Home Blog Page 605

‘पुनीत बालन ग्रुप’चा पैलवान सिकंदर शेख 2024 चा रुस्तुम-ए-हिंद किताब जिंकणारा महाराष्ट्रातील चौथा कुस्तीपटू

पुणे ;‘पुनीत बालन ग्रुप’चा खेळाडू असलेल्या’महाराष्ट्र केसरी’ सिकंदर शेखने पंजाबमध्ये झालेल्या स्पर्धेत बाजी मारत रुस्तुम-ए-हिंद हा मानाचा किताब जिंकला आहे. हा किताब जिंकणारा शेख हा महाराष्ट्रातील चौथा पैलवान ठरला असून त्याच्या या विजयाबद्दल ‘पुनीत बालन ग्रुप’कडून अभिनंदन करण्यात आले आहे.

गतवर्षी म्हणजे २०२३ ला सिकंदर शेख याने ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती जिंकून ६६ वा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळविला होता. त्याच्या कुस्तीमधील पुढील करिअरसाठी पुण्यातील ‘पुनीत बालन ग्रुप’ने सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ‘पुनीत बालन ग्रुप’ आणि सिकंदर शेख यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या मदतीच्या आधारे शेख याची विविध कुस्ती स्पर्धांत भाग घेण्याची आणि त्यात विजय मिळविण्याची घौडदौड जोमाने सुरू असून त्यात आणखी एका मोलाच्या विजयाची भर पडली आहे.पंजाब मधील जांडला जि. जालंधर येथे 2024 च्या रुस्तुम-ए-हिंद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देशातील अनेक नामवंत पैलवानांनी सहभाग घेतला होता. मात्र, त्यांना धुळ चारत सिकंदर शेख याने रुस्तुम-ए-हिंद हा किताब पटकविला. या रुस्तुम-ए-हिंद या किताबावर नेहमीच उत्तर भारतीय मल्लांचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. त्यात केवळ पै. हरीशचंद्र बिराजदार, अमोल बुचडे आणि असाब अहमद यांनीच हा किताब जिंकल्याचे सांगितले जाते. त्यांच्यानंतर आता सिकंदर शेख हा किताब जिंकणारा महाराष्ट्रातील चौथा मल्ल ठरला आहे. या स्पर्धेत सिकंदर च्या रोशन किरलगड आणि बग्गा कोहली यांच्यासोबत झालेल्या कुस्त्या रोमहर्षक आणि पाहण्यासारख्या होत्या. अंतिम स्पर्धेत सिकंदर विरूध्द बग्गा कोहली यांच्यात कुस्ती झाली यात सिकंदर विजयी झाला. त्याला बक्षीस म्हणून मानाची गदा, ट्रॅक्टर या बक्षिसाबरोबरच आर्थिक स्वरूपातही बक्षिस मिळाले आहे.

“सिंकंदर शेख हा एक गुणवान खेळाडू आहे. त्याने रुस्तम-ए-हिंद किताब जिंकून आपल्या महाराष्ट्राचं नाव देशपातळीवर गाजवलं. भविष्यात शेख कुस्तीच्या माध्यमातून जगभरात महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव तो उंचावेल अशी खात्री आहे. ‘पुनीत बालन ग्रुप’कडे असे गुणवंत खेळाडू आहेत, ही आमच्यासाठी आणखी आंनदाची आणि अभिमानाची बाब आहे. शेख याने मिळविलेल्या यशामुळे आणखी प्रतिभावान खेळाडूंच्या मागे उभं राहण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली.”

  • पुनीत बालन
    अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप

मायावती यांची पुण्यात सभा

पुणे, ६ नोव्हेंबर २०२४

समाजातील शोषित, पीडित, उपेक्षितांना नेतृत्व देवून त्यांना शासनकर्ती जमात करण्याचे महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कांशीराम साहेब आयुष्यभर झटले. बहुजन समाज पक्षाने तळागाळातील समाजाला नेतृत्व देत उत्तर प्रदेशसारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्यात सत्ता मिळवली. आता महाराष्ट्रातही उपेक्षित वर्गाचा राजकीय प्रतिनिधी बसपाच्या माध्यमातून कायदेमंडळात पोहचेल,असा विश्वास बसपचे प्रदेश महासचिव,पश्चिम महाराष्ट्र प्रभारी, वडगाव शेरी मतदार संघाचे उमेदवार डॉ.हुलगेश चलवादी यांनी बुधवारी (ता.६) व्यक्त केला.

देशाच्या आयरन लेडी, उत्तर प्रदेशचे कणखर नेतृत्व, माजी मुख्यमंत्री मायावती यांची येत्या १७ नोव्हेंबर रोजी पुण्यातील येरवडा येथे महासभेला संबोधित करणार आहेत. दुपारी १२ वाजता येरवडा प्रादेशिक मनोरूग्णालय मैदान, कॉमर झोन येथे आयोजित या सभेसाठी समाजातील अनेक बुद्धिवंत, विचारवंत आणि समाजसेवकांना आमंत्रित करण्यात आले आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले. राज्यात गेल्या काही वर्षात मराठा आरक्षणाचे आंदोलन बरेच गाजले.उपेक्षितांना विकासाच्या पुढील पंगतीत आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. बसपाचे आरक्षणाला समर्थन आहे.राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर बसपा योग्य मार्ग काढू शकतो. अशात मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची नुकतीच भेट घेत त्यांना देखील सभेचे निमंत्रण देण्यात आल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

