Home Blog Page 621

पर्वतीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतूनही इच्छुकांचे अधिकृत उमेदवारीला आव्हान

पुणे-पर्वती विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल हे इच्छुक उमेदवार असून त्यांच्या समर्थनार्थ आज वाळवेकर लॉन्स पुणे सातारा रोड येथे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आबा बागुल मित्र परिवार व हितचिंतक यांची बैठक पार पडली यावेळी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला असून यंदा पर्वतीमध्ये पर्वती पॅटर्न चालवायचा असून या अनुषंगाने तयारी सुरू ठेवून वेळ प्रसंगी पक्षाचे राजीनामे देण्याची तयारी पदाधिकाऱ्यांनी ठेवली आहे. ही वेळ पर्वतीमध्ये काँग्रेस जिवंत ठेवण्याची आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी यंदा लढण्याचा निर्धार पक्का केला असून आता कोणत्याही प्रकारे माघार घ्यायची नाही असा विश्वास व्यक्त केला. या प्रसंगी आबा बागुलांच्या समर्थनार्थ पर्वती मतदारसंघातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे इच्छुक उमेदवार सचिन तावरे यांनीही अश्विनी कदम यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर नाराज होऊन आज संध्याकाळी बैठक बोलाविली आहे पर्वती मतदार संघातील दोनशे ते अडीशे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी योग्य उमेदवार न दिल्याने नाराज होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा राजीनामा देणार व सचिन तावरे आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत असे तावरे समर्थकांनी कळविले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी उमेदवारांची तिसरी यादी केली जाहीर…

आजच्या यादीत गेवराई, फलटण, निफाड, पारनेरचा समावेश…

मुंबई दि. २७ ऑक्टोबर – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने दिनांक २३ आणि २५ ऑक्टोबर रोजी ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली होती आणि आज ४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेली विधानसभा उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे :
गेवराई – विजयसिंह पंडित
फलटण – सचिन पाटील
निफाड – दिलीपकाका बनकर
पारनेर – काशिनाथ दाते

राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत ४९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना पुण्यात अटक

पुणे-जयश्री थोरात यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या सुजय विखे समर्थक वसंत देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून त्यांना पुण्यातून ताब्यात घेतले आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून ते गायब झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेने आज त्यांना नगर जिल्ह्याबाहेरुन ताब्यात घेतले आहे. त्यांना लवकरच जिल्ह्यात आणले जाणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात येईल.
शुक्रवारी रात्री धांदरफळ येथे सुजच विखे यांच्या वतीने आयोजित मेळाव्यात बोलताना वसंत देशमुख यांनी भाषणादरम्यान बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यानंतर आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सभास्थळी ठिय्या आंदोलन केले होते. तर काही अज्ञातांनी विखे समर्थकांच्या गाड्या तोडफोड करत पेटवून दिल्या होत्या. यामुळे सभास्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता.

पोलिस ठाण्याबाहेर 8 तास ठिय्या आंदोलन केले म्हणून जयश्री थोरात यांच्यासह ५० जणांवर गुन्हे दाखल

जयश्री थोरातांबाबत सुजय विखेंच्या सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर संगमनेरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात जयश्री थोरात, डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबेंसह कार्यकर्त्यांनी रात्री 10 वाजेपासून सकाळी 6 वाजेपर्यंत पोलिस ठाण्याबाहे ठिय्या आंदोलन केले होते. दरम्यान, या प्रकरणात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले होते.

‘अलंकृता ‘ मधून उलगडली लखलख चंदेरी – सोनेरी दागिन्यांची दुनिया !

आर्किटेक्ट, इंजिनिअर्स आणि सर्व्हेअर्स असोसिएशन चा दिवाळी कार्यक्रम

पुणे:आर्किटेक्ट, इंजिनिअर्स आणि सर्व्हेअर्स असोसिएशन(एईएसए) कडून ‘अलंकृता’ या संगीतमय दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन दि. २७ ऑक्टोबर रोजी  सकाळी १०  वाजता  भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (कर्वेनगर) च्या सभागृहात करण्यात आले होते.ग्वाल्हेर घराण्याच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ.रेवा नातू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा अप्रतिम कार्यक्रम सादर केला.ज्येष्ठ आर्किटेक्ट डॉ.अभिजीत नातू तसेच आर्किटेक्ट, इंजिनिअर्स आणि सर्व्हेअर्स असोसिएशनचे चेअरमन  आर्किटेक्ट महेश बांगड यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार झाला. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य होता.

कला, अलंकार आणि संस्कृती चा आविष्कार या कार्यक्रमात झाला. सुरेल गीत रचनांच्या लडीमधून दागिन्यांची कहाणी ‘अलंकृता ‘ मधून उलगडली.अलंकार हा परंपरेने नावीन्याकडे सोपवलेला वारसा मैफलीतून पुढे आला.

राजस सुकुमार,बिंदिया ले गयी हमार ये मछलिया,नथ ही सजली, नथनिया ने बडा दुख दिना,मुंदरी मोरी काहेको छीन रहे,बिल्वर अंगठी तोडे हा मराठी गोंधळ,मंगलाष्टक,   रेणुका स्तोत्र अशा अलंकृत रचनांना डॉ.रेवा नातू यांनी अप्रतिम स्वरसाज चढविला.

निवेदन आणि गायनातून उलगडणाऱ्या अलंकृताला पीएनजी(सांगली )च्या दागिन्यांच्या छायाचित्र प्रक्षेपणाने आगळी उंची प्राप्त झाली. भरतमुनीपासून, संत साहित्यापासून लोकसाहित्य, काव्य शास्त्र विनोदातून अलंकारांचे अलवार  रंग  सजून या मैफलीत आले. उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली.स्त्री धन असलेल्या दागिन्यांच्या प्रकारांची गर्भश्रीमंती या कार्यक्रमातून समोर आली.अलंकार हा परंपरेने नावीन्याकडे सोपवलेला वारसा पुढे आला.

डॉ.मृणाल घोंगडे, मंजुषा उकीडवे यांनी कार्यक्रमाचे बहारदार निवेदन केले. त्यातून दागिन्यांचा इतिहास आणि मनोरंजक नोंदी उलगडल्या.राजीव राजे यांनी प्रास्ताविक केले.   आर्किटेक्ट, इंजिनिअर्स आणि सर्व्हेअर्स असोसिएशन(एईएसए)  चे  संजय तासगावकर,जयंत पटवर्धन,जयंत इनामदार, निनाद जोग,दिवाकर निमकर,पुष्कर कानविंदे,पराग लकडे हे पदाधिकारी उपस्थित होते. ईशा उमराणी यांनी परिचय करून दिला.

उमेश पुरोहित,अक्षय शेवडे,प्रज्ञा देसाई,तुषार दीक्षित,हेमंत पोटफोडे,सारिका सोमण,सानिका जोगळेकर,मधुरा भिडे, पायल वाळके,अनुजा महाजन यांनी अनुरूप साथसंगत केली.

‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ टरबूजाच्या विकृत राजकारणाचे खरे रूप जनतेसमोर आणणारे अनेक धक्कादायक खुलासे-माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा दावा …

मुंबई- माजी गृहमंत्री तथा शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी रविवारी सकाळी त्यांच्या ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ या आत्मचरित्रातील दोन उतारे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. यामध्ये त्यांनी तुरुंगात आलेला अनुभव तसेच एका टरबुज्या नावाच्या गल्लेलठ्ठ उंदराची गोष्ट सांगितली. मी तुरुंगात कित्येकदा उपाशी झोपलो आहे, असा दावा देशमुख यांनी आपल्या आत्मचरित्रात केला. तसेच देवेंद्र फडणवीस यांची तुलना गलेलठ्ठ उंदराशी केली. तर त्यांच्या पुन्हा येईन या घोषणेची अनिल देशमुख यांनी खिल्ली उडवली आहे.

अनिल देशमुख यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, महाराष्ट्राच्या राजकारणातील टरबूज्या – लवकरच तुम्हाला समजेल मी कोणाबद्दल बोलतोय! माझी थरारक आणि अंगावर काटा आणणारी आत्मकथा ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ मधील 16 आणि 20 नंबरच्या प्रकरणातील काही उतारे तुमच्याशी शेअर करतोय. ही फक्त एक झलक आहे, या पुस्तकात टरबूजाच्या विकृत राजकारणाचे खरे रूप जनतेसमोर आणणारे अनेक धक्कादायक खुलासे आहेत.

