उद्योग व कामगार न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश श्री.सुधीर कुमार बुके,डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष व विधी महाविद्यालय समितीचे अध्यक्ष ऍड.अशोक पलांडे, डॉ.सुनीता आढाव या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुनीता आढाव यांनी केले. यावेळी बोलताना आगामी काळामध्ये कामगारांच्या कायद्यामध्ये आपल्या सारख्या तरुण संशोधकांनी संशोधन करण्याची गरज आहे असे मत श्री.श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.तसेच कामगारांच्या हक्कासाठी व न्यायासाठी वेळोवेळी कायद्यांमधील तरतुदी ह्या गरजेच्या आहेत असे मत उद्योग व कामगार न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश श्री.संतोषकुमार बुके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. तसेच विविध मान्यवरांनी कामगार व त्यांच्या विषयी कायद्यामध्ये होणाऱ्या बदलांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक प्रा.प्रज्ञा यादव यांनी केले तसेच आभार सहाय्यक प्रा.पूजा देव यांनी व्यक्त केले.

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलचा झेंडास्कूलच्या जलतरणपटूंची ३३ पदकांची कमाईः ९ सुवर्ण, १० रौप्य आणि १४ कांस्य पदके

पुणे, बारामती येथील शारदाबाई विद्या निकेतन येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा ध्रुव ग्लोबल स्कूलच्या जलतरणपटूंनी गाजवली. उत्कृष्ट प्रदर्शन करीत ध्रुवच्या खेळाडूंनी ९ सुवर्ण, १० रौप्य आणि १४ कांस्य असे एकूण ३३ पदकांची कमाई केली. खेळाडूंनी खेळातील सातत्य राखत विजय संपादन केला. तसेच संपूर्ण स्पर्धेत ध्रुवच्या खेळाडूंचा बोलबाला बघायला मिळाला. खेळाडुंच्या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यश मालपाणी व प्रिन्सीपल संगीता राऊतजी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्यात.
आयोजित स्पर्धेत ध्रुव ग्लोबलच्या २७ जलतरणपटूंनी भाग घेतला होता. अर्जुन पुरस्कार विजेते विपत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १६० स्पर्धकांसोबत ही स्पर्धा झाली.
१४ वर्षाखालील मुलेः शर्विल जंगम ५० मीटर बटरफ्लाय (रौप्य), अद्विक भालेकर १०० मीटर बॅकस्ट्रोक (रौप्य) व २०० मी. बॅकस्ट्रोक (कांस्य) आणि विवान काळे ५० मी. फ्रीस्टाईल (कास्य)
१४ वर्षाखालील मुली ः अनया वाणखेडे २०० मी. बॅकस्ट्रोक (कांस्य) , १०० मी. बॅकस्ट्रोक (सुवर्ण) व (रौप्य पदक), रेवा चौगुले १०० मीटर बटरफ्लाय (रौप्य), २०० मी.व ५० मीटर बटरफ्लाय आणि इवा मालवणकर १०० मी. फ्रीस्टाईल (रौप्य पदक), आरोही इनामदार १०० व २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक (सुवर्ण) व ५० मी. ब्रेस्टस्ट्रोक (कांस्य), सिद्धी देखाते १०० मी. बॅकट्रोक (कांस्य) आणि पृथ्विका देशमुख ५० मीटर ब्रेस्ट्रोक (सुवर्ण)
 १७ वर्षाखालील मुले ःमंदार कोल्हटकर १०० मी. फ्रीस्टाईल व ५० मीटर बटरफ्लाय (सुवर्ण), आदर्श खोब्रागडे ५० मीटर बटरफ्लाय (रौप्य पदक), जैत्र भोर १०० मी. बॅकस्ट्रोक (कांस्य), व पार्थ पोटे २०० मी. बॅकस्ट्रोक  (कांस्य)
१७ वर्षाखालील मुलीः हिया कोटक २०० मीटर बटरफ्लाय (सुवर्ण) व १०० मीटर बटरफ्लाय (कांस्य), निया पतंगे हिने १०० मी. बॅकस्ट्रोक (सुवर्ण), ५० मी. बॅकस्ट्रोक व २०० मी फ्रीस्टाईल (रौप्य),इशान्वी बर्पांडा १०० मी फ्रीस्टाईल (कांस्य) आणि अवंतिका किर्लोस्कर ५० मी. ब्रेस्टस्ट्रोक (सुवर्ण) व ५० मी. फ्रीस्टाईल (कांस्य)
रीले स्पर्धेत ः १४ वर्षाखालील मिडल रीले स्पर्धेत खुश मुंद्रा, विवान काले, आयुष नाशी व अद्विक भालेकर यांना कांस्य पदक, १४ वर्षाखालील मुली फ्रीस्टाईल रीलेः डिंपल खेडकर, रेवा चौगुले, एवा मालवणकर व  अन्या वाणखेडे यांना रौप्य पदक आणि १४ वर्षाखालील मुली मिडले रीले ः रेवा चौगुले, आरोही इनामदार, अन्या वाणखेडे व इवा मालवणकर यांना रौप्य पदक
१७ वर्षाखालील मुलेःफ्रीस्टाईल रीलेः मंदार कोल्हटकर, पार्थ पोटे, जैत्र भोर, आदर्श खोब्रागडे यांना कांस्य पदक, १७ वर्षाखालील मुले मिडले रीलेः मंदार कोल्हटकर, परिजात चंद्र, आदर्श खोब्रागडे व जैत्र भोर यांना रौप्य पदक
ध्रुव ग्लोबल स्कूलच्या सर्व जलतरणपटूंना प्रशिक्षक स्मिता काटवे, उमा जोशी, रूपाली अनुप, केशव हजारे यांनी प्रशिक्षण दिले.