पुणेरी पगडी आणि संविधानाची प्रत यावेळी बसपच्या शिष्टमंडळाकडून जरांगे यांना देण्यात आली.यावेळी बसपाचे प्रदेश सचिव सुदीप गायकवाड आणि स्वप्नील शिर्के प्रामुख्याने उपस्थित होते.जरांगेची मराठा आरक्षण आंदोलनातील भूमिका प्रेरणादायी आहे.सर्व समाजाने एकत्रित येवून यशस्वी नवीन राजकीय समीकरणे जुळवून आणता येईल,अशी भावना डॉ.चलवादी यांनी या भेटीनंतर व्यक्त केली.वडगाव शेरी मतदार संघात पक्षाचा कॅडर घरोघरी जावून मतदारांना बसपाची भूमिका आणि विचार समजावून सांगत आहे. मतदारांना येणाऱ्या काळात पक्षाकडून केल्या जाणाऱ्या विकासकामांची ‘गॅरंटी’दिली जात असल्याचे देखील डॉ.चलवादी म्हणाले.

खडकवासला निवडणूक: शांतता आणि निर्भयतेसाठी डॉ. यशवंत माने यांची ठाम भूमिका


पुणे:खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया निर्भय व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिले आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरक्षित व पारदर्शकपणे पार पडावी यासाठी प्रशासनास सहकार्य करणे सर्व पक्षांची जबाबदारी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
प्रचार मोहिमेत कोणतेही नियमभंग होऊ नये म्हणून उमेदवारांनी भारत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक सभा, रॅली, पोस्टर-बॅनर लावणे यासारख्या सर्व कार्यक्रमांसाठी प्रशासनाची अधिकृत परवानगी घेणे अनिवार्य असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी आणि मतदारांमध्ये सुरक्षितता व विश्वास निर्माण व्हावा, यासाठी पोलिस प्रशासन देखील सतर्क आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष सुरक्षा पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक सुविधांचा वापर करण्यात येणार आहे.
शासनाच्या निर्देशांनुसार कोणत्याही प्रकारची अनुचित घटना किंवा आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास त्याची तत्काळ नोंद घेण्यात येईल. उमेदवारांनी व त्यांच्या समर्थकांनी कोणत्याही प्रकारचे दडपशाहीचे किंवा अनुचित दबावाचे प्रकार न करता, कायद्याचे पालन करावे व निवडणूक निर्भयपणे पार पाडावी, असे डॉ. माने यांनी सूचित केले.
खडकवासला मतदारसंघातील प्रत्येक उमेदवार आणि मतदारांनी या निर्देशांचे पालन करून शांतता, कायदा आणि सुव्यवस्था राखावी, यासाठी निवडणूक कार्यालय आणि प्रशासनाला सहकार्य करणे अत्यावश्यक आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची तीन टप्प्यांत खर्च तपासणी

पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ही तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक अमित कुमार यांच्या समक्ष केली जाणार आहे. उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणी तीन टप्प्यांत केली जाणार असून, पहिली तपासणी ८ नोव्हेंबर २०२४ रोजी, दुसरी तपासणी १४ नोव्हेंबर रोजी व तिसरी तपासणी १९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते सायं ६ पर्यंतवाजेपर्यंत असेल , खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे कार्यालय, निवडणूक खर्च व सनियंत्रण कक्ष पहिला मजला, सिंहगड टेक्निकल कॉलेज, सेंट्रल लायब्ररी जवळ, आंबेगाव बु. पुणे.
सदर खर्च तपासणीस सर्व उमेदवार / खर्च प्रतिनिधी यांनी सर्व माहितीसह उपस्थित राहणे बंधनकारक असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली.

मातंग आणि धोबी समाज मेळाव्यात रमेश बागवे यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचा निर्धार

पुणे –कँटोन्मेंटचा विकास करण्यासाठी पुन्हा रमेश बागवे यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचा निर्धार मातंग आणि धोबी समाज मेळाव्यात करण्यात आला.महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्ष काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी मंगळवारी केली.

महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्ष काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आणि या दोन्ही समाजांचा मेळावा झाला.यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, संगीता तिवारी, अविनाश बागवे, कुमार राठोड, प्रदीप परदेशी, संजय कवडे, योगेश घोडके, अक्रम शेख, हिरालाल परदेशी, मनोज बाट्टम, गणेश सातपुते, संजय वाघमारे, डेनी स्वामी, अजय पाटोळे, अविनाश अंजीरवाल यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षांसह आप तसेच बीटी कवडे रस्ता व्यापारी संघटना, धोबी व ख्रिश्चन समाज, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रात व राज्यात सत्ता असूनही मतदारसंघाचा विकास झालेला नाही. या उलट बागवे यांच्या काळात घोरपडी बाजार पोलीस चौकी, धोबी घाट, राम मंदिर अशी विविध विकासकामे आमदार निधीतून झाली. त्यामुळे मतदारसंघाच्या सर्वागीन विकासासाठी बागवे यांना विजयी करण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला.मागील दहा वर्षात जी कामे झाली नाहीत ती आपण आमदार असताना अवघ्या पाच वर्षात केली. मतदारसंघाच्या सर्वांगीन विकासासाठी मी पुन्हा एकदा मतदारांच्या समोर जात असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांनी सांगितले.