तुरुंगात अनेकांना घरचे जेवण दिले जात असे. मात्र मला घरचे जेवण द्यायला न्यायालयाची परवानगी नव्हती, म्हणून मला तुरुंगातील जेवणच दिले जायचे. तुरुंगातील जेवण कसे असते याचा अंदाज वाचक लावू शकतात; मात्र, त्यापेक्षाही तुरुंगातील जेवण कितपत सुरक्षित आहे, याची सतत धाकधूक असायची. संपूर्ण तुरुंगात आणि माझ्याही सेलमध्ये उंदीर-चिचुंद्रयांची अगदी भाऊगर्दीच होती. कित्येकदा तर असे व्हायचे की जेवण यायचे आणि मला जेवायला थोडा जरी उशीर झाला, तर तोवर उंदीर-चिचुंद्रया त्यावर तुटून पडलेल्या असायच्या. यामुळे कित्येकदा माझ्यावर उपाशी झोपण्याची पाळीही आली. रविवारी आणि सरकारी सुट्टीच्या दिवशी तर जेवणाची परिस्थिती आणखीच खराब असायची; कारण रविवारी दुपारी 12 वाजता सेलचे दरवाजे जे बंद व्हायचे, ते थेट दुसऱ्या दिवशी 12 वाजता उघडायचे. म्हणजेच रविवारी दुपारी 12 वाजता जे जेवण मिळायचे त्यावरच दुसऱ्या दिवशी जेवण मिळेपर्यंतची वेळ मारून न्यावी लागायची. त्याशिवाय रविवारी दुपारी आलेले जेवण उरवून उंदीर-चिचुंद्रयांपासून त्याचे रक्षण करण्यासाठी ते बादलीच्या वर ठेवून त्याची राखण करत बसावे लागायचे ते वेगळेच, असा अनुभव अनिल देशमुख यांनी पुस्तकात पान क्रमांक 180 वर सांगितला आहे.

अनिल देशमुख यांनी पुढे टरबूजा हा उल्लेख केला आहे. ते लिहितात की, तुरुंगात तसे तर खूपच उंदीर आणि चिचुंद्र्या होत्या. त्यामध्ये एक उंदीर वेगळा होता. अगदी गलेलठ्ठ. साहजिकच तुरुंगातले सगळे त्याला टरबूजा म्हणायचे. त्याला कितीही दूर हाकलायचा प्रयत्न केला तरीही तो अशा काही नजरेने बघायचा की जणू काही ती नजर सांगत असायची मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन… मी पुन्हा येईन..! असे देशमुख यांनी नमूद केले आहे.

बाळासाहेब थोरातांच्या PA सह ५० जणांवर गाड्या पेटविणे, जिवंत जाळून ठार मारण्याचे प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल -संगमनेर पोलिसांची कारवाई

संगमनेर – जयश्री थोरात यांच्याबद्दल वसंतराव देशमुख यांनी केलेल्या विधानानंतर जाळपोळ आणि एका स्कार्पिओ तील व्यक्तींना जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून बाळासाहेब थोरात यांचे पी.ए तसेच कारखान्याचे संचालक व कॉंग्रेस नेते कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्यासह ५० लोकांवर संगमनेर पोलिसांनी गुरन-899-2024 बी. एन. एसकलम 109,118(1),126(2),109(2),191(2),191(3), 190.326(7)33445),223 मुं.पी.का.क 37(1)(3),1.35 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अशोक बाबुराव वालझाडे वध 48 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी रा, निमोण ता संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

1) इंद्रजित थोरात, कारखान्याचे संचालक व कॉंग्रेस पक्षाचे पुढारी, 2) भास्कर खेमनर, (बाळासाहेब थोरात यांचे पी.ए.) 3) सुरेश थोरात राजीयें, 4) सुरेश लक्ष्मण सागरा देवकीठे वा संगमनेर 5) शाबीर (मुना) शफीक तांबोळी रा निभोज ता संगमनेर 6) सिध्दार्थ थोरात रा. जोर्वे ७)गोरक्ष रामदास घुगे रा.निमोण ता संगमनेर, 8) वैष्णाव मुर्तडक रा. संगमनेर (9) निखील बेदप्रकाश पापडेजा रा. संगमनेर 10) शेखर सोसे वा मालुंजे ता संगमनेर, 11) शरद पाव्बाके रा. संगमनेर (12)
सौरभ कडलग रा. संगमनेर 13) हर्षल रहाणे रा.चंदनापुरी 14 )सचिन रामदास दिये, रा तनाव दिघे ता. संगमनेर, 15) अनिल नायता संगमनेर, 16) विजय पवार धुलेवाडी ता संगमनेर 17) निखिल नामाहरी कातोरे रा. संगमनेर, 18) गौरव डोंगरे संगमनेर, 19) अजय फटांगरे रा. घुलेवाडी 20) शुभम धुले रा.घुलेवाडी ता संगमनेर 21) शुभम जाधव राजोता रा.संगमनेर 22) शुभम पेंडभाजे रा. गौल्डन सिटी संगमनेर, 23) भगवान लहामगे रा मालदाड रोड ता संगमनेर, 24) रावसाहेब थोरात रा कवठे सामकेश्वर 25) भरत कळसकर रा. रंगार गली, संगमनेर आणि इतर अजुन 20 से 25 अनोळखी लोक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दि. 25/10/2024 रोजी रात्री 9:45 ते 10/30 वा चे सुमारास चिखली गावात अकोले संगमनेर येथे यांनी हा गुन्हा केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.



