पुणे-कोजागिरी आणि चंद्राच एक वेगळ नात आहे. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त चंद्र व चांदण्यांवर लिहिलेली मराठीतील आणि हिंदीतील श्रवणीय सदाबहार गीते “चंदा रे चंदा” या गीतांच्या मैफलीत सादर करण्यात आली. पुणे लोकमान्य फेस्टीवल नवरात्र उत्सव २०२४ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मैफिलीला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिली. दुग्धपानाची रसिकांना सोय करण्यात आली होती. सुमधुर गीते ऐकत रसिकांनी दुग्धाचा आस्वाद घेतला.
प्रसिद्ध गायक जितेंद्र भुरुक, पौर्णिमा गीते, अश्विनी कुरपे यांनी मेरे सामने वाली खिड़की में, नीले नीले अंबर पर, ओ चांद की रात, क्या खूब लगती हो, गाडी बुला रहिए, सुर नवे छेडिता, पांच रुपए बारा आना, ओ हंसिनी, अशी सदाबहार गीते सादर केली. बासरी – सचिन वाघमारे, सिंथेसायझर – रशीद शेख, तबला – रोहित साने, ऑटोपॅड – नंदू डेव्हिड, ट्रंपेट – बाबा खान या कलाकारांनी त्यांना मोलाची साथ दिली. तर कार्यक्रमाचे निवेदक महेश गायकवाड यांनी केले.
पुणे लोकमान्य फेस्टिव्हलचे हे २७ वे वर्ष होते. फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष – ॲड. गणेश सातपुते, उत्सव-अध्यक्ष – डॉ. नरेश मित्तल, निमंत्रक – शुभांगी सातपुते यांनी या महोत्सवाचे आयोजन केले होते.