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात ४४५ मतदान केंद्रावर ‘वेब कास्टींग’ची सुविधा

पुणे – वडगावशेरी विधानसभा मतदार संघातील एकुण मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून एकुण मतदार ५ लाख ३ हजार ५३९ झाले आहेत. तसेच, एकुण ४४३ मतदार केंद्रावर वेब कास्टींगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.मतदान केंद्रावर सीसीटीव्हीचा वॉच राहणार असून व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे.

वडगाव शेरी विधानसभा मतदार निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तृप्ती कोलते-पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. मतदार संघात पुरुष मतदार २ लाख ५९ हजार ४५३ तर महिला मतदार २ लाख ४३ हजार ९८४, ट्रान्सजेंडर मतदार १०२ आहेत. या मतदार संघातील शहरी भागीतील ४३७ तर ग्रामीण भागातील निरगुडी -१, वडगावशिंदे – २, मांजरी – ३ या ६ मतदान केद्रांवर वेब कास्टींगच्या सुविधा पुरविण्यात येणार आहे.

निवडणुकीच्या कामकाजासाठी २ हजार ४५० अधिकारी, कर्मचारी एवढे मनुष्यबळ वापरण्यात येणार आहे. मतदार संघात या निवडणुकीसाठी एकही संवेदनशील मतदान केंद्राचा समावेश नाही. उपलब्ध मतदान केंद्रात वीज, पाणी, स्वच्छता आदीसह अन्य आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने मतदान केंद्राची पाहणी करण्यात आलेली आहे.

असे आहेत मतदान केंद्र…
शहरी भागातील ११ पत्राशेड व ५३ इमारतींच्या पार्किंगमध्ये मतदान केंद्र असणार आहेत. याबरोबरच विश्रांतवाडीतील कस्तुरबा हौसिंग सोसायटीत चार तर मुंढवा रस्त्यावरील सेंट क्रिसेंट या सोसायटीत दोन मतदान केंद्र असणार आहे. १४ केंद्र बदलण्यात आली आहेत. ३१ मतदारांसाठी १४ व १५ नोव्हेंबरला होम वोटींग घेण्यात येणार आहेत. यात प्रामुख्याने वय वर्ष ८५ च्या पुढील मतदारांचा समावेश आहे.

अतिमहत्वाच्या घटनात्मक पदांवरील व्यक्तीसह प्रत्येक पोलिस आणि शासकीय वाहनांचीही तपासणी करण्याचा आदेश

मुं बई- विधानसभा निवडणुकीच्या काळात पैशांची वाहतूक करण्यात येत असल्याच्या तक्रारीनंतर प्रत्येक पोलिस वाहनांसह सर्वच शासकीय वाहनांची तपासणी करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिका-यांना दिला असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली.आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात २६२ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. पुण्यात १३५ कोटी रुपयांचे सोने घेऊन जाणारे वाहन हे विक्रेत्याला दागिने पुरविणा-याचे असून त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या होत्या मुद्देमाल संबंधितांना सुपूर्द केला आहे. असेही त्यांनी सपष्ट केले
विधानसभा निवडणुकीत राज्यात पोलिसांच्या आणि सरकारी वाहनांमधून पैशांची वाहतूक करण्यात येत असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर सर्व जिल्हाधिका-यांना तपासणीचा आदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
या संदर्भात चोक्कलिंगम यांना विचारले असता ते म्हणाले की निवडणूक काळात सर्वच वाहने तपासण्याचे अधिकार पथकांना असतात या वेळी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तक्रारी केल्या म्हणून सर्व जिल्हाधिकायांना पुन्हा सूचना केली आहे. या नुसार अतिमहत्वाच्या घटनात्मक पदांवरील व्यक्तीसह सर्वांची वाहने तपासण्यात येतील
तपासणी पथके जेथे तैनात करण्यात ये तात तेथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले जाहेत. यामुळे जे अधिकारी तिथे उपस्थित असतात.त्यांच्याकडून ही तपासणी पारदर्शी झाली पाहिजे या साठी आम्ही आग्रही आहोत. यात कुणी कुचराई
केलेई तर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

६० वर्षांच्या जेष्ठ नागरिकांना सर्व सवलती लागू कराव्यात- देवेंद्र भुजबळ

मुंबई- महाराष्ट्रा राज्यात सध्या ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना लागू असणाऱ्या शासनाच्या सर्व सवलती साठ वर्षावरील
जेष्ठ नागरिकांना लागू करण्यात याव्यात अशी मागणी निवृत्त माहिती संचालक श्री देवेंद्र भुजबळ यांनी केली.महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षपदी श्री .अण्णासाहेब टेकाळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सानपाडा जेष्ठ नागरिक संघातर्फे,श्री देवेंद्र भुजबळ यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी श्री भुजबळ बोलत होते.

श्री भुजबळ पुढे म्हणाले की,जेष्ठ नागरिक होण्यासाठी वयाची साठ वर्षे पूर्ण होण्याची अट आहे. पण जेष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलती मिळण्यासाठी ६५ वर्षे वयाची अट आहे, या विसंगती कडे त्यांनी लक्ष वेधले.

