पुणे महानगरपालिकेच्या महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे यांनी आज सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयास भेट देऊन विविध नागरी सुविधांचा आढावा घेतला.
यावेळी वटपौर्णिमेनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. “एक कुटुंब – एक वडाचे झाड” या संकल्पनेतून प्रत्येक नागरिकाने किमान एक वडाचे रोप लावावे, असे आवाहन महापौरांनी केले. तसेच उपस्थित नागरिकांना वडाच्या रोपांचे वितरणही करण्यात आले.
महापौरांनी परिसरातील स्वच्छता व्यवस्थेची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. अतिक्रमण झालेल्या ठिकाणांचीही त्यांनी पाहणी करून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. याशिवाय सिंहगड रोड परिसरातील विविध सार्वजनिक ठिकाणांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
आज, २८ जून हा दिवस पोलिओ जनजागृती दिन म्हणून पाळला जात असल्याच्या निमित्ताने महापौरांनी पोलिओ प्रतिबंधक लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली. लहान मुलांना वेळेत पोलिओचा डोस देणे किती आवश्यक आहे, याबाबत त्यांनी नागरिकांना माहिती दिली. तसेच आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेऊन लसीकरण मोहिमेसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
यावेळी क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित हो

