मुंबई – . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याने शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव निर्माण केला जात असल्याचे बोलले जात आहे.मनसेने महायुतीच्या विरोधात सगळ्याच ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे महायुतीविरोधात उभे केलेले मनसेने उमेदवार मागे घ्यावेत. त्यानंतर मी पक्षासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार आहे. मी पक्षासाठी त्याग करण्यास तयार आहे, असे सदा सरवणकर यांनी म्हटले आहे. यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेला तिढा अजूनही सुटण्याच्या मार्गावर नसल्याचे दिसते
याच मतदारसंघातून ठाकरे गटाने महेश सावंत यांना उमेदवारी दिली आहे.मनसेकडून राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली असल्याने महायुतीकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव निर्माण केला जात आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. मात्र असे असूनही सदा सरवणकर हे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार नाही आहेत. राज ठाकरे यांनी आधी चर्चा करायला हवी होती, नंतर वेगळा निर्णय घेता आला असता असे मत देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केले होते.
सदा सरवणकर उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार देखील होतील, असे त्यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. मात्र आता त्यांनी एक अट घातली आहे. सदा सरवणकर म्हणाले, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. मनसेने महायुतीच्या विरोधात सगळ्याच ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे महायुतीविरोधात उभे केलेले मनसेने उमेदवार मागे घ्यावेत. त्यानंतर मी पक्षासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार आहे. मी पक्षासाठी त्याग करण्यास तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.