आपल्या सत्काराला उत्तर देतानाश्री अण्णासाहेब टेकाळे यांनी श्री भुजबळ यांनी केलेल्या मागणीचा संदर्भ देऊन
सांगितले की, ६५ वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना लागू असणाऱ्या शासनाच्या सर्व सवलती ६० वर्षे पूर्ण केलेल्या
जेष्ठ नागरिकांना लागू करण्यात याव्यात अशी मागणी सरकारकडे लवकरच करण्यात येईल. तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना सरकार कडून दरमहा मिळणारी १५०० रुपयांची पेन्शन ३ हजार रुपये करण्यात यावी,अशीही मागणी सरकारकडे करण्यात येईल.महाराष्ट्रात सध्या १ कोटी ४० लाख जेष्ठ नागरिक असून त्यापैकी ५३% महिला आहेत तर ४७ % पुरुष आहेत.एकूण जेष्ठ नागरिकांपैकी ४० लाखाहून अधिक जेष्ठ नागरिक दारिद्य्र रेषेखाली असून त्याना सरकार तर्फे दिड हजार रुपये मिळतात ,अशी माहिती देऊन श्री टेकाळे यांनी सर्व ग्रामपंचायती आणि महानगर पालिकांनी शासनाच्या धोरणानुसार जेष्ठ नागरिकांसाठी धडाडीने विरंगुळा केंद्रे उभारावीत असे आवाहन करून राज्यात सर्वात जास्त म्हणजे ३२ विरंगुळा केंद्रे नवी मुंबईत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

प्रारंभी सानपाडा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री मा ना कदम यांनी संघाच्या वाटचालीचा आढावा घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे जेष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये सानपाडा संघाच्या अकरा सदस्यांना पुरस्कार मिळाले या बद्दल आनंद व्यक्त करून सर्व सदस्यांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे उपाध्यक्ष श्री विठ्ठल गव्हाणे यांनी केले तर प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन सचिव श्री शरद पाटिल यांनी केले.यावेळी सानपाडा नागरिक संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये, तर पीएम किसानचे 15 हजार करणार:महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन

कोल्हापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारतोफांचा झंझावात आजपासून सुरू झाला असून महाविकास आघाडी व महायुतीचे नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. महायुतीची संयुक्त सभा आज कोल्हापूरातून होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) कोल्हापुरातूनच महायुतीच्या जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणांची माहिती दिली आहे.
आजची सभा खूप ऐतिहासिक आहे, 1995 साली बाळासाहेब ठाकरे यांनी इथूनच प्रचाराचा शुभारंभ केला आणि इतिहास घडला. आई अंबाबाईने नेहमीच आम्हाला आशीर्वाद दिला आहे, आज देखील आई अंबाबाई आम्हाला आशीर्वाद देईल. यावेळी, 23 तारखेला विजयाचा गुलाल उधळायला इथं येऊ. तत्पूर्वी, वचननाम्यातील 10 कलमं जनतेच्यासमोर ठेवतो आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी वचननाम्यातील मोठी घोषणा सांगितली. त्यानुसार, लाडक्या बहिणींना (Ladki bain yojana) 2100 रुपये दरमहा मिळणार असल्याची माहिती दिली, तसेच आम्ही बोलतो ते करुन दाखवतो, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.
कोल्हापूरच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महायुतीच्यावतीने 10 वचने जाहीर करण्यात आली आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार असून तत्पूर्वीच जाहीरनाम्यातील 10 महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली. त्यामध्ये, लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. तसेच, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकाही मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय. विरोधक लाडक्या बहीण योजनेला विरोध म्हणून कोर्टात गेले, आता नागपूरचा कोणतरी कोर्टात गेला आहे. कोणाच्या माय का लाल आला तरी ही योजना बंद होणार नाही, तुमचे आशीर्वाद मिळाल्यानंतर तुम्हाला देताना आमचे हात आकडते घेणार नाही. आम्ही दिल्लीला जातो तर म्हणता दिल्लीला जातात, आम्ही निधी आणायला जातो. पण तुम्ही दिल्लीला जाता की माझा चेहरा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा म्हणून. मात्र, तुमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना तुमचा चेहरा नको आहे, तर महाराष्ट्रातील जनता कशी स्वीकारेल, असा टोलाही उद्धव ठाकरेंना लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वचननाम्यातील केलेल्या 10 घोषणा
1) लाडक्या बहिणींना रु.2100 प्रत्येक महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन!
2) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला रु.15,000 प्रत्येक वर्षाला रु.12,000 वरुन रु.15,000 देण्याचे तसेच MSP वर 20% अनुदान देण्याचे वचन!
3) प्रत्येकास अन्न आणि निवारा प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन!
4) वृद्ध पेन्शन धारकांना रु.2100 महिन्याला रु.1500 वरुन रु.2100 देण्याचे वचन!
5) जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर राज्यातील जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन!
6) 25 लाख रोजगार निमिर्ती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 प्रशिक्षणातून महिन्याला १० लाख विद्यार्थ्यांना रु.10,000 विद्यावेतन देण्याचे वचन!
7) 45,000 गावांत पाणंद रस्ते बांधणार राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन!
8) अंगणवाडी आणि आशा सेविकांना रु.15000 आणि सुरक्षा कवच
महिन्याला रु.15,000 वेतन आणि संरक्षण देण्याचे वचन!
9) वीज बिलात 30% कपात करुन सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन!
10) सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र@2029 ‘ 100 दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन!

