Home Blog Page 610

महेशदादा लांडगे यांनी पक्षभेद बाजूला ठेवून कामे केली – माजी महापौर मंगलाताई कदम यांचे प्रतिपादन

पिंपरी, पुणे (दि. ४ नोव्हेंबर २०२४) भोसरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार महेशदादा लांडगे यांनी विकास कामे करताना पक्षभेद बाजूला ठेवून कामे केली. राष्ट्रवादीच्या कारकिर्दीत भूमिपूजन झालेली कामे, अनेक प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावले असे प्रतिपादन माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या मंगलाताई कदम यांनी माध्यमांशी बोलताना केले.
मंगलाताई कदम म्हणाल्या की, महायुतीमध्ये भोसरी मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. मित्रपक्ष या नात्याने आम्ही महायुतीचे काम करत आहोत. आमदार महेश दादा लांडगे यांनी निवडणूक ही निवडणुकीपूर्तीच ठेवली. मागच्या वेळी महायुती नव्हती. मात्र आमदार लांडगे तसेच कार्तिक लांडगे यांनी पक्षभेद बाजूला ठेवून कामे केली. कृष्णा नगर मधील रायरेश्वर मंदिर सभा मंडप, कृष्ण मंदिर सभा मंडप, शिवाजी पार्क मधील विठ्ठल मंदिरातील सभामंडप, अशी अनेक कामे आम्ही विरोधात असताना त्यांना सांगितली ती त्यांनी पूर्णत्वास नेली. भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन राष्ट्रवादीच्या कार्यकाळात झाले होते ते त्यांनी पूर्णत्वास नेले. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, संत पीठ प्रकल्प साकारले. बफर झोनचा प्रश्न मार्गी लावला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र त्यांच्याच पुढाकाराने झाले. संविधान भवन ची संकल्पना त्यांनी मांडली ती ही पूर्णत्वास येणार आहे. प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमिनीचा परतावा देण्याचा प्रश्न, शास्तीकर माफीचा प्रश्न आ. लांडगे यांनी मार्गी लावला. मोरे वस्तीतील काही भागात अडचणींचा भाग असल्याने रस्त्याचे प्रश्न होते ते त्यांनी सोडवले असे मंगला कदम यांनी सांगितले.
आ. लांडगे यांनी नगरसेवकाच्या पातळीवर येऊन, त्यांच्या बरोबरीने काम केले. कोविड काळात स्वतःची स्वतंत्र यंत्रणा राबवली. अनेकांना मदतीचा हात दिला. शेवटी काम होणे महत्त्वाचे असते त्या त्या भागातील काम झाल्यास त्या नगरसेवकालाच त्याचे श्रेय मिळत असते त्यामुळे आपल्या पाठीशी उभा राहणारा आमदार म्हणून आम्हाला नेहमीच आमदार महेशदादा लांडगे यांचे कौतुक वाटले असे कदम म्हणाल्या. विविध प्रकारची नागरी सेवा, सुविधा आदी कामे मार्गी लागावी यासाठी आमदार महेशदादा लांडगे यांनी उभारलेल्या यंत्रणेचे अतिशय कौतुक वाटते. शेवटी काम करतो तो चुकतो आमदार महेशदादा लांडगे यांच्याकडूनही एखादी चूक झालेली असू शकते. मात्र त्यामुळे त्यांनी केलेल्या चांगल्या कामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही असे कदम यांनी सांगितले. कामाच्या बळावर आमदार महेशदादा लांडगे हे पुन्हा एकदा विक्रमी मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास माजी महापौर मंगला कदम यांनी व्यक्त केला.

आकांक्षा नव्या युगाच्या पुस्तक युवा पिढीला मार्गदर्शक : कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी

अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सचे संस्थापक डॉ. संजय गांधी लिखित पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दर दोन वर्षांनी बदल घडत आहेत. तंत्रज्ञानातील बदल लक्षात घेऊन रोजगार क्षमता, उद्योजकता आणि शाश्वत विकास ही त्रिसूत्री केंद्रस्थानी ठेवून डॉ. संजय गांधी यांनी लिहिलेले आकांक्षा नव्या युगाच्या हे पुस्तक युवा पिढीला मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी व्यक्त केला.
सकाळ प्रकाशनतर्फे प्रकाशित आणि अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सचे संस्थापक डॉ. संजय गांधी लिखित आकांक्षा नव्या युगाच्या या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. गोसावी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, पद्मश्री दादा इदाते, डी. आय. सी. सी.चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे, आय. आय. आय. टी. अलाहाबादचे संचालक प्रा. मुकुल सुतावणे, सकाळ प्रकाशनचे अशुतोष रामगिर, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, पुस्तकाचे शब्दांकनकर्ते प्रसाद मिरासदार, अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सचे संस्थापक डॉ. संजय गांधी, अस्पायर नॉलेज ॲन्ड स्किल्सच्या संचालक समीधा गांधी, संवाद, पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे मंचावर होते.
डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, डॉ. संजय गांधी यांनी विकासाची त्रिसूत्री मांडताना शाश्वत विकासाचे ध्येय समोर ठेवून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याचा आढावा पुस्तकामार्फत युवा पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचविला आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुर्ननिर्मितीवर भर देताना डॉ. संजय गांधी यांनी पाच आरची तत्त्वे मांडली आहेत, ज्यात रिड्युस, रियुज, रिफ्यूज, रिपेअर आणि रिसायकल यांचा विचार केला आहे. त्या बरोबरीनेच आजच्या तांत्रिक युगात रिकॉन्फिगर या सहाव्या आरचाही समावेश व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सुरुवातीस डॉ. संजय गांधी यांनी पुस्तकाच्या निर्मितीमागील भूमिका विशद केली. युवा पिढीने रोजगारक्षम होऊन शाश्वत विकासाच्या माध्यमातून कार्यरत व्हावे यासाठी या पुस्तकाची निर्मिती केली आहे, असे समीधा गांधी म्हणाल्या.
पद्मश्री दादा इदाते म्हणाले, नाविन्य, धडपड, येणाऱ्या पिढीविषयी आस्था, सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास, रोजगार, उद्योजकता या विषयी समाजजीवनात नविन इतिहास घडविणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे डॉ. संजय गांधी होत. आकांक्षा नव्या युगाच्या हे पुस्तक संभ्रमित युवा पिढीला, त्यांच्या स्पदंनांना साद घालणारे ठरेल.
पद्मश्री मिलिंद कांबळे म्हणाले, या पुस्तकाच्या निर्मितीने साहित्य क्षेत्रात मोलाची भर पडली आहे. हे साहित्य भविष्याचे वेध घेणारे आहे. युवा पिढीच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षांना जागृत करणारी त्रिसूत्रीची मांडणी महत्त्वाची ठरणार आहे.
प्रसाद मिरासदार यांनी पुस्तकाविषयी सविस्तर माहिती दिली. युवा पिढीने या प्रेरणादायी पुस्तकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
मान्यवरांचे स्वागत डॉ. संजय गांधी, समीधा गांधी, सुनील महाजन यांनी केले. सामाजिक क्षेत्रात कार्यरत हुनर गुरुकुल, असीम फाऊंडेशन, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन तसेच रिलायन्स ग्रुपचा सन्मान पद्मश्री दादा इदाते आणि पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला. आभार निकिता मोघे यांनी मानले.

“अनुपम खेर हिंदी मीडियम मधले , ज्यांनी हॉलीवूडमध्ये आपली छाप सोडली!” – अनिल कपूर


अनिल कपूर, ज्यांनी अनुपम खेरसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि त्यांची कला जवळून अनुभवली आहे, अनुपम खेर ला ” इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या रिस्क-टेकरपैकी एक” म्हणून ओळखले आहे.

अनिल कपूर यांच्या मते, अनुपम खेर प्रत्येक त्या व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहेत, ज्याने स्वप्न पाहण्याचे धाडस केले आहे. अनिल कपूर यांना विशेष वाटते की हिंदी मीडियमच्या पार्श्वभूमीतून असूनही, अनुपमने हॉलीवूडमध्ये मोठ्या दिग्दर्शकांसह काम केले, हे त्यांच्या कलेची ओढ आणि जागतिक सिनेमा क्षेत्रात नाव कमावण्याच्या जिद्दीचे प्रतीक आहे.

अनिल म्हणतात, “अनुपम खेर हे आमच्या इंडस्ट्रीमधले सर्वात मोठे रिस्क-टेकर आहेत. ते असे बहुपरिचित कलाकार आहेत जे काहीही करू शकतात. मला अनुपमसोबत काम करण्याचा आनंद मिळाला आहे, आणि ते खरंच भारतातील सर्वोत्तम कलाकारांपैकी एक आहेत.”

ते पुढे म्हणतात, “हिंदी मीडियममधला मुलगा असूनही अनुपमने हॉलीवूडमध्ये आपली छाप सोडली, हे त्यांच्या कलेतून कौटुंबिक अभिमान कमावण्याच्या ओढीचे प्रतीक आहे. त्यांनी भारतात आणि जगातील मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.”

अनिल कपूर अनुपम खेरच्या आगामी नेटफ्लिक्स रिलीज “विजय 69” साठी शुभेच्छा व्यक्त करतात आणि ते जागतिक स्तरावर हिट होवो, अशी त्यांची इच्छा आहे. YRF एंटरटेनमेंटद्वारे निर्मित “विजय 69” हा YRF आणि नेटफ्लिक्समधील चौथा प्रोजेक्ट आहे.

ते म्हणतात, “विजय 69 हे अनुपमच्या कष्ट आणि त्यांच्यातील अभिनय कौशल्याचा उत्तम नमुना आहे. 69 व्या वर्षातसुद्धा अनुपम कामाबद्दल तितकेच जिद्दी आणि प्रेरित आहेत. ते अत्यंत शिस्तप्रिय, जीवनाचा पुरेपूर आनंद घेणारे, उत्तम वाचन करणारे, मजेशीर आणि चांगले मित्र आहेत!”

