विधान परिषदेवर भाजपचे ६ : कोणाला मिळणार संधी ?आज रात्री वर्षा निवासस्थानी बैठक

Date:

मुंबई- महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक आज रात्री वर्षा निवासस्थानी पार पडणार असून, या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर काही निवडक नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि हालचाल वाढली आहे.या निवडणुकीत एकूण 10 जागांपैकी भाजपच्या वाट्याला 6 जागा येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या सहा जागांसाठी कोणाला उमेदवारी मिळणार, यावर पक्षांतर्गत जोरदार चर्चा सुरू आहे.

पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. उर्वरित पाच जागांसाठी अनेक दिग्गज नेत्यांची नावे पुढे येत असून, अंतिम निर्णय मात्र केंद्रीय नेतृत्वाच्या मंजुरीनंतरच होणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी मुंबईत गाठीभेटी वाढवल्या असून, सह्याद्री अतिथीगृहासह विविध ठिकाणी राजकीय हालचालींना वेग आला आहे.दरम्यान, या निवडणुकीसाठी माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर, प्रज्ञा सातव, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. या सर्वांनी आपापल्या पातळीवर लॉबिंग सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अंतिम यादी जाहीर होईपर्यंत पक्षातील वातावरण तापलेले राहणार आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक 12 मे रोजी होणार आहे. मतदान सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत होणार असून, त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे. विशेष म्हणजे, आमदारांना दोन वेळा मतदान करावे लागणार असून, दोन्ही निवडणुकांसाठी वेगवेगळे मतदानाचे गणित असणार आहे.

सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार, महायुतीला 10 पैकी 9 जागांवर विजय मिळवणे सहज शक्य असल्याचे मानले जात आहे, तर महाविकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक केवळ औपचारिक नसून, अंतर्गत संतुलन साधण्याची मोठी कसोटी ठरणार आहे. आता अंतिम यादीत कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उत्पादन, वितरण अन् बाजारपेठेची साखळी निर्माण करून महिला बचत गटांनी आर्थिक क्रांती करावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

​लातूर जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या ऑनलाईन बैठकीत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन ​बँकांच्या...

पुण्यात महाविकास आघाडीतून बाहेर पडा-वसंत मोरे

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधानपरिषदेची निवडणूक अनेक नाट्यमय...