Home Blog Page 590

निवडणुकीत पैशाचा वापर, अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू आदी बाबींवर बारकाईने लक्ष ठेवावे- विशेष खर्च निरीक्षक बी. आर. बालकृष्णन

पुणे1: निवडणुकीत आदर्श आचारसंहिता कालावधी पैशाचा वापर, अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू, निवडणूक प्रचारासाठी करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणीकरण, समाज माध्यमांवरील प्रचार आदी बाबी गांभीर्याने घ्याव्यात; कार्यवाही करताना आपल्या यापूर्वीच्या निवडणुकीतील पूर्वानुभव व त्यामाध्यमातून नाविन्यपूर्ण कल्पना राबवून त्याला तंत्रज्ञानाची जोड द्यावी, असे निर्देश विशेष खर्च निरीक्षक बी. आर. बालकृष्णन दिले.

जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाविषयक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक सुमित कुमार, प्रेमप्रकाश मीना, उमेश कुमार, अमित कुमार, ए. वेंकादेश बाबू, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे, पिंपरी चिंचवडचे पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त पियुषकुमार सिंह यादव, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त विक्रम चंद मेका, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी, निवडणूक खर्च सोनाप्पा यमगर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्यासह सर्व संबंधित अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

श्री. बालकृष्णन म्हणाले, निवडणुकीच्या काळात दारु निर्मिती करणाऱ्या कंपनीला अतिरिक्त उत्पादनाकरीता परवाना देण्यात येवू नये. उत्पादन नेणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा असावी, वाहने थांब्याच्या ठिकाणी फिरती सर्वेक्षण पथके (एफएसटी) आणि स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी), पोलीस पथकाद्वारे तपासणी करावी. खर्च संवेदनशील मतदार संघांमध्ये प्रत्येकी एक अतिरिक्त भरारी पथक (एफएसटी), व स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे (एसएसटी) कसून तपासणी सुरू ठेवावी. उमेदवारांच्यावतीने काढण्यात येणाऱ्या रॅलीच्या मार्गावरील संशयास्पद ठिकाणांची नियमितपणे तपासणी करण्यात यावी.

निवडणुकीच्या काळात अवैधरित्या वाहतूक होणारे पैसे, दारू किंवा इतर आमिषाच्या बाबींवर विविध पथकांच्या माध्यमातून कडक लक्ष ठेवण्यात यावे. कारवाई करतांना बॅंक व एटीएम व्यवहार, रोख व्यवहार, मोबाईलवरील संदेश, सीसीटिव्ही आदी पुराव्याची तपासणी करावी. स्थानिक बॅंकेच्या व्यवहारावरही लक्ष ठेवण्यात यावे.

रेल्वेने अवैधरित्या होणारी पैसे, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातूंची वाहतूक रोखण्याकरीता रेल्वे पोलीसांनी राज्य उत्पादन शुलक्, स्थानिक पोलीसांच्या मदतीने कार्यवाही करावी. विमानतळावरही यादृष्टीने कार्यवाही करावी. जिल्हा नियत्रंण कक्षात येणाऱ्या तक्रारी दैनंदिन निकाली काढावेत. निवडणुकीचे कामकाजाकरीता आवश्यकतेनुसार मनुष्यबळ आणि वाहने पुरविण्यात यावीत. निवडणुकीची गांभीर्यता लक्षात घेवून सर्व संबंधित यंत्रणेने संपर्कात राहून निवडणूक कामकाज पार पाडावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

डॉ. दिवसे यांनी एफएसटी, एसएसटी, व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी) पथकांच्या मदतीने निवडणुकीतील पैशाचा वापर, अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू यांची जप्ती यासाठीची यंत्रणा, निवडणूक प्रचारासाठी करण्यात येणाऱ्या जाहिरातींचे प्रमाणीकरण, निवडणुकीसाठी केलेल्या व्हीएचए, सी- व्हिजिल आदीबाबत निरीक्षकांना माहिती दिली. बैठकीत निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असेही डॉ. दिवसे म्हणाले.

यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक सुमित कुमार, प्रेमप्रकाश मीना, उमेश कुमार, अमित कुमार, ए. वेंकादेश बाबू यांनी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्च तसेच आयकर विभाग, केंद्रीय व राज्य वस्तुकर विभाग, भारतीय रेल्वे, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क आदी विभागाच्यावतीने खर्चाबाबत करण्यात आलेली कारवाई व नियोजनाबाबत माहिती दिली.

जिल्ह्यात सर्वाधिक 6 कोटी 70 लाख 34 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पर्वती विधानसभा मतदार संघात जप्त

जिल्ह्यात आचारसंहिता कालावधीत 31 कोटी 77 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान 15 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात 31 कोटी 77 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. यात 10 कोटी 92 लाख 25 हजार रुपये रोकड, 5 कोटी 2 लाख 57 हजार रुपयांचे 6 लाख 5 हजार लिटर मद्य, 58 लाख 81 हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ, 8 कोटी 63 लाख 53 हजार रुपयांचे मौल्यवान धातू, 6 कोटी 59 लाख 88 हजारांच्या वस्तूंचा समावेश आहे.

जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदार संघात भरारी पथके (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी) कार्यान्वित असून संशयास्पद वाहने, वाहतूक आदीवर काटेकोर लक्ष ठेऊन कार्यवाही केली जात आहे. पोलीस, आयकर विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग आदी विभागांच्यावतीनेही यामध्ये कार्यवाही केली जात आहे.

विधानसभा मतदार संघ निहाय आतापर्यंतची जप्तीची कारवाई:
जिल्ह्यात सर्वाधिक 6 कोटी 70 लाख 34 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पर्वती विधानसभा मतदार संघात जप्त करण्यात आला आहे. यात 2 लाख 88 हजार रुपयांचे 727 लिटर मद्य, 6 कोटी 60 लाख रुपयांचे मौल्यवान धातू, 7 लाख 46 हजार रुपयांच्या वस्तू यांचा समावेश आहे. आंबेगाव मतदार संघात सर्वात कमी किंमतीचा अर्थात 1 लाख 17 हजार रुपये रोकड, 3 लाख 91 हजार रुपयांचे 5 हजार 558 लिटर मद्य, 85 हजार रुपयांच्या वस्तू असा एकूण 5 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बारामती मतदार संघात 6 लाख 83 हजार रुपयांचे 12 हजार 16 लिटर मद्य, 2 लाख 3 हजार किंमतीच्या वस्तू असा 8 लाख 87 हजारांचा मुद्देमाल, भोर- 60 लाख रुपयांचे 25 हजार 487 लिटर मद्य, 81 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 1 कोटी 35 लाख 29 हजार रुपयांच्या वस्तू असा एकूण 1 कोटी 96 लाख 47 हजार रुपयांचा, भोसरी- 23 लाख 26 हजार रुपये रोकड, 21 लाख 45 हजार रुपयांचे 8 हजार 778 लिटर मद्य, 2 लाख 84 हजारांचे अंमली पदार्थ, 21 लाख 32 हजार रुपयांच्या वस्तू असा 68 लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चिंचवड- 40 लाख 11 हजार रुपये रोकड, 22 लाख 91 हजार रुपयांचे 9 हजार 569 लिटर मद्य, 63 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 5 लाख 45 हजारांच्या वस्तू असा 69 लाख 10 हजारांचा मुद्देमाल, दौंड- 13 लाख 99 हजार रुपये रोकड, 44 लाख 84 हजार रुपयांचे 86 हजार 428 लिटर मद्य, 12 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 1 लाख 72 हजार रुपयांच्या वस्तू असा 60 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हडपसर- 35 लाख 90 हजार रुपये रोकड, 10 लाख 52 हजार रुपयांचे 7 हजार 88 लिटर मद्य, 3 कोटी 18 लाख 61 हजार रुपयांच्या वस्तू असा 3 कोटी 65 लाख 3 हजारांचा मुद्देमाल, इंदापूर- 5 लाख 25 हजार रुपये रोकड, 19 लाख 3 हजार रुपयांचे 17 हजार 14 लिटर मद्य, 10 लाख 98 हजार रुपयांच्या वस्तू असा 35 लाख 26 हजारांचा मुद्देमाल, जुन्नर- 28 लाख 78 हजार रुपयांचे 13 हजार 950 लिटर मद्य, 5 लाख 93 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 61 लाख 27 हजार रुपयांच्या वस्तू असा 95 लाख 99 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कसबापेठ मतदार संघात 2 लाख 9 हजार रुपयांचे 1 हजार 106 लिटर मद्य, 17 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 5 लाख 34 हजार रुपयांच्या वस्तू असा 7 लाख 60 हजारांचा मुद्देमाल, खडकवासला- 5 कोटी रुपये रोकड, 14 लाख 5 हजार रुपयांचे 6 हजार 15 लिटर मद्य, 16 लाख 60 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 18 लाख 42 हजार रुपयांच्या वस्तू असा 5 कोटी 49 लाख 7 हजारांचा मुद्देमाल, खेड आळंदी- 89 लाख 8 हजार रुपये रोकड, 36 लाख 64 हजार रुपयांचे 44 हजार 685 लिटर मद्य, 10 लाख 79 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 14 लाख 16 हजार रुपयांच्या वस्तू असा 1 कोटी 50 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोथरुडमध्ये 6 लाख 26 हजार रुपयांचे 1 हजार 773 लिटर मद्य, 2 लाख 48 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 1 लाख 71 हजार रुपयांच्या वस्तू असा 10 लाख 46 हजारांचा मुद्देमाल, मावळ- 27 लाख 12 हजार रुपये रोकड, 81 लाख 84 हजार रुपयांचे 1 लाख 62 हजार 840 लिटर मद्य, 2 लाख 62 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 98 लाख 97 हजारांचे मौल्यवान धातू, 27 लाख 92 हजार रुपयांच्या वस्तू असा 2 कोटी 38 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पिंपरी- 4 लाख 48 हजार रुपये रोकड, 6 लाख 61 हजार रुपयांचे 6 हजार 970 लिटर मद्य, 5 लाख 34 हजार रुपयांच्या वस्तू असा 16 लाख 43 हजारांचा मुद्देमाल, पुणे कॅन्टोन्मेंट- 3 लाख 20 हजार रुपयांचे 1 हजार 795 लिटर मद्य, 12 लाख 45 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 5 लाख 89 हजार रुपयांच्या वस्तू असा 21 लाख 54 हजारांचा मुद्देमाल, पुरंदर- 58 लाख 87 हजार रुपयांचे 89 हजार 972 लिटर मद्य, 29 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 2 लाख 50 हजार रुपयांच्या वस्तू असा 61 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शिरुरमध्ये 3 कोटी 1 लाख 90 हजार रुपये रोकड, 52 लाख 60 हजार रुपयांचे 92 हजार 312 लिटर मद्य, 12 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 1 कोटी 4 लाख 56 हजारांचे मौल्यवान धातू, 5 लाख 11 हजार रुपयांच्या वस्तू असा 4 कोटी 64 लाख 28 हजारांचा मुद्देमाल, शिवाजीनगर- 8 लाख 83 हजार रुपयांचे 5 हजार 405 लिटर मद्य, 2 लाख 89 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 3 लाख 81 हजार रुपयांच्या वस्तू असा 15 लाख 53 हजारांचा मुद्देमाल, वडगाव शेरी- 50 लाख रुपये रोकड, 10 लाख 2 हजार रुपयांचे 5 हजार 547 लिटर मद्य, 6 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 4 लाख 67 हजार रुपयांच्या वस्तू असा 64 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
0000

खडकवासल्यात महायुतीच्या एकजुटीच्या निर्धाराने आमदार तापकिरांच्या विजयाचा मार्ग होणार सुकर

तापकीर यांच्या गाव भेट दौरा व पदयात्रा दरम्यान वडगाव-धायरीत महायुती मध्ये अतिशय सकारात्मक वातावरण

पुणे-खडकवासला विधानसभा मतदार संघातील उमेदवार भीमराव तापकीर यांचा महायुतीच्या नेतृत्वाखाली आज वडगाव-धायरी परिसरात गाव भेट दौरा तसेच पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. सकाळी ९ वाजता सुरू झालेली ही पदयात्रा दुपारी २ वाजता संपन्न झाली. मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने आयोजित या दौऱ्यात महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.

धायरी मुख्य रोडवरून सुरू झालेली ही पदयात्रा उंबऱ्या गणपती चौक, मुक्ताई गार्डन कमान, गणेशनगर मित्र मंडळ, रायकरनगर, गारमाळ, लाडली साडी सेंटर कॉर्नर, मिडीया कॉर्नर, आणि शेवटी सुवासिनी मंगल कार्यालय (त्रिमूर्ती हॉस्पिटल) येथे संपन्न झाली.

महिला आयोग अध्यक्ष: रूपालीताई चाकणकरशिवसेना पुणे शहर प्रमुख: पूजाताई रावेतकरमाजी नगरसेवक: राजाभाऊ लायगुडे, बाळासाहेब नवले, राजश्रीताई नवले, हरिदास चरवड,स्वीकृत नगरसेवक: गंगाधर भडावळे,प्रमुख पदाधिकारी: अतुल चाकणकर, अनंता दांगट,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष: सारंग नवले,महिला अध्यक्ष (राष्ट्रवादी अजितदादा गट): डांगीताई,प्रभाग अध्यक्ष: यशवंत लायगुडेयासोबतच महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पदयात्रेदरम्यान नेत्यांनी मतदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. विकासकामांबाबत स्थानिकांचा अभिप्राय जाणून घेतल्याने जनतेत सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.ही पदयात्रा केवळ प्रचाराचाच भाग नसून मतदारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या भल्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचे प्रतीक आहे असे यावेळी आ.तापकीर यांनी सांगितले वडगाव-धायरीसारख्या भागाचा सर्वांगीण विकास आणि स्थानिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याचा निर्धार महायुतीच्या नेतृत्वाने यावेळी व्यक्त केला.महायुतीतील सर्व घटक पक्षांकडून तापकीर यांच्या नेतृत्वात वडगाव-धायरीच्या जनतेसाठी सतत कार्यरत राहण्याचे वचन पुन्हा एकदा दृढ करण्यात आले.

अरे सुन ले ओ ओवैसी, कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर…अब तो तिरंगा लहरायेगा पूरे पाकिस्तान पर.. फडणविसांनी ललकारले ..

मुंबई-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मेरे हैदराबादी भाई, उधरी रहना, इधरकू मत आना, इधरकू तुम्हारा कोई कामा नहीं, असे म्हणत फडणवीस यांनी ओवैसींना हैद्राबादी भाषेत टोला लगावला आहे. तसेच औरंगजेबाच्या मुद्द्यावरूनही असदुद्दीन ओवैसींवर जोरदार टीका केली आहे. अरे सुन ले ओ ओवैसी, कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर…अब तो तिरंगा लहरायेगा पूरे पाकिस्तान पर, असे फडणवीस म्हणाले.मुंबईतील मलाड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विनोद शेलार यांच्यासाठी तर जोगेश्वरी येथे विद्या ठाकुर आणि भारती लव्हेकर यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीसांच्या सभा पार पडल्या. या सभांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि विरोधकांवर जोरदार निशाणा साधत टीका केली आहे.


देवेंद्र फडणवीस ओवैसी यांच्यावर टीका करताना म्हणाले, हल्ली ते ओवैसी देखील आपल्या राज्यात, येथील मतदारसंघांमध्ये येत आहेत, फिरत आहेत. मला त्यांना सांगायचे आहे, मेरे हैदराबादी भाई, उधरी रहना, इधरकू मत आना, इधरकू तुम्हारा कोई कामा नहीं है, असे म्हणत फडणवीसांनी ओवैसी यांना चिमटा काढला आहे. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, येथे येऊन आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. औरंगजेबाचे महिमामंडन केले जात आहे. त्या लोकांना मला सांगायचे आहे की भारताचा जो सच्चा मुसलमान आहे तो औरंगजेबाला आपला हिरो मानत नाही. कारण औरंगजेब हा एक आक्रमणकारी होता. त्याने आमच्यावर अनेक आक्रमणे केली आहेत. म्हणून मी म्हणतो, अरे सुन ले ओ ओवैसी, कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर…अब तो तिरंगा लहरायेगा पूरे पाकिस्तान पर.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. मुंबईतील मराठी माणसाला बेघर करण्याचे काम उबाठाने केले, असा आरोप त्यांनी केला. पत्राचाळीमध्ये भ्रष्टाचार करत मुंबईतील मराठी माणसाला बेघर करण्याचे काम उबाठाने केले. मात्र, प्रकल्पाला नव्याने मंजुरी देऊन मराठी माणसाला त्याच ठिकाणी घर मिळेल, हे महायुती सरकारने करुन दाखवले. उबाठाचे आणि महाभकास आघाडीचे लोक कधीच विकासावर बोलू शकत नाहीत, असे फडणवीस म्हणाले.यापूर्वी मुंबईकरांना केवळ स्वप्ने दाखवली जात होती, काहीही न करता ‘करुन दाखवले’ अशी होर्डिंग्स लावली जात होती. पूर्वीच्या काँग्रेस सरकारने 11 वर्षात 11 किलोमीटरची मेट्रो तयार केली. 2014 मधील आपल्या सरकारने आणि नंतरच्या काळातील महायुती सरकारने 5 वर्षात 354 किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे उभारले, त्यापैकी 100 किमीचे काम पूर्णत्वासही आलेले आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.आम्ही कोणत्याही जातीधर्माविरोधात नाही. मात्र, लांगुलचालन खपवून घेणार नाही. कुणी जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. ओवैसीलाही सांगू इच्छितो की, तुम्ही रझाकारांचे सरकार पुन्हा येथे आणण्याचे स्वप्न पाहू नका, ते स्वप्न आम्ही गाडून टाकू. व्होट जिहादचा नारा दिला जात असेल, तर तुम्ही मतांचे धर्मयुद्ध पुकारा व महायुतीचे राज्य आणा, असेही फडणवीस म्हणाले.

DSK ना अटक,मालमत्ता जप्त पण 32 हजार ठेवीदारांचे पैसे गायबच …विधानसभा निवडणुकीत ठेवीदार संघटना आणि हिंदू महासंघ आक्रमक

राजकीय पक्षांनी असंवेदनशीलता दाखविल्याने डी एस के ठेवीदार नाराज

पुणे :डिएस कुलकर्णी यांच्या कंपन्यात तब्ब्ल 32 हजार ठेवीदारांची 1200 कोटी रुपयांची संघटित पणे लूट करण्यात आली, तरी असंवेदशीलता दाखविणाऱ्या राजकीय पक्षांच्या बाबतीत डिएसके ठेवीदार नाराज असून विधानसभा निवडणुकीबाबत आक्रमकपणे निर्णय घेण्याच्या मानसिकतेत आहे.डीएसके ठेवीदार संघटना,हिंदू महासंघा च्या मदतीने अनेक महिने आंदोलनात असून हिंदू महासंघ चे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात पुढील वाटचालीची माहिती देण्यात आली आहे.

सर्व सरकारी यंत्रणा याबाबत पूर्ण असंवेदनशील असून कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेतृत्वाने सुद्धा या ठेवीदारां प्रति अनुकूलता दाखवली नसल्याने हिंदू महासंघ च्या सहकार्यने हे सर्व ठेवीदार पहिल्यांदाच राजकीय निर्णय घेण्याच्या विचारात आहेत.

कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता उलट ती डावलून सर्व ठेवीदारांची फसवणूक करण्यात आली आहे, याकडे ठेवीदारांनी लक्ष वेधले आहे.10 नोव्हेंबर रोजी चित्तरंजन वाटीका बागेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या बैठकीत सर्व ठेवीदार आणि हिंदू महासंघ कडून आनंद दवे सहित, सूर्यकांत कुंभार, मनोज तारे, नितीन शुक्ल आणि आदिती जोशी उपस्थित होते. ठेवीदार संघटनेचे प्रतिनिधी दीपक फडणवीस, शरद नातू, सुधीर गोसावी, नितीन मोरे आदी उपस्थित होते.पुढील 2/3 दिवसात मेळावा घेऊन अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे आनंद दवे यांनी सांगितले

दि.१५,१६ नोव्हेंबर रोजी पुण्यात वास्तू ज्योतिष संमेलन

कृष्णमूर्ती पद्धत,वास्तूशास्त्र विषयक मंथन होणार

गौरीकैलास ज्योतिष संस्थेकडून आयोजन

पुणे :गौरीकैलास ज्योतिष संस्थेच्या वतीने कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत,वास्तूशास्त्र विषयक विचारमंथन करण्यासाठी दि.१५,१६ नोव्हेंबर २०२४ रोजी पुण्यात वास्तू ज्योतिष संमेलन आयोजित करण्यात आले आहे.हॉटेल प्रेसिडेंट (प्रभात रस्ता) येथे हे संमेलन होणार असून भालचंद्र ज्योतिर्विद्यालय,स्मार्ट ऍस्ट्रॉलॉजर्स,ज्योतिष प्रबोधिनी,वास्तू ज्योतिष मित्र,आयादी ज्योतिष आणि वास्तू संस्था,मराठी ज्योतिषी मंडळ या संस्था सहभागी होणार आहेत. गौरीकैलास ज्योतिष संस्थेचे संस्थापक कैलास केंजळे,सौ.गौरी केंजळे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.वास्तू ज्योतिष संमेलन आयोजनाचे हे तिसरे वर्ष आहे.

शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता वास्तू तज्ज्ञ डॉ.आनंद भारद्वाज(दिल्ली) यांच्या हस्ते उदघाटन होणार असून डॉ.त्रिशला शेठ या अध्यक्ष स्थानी असणार आहेत.चंद्रकांत शेवाळे हे स्वागताध्यक्ष आहेत.प्रमुख उपस्थिति गुरुश्री प्रिया मालवणकर याची आहे.ॲड.सुनीता पागे,नरेन उमरीकर,डॉ.चंद्रकला जोशी,मोहन पूर्णपात्रे,रमेश पलंगे,डॉ.सीमा देशमुख,श्री नाटेकर ,गणेशशास्त्री शुक्ल हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.दिवसभर ज्योतिषविषयक सत्रे होणार असून त्यात डॉ.आनंद भारद्वाज,डॉ.त्रिशला शेठ,डॉ.कीर्ती शाह,श्री नाटेकर,राहुल सरोदे,प्रदीप पंडित सहभागी होणार आहेत.

शनिवार,दि.१६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता ज्योतिष तज्ज्ञ श्री.सिल गुरु यांच्या हस्ते उदघाटन होणार असून दत्त्तप्रसाद चव्हाण हे अध्यक्ष स्थानी असणार आहेत.ख्यातनाम ज्योतिषी आदिनाथ साळवी यांची प्रमुख उपस्थिती असेल.कांतीलाल मुनोत हे स्वागताध्यक्ष आहेत.सौ.अंजली पोतदार,सौ.पुष्पलता शेवाळे,श्रीराज पाताडे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.दिवसभर ज्योतिषविषयक सत्रे होणार असून त्यात श्री.सिल गुरु,विनायक आगटे,विकास वैद्य,दत्तप्रसाद चव्हाण,विजयानंद पाटील,सौ.अनुराधा कोगेकर,सौ.गौरी केंजळे, प्रदीप पंडित,नंदकिशोर जकातदार,ॲड.मालती शर्मा सहभागी होणार आहेत. कै.मनोहर केंजळे स्मृती पुरस्कार डॉ.सौ.जयश्री बेलसरे यांना देण्यात येणार आहे.प्रश्नोत्तराचे सत्र तसेच स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे.