अनिल आणि अनुपम यांचे वर्षानुवर्षे मैत्रीचे नाते आहे आणि फिटनेससाठी दोघांचे समान प्रेम आहे. ते एकमेकांना जिममध्ये पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. त्यांच्या जिमचे फोटो येथे पहा: https://www.instagram.com/p/DB7_6otNEsK/?igsh=andubzJsbGJrNWhr

अनिल म्हणतात, “मला आवडते की अनुपम फिटनेसला महत्त्व देतो, जो आमच्यातील एक कॉमन ग्राउंड आहे. जिममध्ये आम्ही एकमेकांना प्रेरणा देतो. 69 वर्षांचा असूनही, अनुपम तरुण मुलासारखा आहे, आणि विश्वास ठेवा, जिममध्ये तो स्वतःला खूप पुश करते !”

खडकवासला विधानसभा मतदारसंघात टपाली मतदान प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी


पुणे: खडकवासला विधानसभा मतदारसंघात टपाली मतदान प्रक्रियेची सुरुवात प्रभावीपणे करण्यात आली असून निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या आदेशानुसार या प्रक्रियेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी हि नोडल अधिकारी आणि त्यांच्या टीमकडे सोपविण्यात आली आहे. निवडणुक संचालन नियम, १९६१ नुसार, निवडणुक कर्तव्यार्थ अधिकारी-कर्मचारी, दिव्यांग मतदार, ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदार, तसेच अत्यावश्यक सेवेतील मतदारांना टपाली मतदानाची सुविधा दिली जाते.
खडकवासला मतदारसंघात संबंधित मतदारांनी EDC (फॉर्म १२ अ) चा वापर केला आहे. तसेच दिव्यांग व ८५ वर्षांवरील मतदारांसाठी मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. अशी माहिती तहसीलदार किरण सुरवसे, सचिन आखाडे, अंकुश गुरव यांनी दिली आहे.या व्यवस्थेमुळे अधिकाधिक मतदारांना मतदान करण्याची संधी मिळाली असून, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व सोय सुविधा वाढली आहे.

निवडणूक लढविणारे उमेदवार आणि समर्थक आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास तक्रार करा!

भारत निवडणूक आयोगाने तयार केले सी-व्हिजिल
भारत निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल नावाचे अँप तयार केले आहे, ज्याद्वारे निवडणूक लढविणारे उमेदवार आणि समर्थक आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास त्यांना सहज पकडले जाईल.
आता निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन करणे आता सोपे नसणार कारण आता – तंत्रज्ञानाच्या मदतीने नियम मोडणाऱ्या राजकीय नेत्यांवर कारवाई करण्याची तयारी निवडणूक आयोगाने केली आहे. आयोगाने सी-व्हिसल अँप तयार केले आहेत, आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास मुख्यत:निवडणूक लढविणारे उमेदवार आणि समर्थक सहज पकडले जाऊ शकतात. उमेदवारांच्या सोयीसाठी काही अँप तयार करण्यात आले असून, ही माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. म्हणजेच नेत्यांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जावे लागणार नाही.
निवडणुकीत आचारसंहितेचा भंग होऊ नये आणि निवडणूक निष्पक्ष व शांततेत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग अनेक आधुनिक तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करीत आहे आहे. आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने लोकांच्या सोयीसाठी आता अँड्रॉइड फोनमध्ये ‘सी-व्हिजिल’ अँप विकसित केले आहे. निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे कि, आचारसंहितेच्या उल्लंघनाची माहिती मिळण्यास उशीर होत असल्याने गुन्हेगारांना शिक्षा होत नाही तसेच फोटो किंवा व्हिडिओ व्यतिरिक्त अशा पुराव्याशिवाय तक्रारींची पडताळणी करणे अवघड आहे. बहुतांश तक्रारी खोट्या असल्याचे आढळून आले आहे
निवडणूक आयोगाने म्हटले आहे कि, परंतु आता ‘सी-व्हिजिल’ अँपच्या मदतीने आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारींमध्ये उणीव भरून निघेल, जेणेकरून तक्रारींची तातडीने निवारण करता येईल, आणि आचारसंहिता उल्लंघनाचा थेट अहवाल पाठवू शकता.
नोंदणीकृत अहवाल असल्यास, संबंधित व्यक्तीला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर जारी केला जाईल, जेणेकरून तो त्याच्या प्रकरणाची स्थिती ट्रॅक करू शकेल. निनावी तक्रारींना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला जाणार नाही. ‘सी-व्हिजिल’ प्रणालीत तक्रार मंजूर झाल्यानंतर जिल्हा नियंत्रण कक्षाला कळविण्यात येईल, ते फिरत्या भरारी पथकाला कारवाईचे निर्देश देतील.
आता निवडणुका होणार असून निवडणूक आयोग राष्ट्रीय तक्रार तक्रार सेवा, एकात्मिक संपर्क केंद्र, सुविधा, सुगम, इलेक्शन मॉनिटरिंग डॅशबोर्ड आणि वन वे इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सारख्याअँप्सचा वापर करेल. आयोगाने म्हटले आहे की, ‘सुविधा’ ही एक खिडकी प्रणाली आहे, जी 24 तासांच्या आत निवडणुकीशी संबंधित परवानगी किंवा मंजुरी प्रदान करते. जाहीर सभा, उमेदवार आणि राजकीय पक्षांना या यंत्रणेच्या माध्यमातून सभा, आरसे लावणे, गाड्या घेणे, तात्पुरती निवडणूक कार्यालये उभारणे आणि एकाच ठिकाणी लाऊडस्पीकर लावण्याची मुभा देण्यात येणार आहे.
निवडणुकीतील गैरप्रकारांबाबत तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना सी व्हिजिल ॲपची सुविधा उपलब्ध केली आहे. नागरिक आक्षेपार्ह छायाचित्र वा चित्रफित या ॲपवर पाठवून त्याची तक्रार नोंदवू शकतात. या तक्रारीवर भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई केली जाते. निवडणुकीच्या धामधुमीत आचारसंहितेचा भंग वा तत्सम गैरप्रकारांविषयी तक्रार करण्यासाठी सी – व्हिजिल ॲप विकसित करण्यात आलेले आहे.
अँप अधिक सक्षम कसे आहे याचा दुरुपयोग का करता येत नाही …