वारे पोलीस ..जिला न्याय द्यायचा, तिच्यावरच केला गुन्हा दाखल ..

भाजपा प्रदेशाध्यक्षांनी म्हटले होते …आम्ही महिलेच्या अवमानाबद्दल निषेध करून वसंत देशमुखांवर कारवाई करावी

संगमनेर -ज्या वाक्याचा निषेध खुद्द भाजपच्या प्रदेश अध्यक्षांनी देखील केला आणि महिला सन्मान महत्वाचा आहे असे म्हटले त्याकडेही संगमनेर पोलिसांनी दुर्लक्ष करून आपला राजकीय नेत्यांपुढे असलेला लाळघोटेपणा दाखवून दिलाच .डॉ. जयश्री थोरात यांच्यावर घाणेरड्या शब्दात टीकाटिप्पणी केल्यानंतर संगमनेर मध्ये उद्रेक झाला, या उद्रेकाला आधार धरून संगमनेर मध्ये मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांच्या बगलबच्चांनी संगमनेर मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा सपाटा लावला आहे.

डॉ. जयश्री हिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, तिला पाठबळ देणाऱ्या कार्यकर्त्यांवर सर्रास गुन्हे दाखल करण्यात आले आहे, यातील अनेक कार्यकर्ते तर घटनेच्या वेळी संगमनेर मध्ये सुद्धा नव्हते.

कहर म्हणजे ज्या डॉ. जयश्री थोरात यांच्या बद्दल घाणेरड्या शब्दात टीकाटिप्पणी झाली, रात्रभर कार्यकर्त्यांनी जागून पोलीस स्टेशनमध्ये ठिया दिला तेव्हा कुठे आठ तासानंतर गुन्हे दाखल झाले. आता तिला न्याय द्यायचा सोडून तिच्यावरच जमावबंदीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1) जयश्री थोरात रा- संगमनेर (2) दुर्गाताई तांबे 3) विश्वासराव मुर्तडक रा संगमनेर 4 ही सुधीर तारा संगमनेर पहलाज 5ि) इंद्रजित थोरात र जोर्वे 6) शरयु थोरात / देशमुख रा. संगमनेर (7) सुरेश थोरात स- जोर्वे रा-8) प्रभावती लोणी खु. ता. राहता 9) सचिन गुजर रा. श्रीरामपुर 10) मा. खा. भाऊसाहेब वाकचौरे रा. किडीं 11 बाबा ओडोन रा. बडगावपान ता संगमनेर 2) सिताराम राऊत रा. घुलेवाडी 13) उत्कर्षा प्रेमानंद रुपवते रा. अकोले 14) बा गायकवाड रा. आश्वी, 15) हेमंत ओगले रा श्रीरामपुर, 16) करण ससाणे रा.श्रीरामपुर, 17) दिपाली करण ससाणे रा श्रीरामपुर, 18) अमर कतारी रा. संगमनेर, 19) अशोक सातपुते रा खांजापुर ता. संगमनेर 20) माधवराय कानपडे रा संगमनेर, 21) इंद्रजीत खेमनर रा. साकुर, 22) सचिन सोमनर रा. साकुर, 23) राजाभाऊ खरात राघुलेवाडी, 24) सचिन चौघुले रा. शिर्डी 25) सचिन दिधे रा- तळेगांव दिघे व इतर अनोळखी 20 ते 25 लोक यांच्याविरोधात पोलीस हेड कॉन्स्टेबल 1917 संदिप ज्ञानदेव आधाडे वय. 50 वर्ष, नेमणुक संगमनेर तालुका पोलीस स्टेशन मो.नं. 9881103100 यांनी गुरन – 898/2024 बी. एन. एस कलम 223, महा.पो.का.क 37 (1) (3) चे धन 135 प्रमाणे,गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख संगमनेर शहर पोलीस स्टेशन मो.नं-9011114343
सहायक पोलीस निरीक्षक भान्सी नेम संगमनेर शहर पोलीस स्टेशन मो.नं- 9404807235 यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून त्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
यातील सर्व आरोपीनी यांनी विनापरवाना धरणे आंदोलन व जोडे मारो आंदोलन करन त्यात असंविधानात्मक शब्दोच्चार केले आहेत तसेच सध्या महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चालु असलेल्या आदर्श आचारसंहिता व जिल्हाधिकारी अहिल्यानगर जिल्हा यांचेकडील जमावबंदी आदेशाचे तसेच निवडणुक संदभांचे आदेश क्रमांक डी. सी/ विधानसभा निवडणुक / 14/2024 दि. 15/10/2024 चे आदेशाचे उल्लंघन केले आहे असे यात म्हटले आहे.

