पुणे, २३ नोव्हेंबर २०२४
राज्यातील प्रतिष्ठित लढत समजल्या जाणाऱ्या वडगाव शेरी मतदार संघात धक्कादायक निकाल समोर आले आहेत. ५० हजारांहून अधिकची हक्काची मतं असून देखील तेवढीही मतं न मिळाल्याने ईव्हीएम यंत्रणेत घोळ असल्याचा आरोप वडगाव शेरी मतदार संघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार आणि प्रदेश महासचिव, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी शनिवारी (ता.२३) केला.ईव्हीएम यंत्रणेसंबंधी अनेक तक्रारी असून देखील त्यावरच निवडणूकीचे चक्र अवलंबून असल्याने आता याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून लवकरच जनहित याचिका न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती डॉ.चलवादींनी दिली आहे.
प्रस्थापित पक्षांनी यावेळी मतदार संघात पैशांचे अमाप वाटप केल्याने हा धनबलाचा आणि ईव्हीएमचा कौल आहे; जनमताचा नाही, अशी खंत देखील डॉ.चलवादी यांनी बोलून दाखवली.वडगाव शेरी मतदार संघात जवळपास १५० कोटींचे वाटप झाल्याचा धक्कादायक आरोप देखील त्यांनी यावेळी केला.मतदार संघात दलित, मागासवर्गीय, ओबीसी,अल्पसंख्याक मतदारांची मोठी संख्या आहे. ही सर्व मतदार बहुजन समाज पक्षांच्या बाजूने कौल देतात. यंदा मतदारसंघात बसपाचे वारे होते. विविध वस्त्यांमध्ये, सोसायटी,परिसरात बसपचीच चर्चा होती.
डॉ.चलवादी यांनी त्यांच्या प्रचारातही अगोदरपासून आघाडी घेतली होती. प्रसारमाध्यमांमध्ये देखील बसप आणि डॉ.चलवादींचे नाव चांगलेच चर्चेत होते.पहिल्या तीन उमेदवारांमध्ये डॉ.चलवादींची चर्चा होती. असे असतांना केवळ ३ हजार ७६२ मतं मिळाल्याने ईव्हीएम यंत्रणेत घोळ झाल्याचा संशय डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला आहे. वडागाव शेरी मतदार संघातील सर्व जनता ठामपणे पाठिशी उभी असतांना देखील प्रत्यक्षात मिळालेली मतं बघता हा निकाल जनतेचा नाही, तर भ्रष्ट ईव्हीएमचा असल्याचा दावा डॉ.चलवादी यांनी केला.यामुळे मतपत्रावर निवडणूक होणे आवश्यक आहे. जेणेकरून मतदारांचे खर मत कुणाला हे कळत.आता ईव्हीएम विरोधात अधिक तीव्र आंदोलन उभारू असे,डॉ.चलवादी म्हणाले.
ईव्हीएम’विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार-डॉ.हुलगेश चलवादी
हा विजय महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ: “संदीप खर्डेकर”
पुणे :महायुतीतील सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी, नेते, यांनी एकसंघपणे काम केल्यामुळेच पुणे शहरात आठ पैकी सात जागांवर विजय मिळवता आला असे महायुतीचे समन्वयक आणि भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी सांगितले.
सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते अगदी बूथ लेव्हल पर्यंत एकत्रित काम करत होते वा संयुक्तपणे प्रचार यंत्रणा राबवत होते. कार्यकर्त्यांची वज्रमूठ आणि मतदारांना भावलेले प्रचारातील मुद्दे हेच ह्या विजयाचे – यशाचे गमक आहे असेही खर्डेकर म्हणाले. ह्या लढ्यात आम्ही वडगाव शेरी ची जागा गमावली ह्याचे दुःख आहे च पण ह्या पराभवाच्या कारणांचाही शोध नक्की घेऊ असेही संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतानाच आम्ही “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” ह्या पंतप्रधान “नरेंद्र मोदी” यांच्या संकल्पानुसार पुण्याला विकासाच्या नव्या क्षितिजावर घेऊन जाऊ असेही संदीप खर्डेकर म्हणाले.
काय झाडी,काय डोंगार… झाले पराभूत..
सांगोला: सांगोला मतदारसंघात विद्यमान आमदार शहाजी पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेतील बंडखोरीत एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या विद्यमान आमदार शहाजी पाटील यांचा (बापू) यांचा पराभव झाला
शेकापचे बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. आबासाहेब देशमुख 25 हजार 384 मतांनी विजयी झाले आहेत. दीपक साळुंखे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
सांगोला हा मतदारसंघ पूर्वीपासून शेकापचा बालेकिल्ला होता. गणपतराव देशमुख या मतदारसंघातून ११ वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. खुद्द शहाजी पाटील यांनी देशमुख यांच्याविरोधात 6 वेळा निवडणूक लढविली होती. त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. 2019 ला बाबासाहेब देशमुख यांची वय झाल्याने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शहाजी पाटील यांना संधी चालून आली. या निवडणुकीत शहाजी पाटील यांचा विजय झाला होता. यंदाच्या निवडणुकीत बाबासाहेब देशमुख यांनी 1 लाख 16 हजार 280 मते घेत शहाजी पाटील यांचा 25 हजार 384 मतांनी पराभव केला. बाबासाहेब देशमुख यांनी पुन्हा एकदा सांगोला मतदारसंघ खेचून आणत मतदारसंघात शेकापचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.