लोकशाहीचा कणा: विधानसभा निवडणुकीतील मीडिया सेलचे कार्य

विधानसभा निवडणूक कार्यालयाच्या मीडिया सेलची भूमिका निवडणूक प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची असते. या सेलचे मुख्य कार्य म्हणजे निवडणुकीसंबंधी सर्व माहिती पारदर्शकपणे प्रसारित करणे, जनतेला निवडणूक प्रक्रियेविषयी योग्य माहिती देणे, तसेच निवडणूक स्वच्छ, पारदर्शक व सुरक्षित ठेवण्यासाठी जनजागृती करणे. मीडिया सेलच्या या कार्यामुळे निवडणुकीबद्दल विश्वासार्हता वाढते आणि लोकांचा सहभाग वाढतो.
विधानसभा निवडणुकीच्या काळात, मीडिया सेलच्या माध्यमातून पत्रकार परिषदा आयोजित केल्या जातात, ज्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या सूचना, नियम आणि विविध मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली जातात. यामध्ये आचारसंहितेचे पालन, मतदारांसाठी असलेल्या सुविधांबाबतची माहिती, मतदान केंद्रांची उपलब्धता, मतदानाच्या तारखा आणि वेळा यासारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश असतो. यामुळे नागरिकांना सुस्पष्ट आणि वेळोवेळी अद्ययावत माहिती मिळण्यास मदत होते.
मीडिया सेलचे दुसरे महत्वाचे कार्य म्हणजे निवडणुकीत मतदार जागरूकता अभियान राबवणे. मतदानाचे महत्व, मतदार नोंदणी, मतदानाचा हक्क, आणि मतदानाचे नियम यासंबंधी लोकांना शिक्षित करण्यासाठी मीडिया सेल विविध माध्यमांचा वापर करते. सोशल मीडिया, वृत्तपत्रे, रेडिओ, आणि दूरदर्शनवरून संदेश प्रसारित करून मतदारांना मतदान प्रक्रियेविषयी माहिती दिली जाते, जेणेकरून नागरिक त्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होतील.
तसेच, मीडिया सेल निवडणुकीच्या वेळी आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवते. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास त्यांची माहिती माध्यमांद्वारे प्रसिद्ध केली जाते. यामुळे उमेदवार व पक्षांना नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन मिळते.
मीडिया सेल निवडणुकीसंदर्भात तातडीच्या घडामोडींवर सतत लक्ष ठेवून असते. निवडणूक काळात तांत्रिक गडबड, गैरव्यवहार, तक्रारी यांची माहिती लगेच उपलब्ध करून दिली जाते आणि संबंधित कारवाईही सुचवली जाते. निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी हे अत्यंत आवश्यक असते.
शेवटी, शासकीय निवडणूक कार्यालयाचा मीडिया सेल म्हणजे निवडणूक प्रक्रियेचे व्यवस्थित व्यवस्थापन करणारे आणि लोकांच्या सहभागाला प्रोत्साहित करणारे एक महत्वपूर्ण अंग आहे. जनतेपर्यंत योग्य माहिती पोहोचवणे, आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करणे आणि मतदानासाठी जनजागृती करणे या सर्व गोष्टींमुळे मीडिया सेलची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते.
@प्रा.योगेश हांडगेपाटील

ज्येष्ठांचे आशीर्वाद, कौतुकाची थाप आणि जनतेचा अकृत्रिम जिव्हाळा हीच माझी ताकद. : अश्विनी नितीन कदम

पुणे : पर्वतीकर नागरिकांचा उत्साह, जल्लोष आणि आबालवृद्धांच्या साक्षीने आज सहकारनगर पद्मावती परिसरातील अरुणेश्वर मंदिरात महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटच्या अधिकृत उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ
संपन्न झाला. यावेळी काढण्यात आलेल्या पदयात्रा प्रचार रॅलीत ग्रामदैवत अरुणेश्वर, पद्मावती देवी, तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास वंदन करून आणि आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. प्रचार पदयात्रा दरम्यान ठिकठिकाणी अश्विनी नितीन कदम यांना पर्वतीकर जनतेचे विशेषतः आबालवृद्धांपासून सर्वांचे निरपेक्ष प्रेम, कौतुक आणि पाठींबा मिळाला. माझ्या जनतेचा हा अकृत्रिम जिव्हाळा, माया हीच माझी ताकद आहे यामुळे मी भारावून गेले असुन यावेळी पर्वतीकर नागरिक बदल घडवत प्रचंड मताधिक्याने मला विधानसभेत पाठवणार असल्याचा विश्वास अश्विनी नितीन कदम यांनी व्यक्त केला.

पदयात्रा प्रचाराची सुरुवात अरण्येश्वर मंदिर टांगेवाला कॉलनी अध्यापक कॉलनी – कामगार कल्याण केंद्र संजीवनी सोसायटी खांडेकर शाळा – भोईराज सोसायटी – पद्मावती पोलीस चौकी चंदन सोसायटी – मोगल वसाहत – मंदार सोसायटी जनसेवा वसाहत पद्मावती मंदिर मार्गे नवजीवन मल्हार मार्तंड पंचवटी मंडळ – जय मल्हार – विशाल महाराष्ट्र आंबेडकर संकुल वीर लहुजी – रोहिदास सोसायटी स्वप्न साकार सोसायटी महात्मा गांधी सोसायटी – डाळिंब चौक सहकार नगर पोलीस स्टेशन – पद्मावती वसाहत – विणकर सभागृह सिद्धकला वीट भट्टी श्रमिक वसाहत – चव्हाण नगर गणपती मंदिर येथून आत जाणे शनी मंदिरचे येथून बाहेर येणे तीन हत्ती चौक संभाजीनगर कडे आत जाणे – शंकर महाराज वसाहत समाप्त.

या भागात पदयात्रा संपन्न होत असताना तमाम जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यात आली. त्याचप्रमाणें लाडक्या बहिणींसह महिलांनी औक्षण करत अश्विनी नितीन कदम यांचे स्वागत केले.  

