पुणे, बारामती येथील शारदाबाई विद्या निकेतन येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा ध्रुव ग्लोबल स्कूलच्या जलतरणपटूंनी गाजवली. उत्कृष्ट प्रदर्शन करीत ध्रुवच्या खेळाडूंनी ९ सुवर्ण, १० रौप्य आणि १४ कांस्य असे एकूण ३३ पदकांची कमाई केली. खेळाडूंनी खेळातील सातत्य राखत विजय संपादन केला. तसेच संपूर्ण स्पर्धेत ध्रुवच्या खेळाडूंचा बोलबाला बघायला मिळाला. खेळाडुंच्या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यश मालपाणी व प्रिन्सीपल संगीता राऊतजी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्यात.
आयोजित स्पर्धेत ध्रुव ग्लोबलच्या २७ जलतरणपटूंनी भाग घेतला होता. अर्जुन पुरस्कार विजेते विपत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १६० स्पर्धकांसोबत ही स्पर्धा झाली.
१४ वर्षाखालील मुलेः शर्विल जंगम ५० मीटर बटरफ्लाय (रौप्य), अद्विक भालेकर १०० मीटर बॅकस्ट्रोक (रौप्य) व २०० मी. बॅकस्ट्रोक (कांस्य) आणि विवान काळे ५० मी. फ्रीस्टाईल (कास्य)
१४ वर्षाखालील मुली ः अनया वाणखेडे २०० मी. बॅकस्ट्रोक (कांस्य) , १०० मी. बॅकस्ट्रोक (सुवर्ण) व (रौप्य पदक), रेवा चौगुले १०० मीटर बटरफ्लाय (रौप्य), २०० मी.व ५० मीटर बटरफ्लाय आणि इवा मालवणकर १०० मी. फ्रीस्टाईल (रौप्य पदक), आरोही इनामदार १०० व २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक (सुवर्ण) व ५० मी. ब्रेस्टस्ट्रोक (कांस्य), सिद्धी देखाते १०० मी. बॅकट्रोक (कांस्य) आणि पृथ्विका देशमुख ५० मीटर ब्रेस्ट्रोक (सुवर्ण)
१७ वर्षाखालील मुले ःमंदार कोल्हटकर १०० मी. फ्रीस्टाईल व ५० मीटर बटरफ्लाय (सुवर्ण), आदर्श खोब्रागडे ५० मीटर बटरफ्लाय (रौप्य पदक), जैत्र भोर १०० मी. बॅकस्ट्रोक (कांस्य), व पार्थ पोटे २०० मी. बॅकस्ट्रोक (कांस्य)
१७ वर्षाखालील मुलीः हिया कोटक २०० मीटर बटरफ्लाय (सुवर्ण) व १०० मीटर बटरफ्लाय (कांस्य), निया पतंगे हिने १०० मी. बॅकस्ट्रोक (सुवर्ण), ५० मी. बॅकस्ट्रोक व २०० मी फ्रीस्टाईल (रौप्य),इशान्वी बर्पांडा १०० मी फ्रीस्टाईल (कांस्य) आणि अवंतिका किर्लोस्कर ५० मी. ब्रेस्टस्ट्रोक (सुवर्ण) व ५० मी. फ्रीस्टाईल (कांस्य)
रीले स्पर्धेत ः १४ वर्षाखालील मिडल रीले स्पर्धेत खुश मुंद्रा, विवान काले, आयुष नाशी व अद्विक भालेकर यांना कांस्य पदक, १४ वर्षाखालील मुली फ्रीस्टाईल रीलेः डिंपल खेडकर, रेवा चौगुले, एवा मालवणकर व अन्या वाणखेडे यांना रौप्य पदक आणि १४ वर्षाखालील मुली मिडले रीले ः रेवा चौगुले, आरोही इनामदार, अन्या वाणखेडे व इवा मालवणकर यांना रौप्य पदक
१७ वर्षाखालील मुलेःफ्रीस्टाईल रीलेः मंदार कोल्हटकर, पार्थ पोटे, जैत्र भोर, आदर्श खोब्रागडे यांना कांस्य पदक, १७ वर्षाखालील मुले मिडले रीलेः मंदार कोल्हटकर, परिजात चंद्र, आदर्श खोब्रागडे व जैत्र भोर यांना रौप्य पदक
ध्रुव ग्लोबल स्कूलच्या सर्व जलतरणपटूंना प्रशिक्षक स्मिता काटवे, उमा जोशी, रूपाली अनुप, केशव हजारे यांनी प्रशिक्षण दिले.