सांगोला विधानसभा मतदार संघांमध्ये पडलेली मते
काेणाला किती मते मिळाली?
बाबासाहेब देशमुख : 1 लाख 16 हजार 280
शहाजी पाटील : 90 हजार 896
मुलाची रणनीती अन् वडिलांचा विजय; बापूसाहेब पठारे यांच्या विजयात सुरेंद्र पठारे किंगमेकर
राज्यभरासह पुणे अन् पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि भाजपचा झंझावात असताना पुण्यात मात्र एका तरुणाने आपल्या रणनीतीच्या जोरावर वडिलांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे विजयी झाले. विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा ४७१० मतांच्या फरकाने पराभव झाला.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून पुण्यातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ चर्चेत होता. महायुतीकडून ही जागा भाजपच्या जगदीश मुळीक यांना जाणार की विद्यमान आमदार सुनील टिंगरे हेच वडगाव शेरीचे आगामी उमेदवार असणार यावरून जोरदार चर्चा रंगली होती. अखेरीस सुनील टिंगरे यांनी पुन्हा उमेदवारी मिळवली आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अनुभवी उमेदवार असलेल्या बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी दिली. आणि तेव्हापासून वडगावशेरीचा सामना अटीतटीचा होईल अशी शक्यता वर्तवली गेली. आणि प्रत्यक्षात झाले ही तसेच. मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर सुनील टिंगरे यांनी आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात बापूसाहेब पठारे यांनी आघाडी मोडून काढत तब्बल ४७१० मतांच्या फरकाने विजय मिळवला.
दरम्यान स्थानिक असलेले बापूसाहेब पठारे माजी आमदार राहिले. सरपंच ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिला. मात्र मागील काही वर्षे ते काही कारणास्तव राजकारणापासून लांब राहिले. वडगावशेरी २०१४ आणि २०१९ च्या निवडणूकीत भाजपचे जगदीश मुळीक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल टिंगरे यांनी विजय मिळवला होता. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी विधानसभेचे तिकीट मिळवलं आणि त्यात ते विजयी झाले.
विधानसभेच्या या लढाईत बापूसाहेब पठारे यांना मुलाची साथ लाभली ती म्हणजे मुलगा सुरेंद्र पठारे यांची. सुरेंद्र पठारे हे देखील मागील काही वर्षापासून वडगावशेरीचा राजकारणात सक्रिय आहेत. या संपूर्ण परिसरात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. मतदारसंघातील प्रत्येक छोट्या मोठ्या कामात त्यांनी सहभाग घेत अडचणी सोडण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी आंदोलने ही केली आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले.
गेल्या काही वर्षांपासून सुरेंद्र पठारे यांनी मतदार संघात आपला जनसंपर्क वाढवत कामाला सुरूवात केली. प्रत्येक गोष्टीत सहभागी होत त्यांनी मतदार संघातल्या अडचणी जाणून घेतल्या व सोबतच पर्यायाने त्या सोडविण्यासाठी लढा उभारला आणि आंदोलने केली. पुण्यातील सीईओपी महाविद्यालयातील गोल्ड मेडलिस्ट असलेल्या सुरेंद्र पठारे यांनी मागील काही वर्षात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. दीड महिन्यांपासून ते पायाला भिंगरी लागल्यासारखी फिरत होते. आणि त्याचा परिणाम विजयात झाला. वडील बापूसाहेब पठारे यांच्या गळ्यात त्यांनी विजयाची माळ घातली.
वडगाव शेरीत आरपीआयची भूमिका ठरली जाईंट किलर:. वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) तसेच आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका निर्णायक ठरली आहे. गेल्या अनेक वर्षात महायुती मधील प्रमुख नेत्यांनी आरपीआयला सन्मानपूर्वक वागणूक न दिल्याने या मतदारसंघात महायुतीला पराभवाचा फटका बसला आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयात आरपीआयची भूमिका जाईंट किलर ठरली आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आरपीआयच्या कष्टाचे हे फळ आहे.– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.
महायुतीसाठी ‘हे’ 5 मुद्दे ठरले गेम चेंजर! शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या .…
मुंबई दि २३:- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान हे 20 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलं होतं. संपूर्ण राज्यात 66.05 टक्के एवढं मतदान झालं होतं. ज्यानंतर आज (23 नोव्हेंबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहेत. सध्या समोर आलेल्या कलांनुसार राज्यात महायुती आघाडीवर दिसते आहे. 100 पेक्षा जास्त जागांवर आता महायुती पुढे आल्याचं दिसतंय. अशातच एका वाहिनीवर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांनी महायुतीसाठी गेम चेंजर आणि मविआच्या वाट्याला पराभव आणणाऱ्या काही मुद्द्यांबद्दल सविस्तर सांगितलं आहेत.