  • फोटो अथवा व्हिडिओ क्लिक केल्यानंतर ‘सी-व्हिजिल’ वापरकर्त्यास केवळ 5 मिनिटांचा अवधी मिळेल.
  • हे अँप आधीच मोबाईलवर रेकॉर्ड केलेल्या फोटो आणि व्हिडिओंची अपलोड करण्याची परवानगी देत नाही.
  • अँपवरून क्लिक केलेले फोटो अथवा व्हिडिओ थेट फोन गॅलरीमध्ये जतन करता येत नाही.
  • एकसारख्या तक्रारीच्या दरम्यान किमान 5 मिनिटांचा विलंब करावा लागतो.
  • ‘सी-व्हिजिल’चा वापर केवळ आदर्श आचारसंहिता उल्लंघनाशी संबंधित खटले दाखल करण्यासाठी केला जातो .
    स्मार्टफोनवरून या अँपच्या माध्यमातून आदर्श आचारसंहिता भंगाची तक्रार करता येते . यानुसार खालील पद्धतीने तक्रारिंवर कारवाई होते
    १. आचारसंहिता भंग होत असल्याचे आढळल्यास नागरिकांने संबंधित घटनेचे एक छायाचित्र अथवा 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा. जी.पी.एस.द्वारे स्वयंचलीत स्थान मॅपिंगसह अँपवर फोटो अथवा व्हिडिओ अपलोड करावा. त्यानंतर तक्रारदार नागरिकाच्या मोबाईलवर केलेल्या तक्रारीचा मेसेज द्वारे युनिक आयडी प्राप्त होतो. प्रत्येक तक्रारींसाठी एक आयडी मिळतो . तसेच अँप वापरनाऱ्यास ‘सी-व्हिजिल’ अँपवर आपली ओळख लपवून देखील तक्रार नोंदविण्याचा पर्याय दिलेला आहे. यात वापरकर्त्याच्या मोबाइल नंबर आणि इतर प्रोफाइल माहिती अँप प्रणालीवर पाठवले जात नाहीत त्यामुळे निनावी तक्रारींना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर दिला जात नाही. त्याच्या तक्रारीवर कारवाई ही होणार असली तरी निनावी तक्रारीच्या बाबतीत, तक्रारकर्त्यास त्याच्या प्रकरणाची स्थिती ट्रॅक करता येत नाही .
    २.तक्रारकर्त्याने तक्रार नोंदविल्यानंतर ती पाच मिनीटातच जिल्हा नियंत्रण कक्षाकडे दाखल होईल. त्यानंतर ती तक्रार तक्रारीचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या एसएसटी, व्हीएसटी आणि भरारी पथकाकडे पाठविण्यात येईल. त्या नुसार संबंधित पथकाकडे असणाऱ्या ‘जीव्हीआयजीआयएल अन्वेषक’ नामक जीआयएस-आधारित मोबाइल ऍप्लिकेशनच्या सहाय्याने जीआयएस संकेत आणि नेव्हीगेशन तंत्रज्ञानाचा वापर करून ते संबंधित पथक घटनास्थळावर पोहोचाल. त्यानंतर संबंधित तक्रारी बाबत तपास व तक्रारीतील तथ्यांची तपासणी करून त्याचा अहवाल निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे तातडीने पाठवतील. हा एकूण कालावधी ३० मिनिटांचा असेल
    ३.भरारी पथकाने अहवाल संबंधित निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे पाठविल्यावर, त्या घटनेतील तथ्य, पुरावा आणि अहवालाच्या आधारे निवडणुक निर्णय अधिकारी ती तक्रार फेटाळण्याची अथवा , निकाली काढावयाची की पुढे पाठवायचे याचा निर्णय घेतील. जर त्या तक्रारीत तथ्य अढळले तर भारत निवडणूक आयोगाच्या राष्ट्रीय तक्रार पोर्टलवर माहिती पाठविण्यात येईल. तक्रार अपलोड केल्यापासून अवघ्या 100 मिनिटांच्या आत तक्रारीची स्थिती तक्रारकर्त्याला मोबाईलवर संदेशाने प्राप्त होईल.
    ‘सी-व्हिजिल’ वर खालील कारणांसाठी तक्रार करता येईल
  • मतदारांना मारहाण अथवा दमबाजीच्या प्रकारात.
  • पेड न्यूज आणि फेक न्यूज संबंधी.
  • मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक करणे.
  • मतदारांना अमिष म्हणून वस्तूंचा वापर.
  • उमेदवाराच्या मालमत्ता अपात्रते संबंधी व इतर.
  • जमावाला चिथावणीखोर भाषण देणे.
    -मतदारांना पैसा, मद्य आणि आमली पदार्थांचे वाटप.
  • शस्त्रसाठा अथवा शस्त्र वापर.
    सी-व्हिजिल’वरील नोंदविलेली तक्रार योग्य असल्यास काय कारवाई होईल
  • कारवाईतील रोख रक्कम जप्त होणार.
  • कारवाईतील मद्य अथवा आमली पदार्थ जप्त होणार.
  • संबंधितांवर एफआयआर नोंदवला जाईल.
  • संबंधितांवर गुन्हेगारी कारवाई होणार.
    लेखक : प्रा योगेश अशोक हांडगे

चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी निवडून आणू – अमोल बालवडकरांनी दिला शब्द

पुणे- कोथरूड चे युवा नेतृत्व, माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी चंद्रकांत दादा पाटलांना विक्रमी मतांनी विजयी करून दाखवू असे म्हटले आहेत तसा शब्द त्यांनी आज भाजपा नेते ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलाय .बालवडकर म्हलेत कि,’संघटन मे ही शक्ती है। हे ब्रीदवाक्य आमचे आहे. आज आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली..त्यांची प्रत्येक भेट ही प्रेरणा देणारी असते, आजची भेट ही तशीच प्रेरणादायी होती ,१० वर्ष पक्षाचे तन मन धनाने अथक काम केल्यानंतर मी विधानसभा निवडणुकीसाठी कोथरुड मतदारसंघातून इच्छुक होतो..
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून माझ्या इच्छेचा सन्मान करून निवडणुकीत चंद्रकांत दादा पाटील यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले,नेत्याचा आदेश “सर आँखो पर”…आम्हास आहे याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र यांनी आज भेट दिली, संघटन हीच शक्ती आहे आणि भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांच्या कार्याचा योग्य वेळी योग्य तो सन्मान केल्या जाईल असे यावेळी देवेंद्र म्हणालेत.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोथरुड विधानसभा मतदारसंघ येथून चंद्रकांत दादा पाटील यांना बहुमताने निवडून येण्यासाठी अथक परिश्रम करण्याचा शब्द ही मी देवेंद्रजी यांना दिला आहे.

कॉंग्रेसचे लाडकी बहिण योजनेविरुद्ध षडयंत्र!

नागपूर

  • चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप
  • अपमान करणाऱ्यांना महिलाच धडा शिकवतील

कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी महाराष्ट्रातील लाडकी बहिण, शेतकऱ्यांची वीज बिलमाफी या योजना चुकीच्या असून त्या सरकारला दिवाळखोरीकडे नेतील असे विधान करून आपले महिला व शेतकरीविरोधी आकस उघड केला. इतकेच नव्हे, लाडकी बहिण योजनेविरुद्ध षडयंत्रही जनतेसमोर आले, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. कॉंग्रेसचे षंडयंत्र आम्ही हाणून पाडू. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आणि भाऊ त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

ते कोराडी (नागपूर) येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. कॉंग्रेसने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशमधील महिलांसाठी सुरू असलेल्या योजना बंद पाडल्या किंवा जाहीर करून त्या पूर्ण केलेल्या नाहीत. कॉंग्रेसने मतदारांची फसवणूक केली, याकडे लक्ष वेधून बावनकुळे म्हणाले, “महाविकास आघाडीचे नेते भाऊबिजेच्या दिवशी महिलांचा अपमान करीत असून, आजचे संजय राऊत याचे विधान महिलांचा अपमान करणारे आहे. महिलांचा अपमान करणाऱ्यांना महिलांनी चप्पल दाखविली पाहिजे, महिलांचा अपमान लाडक्या बहिणी कदापिही सहन करणार नाहीत. त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून धडा शिकवेल आणि वचपा काढतील.

  • राहुल गांधीचा खोटारडेपणा खोडून काढू!
    राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन भारतातील एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण संपविण्याची भाषा केली आहे. नाना पटोले हे त्यांचे समर्थन करतात. देशाला आरक्षणाची गरज नाही असे म्हणणाऱ्या राहूल गांधी यांना आम्ही जाब विचारू. मागासवर्गीयांची मते घेण्यासाठी राहुल गांधी नागपुरात येत असून त्यांचा खोटारडेपणा आम्ही खोडून काढणार आहोत.
  • मविआ महाराष्ट्राला काय देणार!
    महाविकास आघाडीच्या नेत्यांजवळ बोलण्यासाठी काहीच मुद्दे नाहीत. मविआच्या सर्व नेत्यांना आव्हान आहे, त्यांनी आपला जाहीरनामा आणावा त्यात जनतेच्या विकासासाठी काय आहे हे दाखवावे. आम्ही सांगतो आहोत की, लाडक्या बहिणींना पाच वर्षांपर्यंत दरवर्षी १८ हजार रूपये देऊ, मध्यमवर्गीयांच्या घरांचे सूर्यघर योजनेतून वीज बिल माफ करू. पीक विमा योजना देऊ, त्याप्रमाणे मविआच्या नेत्यांनी जाहीर करावे.