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार प्रभारी अध्यक्ष अंकुश काकडे, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष अभय छाजेड, माजी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, अशोक हरणावळ राहुल तुपेरे, शिवसेना विभाग प्रमुख सुरज लोखंडे, पर्वती विधानसभा अध्यक्ष शशिकांत तापकीर, वैजनाथ वाघमारे, पुरुषोत्तम ओव्हाळ, संजय दामोदरे आदी महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि पर्वतीकर नागरिक महिलांची उपस्थित मोठ्या संख्येने होती.

वडगाव शेरीला दोन आमदार मिळणार : माजी आमदार जगदीश मुळीक

विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका : आमदार सुनील टिंगरे

पुणे : वडगाव शेरी मतदारसंघाला सुनील टिंगरे यांच्या रूपाने विधानसभेत एक आमदार मिळणार आहे. तसेच, मीसुद्धा विधान परिषदेवर जाणार आहे. त्यामुळे वडगाव शेरीला दोन आमदार मिळणार असून त्यामुळे या मतदारसंघाला विकासाच्या उंचीवर नेऊ, असे प्रतिपादन माजी आमदार जगदिश मुळीक यांनी केले.
वडगाव शेरी मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार सुनील टिंगरे यांच्या प्रचाराचा नारळ धानोरी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासह महायुतीच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फोडण्यात आला. यावेळी मुळीक म्हणाले, गेल्या दहा वर्षातील विकास आपण सर्वांनी पाहिलेलाच आहे. यापुढील पाच वर्ष आम्ही दोघे आमदार म्हणून वडगाव शेरीला एका वेगळ्या उंचीवर नेऊ, आपल्याला राष्ट्रीयत्वाची भावना असणारे महायुतीचे सरकार महाराष्ट्रात पुन्हा आणायचे आहे. महविकास आघाडीचे महिन्याला शंभर कोटींचा मलिदा गोळा करणारे सरकार नको आहे. महिला, शेतकरी, युवकांचे हित जोपासणारे, देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वातील सरकार महाराष्ट्रात आणायचे आहे. महाराष्ट्राच्या पुढील सरकारमध्ये वडगावशेरीचा विधानसभेत एक व विधान परिषदेत एक असे दोन आमदार असणार आहेत. अनेकांना माझी काळजी होती. परंतु जोपर्यंत एखादा मतदारसंघ कोणाला जाणार त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत सर्वांनाच तिकीट मागण्याचा अधिकार असतो. माझी जबाबदारी देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे. सुनील टिंगरे यांना आमदार करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. हा संदेश आपल्याला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवायचा आहे.


आमदार सुनील टिंगरे यांनी विरोधाकांकडून पसरविण्यात येणार्‍या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. विरोधक चुकीचे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु कार्यकर्त्यांनी त्याकडे लक्ष देऊ नये. महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागले असून जगदीश मुळीक व मी दोघेही आमदार होणार आहोत. याबद्दल कार्यकर्त्यांनी काळजी करू नये. प्रत्येक मतदारापर्यंत माहिती सरकारची कामे पोहोचवावीत, असे आवाहन टिंगरे यांनी केले.
राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. महायुतीकडे विरोध करण्यासारखे काही नाही. त्यामुळे टिंगरे यांच्याबद्दल खोट्या गोष्टी पसरविल्या जात आहेत. कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या टीकेला महत्त्व न देता जोरदार प्रचार करावा, असे आवाहन त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले.
रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे बाळासाहेब जानराव म्हणाले, सुनील टिंगरे यांना निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहेत. नाराज असलेले माजी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे व अय्युब शेख यांचीही आम्ही समजूत काढू, असे जानराव यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पांडुरंग खेसे, अर्जुन गरुड, अशोक खांदवे, मंगेश गोळे, सतीश कुसमाडे, माजी नगरसेवक योगेश मुळीक, अनिल टिंगरे, राहुल भंडारे, भगवान जाधव, अशोक कांबळे, उषा कळमकर, ऐश्वर्या जाधव तसेच, सतीश म्हस्के, नवनाथ मोझे, संतोष खांदवे, शशिकांत टिंगरे, मोहनराव शिंदे सरकार, सुनील टिंगरे, अर्जुन जगताप, चंद्रकांत जंजिरे, गुलाब पठारे, विकास पठारे, रवींद्र गलांडे, सुधीर गलांडे, कुलदीप शर्मा, आनंद सरोदे, सचिन टिंगरे, विनायक टिंगरे, रवी टिंगरे, बंडू खांदवे, दीपक शिर्के, मिलिंद खांदवे, रवींद्र देवकर, साहेबराव धापटे, शामा जाधव, दत्ता भालेराव, पदाधिकारी व कार्यकर्ते, धानोरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साताऱ्याजवळ क्रेटा कारमधून 95 लाखांची रोकड जप्त