महायुतीसाठी गेम चेंजर ठरणारे ते मुद्दे कोणते?
शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, ‘जे-जे प्रश्न समोर दिसले आणि त्यामध्ये तातडीने निर्णय घेण्याची गरज होती ते सरकारने घेतले. याचं उदाहरण जर पाहायचं झालं तर, सोयाबीनचा मुद्दा… सरकारने सोयबीनला 4892 रूपये दर दिला. त्यात 15 टक्के जरी मॉयस्टर असलं आणि अगदी किलोभर जरी असलं तरी ते शेतकऱ्यांकडून खरेदी होईल हा निर्णय घेतला.
त्याचबरोबर शेतकऱ्यांना 10 युनिट्सपर्यंत वीजबील माफी सरकारने केली. तिसरं म्हणजे, जेष्ठ नागरिक, सिंचन प्रकल्प, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान या सर्वात 15 हजार कोटींची मदत केली. अगदी गोगलगायीपासून होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला.
त्यामुळे मुद्दा असा आहे की, हे सगळं करत असताना जे लोकांचे प्रश्न आहेत त्यांना सामोरे जाण्याचं काम जसं आम्ही केलं, तसं माझं निरिक्षण असं आहे की, जो काही नेत्यांबद्दल जातीय प्रचार झाला तो समाजातल्या बऱ्याचशा घटकांना आवडलेला नाहीये. विशेषता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जातीय प्रचार करण्यात आला.
दुसरं महत्त्वाचं म्हणजे, समर्थ रामदास स्वामींसारखे व्यक्तीमत्त्व की, ते शिवाज महाराजांचे गुरू आहेत की नाही? यावर कोणाचा वाद असेल… पण ते एक संत आहेत. त्यांच्याबद्दल वाटेल त्या शब्दात सोशली ट्रोल केलं जातं. मोठ-मोठे नेते बोलतात त्याच्यावर नावं घेऊन आणि मौन राहतात. उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचे सगळे घटक मौन ठेवतात. काही लोकांनी तर त्यांच्याबद्दल अपशब्दही वापरले. हे सुद्धा लोकांना आवडलेलं नाही. ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे लोक आले असं म्हणणं म्हणजे मी म्हणेन दिशाभूल होईल.
यामागील कारण म्हणजे, जो मध्यम वर्ग आम्ही बाहेर पडलेला पाहिला तो 2014 ला मोदींना परत पंतप्रधान करायचं याच विचारांचा असणारा मध्यम वर्ग सकाळी 7 वाजता उतरलेला दिसला. तो काही पैशाच्या प्रभावाने आलेला नव्हता.’ असं शिवसेना नेत्या तथा उपसभापती नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. सर्व एक्झिट पोलचे निष्कर्ष खोटे ठरवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. महायुतीच्या या यशात एकनाथ शिंदे सरकारने आणलेल्या पाच योजनांचा मोठा वाटा आहे. त्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यातील जनतेने भरभरुन प्रतिसाद दिला. राज्यातील लाडक्या बहिणींनी महायुतीलाच मतदान केल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीतील ट्रेंड फिरवण्यात महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा घोषणा त्याचबरोबर, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना इंटर्नशिप योजना, अखिल भारतीय उलेमा बोर्डाचा फतवा या पाच महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत ठरल्या आहेत.
खडकवासला विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांचा ५२,३२२ मताधिक्याने दणदणीत विजय
खडकवासला विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी ५२,३२२ मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे. या मतदारसंघात एकूण १४ उमेदवार उभे होते. मात्र, खरी लढत महायुतीचे तापकीर, महाआघाडीचे सचिन दोडके आणि मनसेचे मयुर वांजळे यांच्यामध्ये होती.
पुणे:
“खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या तमाम नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाने मला पुन्हा एकदा आपला प्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी दिली आहे, यासाठी मन:पूर्वक आभार व्यक्त करतो. हा विजय केवळ माझा नाही, तर आपल्या सर्वांचा आहे. हा विजय आपल्या विकासाच्या स्वप्नांचा, आपल्या समस्यांच्या समाधानाचा, आणि एकत्रित काम करण्याच्या निर्धाराचा आहे.असे खडकवासल्यात बाजीगर ठरलेले आमदार भीमराव तापकीर यांनी म्हंटले आहे.
ते म्हणाले ‘आपल्या मतदारसंघातील नागरिकांनी दाखवलेल्या प्रेमाने आणि भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच आज ही वेळ आली आहे. हा विजय हा फक्त निवडणूक लढविण्याचा नव्हे तर आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीचा महत्त्वाकांक्षी आराखडा प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प आहे.आता पुढील वाटचाल ही आपणा सर्वांच्या सहकार्यानेच होईल. खडकवासल्याच्या प्रत्येक नागरिकाचा आवाज हा माझ्यासाठी प्राधान्य असेल. मला खात्री आहे की, आपल्या एकतेच्या जोरावर आपण आपल्या मतदारसंघाला विकासाच्या नवीन उंचीवर नेऊ..आपल्या विश्वासासाठी पुन्हा एकदा धन्यवाद!

