पुणे : पर्वतीकर नागरिकांचा उत्साह, जल्लोष आणि आबालवृद्धांच्या साक्षीने आज सहकारनगर पद्मावती परिसरातील अरुणेश्वर मंदिरात महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटच्या अधिकृत उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्या प्रचाराचा शुभारंभ
संपन्न झाला. यावेळी काढण्यात आलेल्या पदयात्रा प्रचार रॅलीत ग्रामदैवत अरुणेश्वर, पद्मावती देवी, तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास वंदन करून आणि आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ वाढविण्यात आला. प्रचार पदयात्रा दरम्यान ठिकठिकाणी अश्विनी नितीन कदम यांना पर्वतीकर जनतेचे विशेषतः आबालवृद्धांपासून सर्वांचे निरपेक्ष प्रेम, कौतुक आणि पाठींबा मिळाला. माझ्या जनतेचा हा अकृत्रिम जिव्हाळा, माया हीच माझी ताकद आहे यामुळे मी भारावून गेले असुन यावेळी पर्वतीकर नागरिक बदल घडवत प्रचंड मताधिक्याने मला विधानसभेत पाठवणार असल्याचा विश्वास अश्विनी नितीन कदम यांनी व्यक्त केला.
पदयात्रा प्रचाराची सुरुवात अरण्येश्वर मंदिर टांगेवाला कॉलनी अध्यापक कॉलनी – कामगार कल्याण केंद्र संजीवनी सोसायटी खांडेकर शाळा – भोईराज सोसायटी – पद्मावती पोलीस चौकी चंदन सोसायटी – मोगल वसाहत – मंदार सोसायटी जनसेवा वसाहत पद्मावती मंदिर मार्गे नवजीवन मल्हार मार्तंड पंचवटी मंडळ – जय मल्हार – विशाल महाराष्ट्र आंबेडकर संकुल वीर लहुजी – रोहिदास सोसायटी स्वप्न साकार सोसायटी महात्मा गांधी सोसायटी – डाळिंब चौक सहकार नगर पोलीस स्टेशन – पद्मावती वसाहत – विणकर सभागृह सिद्धकला वीट भट्टी श्रमिक वसाहत – चव्हाण नगर गणपती मंदिर येथून आत जाणे शनी मंदिरचे येथून बाहेर येणे तीन हत्ती चौक संभाजीनगर कडे आत जाणे – शंकर महाराज वसाहत समाप्त.
या भागात पदयात्रा संपन्न होत असताना तमाम जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यात आली. त्याचप्रमाणें लाडक्या बहिणींसह महिलांनी औक्षण करत अश्विनी नितीन कदम यांचे स्वागत केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार प्रभारी अध्यक्ष अंकुश काकडे, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते मोहन जोशी, प्रदेश उपाध्यक्ष अभय छाजेड, माजी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल, अशोक हरणावळ राहुल तुपेरे, शिवसेना विभाग प्रमुख सुरज लोखंडे, पर्वती विधानसभा अध्यक्ष शशिकांत तापकीर, वैजनाथ वाघमारे, पुरुषोत्तम ओव्हाळ, संजय दामोदरे आदी महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि पर्वतीकर नागरिक महिलांची उपस्थित मोठ्या संख्येने होती.