जयश्रीताई थोरात या आमच्या मुलीसारख्या आहेत. त्यांच्याबद्दल केलेले विधान अतिशय संतापजनक आहे. मी त्याचा निषेध करतो. कोणत्याही स्थितीत अशी विधाने खपवून घेतली जाणार नाहीत. पण या प्रकाराचा गैरफायदा घेवून विखे पाटील कुटुंबाची कोणी बदनामी करत असेल आणि सुजय विखे यांनी माफी मागितल्यावरही त्यांच्यावर काँग्रेस किंवा अन्य पक्ष भ्याड हल्ले करत असतील, तर हाही प्रकार खपवून घेतला जाणार नाही.- चंद्रशेखर बावनकुळे

अभिजीतने दयाला का मारले? CID लवकरच परत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

सगळ्यांचा आवडता CID सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर रोमांचक पुनरागमन करत आहे त्यामुळे दोन दशकांपेक्षा जास्त काळ ज्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांचे अपार मनोरंजन केले, ते कलाकार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ही बातमी ऐकून प्रेक्षक आनंदले आहेत आणि आपल्या बालपणीच्या आठवणी पुन्हा जिवंत करत असल्याबद्दल निर्मात्यांना धन्यवाद देत आहेत. पण या प्रोमोमध्ये एक अनपेक्षित आणि अविश्वसनीय खोच आहे. एके काळी जिवलग दोस्त असणारे अभिजीत आणि दया आता एकमेकांचे शत्रू झाले आहेत.

जे देशासाठी नेहमी एक होऊन लढले आहेत ते आज शत्रू बनून एकमेकांसमोर का उभे आहेत? अभिजीतने दयाला का मारले?

ACP प्रद्युमनची भूमिका साकारणारे शिवाजी साटम म्हणतात, “मालिकेच्या या आवृत्तीत दया-अभिजीत यांची जोडगोळी तुटली आहे आणि आता दोघे एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. CID चा पायाच हलून गेला आहे. आणि ACP प्रद्युमनचे विश्व उलट-पालट होणार आहे. सहा वर्षांनी पुन्हा ACP प्रद्युमन म्हणून परत येणे स्वप्नवत वाटते आहे. या व्यक्तिरेखेला भरभरून प्रेम मिळाले आहे आणि आम्ही प्रेक्षकांना रहस्य आणि हृदयाची धडधड वाढवणाऱ्या नाट्याने भरलेली थरारक सफर घडवण्याची हमी देतो.”

राजकारण बनला चलन निर्मितीचा धंदा : राजन खान 

न्यायव्यवस्थेला नेमके प्रश्न विचारले पाहिजेत: अॅड. असीम सरोदे

पुणे :युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी यांनी संपादित केलेल्या ‘सत्याग्रही विचारधारा’ या दिवाळी अंकाचा प्रकाशन समारंभ शनिवार,दि.२६ ऑक्टोबर रोजी,सायंकाळी ६ वाजता गांधी भवन(कोथरूड)येथे झाले.ज्येष्ठ लेखक राजन खान,’निर्भय बनो’ चळवळीचे प्रणेते अॅड.असीम सरोदे यांच्याहस्ते हा प्रकाशन समारंभ झाला. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ.कुमार सप्तर्षी  हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.   

एम. एस. जाधव,अन्वर राजन, डॉ उर्मिला सप्तर्षी, प्रशांत कोठडिया, रवींद्र धनक, डॉ. प्रवीण सप्तर्षी, भारदे, एड. स्वप्नील तोंडे,अभय देशपांडे, सौ.रमा सप्तर्षी, प्रसाद झावरे, अप्पा अनारसे, सचिन पांडुळे उपस्थित होते.अभय देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. अन्वर राजन यांनी आभार मानले.

ज्येष्ठ लेखक राजन खान म्हणाले,’डॉ. कुमार सप्तर्षी हे पित्याच्या जागी आहेत.ते देशातील मानवी विद्यापीठ आहेत.सत्याग्रही विचारधारा चालणार नाही असे पुण्यातील अनेकांना वाटत होते. पण या मासिकाने यशस्वी होऊन दाखवले.

‘डॉ. सप्तर्षी यांच्या समाजाबद्दल च्या कल्पना, विचार आवडले. म्हणून एकत्र काम केले. युक्रांद आणि पँथर ने राजकारणात यायला नको होते. त्यांनी देशाला दिशा दिली असती.   समाजकारणात राहून काम करायला हवे होते, राजकारणात जायला  नको होते. राजकारण हा जुगार आहे. कोणाला पाठिंबा द्यावा असा प्रश्न पडतो. धर्म आणि राजकारण हे धंदे आहेत.त्यातून चलन निर्मिती होते. महा विकास आघाडी ला पाठिंबा दिला पाहिजे पण त्यांनी अदानी बरोबर हात मिळवणी केलेली चालणार आहे का ?  असा प्रश्न राजन खान यांनी विचारला.