पहिल्या फेरीत दोडके यांना ४७०७, तापकीर यांना ४१७१ आणि वांजळे यांना २२१८ मते मिळाली. तर दुसऱ्या फेरीत दोडके १०८२१, तापकीर १०४४० आणि वांजळेंना १७२८ मते मिळाली. यामध्ये तापकीर ४२० मताने पिछाडीवर होते. तर तिसऱ्याच फेरीत तापकीर यांनी १७०५९ मते मिळवत दोडके यांची आघाडी मोडीत काढली. दहाव्या फेरीत दोडके ४७,६५९ , तापकीर ६३,१७४ आणि वांजळे यांना १४,१०२ मते मिळाली पंधराव्या फेरीत तापकीर यांना तब्बल ९९,०५० मते तर दोडकेंना ६५,४०२ मते मिळाली.तापकीर विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना निर्णायक २३ व्या फेरीत १,५६,५५८ तर दोडके यांना १,०४,४७९ आणि वांजळेंना ३९,६२६ मते मिळाली. शेवटी अखेर शेवटच्या फेरीत १,६२,७६६ तर दोडके यांना १,१०,४५३ आणि वांजळे यांना ४२,४०८ मते मिळाली. पाोस्टल मतांसह भीमराव तापकीर यांना १,६३,१३१ मते, दोडके-१,१०,८०९ आणि वांजळे यांना ४२,८९७ मते मिळाली.
महाराष्ट्र ना शिवसेनेचा,ना काँगेस राष्ट्रवादीचा तो तर भाजपाचा…
काँग्रेस 63 वरून 16वर, भाजपची 79 वरून 132वर झेप
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय अभूतपूर्व आहे. भाजपने एकूण 149 जागांवर निवडणूक लढवली आणि 132 जागांवर आघाडीवर आहे. म्हणजे स्ट्राइक रेट 86% आहे. यासह महाराष्ट्रात भाजपचा अश्वमेध यज्ञ पूर्ण झाला.
1990 मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लहान भाऊ म्हणून 42 जागा जिंकणारा भाजप एकटाच बहुमताच्या जवळ आहे. त्याचवेळी बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरेंची शिवसेना केवळ 17 जागांवर मर्यादित असल्याचे दिसत आहे.
मात्र, 5 महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर अशा निकालांचा अंदाज लावला जाऊ शकत नव्हता. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचे विधानसभानिहाय रूपांतर केले, तर काँग्रेसने 63 जागा जिंकल्या होत्या, ती आता केवळ 16 जागांपर्यंत मर्यादित असल्याचे दिसते. त्याचवेळी, त्यानुसार भाजपच्या जागा 79 वरून 132 जागा वाढत आहेत.
‘मिशन पश्चिम महाराष्ट्र पूर्णत्वास’ : मुरलीधर मोहोळ

पुणे : विधानसभा निवडणुकीत भाजप-महायुतीला राज्यात, पश्चिम महाराष्ट्रात आणि पुण्यात अभूतपूर्व यश मतदारांच्या साथीने मिळाले. या विश्वासाबद्दल मतदारांचे मनापासून आभार ! मतदारांचा हा कौल म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर, केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांवर जनतेने मतांद्वारे व्यक्त केलेला विश्वास आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुशल आणि संवेदनशील नेतृत्वाचाही हा विजय आहे !
पश्चिम महाराष्ट्राच्या गडावर मतदारांनी महायुतीचा झेंडा रोवत जवळपास ५८ पैकी ४५ जागा दिल्या आहेत, हा आकडा आमचे आखलेले मिशन पूर्ण करणारा आहे. पश्चिम महाराष्ट्रात मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरविला जाईल.
पुणे शहरातील आठपैकी सात आणि जिल्ह्यातील तेरापैकी अकरा जागा महायुतीला देताना पुणेकरांनी महायुतीच्या विकासाच्या कामांवर मोहोर उमटवली आहे.
विरोधकांच्या फेक अजेंड्याला श्री. देवेंद्रजींनी दिलेले थेट उत्तर जनतेलाअधिक आश्वासक वाटल्याने मतांचे भरघोस दान महायुतीच्या पदरात मतदारांनी टाकले. मतांच्या लाचारीपोटी व्होट जिहादच्या विरोधकांच्या कारस्थानाला जनतेने धर्मयुद्धाव्दारे उत्तर देऊन एक इशाराच दिला आहे. महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन!
कार्यकर्त्यांना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे साष्टांग दंडवत
तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचा शतशः आभारी आहे – चंद्रकांतदादा पाटील
कोथरूड : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सातत्याने सर्व कार्यकर्ते झटून कामाला लागले. प्रसंगी कुटुंबियांचाही रोष पत्करून काम केले, त्यामुळे तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचा शतशः आभारी आहे, अशी भावना चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी साष्टांग दंडवत घालत सर्व कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कोथरुड विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मंडल कार्यालयात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांचेही आभार मानले.