0

सातारा:सातारा – पुणे – बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या तपासणीत सुमारे 95 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. सातारा तालुक्यातील शेंद्रे या ठिकाणी क्रेटा कारमध्ये ही रोकड सापडली आहे. महामार्ग पोलिसांनी ही रोकड ताब्यात घेतली असून ही रोकड नेमकी कुणाची? याचा तपास सातारा ग्रामिण पोलिस करत आहेत.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, सातारा तालुका पोलिसांनी क्रेटा कारमधून (क्र. एम. एच. 48 सी. टी. 5239) 95 लाख रुपयांची रोकड जप्त केली. तसेच राजस्थानच्या मनोज गोयल व दिपू चव्हाण या 2 तरूणांना ताब्यात घेतले. या दोन्ही तरूणांची चौकशी केली असता त्यांनी ही रक्कम मुंबईहून कोल्हापूरला नेत असल्याचे सांगितले. कार मालकाचे नाव मुकेश कस्तुरचंद्र देवरा, (रा. गोकुळ प्लाझा, विरार वेस्ट , पालघर) आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पुणे-बंगळुरू महामार्गावरील तासवडे (ता. कराड) टोलनाक्यावर 27 ऑक्टोबर रोजी रात्री पोलिसांनी कारमधून 7 कोटी 53 लाख रूपये किंमतीचे 9 किलो सोने व 60 किलो चांदी जप्त केली होती. तत्पूर्वी, गुजरात पासिंगच्या बोलेरो गाडीतूनही 15 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर दिवाळीच्या दोन दिवस आधी साताऱ्याजवळच्या आनेवाडी टोलनाक्यावर तहसीलदारांच्या पथकाने एका वाहनातून 34 लाखांचे सोने जप्त केले होते.

उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे:-मनवेश सिंग सिद्धू

पुणे, दि. ५: विधानसभा निवडणूक निर्भयपणे व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी, उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. तसेच कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी उमेदवारांनी प्रचार करताना भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक गोष्टीची रिसतर परवानगी घ्यावी, असे निर्देश चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक मनवेश सिंग सिद्धू यांनी दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ग क्षेत्रीय कार्यालय, थेरगाव येथे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत श्री. सिद्धू बोलत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम, आशा होळकर, किशोर ननवरे तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

निवडणूक निरीक्षक श्री. सिद्धू म्हणाले, उमेदवारांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या रॅली, रोड-शो, प्रचार सभा इत्यादी बाबत एक खिडक कक्ष योजनेअंतर्गत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ४८ तास अगोदर परवानगी घेणे बंधनकारक आहे. ही परवानगी २४ तासांच्या आत देण्यात येईल. तसेच उमेदवारांकडून प्रचारासाठी वापरण्यात येणारे स्पिकर आणि वाहने याबाबतही परवानगी घेणे बंधनकारक आहे. याव्यतिरिक्त प्रचार प्रसारासाठी जे पोस्टर्स छपाई करून घेतले जातात त्यावर संबंधित मुद्रणालयाचे नाव, संपर्क क्रमांक छापणे, एकूण छपाई केलेल्या पोस्टर्सचा तपशील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास कळविणे आवश्यक आहे.

सोशल मिडीयाचा वापर प्रसिद्धीसाठी करताना प्रसिद्धीस दिलेला मजकुर प्रक्षोभक आढळल्यास उमेदवाराविरोधात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल. वर्तमानपत्र व टीव्ही चॅनल्सवर दिलेल्या जाहिरातीबाबतचा तपशील विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास कळविणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

0000

कर्तृत्व वाढवले तरच मराठी भाषा होईल मोठी – डॉ. सदानंद मोरे

२६ व्या स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवानिमित्त परिसंवादाचे आयोजन