विचारधारा आणि सध्याच्या नेत्यांबद्दल बोलताना राजन खान पुढे म्हणाले,’नेहरू आणि गांधी सर्वच पक्षांच्या दृष्टीने अडचणीत ठरले असले तरी राहुल गांधींना राजकारण ची नाडी सापडली आहे, असे माझ्या लक्षात आले आहे.त्यांनी डॉ. सप्तर्षी यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे.डाव्यानी तत्व निष्ठता सोडली नसती तर देशाची इतकी वाताहात झाली नसती. त्यामुळे टुकारांना साहेब म्हणावे लागत आहे. पवारांनी बारामतीत फक्त आपल्या कुटुंबियांना निवडणुकीत का उभे करावे, असा प्रश्न विचारला पाहिजे. छत्रपतींचा वारसा त्यांचे वारसा चालवतात का, असाही प्रश्न पडतो.अण्णा हजारे देखील उघडे पडले. आपण त्यांनाही फसलो.

सर्वच जण समाजाला फसवणार असतील तर आपण जायचे कुठे? सरंजामशाही आपल्यालाच हवी आहे, म्हणून ती टिकून आहे. आपण निवडून देतो म्हणून हे सारे चालू आहे.मनुस्मृती टिकून होतीच समाजात, पण लागू होण्याच्या बेतात आहे. परंतु, तरीही या देशातील करुणेचा प्रवाह थांबणार नाही. आपण काय करणार यावर लक्ष ठेवावे लागणार आहे.

एड. असीम सरोदे म्हणाले,’ डॉ सप्तर्षी यांनी सत्याग्रही विचारधाराची वैचारिक बैठक तयार केली आहे. अण्णा हजारेंच्या नादात देश वाहवत गेला. सत्याग्रह कल्पनेबाबत गैरसमज तयार केला. त्यांनी इलेक्टोरल बाँड बद्दल बोलायला हवे होते. न्यायाला अन्यायाचे स्वरूप दिले जात आहे. न्याय व्यवस्थेत लहान लहान चंद्रचूड तयार होत आहेत. न्यायव्यवस्थेला नेमके प्रश्न विचारणारे उरले नाहीत.आपण संवैधानिक पद्धतीने लढलो तर दुराग्रह करणाऱ्यांना अधिक त्रास होतो. असत्य बोलणारांना मोठी किंमत मिळत आहे.म्हणूनच व्रत घेतल्यासारखे सत्याचा मार्ग धरला पाहिजे.गांधी आणि आंबेडकर यांना एकत्र करून चालले पाहिजे.

अध्यक्ष स्थानावरुन बोलताना डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,’सर्व समाजातील अंतर कमी झाल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही. सत्य हे ठामपणे बोलले तर त्याचा प्रभाव पडतो. सध्या अनैतिकता पचविण्याची समाजाची तयारी झाली आहे.तसे होऊ देता कामा नये. लाडकी बहिण म्हणणारे महिलेलाच शिवीगाळ करू लागले आहेत.मागील निवडणुकीत नागरिकांची भीती गेली आहे. अन्याय ही नीती बनू देता कामा नये.काळ सोकावू देता कामा नये.

पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा

पुणे-

पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा पडला आहे. औंध बाणेर रोडवरील दुकानावर चोरट्यांचा डल्ला घातला आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाले आहेत. दुकानातील मोठी रोकड लंपास केल्याची माहिती मिळाली आहे. 

बाणेर भागातील चितळे बंधू मिठाई विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी गल्ल्यातील दीड लाख रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. दुकानात चोरी करणाऱ्या चोरट्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर भागात चितळे बंधू मिठाई विक्री दुकान आहे. शनिवारी रात्री दुकान बंद करण्यात आले. दुकान बंद करण्यापूर्वी हिशेब करण्यात आला. काही रक्कम गल्लयात ठेवण्यात आली होती. मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचा लोखंडी दरवाजा उचकटला. चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. गल्ला उचकटून चोरट्यांनी एक लाख ४१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी चोरट्यांना टिपले आहे. चित्रीकरण तपासून पोलिसांकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे.

गेल्या महिन्यात येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावरील एका मिठाई विक्री दुकानातून चोरट्यांनी रोकड आणि अडीच किलो आंबा बर्फी चोरुन नेली होती. त्यानंतर वारजे भागात एका सुकामेवा विक्री दुकानातून चोरट्यांनी सुकामेव्याची पाकिटे, तसेच गल्ल्यातील रोकड चोरुन नेली होती.