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोथरुड मधील विजयासाठी गेले महिनाभर रात्रंदिवस सर्व कार्यकर्ते एक दिलाने झटत होते. प्रसंगी कुटुंबियांचा रोष पत्करून देखील काम करत होते. तुम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमामुळेच हा ऐतिहासिक विजय साकार झाला. त्यामुळे तुम्हा सर्वांचा ही मी शतशः आभारी आहे. तसेच, गेले महिनाभर तुम्हाला साथ देणाऱ्या कुटुंबियांचे ही मनापासून आभार मानतो.
विजयाचे सर्व श्रेय महाराष्ट्र आणि कोथरुडच्या जनतेचे- चंद्रकांतदादा पाटील
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांतदादा पाटील विक्रमी मतांनी विजयी
पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीतील विजयाचे सर्व श्रेय नरेंद्र मोदीजी, अमितभाई शाह, जेपी नड्डाजी महाराष्ट्रातील जनतेचे आणि कोथरूडकर जनतेचे आहे, अशी भावना उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली. कोथरूड मधील विजयानंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतील महायुतीचा विजय हा देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमितभाई शाह, जेपी नड्डाजी, आमचे सर्वांचे नेते एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महाराष्ट्रातील जनतेचे आहे. या विजयाने लोकसभा निवडणुकीतील कसर धुवून निघाली अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कोथरुड मधील विजयाबद्दल बोलताना पाटील पुढे म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत कोथरूडकरांची मनापासून सेवा केली. कोथरुड मधील प्रत्येक कुटुंबाशी जोडला गेलो. त्यामुळे आजचा माझा विजय हा कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाचा आहे. कोथरूड मधील जनतेची पुन्हा त्याच जोमाने सेवा करेन, अशी भावना व्यक्त केली.
आधी पक्षांतर्गत नेत्याची निवड नंतर मुख्यमत्र्यांची:देवेंद्र फडणवीसांनी सांगितली पुढीची प्रक्रिया
मुंबई-विधानसभेत महायुतीचा ऐतिहासिक विजय झाला आहे. आतापर्यंतच्या अनेक वर्षांचा निवडणुका आपण पाहिल्या मात्र अशा पद्धतीने लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आपण पाहिली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. लाडक्या बहिणी असेल, लाडके भाऊ असतील किंवा लाडके शेतकरी असतील या सर्वांनी महायुतीवर मनापासून प्रेम दाखवले आहे. त्या सर्वांचे आभार देखील शिंदे यांनी मानले आहे. या ऐतिहासिक विषयासाठी सर्वांना दंडवत घातला पाहिजे, अशा शब्दात मतदारांचे आभार देखील शिंदे यांनी मानले. महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे अभार मानले.
मागील दोन ते सव्वा दोन वर्षात या राज्यांमध्ये जे काम केले, त्या सर्व कामाची ही पोचपावती असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आम्ही जे ऐतिहासिक निर्णय घेतले ते निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यती असे निर्णय होते. आम्ही एकीकडे विकास केला. यात महाविकास आघाडीने जी सर्व कामे थांबवली होती ती सर्व कामे सुरू केली असल्याचा दावा देखील मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी कोणाची याचा निर्णय जनतेने दिला असल्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारा असलेली शिवसेना कोणाची, याचही निर्णय जनतेने दिला असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. घरी बसून सरकार चालत नसते, हे जनतेने दाखवून दिले. असे म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
महाराष्ट्राच्या जनतेसमोर महायुती नतमस्तक असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महायुतीवर महाराष्ट्राने दाखवलेला हा विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात काम करावे लागणार असल्याची जाणीव होत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्व मतदारांच्या चरणी आम्ही नतमस्तक होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर त्यांना मतदारांना आश्वस्त करतो की, जनतेने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला आम्ही तडा जाऊ देणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. आमची जबाबदारी वाढवणारा हा विजय असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
पृथ्वीराज चव्हाणांसारख्या प्रामाणिक उत्तम नेत्याच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचाही पराभव:जोरदार हादरे
पुणे- महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार हादरे दिलेल्या या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक हादरा पृथ्वीराज चव्हाणांसारख्या प्रामाणिक उत्तम नेत्याच्या पराभवाने बसला आहे एवढेच नव्हे तर कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या हि पराभवाने आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. एक्झिट पोल ची तर ऐशी तैशी नेहमीच होते पण या सारख्या बड्या नेत्यांच्या पराभवाने हे हादरे बसले आहेत.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारूण पराभव झाला आहे. भाजपाचे भाजपाचे डॉ. अतुलबाबा भोसले हे या मतदारसंघातून विजयी ठरले आहेत.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे यावेळी तिसऱ्यांदा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. याआधी २०१४ आणि २०१९ साली त्यांनी विजय प्राप्त केला होता.
२०१९ साली भाजपाचे उमेदवार अतुल भोसले यांच्याविरोधात पृथ्वीराज चव्हाण विजयी झाले होते. तर २०१४ साली काँग्रेसचे बंडखोर नेते विलास पाटील-उंडाळकर यांचा चव्हाण यांनी पराभव केला होता.यावेळी पाटील उंडाळकर आणि चव्हाण एकत्र आले. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना विजयाची खात्री वाटत होती. परंतु, त्यांचा पराभव झाला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचादेखील धक्कादायक पराभव झाला आहे.
काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये असलेले बाळासाहेब थोरात, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ आणि मनसेकडून योगेश सूर्यवंशी निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांचा अमोल खताळ यांच्याकडून पराभव झाला आहे. सहकाराचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघावर काँग्रेसची मजबूत पकड होती. मात्र आता हा मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यातून गेला आहे.
२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या साहेबराव नवले यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांना १ लाख २५ हजार ३८० हजार मते मिळाली होती. तर साहेबराव नवले यांना ६३१२८ मते मिळाली होती. आजवरच्या निवडणुकीतील सर्वाधिक ६४ टक्के मते थोरात यांना मिळाली होती. उत्तरोत्तर मताधिक्यामुळे थोरात यांचा गड अधिक मजबूत झाला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला आपला गड राखण्यात अपयश आले आहे.
यशोमती ठाकूर देखील तिवसा मतदार संघातून भाजपचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या पेक्षा ८१९५ मतांनी मागे राहिल्या आहेत. २३ पैकी २१ फेर्यांचे परिणाम आले तेव्हा हि स्थिती होती. अद्याप २ फेर्या बाकी होत्या.
पुणे कँटोंमेंट मधून सुनील कांबळे १० हजारांनी विजयी ..पहा अन्य मतदार संघातील उमेदवारांचे नावे
आपले आमदार पहा.!
(पुणे शहर आणि जिल्हा)२३ नोव्हेंबर, २०२४
शिरुर-हवेली विधानसभा
ज्ञानेश्वर कटके – घड्याळ
पुरंदर-हवेली विधानसभा
विजय शिवतारे – धनुष्यबाण
दौंड विधानसभा
राहूल कुल – कमळ
इंदापूर विधानसभा
दत्तात्रय भरणे – घड्याळ
बारामती विधानसभा
अजित पवार – घड्याळ
भोर-वेल्हा विधानसभा
शंकर मांडेकर – घड्याळ
मावळ विधानसभा
सुनिल शेळके – घड्याळ
जुन्नर विधानसभा
शरद सोनवणे – अपक्ष
आंबेगाव विधानसभा
दिलीप वळसे पाटील – घड्याळ
खेड विधानसभा
बाबाजी काळे – मशाल
हडपसर विधानसभा
चेतन तुपे – घड्याळ
वडगावशेरी विधानसभा
बापूसो पठारे – तुतारी
शिवाजी नगर विधानसभा
सिद्धार्थ शिरोळे – कमळ
पुणे कॅन्टो. विधानसभा
सुनिल कांबळे – कमळ
कसबा विधानसभा
हेमंत रासणे – कमळ
कोथरुड विधानसभा
चंद्रकांत पाटील – कमळ
पर्वती विधानसभा
माधुरी मिसाळ – कमळ
खडकवासला विधानसभा
भीमराव तापकीर – कमळ
पिंपरी विधानसभा
आण्णा बनसोडे – घड्याळ
चिंचवड विधानसभा
शंकर जगताप – कमळ
भोसरी विधानसभा
महेश लांडगे – कमळ
एकूण जागा – २१
कमळ – ९
घड्याळ- ८
तुतारी – १
धनुष्यबाण – १
मशाल – १
अपक्ष – १
मतदार संघाचे नाव आणि क्रमांक – आघाडीवरील उमेदवाराचे नाव आणि पक्ष-२ क्रमांकाच्या उमेदवाराचे नाव – मताधिक्य -एकूण फेऱ्यापैकी किती फेरीअखेर आणि रिझल्ट अशा सीरिअल ने हा तक्क्ता वाचावा …
| कोथरूड | 210 | चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील | भारतीय जनता पार्टीi | चंद्रकांत बलभीम मोकाटे | शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे)i | 97666 | 17/20 | प्रगति में परिणाम |
| शिवाजी नगर | 209 | सिद्धार्थ अनिल शिरोळे | भारतीय जनता पार्टीi | दत्ता बहिरट | इंडियन नेशनल काँग्रेसi | 36702 | 20/20 | प्रगति में परिणाम |
| पुणे छावनी | 214 | कांबळे सुनिल ज्ञानदेव | भारतीय जनता पार्टीi | बागवे रमेश आनंदराव | इंडियन नेशनल काँग्रेसi | 10320 | 20/20 | परिणाम घोषित |
| खडकवासला | 211 | भिमराव (आण्णा) धोंडीबा तापकीर | भारतीय जनता पार्टीi | दोडके सचिन शिवाजीराव | नेशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवारi | 37193 | 18/25 | प्रगति में परिणाम |
| कसबा पेठ | 215 | हेमंत नारायण रासने | भारतीय जनता पार्टीi | धंगेकर रविंद्र हेमराज | इंडियन नेशनल काँग्रेसi | 21143 | 15/20 | प्रगति में परिणा |
| मावल | 204 | सुनिल शंकरराव शेळके | नेशनलिस्ट कॉंग्रेस पार्टीi | अण्णा उर्फ बापू जयवंतराव भेगडे | निर्दलीयi | 108565 | 29/29 | प्रगति में परिणाम |
| पर्वती | 212 | माधुरी सतिश मिसाळ | भारतीय जनता पार्टीi | अश्विनी नितीन कदम | नेशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवारi | 54660 | 20/20 | प्रगति में परिणाम |