कोथरूडमध्ये यंदाही गुलाल आपलाच! भाजपा कार्यकर्त्यांचा निर्धार

महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोला भव्य प्रतिसाद

सोसायटीचे ज्येष्ठ नागरीक आणि गणेशोत्सव मंडळांकडून जोरदार स्वागत

पुणे-कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक ११ मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंदाही गुलाल उधळण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या रॅली मध्ये असंख्य तरुण मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. सोसायटीचे ज्येष्ठ नागरिक आणि गणेशोत्सव मंडळांकडून भव्य स्वागत करुन शुभेच्छा देण्यात आल्या.

विधानसभा निवडणुकीला चांगलाच रंग चढत आहे. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी, रोड शो, पदयात्रा यामुळे सगळीकडे निवडणूकमय वातावरण निर्माण झाले आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील प्रचारात अग्रेसर असल्याचे पाहायला मिळत आहे. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून मतदारांच्या गाठीभेटींसह बाईक रॅलीद्वारे रोड शोद्वारे नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. या सर्व उपक्रमांना कोथरुडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सोमवारी संध्याकाळी कोथरुड मधील प्रभाग क्रमांक ११ मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वनाझ येथील किनारा हॉटेल चौकातून रॅलीला सुरुवात झाली. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा निनाद , पुष्पवृष्टीने रॅलीचे स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी महिलांकडून औक्षण करुन चंद्रकांतदादा पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. दिव्यांग बांधवांकडूनही चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराचे अध्यक्ष दिपकभाऊ मानकर, हर्षवर्धन मानकर, करण मानकर, रिपाइंचे ॲड मंदार जोशी, बाळासाहेब खंकाळ, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, भाजपा कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, नगरसेविका छाया मारणे, भाजपाचे प्रभाग ११ चे अध्यक्ष आशुतोष वैशंपायन, अभिजीत राऊत, स्वाती मोहोळ, सुरेखा जगताप, दिनेश माझिरे, दत्ताभाऊ भगत, नाना कुंबरे, दिलीप उंबरकर यांच्या सह भाजप महायुतीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुत्व रक्षणासाठी महायुती सरकार आवश्यक- संदीप खर्डेकर

कोथरूड मधून चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करणार- श्रीकांत शिळीमकर

पतितपावन संघटनेचा भाजपा महायुतीला पाठिंबा

पुणे-हिंदुत्व रक्षणासाठी महायुती सरकार आवश्यक असून, पुण्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी महायुतीला विजयी करण्याचे आवाहन पतितपावन संघटनेचे माजी प्रांत संघटक तथा महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी केले.कोथरूड मतदारसंघात पतितपावन संघटनेचा स्नेह मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कोथरूड मधून चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करणार, असा निर्धार पतितपावन संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजप महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील, भाजप महायुतीचे कोथरूड समन्वयक सुशील मेंगडे, भाजपा नेते बाळासाहेब टेमकर, पतितपावन संघटनेचे महाराष्ट्र प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील,शहर पालक मनोज नायर,जालिंदर टेमगिरे,सुनील मराठे,ज्ञानेश्वर साठे, राहुल पडवळ, शरद देशमुख, विनोद बागल, अण्णा बांगर यांच्या सह पतितपावन संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

समन्वयक संदीप खर्डेकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आपण सर्व गाफील राहिल्याने आज एक महत्वाचा वक्फ सारखा कायदा मागे घेऊन संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठववा लागला. या निवडणुकीत महाराष्ट्रातील अनेक जागा फारच कमी मतांनी पराभूत व्हावे लागले. मविआ सरकारने अडीच वर्षे हिंदुंना प्रचंड त्रास दिला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोणीही गाफील राहू नये; हिंदुत्वाच्या रक्षणासाठी महायुतीचे सरकार आणावं लागेल. अशी भावना व्यक्त केली.

श्रीकांत शिळीमकर म्हणाले की, पतितपावन संघटना नेहमीच हिंदुत्वाच्या रक्षणासाठी उभी राहिली आहे. त्यामुळे हिंदुत्वासाठी महायुतीला पाठिंबा देण्यासोबतच; कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करणार, असा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

संत साहित्याचे समृद्ध संचित मराठी रुपेरी पडद्यावर

जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवरील ‘आनंदडोह’ चित्रपटाची घोषणा

संत विचारावर महाराष्ट्र समृध्द झाला आहे. या संतांनी अभंग-श्लोक-ओव्या अशा रचनांतून साहित्याचा अलौकिक ठेवा मराठी भाषेला दिला. अध्यात्म, रुढी-परंपरांकडे पाहण्याची एक निर्मळ दृष्टीही दिली. आजच्या काळात या दृष्टीची आपल्याला नितांत आवश्यकता आहे. ‘शिवराज अष्टकाच्या’ रूपाने घराघरांत पोहचलेले गुणी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज अन त्यांच्या शूर शिलेदारांचा इतिहास जागतिक सिनेमांच्या पातळीवर नेऊन ठेवलाय. ‘शिवराज अष्टक’ नंतर आता संत साहित्याचे समृद्ध संचित घराघरांत पोहचावे यासाठी त्यांनी पाऊल उचलले आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या निर्मितीनंतर आता जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेवरील ‘आनंदडोह’ या नव्या चित्रपटाची घोषणा त्यांनी केली आहे. या चित्रपटाचे देखणे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘साईराम एंटरप्राईजेस’ निर्मित, योगेश सोमण लिखित आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘आनंदडोह’ हा भव्य मराठी चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षक भेटीला येणार आहे. अविनाश  शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मुक्ता बर्वे, योगेश सोमण, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, आदिनाथ कोठारे असे मराठीतले नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची अभंगगाथा हा मराठी साहित्यातील फार अनमोल ठेवा आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेशी झगडताना त्यांनी बहुजन समाजाला ज्ञानमार्ग दाखवतील असे अनेक अभंग रचले. त्यांच्या ३००० हून अधिक अभंगातून आजही आपल्याला जगण्याची प्रेरणा व मार्गदर्शन मिळते. यातले अनेक अभंग म्हणींच्या स्वरूपात सुद्धा अलंकृत झालेले पहायला मिळतात. या अभंगगाथेतल्या तत्वज्ञानाला तत्कालीन रूढीवादी पंडितांनी विरोध केला. संत तुकाराम महाराजांची ही गाथा इंद्रायणी नदीच्या डोहात बुडविण्यात आली. संत तुकारामांच्या भक्तीचा चमत्कार म्हणून हे अभंग इंद्रायणीतून तरले, असे सांगण्यात येते. हीच अद्वित्तीय अभंगगाथा इंद्रायणी डोहात बुडल्यापासून ते तरल्या पर्यंतच्या तेरा दिवसात जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, त्यांची पत्नी आवली, त्यांचे कुटुंब,संपूर्ण तत्कालीन समाज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक या सगळ्यांवर काय परिणाम झाला याची कथा ‘आनंदडोह’ चित्रपटात असणार आहे.  