काही काँग्रेसी नेत्यांचे भाजपा धार्जिणे राजकारण: या निष्ठावंत नेत्याने दिलेली कॉंग्रेसची उमेदवारी नाकारली..

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून मागितली होती उमेदवारी.नेत्यांनी दिली अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी

मुंबई: काँग्रेस पक्षाने शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली. काँग्रेसच्या या तिसऱ्या यादीत उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये प्रसारमाध्यमांच्या व्यासपीठावर काँग्रेसची बाजू हिरीरिने मांडणारे प्रवक्ते आणि निष्ठावंत सचिन सावंत यांच्या नावाचा समावेश आहे. सचिन सावंत यांना काँग्रेसने अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरवले आहे. यावर सचिन सावंत यांनी नाराजी दर्शवित मतदारसंघ बदलून देण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसची उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर सचिन सावंत यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तिथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! परंतु मी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नितला यांना पक्षाने निर्णय बदलावा याकरिता विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो, असे सचिन सावंत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मी मतदारसंघ बदलून देण्याचा निर्णय हायकमांडवर सोपवला आहे. याठिकाणी माझ्याऐवजी दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळावी, अशी माझी इच्छा आहे. यामध्ये नाराजीचा कोणताही भाग नाही. मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. केवळ मी जिथून निवडणूक लढण्याची तयारी केली होती, तिकडून मला संधी मिळावी, एवढीच माझी अपेक्षा असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटले. सचिन सावंत यांनी मतदारसंघ बदलून मागितल्याने काँग्रेस नेतृत्व याबाबत काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल.

मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तीथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उबाठा पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून…

राज ठाकरेंच्या मुलास पाठिंबा देण्यावरून शिंदेसेना भाजपमध्ये वाद उफाळला

मुंबई-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित हे माहीममधून लढणार आहेत.राज ठाकरेंच्या मुलास पाठिंबा देण्यावरून शिंदेसेना भाजपमध्येही वाद उफाळला आहे.महायुती व महाविकास आघाडीच्या ७५% उमेदवारांची नावे जाहीर झाली तरी अजून जागावाटप ठरलेले नाही. दुसरीकडे जाहीर झालेल्या जागांवरून दोन्ही गटांत वादांची मालिका सुरूच आहे.

माहीम मधून शिंदे सेनेने आमदार सदा सरवणकर यांना तिकीट दिले आहे, तर भाजपने मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी अमित यांना युतीने पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव ठेवला. मनसेने लोकसभेत पाठिंबा दिला होता, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पाठिंब्यास अनुकूल आहेत, मात्र शिंदसेनेने हा मतदारसंघ न सोडण्याची भूमिका घेतली आहे. आमदार सदा सरवणकर म्हणाले, ‘राज ठाकरे आणि शेलार मित्र आहेत. त्यामुळे ते बोलले असतील, पण माझ्यावर दबाव नाही. मुख्यमंत्र्यांनी मला एबी फॉर्म दिला आहे. मी अर्ज भरनारच, मला मागच्या दाराने जाणे पसंत नाही.’ दरम्यान, सरवणकरांच्या उमेदवारीसाठी त्यांच्या शेकडो समर्थकांनी प्रभादेवीत शक्ती प्रदर्शन केले.

वांद्रे टर्मिन्सवर चेंगराचेंगरी:दोघांची प्रकृती चिंताजनक, 9 जण जखमी

मुंबई- वांद्रे टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. या झालेल्या चेंगराचेंगरीत 9 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दिवाळीच्या सुट्टीमुळे गाड्यांना मोठी गर्दी आहे. गोरखपूर एक्सप्रेसमधून जाण्यासाठी बांद्रा स्टेशनवर जमलेल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि यानंतर चेंगराचेंगरी झाली.शब्बीर अब्दुल रहमान (40), परमेश्वर सुखदार गुप्ता (28), रवींद्र हरिहर चुमा (30), रामसेवक रवींद्र प्रसाद प्रजापती (29), संजय तिलकराम कांगे (27) अशी जखमींची नावे आहेत. दिव्यांशु योगेंद्र (18), मोहम्मद शरीफ शेख (25), इंद्रजीत साहनी (19) आणि नूर मोहम्मद शेख (18),अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

‘सी- व्हिजिल’ ॲपवर दाखल 301 तक्रारींवर पहिल्या शंभर मिनीटात कार्यवाही- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि. 26: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आदर्श आचारसंहिता भंगाच्या 333 तक्रारीवर कार्यवाही करण्यात आली आहे. त्यापैकी 301 तक्रारींवर पहिल्या 100 मिनिटात कार्यवाही करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास सर्वसामान्य मतदार, नागरिकांना थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘सी व्हिजिल’ ॲप विकसित केलेले आहे. या ॲपवर दाखल होणाऱ्या तक्रारींवर 100 मिनिटांत पहिली कार्यवाही केली जात आहे.