भिमाले म्हणाले,’त्या’ बातम्या तर माध्यमातील कंड्या, मीच BJP उमेदवारआणि होणार आमदार..

पुणे-कालपासून माध्यमातून भाजपच्या काही विधान सभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची महा मंडळांवर नियुक्त्या केल्याचे वृत्त अनधिकृत रित्या पसरविले जात असताना आता अशा बातम्यांचा खूपच मारा वाढल्याने पर्वती विधानसभेचे इच्छुक उमेदवार श्रीनाथ भिमाले यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन माध्यमांच्या पुढे स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे.

ते म्हणाले,’ मी विधिमंडळाची मागणी केलीय, महामंडळाची नाही, आणि माझा माझा नेत्यांवर विश्वास आहे ते मलाच पर्वती मतदार संघाची उमेदवारी देतील आणि मीच इथला आमदार होईल . ज्या बातम्या माध्यमातून ज्या पत्राचा हवाला देऊन दिल्या जात आहेत ते पत्र खात्रीलायक आहे काय ? हे तपासून घ्यायला हवे होते . मला असे पत्र कोणी पाठविले नाही ना कोणी फोन करून मला तसे सांगितले.त्या पत्रावर आवक जावक नंबर नाही, तारीख नाही शिक्का नाही ते अधिकृत मानून पसरविले जाणारे वृत्त निराधार आहे.कोणत्या हेतूने ते पत्र कोणी का व्हायरल केले मला ठाऊक नाही . पण मलाच पक्षनेते पर्वतीची उमेदवारी देतील .

तुम्हाला उमेदवारी दिली नाही तर काय करणार ? हा प्रश्नही त्यांनी खोडून काढला , माझा माझ्या नेत्यांवर विश्वास आहे मलाच उमेदवारी मिळेल याची खात्री आहे .उमेदवारी जाहीर होताच तुम्हीच माझे अभिनंदन करायला याल असेही ते म्हणाले.