ते असेही म्हणाले…

  • आव्हाड विकासाबद्दल बोलू शकत नाही. अडीच वर्षे जु्न्या घटनांवर बोलून सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधकांकडे मुद्दे नाहीत.
  • गोपाळ शेट्टी यांचे संपूर्ण आयुष्य भाजपामध्ये गेले ते उद्यापर्यंत निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या विकासाला साथ देतील. दादाराव केचे यांचे आभार मानतो.
  • पक्षातील निष्ठावंत अर्ज मागे घेतील. पक्षाच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा पक्षाचे दरवाजे कायमचे बंद होतील.
  • अब्दुल सत्तार यांच्याशी असणारी लढाई स्थानिक मुद्यांवर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव निवडणुकीच्या लढाईत आणू नये.

मोबाइलच्या विश्वात हरवलेलं बालपण बच्चे कंपनीला अनुभवता आलं, याचा विशेष आनंद – चंद्रकांत पाटील

पुणे : दिवाळी म्हटलं कि लहान मुलांची लगबग सुरु होते ती किल्ले बनविण्यासाठी. दिवाळीत किल्ले तयार करणं हि महाराष्ट्रातील मुलांची परंपराच. यानिमित्ताने सर्व मुले एकत्र येऊन मातीच्या सुंदर कलाकृती साकारतात. मुलांच्या या कलागुणांचा विचार करून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ‘किल्ले बनवा स्पर्धा’ आयोजित केली. या स्पर्धेला बच्चे कंपनीचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.

चंद्रकांत पाटील यांनी या स्पर्धेबाबत माहिती देताना म्हटले कि, आजच्या तरुणाईमध्ये संघभावना तसेच संस्कृती जपण्याची ओढ निर्माण व्हावी या हेतूने दिवाळीमध्ये ‘किल्ले बनवा स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत स्पर्धकांनी शिवनेरी, तोरणा, रायगड, राजगड, जलदुर्ग जंजिरा, प्रतापगड अशा विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती पर्यावरण पूरक घटकांचा वापर करून साकारल्या. या निमित्ताने मोबाइलच्या विश्वात हरवलेलं बालपण बच्चे कंपनीला अनुभवता आलं, याचा विशेष आनंद असल्याचे पाटील यांनी म्हटले.

बालवयात किल्ले बनविणाऱ्या या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बालवयातच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा मिळावी या उद्देशाने चंद्रकांत पाटील कोथरूडमध्ये दरवर्षी ‘किल्ले बनवा स्पर्धा’ आयोजित करतात. या स्पर्धेतील विजेत्यांना शिवचरित्राच्या प्रति भेट दिल्या जातात ज्या लहान मुलांमध्ये शिवरायांच्या स्फूर्ती जागवतात आणि शिवरायांची प्रेरणा मिळवून देतात. चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या या स्पर्धेतून मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजण्यास नक्कीच मदत होईल हे निश्चित.

कापसाच्या आयातीवर तात्काळ बंदी घालून हमीभावाने कापूस खरेदी करा.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली मागणी.

कापूस आयातीचा निर्णय व्यापाऱ्यांच्या फायद्याचा, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे हित पहावे.

मुंबई, दि. ३ नोव्हेंबर २०२४
कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भिती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस महामंडळाला (CCI) हमीभावाने कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की, सध्या कापसाचे भाव ६५०० ते ६६०० रुपये प्रति क्विंटल असून हा भाव ७१२२ रुपये या हमीभावापेक्षा कमी आहे. बाजारात कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस विकलेला नाही. शेतकऱ्यांकडे कापूस आहे तसेच सीसीआयकडेही कापूस गाठी पडून आहेत. देशात एवढ्या मोठया प्रमाणात कापूस असताना कापसाची आयात केल्याने कापूस बाजार कोलमडून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांनाच बसेल आणि या निर्णयाचा फायदा फक्त व्यापाऱ्यांना होणार आहे. महाराष्ट्रात कापूस उत्पादक शेतकरी आधीच संकटात आहे, कमी भाव,शेती अवजारांवर १२ ते १८ टक्के जीएसटी आणि अवकाळी पाऊस या दुष्टचक्रात कापूस उत्पादक शेतकरी सापडला असून खराब हवामानामुळे यावेळी १९ लाख हेक्टरील कापूस क्षेत्राचे नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाईही अद्याप कागदावरच आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना केवळ विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कापूस आयातीवर बंदी घालावी, असे नाना पटोले म्हणाले.

