तापकीर यांच्या गाव भेट दौरा व पदयात्रा दरम्यान वडगाव-धायरीत महायुती मध्ये अतिशय सकारात्मक वातावरण
पुणे-खडकवासला विधानसभा मतदार संघातील उमेदवार भीमराव तापकीर यांचा महायुतीच्या नेतृत्वाखाली आज वडगाव-धायरी परिसरात गाव भेट दौरा तसेच पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. सकाळी ९ वाजता सुरू झालेली ही पदयात्रा दुपारी २ वाजता संपन्न झाली. मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशाने आयोजित या दौऱ्यात महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
धायरी मुख्य रोडवरून सुरू झालेली ही पदयात्रा उंबऱ्या गणपती चौक, मुक्ताई गार्डन कमान, गणेशनगर मित्र मंडळ, रायकरनगर, गारमाळ, लाडली साडी सेंटर कॉर्नर, मिडीया कॉर्नर, आणि शेवटी सुवासिनी मंगल कार्यालय (त्रिमूर्ती हॉस्पिटल) येथे संपन्न झाली.
महिला आयोग अध्यक्ष: रूपालीताई चाकणकरशिवसेना पुणे शहर प्रमुख: पूजाताई रावेतकरमाजी नगरसेवक: राजाभाऊ लायगुडे, बाळासाहेब नवले, राजश्रीताई नवले, हरिदास चरवड,स्वीकृत नगरसेवक: गंगाधर भडावळे,प्रमुख पदाधिकारी: अतुल चाकणकर, अनंता दांगट,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष: सारंग नवले,महिला अध्यक्ष (राष्ट्रवादी अजितदादा गट): डांगीताई,प्रभाग अध्यक्ष: यशवंत लायगुडेयासोबतच महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पदयात्रेदरम्यान नेत्यांनी मतदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. विकासकामांबाबत स्थानिकांचा अभिप्राय जाणून घेतल्याने जनतेत सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.ही पदयात्रा केवळ प्रचाराचाच भाग नसून मतदारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या भल्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचे प्रतीक आहे असे यावेळी आ.तापकीर यांनी सांगितले वडगाव-धायरीसारख्या भागाचा सर्वांगीण विकास आणि स्थानिकांच्या समस्या तातडीने सोडवण्याचा निर्धार महायुतीच्या नेतृत्वाने यावेळी व्यक्त केला.महायुतीतील सर्व घटक पक्षांकडून तापकीर यांच्या नेतृत्वात वडगाव-धायरीच्या जनतेसाठी सतत कार्यरत राहण्याचे वचन पुन्हा एकदा दृढ करण्यात आले.