राजयोगापासून मिळेल व्यसन मुक्ती- ब्रह्माकुमार डॉ. सचिन परब यांचे विचार  


एमआयटी डब्ल्यूपीयू व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे आयोजन

पुणे दि. १७ ऑक्टोबरः ” व्यसनांना कधीही मुळापासून संपविल्या जाता येत नाही. त्यासाठी अंर्तमनातून परिर्वनाची ओढ गरजेचे आहे. जगण्यासाठी व्यसन गरजेचे आहे परंतू ते आध्यात्मिक असावे. त्यासाठी युवकांनी राजयोगाचा सराव करावा.” असे आवाहन ब्रह्माकुमार डॉ.सचिन परब यांनी दिला.
एमआयटी डब्ल्यूपीयू व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे एमआयटी डब्ल्यूपीयू मध्ये आयोजित ‘ व्यसनाधीनता व व्यवसनमुक्तीची वैधानिक प्रक्रिया’ या विषयावरील परिसंवादात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी माजी सनदी अधिकारी डॉ. महेश झगडे, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, ब्रह्माकुमारी नलिनी दीदी, बी.के. दशरत भागवत भाई आणि डॉ. संजय उपाध्ये हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम.चिटणीस, डॉ. निरज महेन्द्रु व डॉ. मृदुला कुलकर्णी उपस्थित होत्या.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या आर्शिवादाने व डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न झाला.
डॉ.सचिन परब म्हणाले,”समाजाच्या बदलत्या वातावरणात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा व मानसिक ताणामुुळे अमली पदार्थांच्या व्यसानाचे प्रमाण वाढत आहे. व्यसन ही तरुणांसाठी एक फॅशनच आहे जी दिवसेंदिवस वाढत आहे. शरीरावर औषधांचा मारा करणे, मोबाइलच्या आहारी, सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता युवा मानसिकतेवर हावी होणे आणि वर्तमानकाळातील सिंथेटिक्स ड्रग्स हे सर्वात घातक आहे.”
डॉ परब यांनी आत्मा आणि ईश्वराचा परिचय सांगितला. आपल्या कुटुंबात प्रेम, आनंद शांती आणि आनंदाने जीवन जगण्याचे मार्ग दाखविला. राजयोगाच्या माध्यमातून मनात आनंददायी विचार आणण्याची कला शिकविली. जेव्हा आपले मन आनंददायी विचारांनी प्रफुल्लित होते तेव्हा आपले अंतरंग आनंद व शांती ने परिपूर्ण होते. राजयोगाचा़ सराव करून व्यसनही सोडता येते. व्यसनाचे घातक दुष्पपरिणाम आणि व्यसनापासून दूर कसे राहायचे हे सांगितले. ”
“व्यसन मुक्ती साठी आत्मविश्वास, कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा आणि जीवनशैली बदलणे आवश्यक आहे. आनंद मिळण्यासाठी मेंदूतील डोपामिन रसायन वृद्धि आवश्यक आहे. त्यासाठी व्यसनापेक्षा प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटरच्या माध्यमातून शिकविल्या जाणार्‍या राजयोगाचा आधार घ्यावा असे आवाहन डॉ. सचिन परब यांनी केले.”
अमितेश कुमार म्हणाले,” वाढत्या फ्रेशर्स पार्ट्या, ड्रिंक पार्टी आणि चोवीस तास मोबाईलच्या आहारी जाण्यापेक्षा युवकांनी शिक्षणाबरोबरच एक चांगला व्यक्ती बनण्यावर अधिक भर द्यावा. सोशल मीडियाची लक्ष्मणरेषा निश्चित करावी. विद्यार्थी जीवनात सकारात्मक दृष्टिकोण ठेऊन सर्व व्यसनांना तिलांजली दयावी. अन्यथा पोलिस कायद्या द्वारे कारवाई करण्यात येणार.”
डॉ. महेश झगडे म्हणाले,” तंबाखूमुळे दरवर्षी २६ लाख नागरिकांचा मृत्यू होतो.त्यातच काही औषधे, पेन किलर व कफ सिरफ यांचे व्यवसन वाढतांना दिसतात. देशात गुटखा हा मागच्या दरवाज्याने आत येत आहे ते थांबविण्यासाठी सरकार फेल झाले परंतू सरकारला टॅक्सचे व्यसन लागलेले आहे.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,” वर्तमान काळात सतत खाणे हे सर्वात मोठे व्यसन आहे. यामुळे शारीरिक आणि मानसिक आजारात वृद्धि होतांना दिसतात. तसेच सर्वाधिक बोलणे हे सुद्धा व्यसन आहे. अशा वेळेस आपल्या जीवनाला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला पाऊले उचलावी लागतील.”
यावेळी डॉ. संजय उपाध्ये यांनी विदेशी संस्कृती भारतीय संस्कृतीवर होतांना कोण कोणत्या गोष्टीचे व्यसन जडत आहे यावर लक्ष केंद्रीत केले. ब्रह्माकुमार दशरथ भागवत यांनी शारीरिक व मानसिक स्वरूपता व्यक्ती व्यसनाधिन होते हे सांगितले. शरीर व आत्मा मिळून मनुष्य बनतो. त्यामुळे संस्कार देने गरजेचे आहे. जीवनात आत्मज्ञानाला उतरविणे गरजेचे आहे.
यावेळी विद्यापीठातील एमएस्सी मानसशास्त्र, लिबरल आर्ट्स, स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे  विद्यार्थी व आत्म्न विद्यार्थी क्लबचे सदस्य उपस्थित होेते.
डब्ल्यूपीयूच्या स्टुडन्ट अफियर्सच्या डीन प्रा. डॉ. मृदुला कुलकर्णी यांनी स्वागतपर भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी व आभार डॉ. शमीम यांनी केले.