पुण्यात घरगुती गॅस सिलिंडरचे दोन ठिकाणी स्फोट; दोन जण गंभीर

पुणे: पुण्यात शनिवारी रात्री घरगुती सिलेंडरचे दोन ठिकाणी स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यातील वारजे माळवाडी आणि अप्पर इंदिरानगर परिसरात दोन घरगुती सिलेंडरचे स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत.या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही ठिकाणी लागलेल्या आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात यश आले
सिलेंडरच्या स्फोटामध्ये दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळे दोन्ही घरात मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून दोन्ही ठिकाणी आग वेळेत नियंत्रणात आणण्यात आली त्यामुळे मोठी हानी टळली आहे. जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात करण्यात दाखल करण्यात आले.
या दोन्ही घटना काल (दि. 2) रात्रीच्या सुमारास वारजे माळवाडी आणि अप्पर इंदिरानगर परिसरात घडल्या आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील वारजे माळवाडी आणि अप्पर इंदिरानगर परिसरात घरगुती सिलेंडरचे स्फोट झाले. या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले. जखमी व्यक्तींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

PICT माजी विद्यार्थी अतिंद्रिय सान्याल यांची आंतरराष्ट्रीय यशस्वी कामगिरी – “AI Impact 50” यादीत समावेश

धनकवडी :पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (PICT) च्या उद्योजकता विकास कक्ष (EDC) आणि बिझनेस इनक्युबेशन सेंटरच्या वतीने संचालक डॉ. प्रल्हाद कुलकर्णी आणि प्राचार्य डॉ. संजय गंधे यांनी PICT चे माजी विद्यार्थी आणि यशस्वी उद्योजक श्री. अतिंद्रिय सान्याल यांचे अभिनंदन केले आहे. श्री. सान्याल हे Galileo चे संस्थापक आणि CEO आहेत.
Galileo या कंपनीचा समावेश आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित “AI Impact 50” यादीत 45 व्या स्थानावर करण्यात आला आहे. यादीत OpenAI, Anthropic, Meta, आणि Google सारख्या जगभरातील प्रसिद्ध कंपन्यांसह Galileo चे नाव समाविष्ट आहे. श्री अतींद्रियो सान्याल यांच्या पुढील वाटचालीस बिझिनेस इंकुबेशन सेंटर तर्फे प्रा. प्रविण पाटील आणि अंकुश सपकाळ यांनी शुभेच्छा दिल्या.
PICT समुदायासाठी हा एक मोठा अभिमानाचा क्षण असून या यशामुळे संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा ठसा जागतिक पातळीवर उमटला आहे.

महायुतीविरोधात उभे केलेले मनसेने उमेदवार मागे घ्यावे:अन्यथा अर्ज मागे घेणार नाही, सदा सरवणकरांनी फेकला फासा

मुंबई – . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याने शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव निर्माण केला जात असल्याचे बोलले जात आहे.मनसेने महायुतीच्या विरोधात सगळ्याच ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे महायुतीविरोधात उभे केलेले मनसेने उमेदवार मागे घ्यावेत. त्यानंतर मी पक्षासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार आहे. मी पक्षासाठी त्याग करण्यास तयार आहे, असे सदा सरवणकर यांनी म्हटले आहे. यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेला तिढा अजूनही सुटण्याच्या मार्गावर नसल्याचे दिसते

याच मतदारसंघातून ठाकरे गटाने महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे.मनसेकडून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली असल्याने महायुतीकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव निर्माण केला जात आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. मात्र असे असूनही सदा सरवणकर हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार नाही आहेत. राज ठाकरे यांनी आधी चर्चा करायला हवी होती, नंतर वेगळा निर्णय घेता आला असता असे मत देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले होते.

सदा सरवणकर उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार देखील होतील, असे त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. मात्र आता त्यांनी एक अट घातली आहे. सदा सरवणकर म्हणाले, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. मनसेने महायुतीच्या विरोधात सगळ्याच ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे महायुतीविरोधात उभे केलेले मनसेने उमेदवार मागे घ्यावेत. त्यानंतर मी पक्षासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार आहे. मी पक्षासाठी त्याग करण्यास तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

“खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाचे 100% मतदान मोहीम, अभिरुची मॉल, डीमार्ट धायरी आणि वारजे येथे मतदार जागरूकता अभियान”

पुणे: खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाच्या ‘स्वीप’ टीमने ‘एकच लक्ष्य: 100% मतदान’ या मोहिमेअंतर्गत मतदार जागरूकता वाढवण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या मोहिमेच्या अंतर्गत, स्वीप टीमने अभिरुची मॉल,डीमार्ट धायरी आणि वारजे डीमार्टमध्ये उपस्थित ग्राहकांशी संवाद साधत, त्यांना मतदानाचे महत्व पटवून देण्याचे कार्य केले.
स्वीप टीमचे सदस्य नागरिकांना मतदान प्रक्रियेत सक्रीय सहभाग घेण्यास प्रोत्साहित करताना सांगितले की, प्रत्येक मतदाराचा हक्क हा लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी लोकांना आपल्या मताचा योग्य वापर करण्याचे आवाहन करत मतदार म्हणून आपली जबाबदारी ओळखण्याचा संदेश दिला. मतदानाद्वारे सामाजिक परिवर्तन घडवण्याची संधी असल्याने प्रत्येकाने मतदान करणे अत्यावश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले.
या मोहिमेचा मुख्य उद्देश मतदारांमध्ये 100% मतदानाची जागरूकता निर्माण करणे हा आहे. निवडणूक कार्यालयाने नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध ठिकाणी जनजागृती अभियान हाती घेतले आहे. या अभियानामुळे खडकवासला मतदारसंघातील अधिकाधिक नागरिक मतदान प्रक्रियेत सहभागी होतील, असा विश्वास निवडणूक कार्यालयाच्या शरदचंद्र गव्हाळे आणि अमोल पिसाळ यांनी व्यक्त केला.
या जागरूकता अभियानाने मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिसाद उमटला असून, विविध माध्यमांद्वारे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