| पुरन्दर | 202 | विजयबापू शिवतारे | शिवसेनाi | संजय चंदुकाका जगताप | इंडियन नेशनल काँग्रेसi | 24188 | 30/30 | प्रगति में परिणाम |
| आम्बेगांव | 196 | दिलीप दत्तात्रय वळसे पाटील | नेशनलिस्ट कॉंग्रेस पार्टीi | देवदत्त जयवंतराव निकम | नेशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवारi | 637 | 18/20 | प्रगति में परिणाम |
| भोसरी | 207 | महेश (दादा) किसन लांडगे | भारतीय जनता पार्टीi | अजित दामोदर गव्हाणे | नेशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवारi | 53831 | 19/23 | प्रगति में परिणाम |
| चिंचवड | 205 | शंकर पांडुरंग जगताप | भारतीय जनता पार्टीi | KALATE RAHUL TANAJI | नेशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवारi | 102540 | 23/24 | प्रगति में परिणाम |
| हडपसर | 213 | चेतन विठ्ठल तुपे | नेशनलिस्ट कॉंग्रेस पार्टीi | प्रशांत सुदाम जगताप | नेशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवारi | 15518 | 16/23 | प्रगति में परिणाम |
| जुन्नर | 195 | शरददादा भिमाजी सोनवणे | निर्दलीयi | सत्यशिल सोपानशेठ शेरकर | नेशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवारi | 7143 | 20/21 | प्रगति में परिणाम |
| खेड आलन्दी | 197 | BABAJI RAMCHANDRA KALE | शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे)i | DILIP DATTATRAY MOHITE | नेशनलिस्ट कॉंग्रेस पार्टीi | 51164 | 18/20 | प्रगति में परिणाम |
| कराड दक्षिण | 260 | DR ATULBABA SURESH BHOSALE | भारतीय जनता पार्टीi | पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण | इंडियन नेशनल काँग्रेसi | 29045 | 16/18 | प्रगति में परिणाम |
| कोपरी-पचपाखडी | 147 | एकनाथ संभाजी शिंदे | शिवसेनाi | KEDAR PRAKASH DIGHE | शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे)i | 101826 | 22/27 | प्रगति में परिणाम |
| नागपुर दक्षिण पश्चिम | 52 | देवेंद्र गंगाधर फडणवीस | भारतीय जनता पार्टीi | PRAFULLA VINODRAO GUDADHE | इंडियन नेशनल काँग्रेसi | 33275 | 22/28 | प्रगति में परिणाम |
| परली | 233 | धनंजय पंडितराव मुंडे | नेशनलिस्ट कॉंग्रेस पार्टीi | राजेसाहेब श्रीकिशन देशमुख | नेशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवारi | 109324 | 18/26 | प्रगति में परिणाम |
| तिवसा | 39 | राजेश श्रीरामजी वानखडे | भारतीय जनता पार्टीi | ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर | इंडियन नेशनल काँग्रेसi | 7674 | 20/23 | प्रगति में परिणाम |
उद्धव ठाकरे महायुतीत आले तर त्यांचे स्वागतच -चंद्रकांत पाटील; म्हणाले – CM पदावर केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार
पुणे-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून महायुती पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. उद्धव ठाकरे आमच्यासोबत आल्यास त्यांचे स्वागत आहे, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा महायुतीकडे जातील का हे पहावे लागणार आहे. ते कोथरूडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
चंद्रकात पाटील यांना उद्धव ठाकरे हे पुन्हा महायुतीच्या सोबत आल्यास तुमची काय भूमिका असेल? असे विचारण्यात आले असता त्यावर बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे हे आमच्यासोबत आल्यास त्यांचे स्वागत आहे. आता महायुतीला पूर्ण बहुमत मिळताना दिसत आहे. काही अपक्षांची साथही मिळणार आहे. अशा परिस्थिती महायुतीकडून उद्धवजींना आमंत्रण दिले जाण्याची शक्यता नाही. त्यांनी स्वत: पुढाकार घेतल्यास भाजपचे वरिष्ठ नेते यावर विचार करतील, असे पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, 2019 मध्ये लोकांनी भाजप-शिवसेनेला कौल दिला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी वेगळी वाट निवडली. त्यांच्या निर्णयामुळे अनेकांना वाईट वाटले. आम्हालाही व्यक्तिश: वाईट वाटलं होतं त्यावेळी तसे काही झाले नसते तर आता यापेक्षाही चांगला निकाल शिवसेना-भाजपच्या बाजूने लागला असता. आज हे निकाल पाहण्याची आवश्यकता नसती.
चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. लोक आता त्यांचे सकाळचे प्रवचन ऐकणार नाहीत. जो वेळेत आपली एक्झिट करतो, तोच शहाणा माणूस असतो. त्यांनी आता लिखाणावर लक्ष केंद्रित करावे. पण त्यांनी रोज टीव्ही समोर येऊन बोलू नये, कारण लोक त्यांना पाहिल्याबरोबर टीव्ही बंद करतील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमचे केंद्रीय बोर्ड याबाबत निर्णय घेतील. तो जे ठरवतील तो मुख्यमंत्री होईल. भाजपचे केंद्रीय नेतृत्व जे ठरवेल, ते आम्हाला मान्य आहे, असे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही म्हणणे आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. पण त्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल, कारण त्यांना लांबचे दिसते.
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी मतदान झाले. त्यानंतर शनिवारी झालेल्या मतमोजणीत सत्ताधारी महायुतीची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने सर्वाधिक 214 जागांवर आघाडी घेतली असून, त्यात भाजपने सर्वाधिक 127, शिवसेना 53 व राष्ट्रवादी काँग्रेसने 34 जागांवर आघाडी घेतली आहे. तर विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने 54 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यात काँग्रेसने 19, ठाकरे गटाने 21 तर शरद पवार गटाने 14 जागांवर आघाडी घेतली आहे.
साधे विवाह व अध्यात्म यांच्या संगमाचे अनुपम दृश्य निरंकारी सामूहिक विवाह सोहळ्यात ९६ जोडपी विवाहबद्ध
पुणे- २३ नोव्हेंबर, २०२४:-
संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिन्दर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले, की मिशनच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने आज संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा येथे निरंकारी सामूहिक साध्या विवाहांचे एक अनुपम दृश्य प्रदर्शित झाले ज्यामध्ये देश-विदेशातील एकंदर ९६ नव वर-वधु सतगुरु माता सुदीक्षाजी आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात परिणय सूत्रात बांधले गेले. या मध्ये महाराष्ट्रातील पुणे पिंपरी-चिंचवड तसेच भारतभरातील बिहार, छत्तीसगढ़, दिल्ली, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांव्यतिरिक्त विदेशातील आस्ट्रेलिया, यू.एस.ए. या देशातील जोडप्यांचा समावेश आहे. या प्रसंगी निरंकारी मिशनचे अधिकारीगण, वधू-वरांचे माता-पिता व नातलग तसेच मिशनचे अनेक भाविक भक्तगण उपस्थित होते. सर्वांनी या दैवी दृश्याचा भरपूर आनंद प्राप्त केला.
सामूहिक विवाह कार्यक्रमाची सुरवात पारंपारिक जयमाला व निरंकारी विवाहाचे विशेष चिन्ह सांझा-हार (सामायिक हार) यानी झाली. त्यानंतर भक्तिमय संगीताच्या तालावर ‘निरंकारी लावां’चे प्रथमच हिंदी भाषेतून गायन करण्यात आले ज्यातील प्रत्येक ओळ नव विवाहित युगुलांसाठी सुखमय गृहस्थ जीवन जगण्याची कल्याणकारी शिकवण देत आहे. नव विवाहित युगुलांवर सत्गुरु माता जी व निरंकारी राजपिता जी तसेच तिथे उपस्थित सर्वांनी पुष्प-वर्षा केली आणि त्यांच्या कल्याणमय जीवनासाठी भरपूर आशीर्वाद प्रदान केले.
उल्लेखनीय आहे, की दरवर्षी आयोजित होणारे हे पावन आयोजन साधेपणा व शालीनता पसरवत जात, धर्म, वर्ण, भाषा यांसारख्या संकुचित भेदभावांच्या पलीकडे जाऊन एकत्वाचे सुंदर स्वरूप प्रदर्शित करतो.
नव विवाहित जोडप्यांना आशीर्वाद प्रदान करताना हुए सतगुरु माताजी म्हणाल्या, की गृहस्थ जीवनाच्या पवित्र बंधनात नर व नारी दोहोंचे समान स्थान असते ज्यामध्ये कोणी लहान-मोठा नाही. दोघांना समान महत्व आहे. सहयोगाचे हे एक उत्तम उदाहरण असते.
सतगुरु माताजींनी सांझा हार रूपी प्रतीकाचे उदाहरण देऊन सांगितले, की ज्याप्रमाणे सांझा हार एकतेची भावना दर्शवितो तद्वत गृहस्थ जीवनात राहून सर्व नात्यांना महत्व देत सर्वांच्या प्रति आदरभाव धारण करुन आपल्या जबाबदाऱ्या निभावण्याचीही प्रेरणा देतो. गृहस्थ जीवनातील सर्व कर्तव्यांचे पालन करत सदोदित सेवा, सुमिरण व सत्संगाद्वारे या निरंकाराचा आधार घेऊन सुखद जीवन जगायचे आहे. निःसंदेह अनेक प्रांतांतून आलेल्या नव युगुलांच्या व उभय परिवाराच्या मिलनाचे हे एक सुंदर स्वरूप आज इथ दृष्टीगोचर झाले. सतगुरु माताजींनी सर्व नव विवाहित दाम्पत्यांना आनंदमय जीवन व्यतीत करण्यासाठी शुभाशीर्वाद प्रदान केले.