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने दिवाळीपूर्वी राज्यातील ५ हजार मंदिर स्वच्छता आणि ध्वज पूजन 

विश्व हिंदू परिषद मठ मंदिर आयाम महाराष्ट्र-गोवा यांच्यावतीने आयोजन
पुणे : विश्व हिंदू परिषदे च्या मठ मंदिर आयाम महाराष्ट्र-गोवा यांच्या वतीने दिवाळीपूर्वी मंदिर स्वच्छता, मंदिरावर रोषणाई आणि भगवा ध्वजाचे विविध समाजाच्या तरुण जोडप्यांतर्फे पूजन असा त्रिसूत्री कार्यक्रम घेण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने राज्यातील ५ हजार  मंदिरात गाभारा ते अंगण असे स्वच्छता सेवा अभियान राबविण्यात येणार आहे. रविवार, दिनांक २० आॅक्टोबर रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत हे अभियान संपूर्ण राज्यात होणार आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र व गोवा धार्मिक विभाग प्रमुख संजय मुद्राळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, मंदिर अर्चक आयाम प्रमुख धनाजी शिंदे, सूर्यकांत थोरात उपस्थित होते.
किशोर चव्हाण म्हणाले, गाभारा ते अंगण या अभियानात सामील होणे बिन खर्चिक असून सेवाभाव जपणारा हा उपक्रम आहे. मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी ते सुंदर, स्वच्छ असले पाहिजे ही विश्व हिंदू परिषदेची भूमिका आहे. मंदिर समाजातील सर्व घटकांचे आहे. सर्वांना त्यात स्थान असून सन्मान आणि वाव देखील आहे. हा समरसतेचा संदेश सर्व दूर जाण्यासाठी आणि नवीन पिढीला मंदिरांशी जोडण्यासाठी भगव्या ध्वजाचे पूजन तरुण जोडप्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
धनाजी शिंदे म्हणाले, दिवाळी हा हिंदू धर्मामध्ये मोठा सण आहे. त्यानिमित्त आपल्या घरावर रोषणाई केली जाते, तशीच मंदिराची स्वच्छता करून मंदिरावर रोषणाई करण्याचे आवाहन राज्यातील सर्व मंदिरांना करण्यात आले आहे. आपल्या जवळच्या मंदिरात नागरिकांनी जाऊन स्वच्छता सेवा द्यावी. अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जावे, यासाठी महाराष्ट्र राज्याच्या चारही प्रांतात काम सुरू आहे. 
महिला विश्वस्त, पुरोहित आणि भाविक या उपक्रमात पुढाकार घेत आहेत. विविध सांप्रदायाचे, संतांचे अनुयायी, पुरोहित महासंघ या अभियानात सामील झाले आहेत. मागील वर्षी ५५० मंदिरात हे अभियान राबविण्यात आले होते. त्यातून अनेक मंदिरात ‘मंदिर स्वच्छता समूह’ तयार झाले आणि काही ठिकाणी दररोज, आठवड्यातून किंवा  महिन्यातून एकदा स्वच्छता सेवा ते देतात.

‘आप’चा महाराष्ट्रात विधानसभा न लढवण्याचा निर्णय…INDIA ला बळ देणार?

दिल्ली विधानसभेवर लक्ष केंद्रीत करणार-आम आदमी पार्टी इंडिया आघाडीला पाठिंबा देईल

मुंबई-आम आदमी पार्टीने हरियाणा विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली होती. त्याचा थेट फटका काँग्रेसला बसून भाजपचा मोठा फायदा झाला होता.हे लक्षात घेऊन दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून अंग काढून घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यामुळे विरोधी पक्षांच्या मतांची विभागणी टळून राज्यातील महाविकास आघाडीला मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आम आदमी पार्टीने हरियाणा विधानसभा निवडणूक स्वबळावर लढली होती. त्याचा थेट फटका काँग्रेसला बसून भाजपचा मोठा फायदा झाला होता. याचे विरोधकांच्या इंडिया आघाडीत तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे आपने महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीत सावध भूमिका घेत या दोन्ही राज्यांतील निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी इंडिया आघाडीला पाठिंबा देईल. आपच्या या भूमिकेमुळे विरोधकांच्या मतांची विभागणी टळून त्याचा थेट फटका भाजप पर्यायाने महायुतीला बसण्याची शक्यता आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, आपकडून सध्या केवळ दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. यासाठी हा पक्ष इंडिया आघाडी मजबूत करण्यासह पक्षसंघटना बळकट करण्यावर भर देत आहे. दुसरीकडे, आपची महाराष्ट्रातील कार्यकारिणी विधानसभा लढवण्याची तयारी करत होती. पण आपने येथील एक-दोन जागांसाठी वाटाघाटी करण्यात वेळ वाया न घालता इंडिया आघाडीला बळ देण्याचा निर्णय घेतला.

उल्लेखनीय बाब म्हणजे आम आदमी पार्टीने 2019 साली महाराष्ट्र व झारखंड या दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी राज्यातील 288 पैकी 24 मतदारसंघांत आपले उमेदवार उभे केले होते. त्यातील 23 जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते. झारखंडमध्येही आपने 81 पैकी 26 जागांवर आपले नशीब आजमावले होते. पण तिथेही त्यांची अनामत रक्कम जप्त झाली होती.

दरम्यान, महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर झारखंडमध्ये 13 व 20 नव्हेंबर अशा 2 टप्प्यांत मतदान होणार आहे. या दोन्ही राज्यांतील निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल.

… आता 1500 चा पाॅकेटमनी ठरेल गेम चेंजर .. हे पक्के व्यापारी .. हलक्यात नका घेऊ-शाम मानवांचा सल्ला

पेट्रोलचे दर वाढवून महागाई लादली,त्यातून प्रत्येकाला लुट लुट लुटले १६ लाख कोटी रुपये भांडवलदारांचे माफ केले, आता निवडणूक हारू नये म्हणून त्यांनी 1500 रुपयांचा रोख आणि मोफत पाॅकेटमनी देणारी योजना सुरु करून लगेच निवडणूक लादली आहे, शिंदे गात, अजित दादा गट कोणती शिवसेना खरी आणि खोटी हे सारे जनतेला ठाऊक असताना पात्र अपात्रतेला तारीख पे तारीख देत न्याय निवडणूक आली तरी टाळला आणि निवडणूक येण्यापूर्वी महिलांना 1500 रुपये दरमहा पाॅकेटमनी सुरु केला .. लोक आज काय याकडे पाहतात , पायापुरते पाहतात, सख्या भावाने महिन्याला दिले नाही म्हणतात हि योजना हलक्यात घेऊ नका हि गेम चेंजर ठरू शकेल असा इशारा महाविकास आघाडीला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी दिला आहे आणि लाडकी बहीण योजनेवरुन काही सूचनाही केल्या आहेत.मोदींनी पेट्रोलचे दर वाढवून वाढवून आपल्यावर महागाई लादली. साधारण १६ लाख कोटी रुपये भांडवलदारांचे माफ केले. या लोकांनी शेठजींचं राज्य निर्माण केलं आहे असाही आरोप मानव यांनी केला. महाराष्ट्रातलं जे सरकार आहे त्याला देवेंद्र फडणवीस यांचं सरकार म्हटलं जातं. या सरकारमध्ये मुख्यमंत्री दिसतात एकनाथ शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री दिसतात अजित पवार. मी खात्रीने सांगतो आहे दोघांचं फारसं चालत नाही. देवाभाऊंचं सगळं ऐकलं जातं. असं श्याम मानव म्हणाले

लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले जात आहे. हा मुद्दा महाविकास आघाडीने हलक्यात घेऊ नये. लाडकी बहीण योजनेचं कौतुक करा. हे सांगा की लाडक्या बहिणी आम्हाला अधिक लाडक्या आहेत. कारण ज्या महिलांना पैसे मिळत आहेत त्यातल्या ४० टक्के महिला गृहिणी आहेत. त्यांच्यासाठी महिन्याला मिळणारे १५०० रुपये फार महत्त्वाचे आहेत. सतत नवरा, मुलांपुढे हात पसरावा लागतो, त्याऐवजी माझ्या नावावर सरकार माझ्यासाठी पैसे पाठवत आहे हा महिलांसाठी फक्त सन्मानाचा नाही तर अभिमानाचा विषय आहे. उद्धव ठाकरेंशी माझी चर्चा झाली आहे. हा पैसे वाया जात नाही. मोदींनी १६ लाख कोटींचं कर्ज माफ केलं तो पैसा वाया गेला. आता जे पैसे महिलांच्या खात्यात जात आहेत त्याचं गणित सांगतो. लोककल्याणकारी सरकार क्रयशक्ती वाढवणाऱ्या योजना आणत असतं. लाडकी बहीण योजना तशीच आहे. यामुळे स्त्रियांची क्रयशक्ती वाढणार आहे. स्त्रियांची क्रयशक्ती वाढली की त्या कुटुंबासाठी खर्च करतील. भाजी विकत घेतील, कपडे घेतील. या स्त्रिया ऑनलाईनवरुन काही मागवणार नाहीत. पण यामुळे छोट्या उद्योगांना चालना मिळणार आहे हे लक्षात घेऊन आणललेलं हे स्तुत्य पाऊल आहे. त्यामुळे मविआने समर्थन केलं पाहिजे. लोकांना काम मिळण्याची शक्यता आहे, अर्थव्यवस्थेला चालना मिळेल त्यामुळे लाडकी बहीण योजना उपयुक्त गुंतवणूक आहे असं मानलं पाहिजे असं श्याम मानव म्हणाले आहेत. लाडकी बहीण योजनेचं कौतुक करा आणि या बाबांना (महायुती सरकार) हाकलायचं आवाहन महिलांना करा असंही श्याम मानव म्हणाले.

महायुतीचं सरकार कसं आलं ते तुम्हाला सांगतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्या सरकारमधून उद्धव ठाकरेंच्या पक्षातली काही माणसं २१ जूनला सुरतला गेली. त्यानंतर गुवाहाटीला लोक गेले. त्यानंतर गोव्याला गेले. त्यानंतर ३० जूनला विद्वान राज्यपालांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. या सरकारमध्ये सहभागी झालेले माझे एक मित्रही होते. त्यांचं पहिलं वाक्य होतं आता लोकशाही उरलेली नाही. मी गुवाहाटीला गेलो होतो. गेल्या गेल्या आमचे फोन काढून घेतले होते. कुणाशीही आम्ही संपर्क साधू शकत नव्हतो. हे सगळे पहारे असताना आम्हाला रोज टेलिकॉन्फरन्सिंगवरुन दिल्लीतले लोक बोलायचे. त्यांनी आम्हाला तेव्हाच सांगितलं होतं की आता आपलं सरकार येणार आहे आणि ते अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. आधीच सगळं ठरलं आहे, सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट सगळं काही ठरलेलं आहे. उपाध्यक्षांना काहीही निर्णय घ्यायचा नाही हे सांगितलं आहे. मी हे आज सांगत नाही आधीही सांगितलं होतं. मी उद्धव ठाकरेंच्या समोर सांगितलं होतं की कोर्टाचे निर्णय काहीही आले तरीही सरकार सुरु राहणार आहे. असंही श्याम मानव म्हणाले.