या ॲपवर जिल्ह्यात नागरिकांकडून 352 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 333 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे. तर त्यापैकी आंबेगाव विधानसभा मतदार संघात 5 तक्रारी, बारामती 12, भोसरी 1, चिंचवड 6, दौंड 4, हडपसर 3, इंदापूर 1, जुन्नर 3, कसबा पेठ 28, खडकवासला 5, मावळ 6, पर्वती 61, पिंपरी 2, पुणे कॅन्टोन्मेंट 20, शिवाजीनगर 7 आणि वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात 137 अशा एकूण 301 तक्रारींवर पहिल्या शंभर मिनीटात कार्यवाही करण्यात आली आहे.

‘सी व्हिजिल’ ॲप अँड्रॉइड आणि आयओएस डिव्हाइसवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी, वापरकर्त्यांनी फक्त ॲप उघडणे, उल्लंघनाचा प्रकार निवडणे आणि घटनेचे तपशिल, स्थान, वेळ आणि छायाचित्रे किंवा व्हीडिओ अपलोड करणे आवश्यक आहे. या ॲप तक्रार दाखल करणाऱ्या तक्रारदाराची ओळख गुप्त राखण्यात येते.
0000

केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षात आखलेल्या ध्येय-धोरणांमुळे भारताचा पायाभूत क्षेत्रात विकास झाला आहे.

पुणे-मेट्रो, रेल्वे, उद्योग, शिक्षण, आरोग्य, अशा क्षेत्रात विकास झाला त्यामुळे देश प्रगतीपथावर आहे. ही बाब लक्षात आल्याने भारताविषयी विकसित देशांना आदर वाटत आहे. विविध देशांमध्ये देशात संधी आहेत. त्या संधींसाठी राजकीय स्थैर्य आवश्यक आहे, असे मत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले.

यशस्वी ग्रुपच्या वतीने जागतिक स्तरावरील सध्याच्या उदयोन्मुख संधी या विषयावर आयोजित व्याख्यानात जयशंकर बोलत होते. यावेळी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, यशस्वी ग्रुपचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना समितीचे राज्याचे सल्लागार राजेश पांडे, उद्योजक विशाल चोरडिया आदी उपस्थित होते.

जयशंकर म्हणाले देशात आज मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत.दररोज १२ ते १४ किलोमीटर रेल्वे ट्रॅकची, तर दररोज साधारण २८ किलोमीटर रस्ते तयार होत आहेत. दिवसाला दररोज दोन कॉलेज कार्यान्वित होत असून, उद्योगांची सुरुवात होत आहे. जगातील विकसित देशांना ही गुंतवणुकीची संधी वाटते. सध्याच्या परिस्थितीत जगातील नामांकीत कंपन्यांचे सुमारे १८०० ग्लोबल कॅपॅबिलिटीज सेंटर विविध महानगरांमध्ये सुरू झाले आहेत. देशाच्या विकासासोबतच हे परिवर्तन वाढणार आहे. त्यासाठी देशात राजकीय स्थैर्य आवश्यक आहे, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

जगातील काही देशांमध्ये युद्ध सुरू आहे, तर काही देशांमध्ये तणाव. मात्र, त्यातही रोजगाराच्या आणि व्यवसायाच्या संधी भरपूर आहे. जागतिक संधींची सुरुवात आपल्या घरातून होते. त्यासाठी कशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. आपल्या युवकांना कौशल्यांचे योग्य प्रशिक्षण दिल्यास, उत्तम मनुष्यबळाची निर्मिती होईल. देशात राजकीय स्थैर्य आणि चांगले सुशासन असल्यास, भारतीयांना जागतिक संधींचा लाभ घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, जर्मनीचे शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर असून, त्यात अनेक कुलगुरू, उद्योगपती आणि मंत्री आहेत. या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, विविध क्षेत्रात काम करण्याबाबत आश्वासन दिले आहे. त्यांनी दरवर्षी २० हजार भारतीय युवकांना नोकरीसाठी व्हिसा देण्याचे ठरवले आहे. मात्र, आम्ही ही संख्या ९० हजारांपर्यत वाढविण्याचे ठरविले आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यापासून अनेक देशांचे प्रमुख आणि शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी वेळ मागत आहेत. याहून भारताचे वाढलेले महत्त्व लक्षात घ्यावे लागेल.

कुलकर्णी यांनी स्वागतपर भाषण केले.सूत्रसंचालन अमृता करमरकर यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस यांनी आभार मानले.