माजी खासदार संजय काकडे यांच्या घरी देवेंद्र फडणवीसांनी दिली भेट

पुणे:भाजप नेते, माजी खासदार संजय काकडे यांच्या काकडे हाऊस वर दुपारी जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काकडे परिवाराची भेट घेतली. काकडे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर अशा चर्चेच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या या भेटीला राजकीय महत्व दिले जात आहे , यावेळी उषा काकडे ,आणि संजय काकडे यांच्याशी त्यांनी सुमारे 45 मिनिटे चर्चा केली.

फडणवीस यांनी या भेटीची माहिती माध्यमातून फोटो सह प्रसिद्ध केली आहे,भाजपा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष संजय काकडे यांच्या पुणे येथील निवासस्थानी आज मी सदिच्छा भेट दिली. यावेळी काकडे परिवाराने केलेल्या स्वागतासाठी मी आभारी आहे! असे फडणवीस यांनी म्हंटले आहे.

संजय काकडे कसबा विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक होते. संजय काकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा सोबत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. गेल्या अनेक दिवसापासून संजय काकडे भाजपमध्ये नाराज आहेत अशा देखील बातम्या येत होत्या. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जात संजय काकडे यांच्याशी चर्चा केली आहे. आता दोन्ही नेते कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जाताच देवेन्द्रजी घरी…म्हणाले डॉ.वैरागे माझा अर्ज घेईन माघारी

पुणे- निवडणुकांच्या गंमती जमती फार असतात,कुठे राग असतो,कुठे मत्सर असतो तर कुठे अस्तित्वासाठी धडपड देखील असते.सुदैवाने पुण्यात राग,मत्सर दिसत नसले तरी अस्तित्वासाठी धडपड मात्र दिसते सर्वात महत्वाचे दिसते ती न्यायासाठी होत असलेली तडफड..बस हि एकदा नजरेत आणून दिली कि भल्या भल्या कार्यकर्त्यांचे बंद देखील पडते थंड..कारण त्यात राग व मत्सर कुठे नसतो…

देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या पुणे भेटीच्या दरम्यान त्यांनी आज अनेक इच्छुक असलेल्या पण उमेदवारी न देता आलेल्या किंवा पक्षाचा उमेदवार निवडून यावा म्हणून महत्वाचे असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या घरी भेटी दिल्या अर्थात अशा सर्व कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना तुम्ही विमानतळावर या तुमची मी भेट घडवून आणतो असा निरोप केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिला होताच.पण जर देवेन्द्रजी हे,याच्या घरी, त्याच्या घरी जाऊ शकतात, हेलीकॉप्टर कुणाला पाठवू शकतात तर..आपल्या घरी का येऊ शकत नाहीत ? आपल्याला बाहेर विमानतळावर का बोलाविले जाते ? ज्यांना उमेदवारी मिळालीय काही पडे मिळालीत ते जातील तिकडे हा भाव बहुतेकांच्या कडून व्यक्त होत होता जो केंद्रीय मंत्र्याच्या पुढे व्यक्त होत होता.अशाच सर्व राजकीय वातावरणातून सनी निम्हण, धीरज घाटे,श्रीनाथ भिमाले यांच्या नंतर देवेंद्र फडणवीस पुणे कॅन्टोन्मेंट मधील बंड करायला थंड..गेले डॉक्टर भरत वैरागेंच्या घरी..गेली कित्येक वर्षे भाजपचा हा जुना कार्यकर्ता.३ टर्म नगरसेवकपद घरात असलेला.सदैव लोकसभा,विधानसभा आणि महापालिकेला आपल्या भागातून भाजपाला मताधिक्य मिळवून देणारा कार्यकर्ता…साहेब ..कायम त्याच त्याच लोकांना पुढे नेले जातेय,आमच्या कामाकडे दुर्लक्ष होतेय,अन्याय होतोय आमच्यावर…

बस एवढेच बोलतो अन…साहेब हसतात, पाहू आपण या पुढे लक्ष घालू..करू आपण काही तरी..तुम्ही सोडा हट्ट,आम्ही आहोत ना.. एवढेच बोलतात आणि अर्ज माघारीच्या निर्णयाला..ह्म्म्म याला म्हणतात कार्यकर्ता..असे संबोधत थोड्या वेळाने निघूनही जातात.

पुणे कॅन्टोन्मेंट मधीलच बंड नव्हे तर अशा पद्धतीने अनेकांची नाराजी दूर करण्याचे काम आजच्या दौऱ्यात फडणविसांनी केले तर आहे.आता नेमके मतदार काय निर्णय घेतात हे पाहण्यासाठी २० तारीख आणि नंतर २३ तारीख उजाडून द्यावी लागणार आहे.