आजच्या परिस्थितीत संत साहित्याच्या समृद्ध संचिताविषयी कृतज्ञतेचा भाव मनात असून हे संचित आपल्याला पुन्हा एकदा जगण्याचे बळ देणारे असेल या विश्वासाने आम्ही संत परंपरेतील चित्रपटांच्या निर्मितीचा संकल्प  लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोडला आहे.

खडकवासलात ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, आणि ‘चक्रीका ॲप’साठी प्रशिक्षण शिबीर यशस्वीरीत्या संपन्न

पुणे: खडकवासला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ईव्हीएम (EVM), व्हीव्हीपॅट (VVPAT), आणि ‘चक्रीका ॲप’च्या वापरासाठी आयोजित अंतिम प्रशिक्षण शिबीर यशस्वीरीत्या पार पडले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या शिबिरात मतदान प्रक्रियेतील तांत्रिक कौशल्ये, नियमावली, आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा यावर सखोल मार्गदर्शन देण्यात आले.
या शिबिरात तहसीलदार किरण सुरवसे, मनपा उपयुक्त विजय नायकल, अधीक्षक विजय शिंदे, प्रमोद भांड, भूमेश मसराम, धम्मदीप सातकर, आणि निवडणूक विभागाचे अधिकारी सचिन आखाडे यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. शिबिराचे सूत्रसंचालन साहीर सय्यद यांनी केले.
प्रशिक्षणात प्रा. तुषार राणे, संजय भोर,प्रा. पल्लवी जोशी आणि प्रा. माधुरी माने यांनी मतदान प्रक्रियेच्या विविध पैलूंवर सखोल माहिती दिली. प्रा. राणे यांनी ईव्हीएम मशीनच्या वापराबाबत तपशीलवार मार्गदर्शन केले, तर प्रा. जोशी आणि संजय भोर यांनी मतदान प्रक्रियेत आवश्यक सुरक्षा उपाय स्पष्ट केले. प्रा. माधुरी माने यांनी ‘चक्रीका ॲप’चा वापर कसा करावा याबद्दल प्रशिक्षण दिले, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेत सुलभता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.
‘चक्रीका ॲप’द्वारे मतदान कर्मचाऱ्यांना मतदारांची तपशीलवार माहिती, मतदान केंद्रांचे निर्देश, आणि प्रक्रियेतील आवश्यक सूचना सहज मिळतात. मतदानाच्या वेळी उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्यांवर त्वरित तोडगा काढण्यासाठीही हे ॲप उपयुक्त ठरते.
प्रशिक्षणानंतर कर्मचाऱ्यांची ५० गुणांची परीक्षा घेण्यात आली, ज्यातून त्यांचे ज्ञान तपासण्यात आले. या शिबिरामुळे कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेचे तांत्रिक ज्ञान मिळाले असून, आगामी निवडणुकीत हा अनुभव उपयुक्त ठरेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

खडकवासला विधानसभा निवडणुकीसाठी एक खिडकी कक्ष: परवानग्या मिळवण्याची अंतिम संधी 16 तारखेपर्यंत

पुणे: खडकवासला विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने उमेदवार व राजकीय पक्षांना विविध परवानग्या मिळवण्यासाठी एक खिडकी कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे. या कक्षामुळे इच्छुक उमेदवारांना एकाच ठिकाणी आवश्यक परवानग्यांची पूर्तता करणे सोपे झाले आहे, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे. ही सुविधा 16 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उपलब्ध राहील.
या कक्षाचे नेतृत्व तहसीलदार किरण सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात असून, नोडल अधिकारी स्वाती नरोटे, ज्ञानेश्वर मानकर, अक्षय लडकत, दीपक टिकेकर, सुवैद्य पवार, प्रदीप शिंदे, संदीप रेणुसे, आणि शैलेंद्र सोनवणे हे या कक्षात कार्यरत आहेत. या अधिकाऱ्यांनी परवानगी प्रक्रियेतील सुलभतेवर भर देत उमेदवारांना जलद आणि प्रभावी सेवा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
परवानगी प्रक्रियेत सभासंस्था, प्रचार रॅली, वाहन परवाने आणि अन्य विविध आवश्यक परवानग्या एकाच ठिकाणी मिळतील. कक्षातील अधिकारी उमेदवारांच्या अर्जांशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी तत्पर असून, त्यांच्या अर्जांच्या पूर्ततेसाठी मदत करत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी कक्षाचे महत्त्व अधोरेखित करत 16 तारखेपर्यंत सर्व उमेदवारांनी परवानग्या पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
या प्रक्रियेत आरटीओ प्रशासनाचे पराग बर्वे व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एम. एस. देशमुख, मनुष्यबळ कक्षाचे साहीर सय्यद हे देखील सहकार्य करत आहेत. तहसीलदार किरण सुरवसे आणि सर्व अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा विभाग अधिक कार्यक्षम ठरला असून, मतदारसंघातील निवडणूक कार्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

