कृष्णमूर्ती पद्धत,वास्तूशास्त्र विषयक मंथन होणार
गौरीकैलास ज्योतिष संस्थेकडून आयोजन
पुणे :गौरीकैलास ज्योतिष संस्थेच्या वतीने कृष्णमूर्ती ज्योतिष पद्धत,वास्तूशास्त्र विषयक विचारमंथन करण्यासाठी दि.१५,१६ नोव्हेंबर २०२४ रोजी पुण्यात वास्तू ज्योतिष संमेलन आयोजित करण्यात आले आहे.हॉटेल प्रेसिडेंट (प्रभात रस्ता) येथे हे संमेलन होणार असून भालचंद्र ज्योतिर्विद्यालय,स्मार्ट ऍस्ट्रॉलॉजर्स,ज्योतिष प्रबोधिनी,वास्तू ज्योतिष मित्र,आयादी ज्योतिष आणि वास्तू संस्था,मराठी ज्योतिषी मंडळ या संस्था सहभागी होणार आहेत. गौरीकैलास ज्योतिष संस्थेचे संस्थापक कैलास केंजळे,सौ.गौरी केंजळे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.वास्तू ज्योतिष संमेलन आयोजनाचे हे तिसरे वर्ष आहे.
शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता वास्तू तज्ज्ञ डॉ.आनंद भारद्वाज(दिल्ली) यांच्या हस्ते उदघाटन होणार असून डॉ.त्रिशला शेठ या अध्यक्ष स्थानी असणार आहेत.चंद्रकांत शेवाळे हे स्वागताध्यक्ष आहेत.प्रमुख उपस्थिति गुरुश्री प्रिया मालवणकर याची आहे.ॲड.सुनीता पागे,नरेन उमरीकर,डॉ.चंद्रकला जोशी,मोहन पूर्णपात्रे,रमेश पलंगे,डॉ.सीमा देशमुख,श्री नाटेकर ,गणेशशास्त्री शुक्ल हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.दिवसभर ज्योतिषविषयक सत्रे होणार असून त्यात डॉ.आनंद भारद्वाज,डॉ.त्रिशला शेठ,डॉ.कीर्ती शाह,श्री नाटेकर,राहुल सरोदे,प्रदीप पंडित सहभागी होणार आहेत.
शनिवार,दि.१६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता ज्योतिष तज्ज्ञ श्री.सिल गुरु यांच्या हस्ते उदघाटन होणार असून दत्त्तप्रसाद चव्हाण हे अध्यक्ष स्थानी असणार आहेत.ख्यातनाम ज्योतिषी आदिनाथ साळवी यांची प्रमुख उपस्थिती असेल.कांतीलाल मुनोत हे स्वागताध्यक्ष आहेत.सौ.अंजली पोतदार,सौ.पुष्पलता शेवाळे,श्रीराज पाताडे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.दिवसभर ज्योतिषविषयक सत्रे होणार असून त्यात श्री.सिल गुरु,विनायक आगटे,विकास वैद्य,दत्तप्रसाद चव्हाण,विजयानंद पाटील,सौ.अनुराधा कोगेकर,सौ.गौरी केंजळे, प्रदीप पंडित,नंदकिशोर जकातदार,ॲड.मालती शर्मा सहभागी होणार आहेत. कै.मनोहर केंजळे स्मृती पुरस्कार डॉ.सौ.जयश्री बेलसरे यांना देण्यात येणार आहे.प्रश्नोत्तराचे सत्र तसेच स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे.