पुणे: खडकवासला विधानसभा मतदारसंघात टपाली मतदान प्रक्रियेची सुरुवात प्रभावीपणे करण्यात आली असून निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या आदेशानुसार या प्रक्रियेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी हि नोडल अधिकारी आणि त्यांच्या टीमकडे सोपविण्यात आली आहे. निवडणुक संचालन नियम, १९६१ नुसार, निवडणुक कर्तव्यार्थ अधिकारी-कर्मचारी, दिव्यांग मतदार, ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदार, तसेच अत्यावश्यक सेवेतील मतदारांना टपाली मतदानाची सुविधा दिली जाते.
खडकवासला मतदारसंघात संबंधित मतदारांनी EDC (फॉर्म १२ अ) चा वापर केला आहे. तसेच दिव्यांग व ८५ वर्षांवरील मतदारांसाठी मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. अशी माहिती तहसीलदार किरण सुरवसे, सचिन आखाडे, अंकुश गुरव यांनी दिली आहे.या व्यवस्थेमुळे अधिकाधिक मतदारांना मतदान करण्याची संधी मिळाली असून, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता व सोय सुविधा वाढली आहे.