उद्धव ठाकरे यांची बॅग तपासणे हे सुडाचे राजकारण: सुप्रिया सुळे

प्रशांत जगताप यांच्यासाठी सुप्रियाताईंची बाईक रॅली – हडपसर मतदारसंघातील कात्रज-कोंढवा परिसरात सुप्रिया सुळे यांचा मतदारांशी संवाद

पुणे: हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित बाईक रॅलीमध्ये सहभागी होत संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारांशी संवाद साधला. कात्रज तलावाजवळील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन सुप्रिया सुळे यांनी बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. मोठ्या संख्येने  नागरिक व कार्यकर्ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले. रॅलीदरम्यान विविध ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वसंततात्या मोरे, माजी उपमहापौर बंडूतात्या गायकवाड, माजी नगरसेवक योगेश ससाणे, दिलीप तुपे, प्रवीण तुपे, समीर तुपे, निलेश मगर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, महिला पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले.’रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’चा जयघोष करीत निघालेल्या या रॅलीमुळे परिसरात जल्लोषाचे व चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. कात्रज गावठाण, गोकुळनगर चौक, कान्हा हॉटेल चौक, साळवे गार्डन, कोंढवा बुद्रुक, साईनगर, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द या भागातून ही रॅली निघाली. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी सुप्रिया सुळे व प्रशांत जगताप यांच्याशी संवाद करीत आपल्या समस्या मांडल्या. सुळे यांनीही सर्वांचे गाऱ्हाणे ऐकून विकासाची हमी दिली व येत्या काळात प्रशांत जगताप यांच्या माध्यमातून परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असा विश्वास दिला.पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ही लढाई कौटुंबिक नसून, वैचारिक आहे. आम्ही अन्यायाविरुद्ध लढत आहोत. आमच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत. हे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असा प्रकार आहे. आमच्यावरील आरोप खरे असतील, तर आम्ही कोर्टामध्ये जाण्यासाठी तयार आहोत. हडपसरच्या विकासासाठी प्रशांतदादा जगताप हेच योग्य पर्याय आहेत. त्यामुळे येत्या २० तारखेला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ चिन्हासमोरील बटण दाबून तुम्ही त्यांना विजयी करावे असे आवाहन करते.”उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासण्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझीही गाडी काल चेक केली. मला याचा आनंद आहे आणि उपस्थित अधिकार्‍यांना याबाबत प्रोत्साहनही दिले. त्यांनी जरूर सर्व चेक करावे. परंतु, उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांची बॅग तपासणे हे सुडाचे राजकारण आहे. अजित पवारांविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, बारामती विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांनी मागील सहा दशके मेहनत घेऊन उभा केला आहे. यामध्ये इतरांनीही काही ना काही योगदान दिले आहे. याचा अर्थ दुसऱ्या कोणी एकाने श्रेय घेणे योग्य नाही. ही परिवाराची लढाई नाही. या वैचारिक लढाईत कोणाला विजयी करायचे हे महाराष्ट्राची आणि बारामतीची मायबाप जनता ठरवेल. एक पारदर्शक आणि नवीन पिढीचा एक स्वच्छ चारित्र्याचा मुलगा, सुशिक्षित व सुसंस्कृत चेहरा म्हणून युगेंद्र बारामतीमध्ये जनतेपुढे जात आहे.”प्रशांत जगताप म्हणाले, “सुप्रियाताईंच्या दौऱ्याने मतदारसंघात आपली ताकद आणखी वाढली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यापाठोपाठ आज ताईंची बाईक रॅली झाल्याने आम्हा सर्व कार्यकर्त्यांसह मतदारांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे. हडपसरच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यावर शाश्वत उपाययोजना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यामध्ये हडपसरची जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे, हे पहिल्या दिवसापासून पाहायला मिळत आहे. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येतो आहे, तसा विजयाचा विश्वास आणखी दृढ होत आहे.”

हेमंत रासने यांच्या प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद

पुणे:कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या शुक्रवार पेठ परिसरातील प्रचार फेरीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

रासने यांच्या प्रचारार्थ भाऊसाहेब रंगारी गणपती, जोगेश्वरी मंदीर, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, मेट्रो स्टेशन, आंग्रेवाडा, अकरा मारुती चौक, चिंचेची तालीम, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, सुभाषनगर, अत्रे सभागृह या परिसरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते.
अशोक येनपुरे, रुपाली ठोफ्लबरे पाटील, स्वरदा बापट, उज्ज्वला गंजीवाले, दिलीप काळोखे, सोहम भोसले, दिलीप पवार, अनिल बेलकर, अशोक कदम, प्रणव गंजीवाले, शेखर बोफ्लडकर, पंकज मोने, नंदकुमार जाधव, अनिल पवार, मुकेश राजावत, विजय नाईक, अनिल तेलवडे, राजू ठिगळे, कल्याणी नाईक, अनिता वाघ, इंदिरा निगडे, मयुर गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.