पिंपरी, पुणे (दि. ०५ ऑक्टोबर २०२४) मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच मिळाला आहे. यानंतर “पुढे काय?” याचा विचार करताना मराठी माणसाचे कर्तुत्व वाढले पाहिजे; तरच भाषा मोठी होईल. मराठी भाषा ज्ञान भाषा होण्यासाठी आपण काय करणार आहोत, हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक प्रश्नावर सरकारला जबाबदार धरणे चूक आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत याचा विचार सर्वांनी केला पाहिजे. त्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. लोक कर्तुत्ववान असतील तरच भाषा मोठी होते. जोपर्यंत मराठी भाषिक हा वैज्ञानिक होत नाही; तोपर्यंत मराठी भाषा ज्ञान भाषा होऊ शकत नाही, असे परखड मत महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन आयोजित २६ व्या स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवानिमित्त सोमवारी (४ ऑक्टोबर) सायन्स पार्क येथे “मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पुढे काय?” या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, भाषा तज्ज्ञ व इतिहास संशोधक संजय सोनवणी, स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवाचे मुख्य संयोजक प्रवीण तुपे आदी उपस्थित होते.
मराठी भाषेचे आपणच मारेकरी आहोत. मराठी शाळा बंद पाडण्यामध्ये साहित्यिकांचा मोठा वाटा आहे. कारण आपणच आपली मुले मराठी शाळांमधून शिकवली नाहीत तर समाजापुढे काय आदर्श ठेवणार. कला, साहित्य, संगीत, चित्रपट या माध्यमांमध्ये भाषा टिकवण्याची मोठी शक्ती आहे. कवी गझलकार सुरेश भट, संगीतकार गायक सुधीर फडके, मंगेशकर कुटुंबीय यांचा मराठी भाषा टिकवून ठेवण्यात मोलाचा वाटा आहे. वारकरी संप्रदाय आणि ग्रामीण भाग येथे मराठी टिकून आहे. मराठी टिकून ठेवण्यासाठी आणि ज्ञानभाषा होण्यासाठी यापुढील काळात ‘मराठी पास नसेल, तिथे त्या व्यक्तीला राज्यात कोठेही नोकरी मिळणार नाही’, असा कायदा करण्याची वेळ आली आहे. आजच्या परिस्थितीचा विचार केला तर मराठीचे मारेकरी मंत्री आहेत. दिल्लीला खुश करण्यासाठी ते मातृभाषेतून बोलतानाच हिंदी आणि इंग्रजी मध्ये माध्यमांशी संवाद साधतात. दिल्लीश्वरांची कृपा करण्यासाठी हे लांगुलचालन केले जात आहे. भाषा जाती जातींमध्ये वाटली जाणार आहे का? असा मला प्रश्न पडतो. मातृभाषा जगण्याचे बळ देते. साहित्य, चित्रपट, माध्यम, संगीत उपासक यांच्यावर भाषा टिकविण्याची जबाबदारी आहे, असे रामदास फुटाणे यांनी सांगितले.
मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला आहे. आपण यासाठी उत्सव साजरा केला. मराठी राजभाषा म्हणून एक दिवसाचा कार्यक्रम करणार आणि उर्वरित ३६४ दिवस आपण काय करणार आहोत, याचा विचार केला पाहिजे. श्रीमंत इंग्रजी विरुद्ध गरीब मराठी असा लढा सध्या चालू आहे. मराठी ज्ञानभाषा खरोखरच आहे का, मराठी शिकून रोजगार मिळणार आहेत का, याचा सर्वांनीच विचार केला पाहिजे. राज्यांनी इंग्रजीची कास धरली आहे. न्याय व्यवस्था, प्रशासनामध्ये इंग्रजीचा वापर केला जातो; ही खंत आहे. जोपर्यंत आपण मराठीतून संवाद साधण्यावर भर देत नाही; तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यातून पुढे मराठीसाठी संशोधन आणि विकास यावर भर दिला पाहिजे. भारतातील अन्य राज्यांमध्ये जेथे मराठी शाळा महाविद्यालय सुरू होती, ती तशीच चालू राहिली पाहिजे. अन्य राज्यांतील विद्यापीठांमध्ये मराठी अध्ययन केंद्र सुरू झाले पाहिजे. अन्य भाषेतील चांगले साहित्य आणि मराठी भाषेतील चांगल्या साहित्याचा अन्य भाषांमध्ये अनुवाद झाला पाहिजे. यासाठी एखादी अनुवाद अकादमी उभारली पाहिजे, असे मत लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडले.
मराठी भाषकांनीच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी विरोध केला, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात अठरा हजार मराठी माध्यमाच्या शाळा बंद झाले आहेत. आपल्याला आपल्या भाषेविषयी आस्था नाही. मातृभाषेतून शिक्षण घेतले तर प्रगती होते हे सिद्ध झाले आहे. परंतु याबाबत पालकांना आत्मविश्वास नाही. केवळ सरकारकडे बोट दाखवून चालणार नाही. पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी धडपडत असतात. मातृभाषा मराठी आणि शिक्षण इंग्रजी भाषेत यामुळे मुलांचा गोंधळ उडतो. मुलांची जिज्ञासा वृत्ती रोखली जाते. अनेक ठिकाणी वाचनालय बंद झाली आहे. जेथे अर्थोद्योग मोठा ती भाषा मोठी होते; हे सप्रमाण सांगता येते. अमेरिकेत गुजराती भाषिकांची संख्या अधिक आहे. तेथे उद्योग व्यवसाय उभारण्यात गुजराती लोकांचा मोठा वाटा आहे. तेथे इंग्रजी बरोबरच गुजराती भाषा वापरली जाते. ‘पटेल्स मोटेल्स’ असे ही म्हटले जाते. तो विचार करता उद्योगांमध्ये मराठी माणूस मागे आहे. भाषिक वैभव मुलांपुढे ठेवण्यासाठी मराठी भाषेत संवाद, वाचन त्याचे महत्त्व समजून सांगणे यावर भर दिला पाहिजे. भाषेच्या कल्याणासाठी आपण सर्वांनी कंबर कसली पाहिजे असे, संजय सोनवणी यांनी सांगितले.
प्रारंभी प्रवीण तुपे यांनी स्वर सागर सांस्कृतिक महोत्सवाच्या २६ वर्षांचा आढावा घेतला. पिंपरी चिंचवड शहरात सांस्कृतिक चळवळ उभी रहावी, स्थानिक कलाकार, साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध झाले पाहिजे या उद्देशाने स्वर सागर कार्य करत आहे, असे तुपे यांनी सांगितले.स्वागत बाबासाहेब काळे यांनी केले. सुत्रसंचलन सीमा गांधी यांनी तर परिसंवादाचे समन्वयन आणि आभार राजन लाखे यांनी मानले.


लोकसभेला दणका दिला म्हणून मराठीला अभिजात दर्जा – रामदास फुटाणे

लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातून दणका मिळाला म्हणूनच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अन्यथा आणखीन प्रतीक्षा करावी लागली असती. देहू – आळंदी ही मराठीची दोन विद्यापीठे आहेत. तर ज्ञानोबा माऊलींनी लिहिलेले ‘पसायदान’ वाचले की मराठी भाषा अभिजात आहे हे स्पष्ट होते. अन्य कोणत्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे रामदास फुटाणे म्हणाले. यावेळी त्यांनी खुमासदार शैलीत वात्रटिका सादर केली.
आजोबा नाचू लागले, आजी नाचू लागली ।
शेंबडी नातवंडे इंग्रजी बोलू लागली ।।
नातू नाचू लागला, नात नाचू लागली ।
अन रद्दी इंग्रजीची घरी साचू लागली ।।
परिणाम असा झाला अजान मुळाखाली माती खचू लागली ।

आणि इंद्रायणीच्या डोहाला पोथी टोचू लागली ।।