रासने म्हणाले, शहरातील मध्यवस्तीतील समांतर असलेले बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्ता हे रस्ते मध्य वस्तीतील सर्वात मोठ्या बाजारपेठेला जोडतात. गेल्या अनेक वर्षांपासून हे रस्ते विस्तारलेले नाहीत. वाहनांची संख्या वाढल्याने या भागातील कोंडी प्रचंड वाढली आहे. अतिक्रमणे वाढत चालली आहेत. याच रस्त्याव असलेल्या ऐतिहासिक स्थळांच्या सौफ्लदर्याला बाधा येऊ लागली आहे. त्यामुळे हा रस्ता मॉडर्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

रासने पुढे म्हणाले. मध्य वस्ती ही शहराची मुख्य बाजारपेठ आहे. या मुळे हा परिसर सतत गजबजलेला असतो. त्यामुळे या रस्त्यावर अनेक वर्षांत नवीन ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन टाकता आलेली नव्हती. या वाहिन्या जुन्या आणि जीर्ण झाल्या होत्या. पुढील 20 ते 25 वर्षांचा विचार करून भूमिगत ड्रेनेज लाईन आणि जलवाहिन्या टाकण्यात आल्या. पुढील काळात प्रशस्त आणि देखणे पदपथही विकसित केले जाणार आहेत. रस्त्याच्या मधोमध रिफ्लेक्टर बसविण्यात येणार असून पथदिवे आकर्षक करण्यात येणार आहेत. हा रस्ता पुढील अनेक वर्षे पुन्हा करावा लागणार नाही. पादचारी, वाहनचालक सर्वांनाच त्याचा व्यवस्थित वापर करता येईल.

आंबेडकरी विचारांच्या जनतेने महाविकास आघाडीच्या पाठीशी राहावे- प्रशांत जगताप यांचे आवाहन

0

हडपसरला कचरामुक्त, ट्रॅफिकमुक्त करण्याचे आश्वासन

पुणे: “सध्या राज्यात व केंद्रात विखारी, विभाजनवादी, जाती-धर्मात विष पेरणारे सरकार आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देणाऱ्या या सरकारला हद्दपार करून भगवान गौतम बुद्धांचा अहिंसेचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा व बंधुतेचा विचार गरजेचा असल्याचे दाखवून द्यावे लागेल. त्यासाठी आंबेडकरी विचारांच्या जनतेने सर्वसमावेशक, सर्व जातीधर्माना सोबत घेऊन चालणाऱ्या महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहावे,” असे आवाहन हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी केले.मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने सुरुवातीपासून प्रचारात आघाडीवर असलेल्या प्रशांत जगताप यांनी भेटीगाठींचा धडाका लावलेला आहे. मतदारसंघाचा एकही कोपरा जगताप यांनी सोडलेला नाही. प्रत्येक भागात जाऊन तिथल्या नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आपल्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन जगताप करीत आहेत. सोमवारी सिद्धार्थ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिद्धार्थ बुद्ध विहार येथे तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले. संतोषनगर येथील श्वेता कॉम्प्लेक्स, मल्हार रेसिडेन्सी, आगम अपार्टमेंट, महावीर, कुंजीर सोसायटी, सक्सेस हाईट्समधील नागरिकांसोबत जगताप यांनी संवाद साधला. या संवादाच्या निमित्ताने सर्व नागरिकांचे प्रश्न जाणून घेत या भागाचा प्रतिनिधी म्हणून आपले प्रश्न सोडवण्यासाठी कायम तत्पर राहील, असा शब्द जगताप यांनी दिला.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर सरचिटणीस राहुल नामदेवराव होले यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. तेथे त्यांचे होले परिवाराने औक्षण केले. माय माऊलींचा आशिर्वाद आणि पदयात्रेदरम्यान मिळणारा नागरिकांचा उत्साह नक्कीच उर्जा देणारा असल्याची भावना जगताप यांनी व्यक्त केली. माजी महापौर वैशाली बनकर, माजी नगरसेवक सुनिल बनकर यांच्या निवासस्थानी जगताप यांचे आपुलकीने स्वागत झाले. बहिणीने केलेल्या औक्षणाने जगताप भारावून गेले. त्यानंतर जगताप यांचे काळे बोराटे येथील किरण गाडेकर व सहकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. कामगार संघटनेचा पाठींबा कामगारांच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या बहुउद्देशीय कामगार संघटनेच्या वतीने विधानसभा निवडणुकीत प्रशांत जगताप यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते नामदेव घोरपडे यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जगताप यांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेत असल्याचे नमूद केले. कामगार, सामाजिक चळवळीतील लोक पाठीशी असल्याने विजयाचा मार्ग अधिक सुकर होत चालल्याचा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.

निवडणुकीसाठी नियुक्त विशेष पोलीस निरीक्षक दीपक मिश्रा यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

निवडणुकीच्यावेळी देशाप्रती आपले योगदान डोळ्यासमोर ठेवून समर्पण भावनेने कामे करा- दीपक मिश्रा

पुणे, दि 11: निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्याची आपली जबाबदारी असून देशाप्रती आपले योगदान डोळ्यासमोर ठेवून समर्पण भावनेने कामे करावीत, असे निर्देश विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून राज्यासाठी नियुक्त विशेष पोलीस निरीक्षक दीपक मिश्रा यांनी दिले. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नि:पक्ष, निर्भय, निकोप आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे विभागातील सर्व जिल्ह्यातील कायदा व सुववस्थेबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, निवडणूक पोलीस निरीक्षक राजेश सिंह, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर उपस्थित होते.

श्री. मिश्रा म्हणाले, पुणे विभागात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याबाबत नियोजन करावे. समाजात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, याबाबत दक्ष राहावे. सुरक्षिततेच्यादृष्टीने कायदा व सुवस्थेबाबत जिल्हानिहाय सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे. मतदानाच्या एक दिवस आधी (19 नोव्हेंबर) सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेवून मॉक ड्रील घेण्यात यावे, असेही ते म्हणाले.

मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ईव्हीएम यंत्र सुरक्षितेच्यादृष्टीने कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत स्ट्रॉंग रुममध्ये पोहचतील याबाबत दक्षता घ्यावी. संवेदनशील मतदान केंद्रावर इतर नागरिकांची गर्दी होणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी. आवश्यकतेप्रमाणे मतदान केंद्रावर सीसीटिव्ही कॅमेरे लावावेत. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदाना सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सांगली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, सोलापूरचे अतुल कुलकर्णी, कोल्हापूरचे महेंद्र पंडित, सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. प्रारंभी विभागातील सर्व पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विधानसभा मतदारसंघनिहाय कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आढावा सादर केला.