Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मुलाची रणनीती अन् वडिलांचा विजय; बापूसाहेब पठारे यांच्या विजयात सुरेंद्र पठारे किंगमेकर

Date:

राज्यभरासह पुणे अन् पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि भाजपचा झंझावात असताना पुण्यात मात्र एका तरुणाने आपल्या रणनीतीच्या जोरावर वडिलांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापूसाहेब पठारे विजयी झाले. विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा ४७१० मतांच्या फरकाने पराभव झाला.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून पुण्यातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ चर्चेत होता. महायुतीकडून ही जागा भाजपच्या जगदीश मुळीक यांना जाणार की विद्यमान आमदार सुनील टिंगरे हेच वडगाव शेरीचे आगामी उमेदवार असणार यावरून जोरदार चर्चा रंगली होती. अखेरीस सुनील टिंगरे यांनी पुन्हा उमेदवारी मिळवली आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अनुभवी उमेदवार असलेल्या बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी दिली. आणि तेव्हापासून वडगावशेरीचा सामना अटीतटीचा होईल अशी शक्यता वर्तवली गेली. आणि प्रत्यक्षात झाले ही तसेच. मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर सुनील टिंगरे यांनी आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात बापूसाहेब पठारे यांनी आघाडी मोडून काढत तब्बल ४७१० मतांच्या फरकाने विजय मिळवला.

दरम्यान स्थानिक असलेले बापूसाहेब पठारे माजी आमदार राहिले. सरपंच ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिला. मात्र मागील काही वर्षे ते काही कारणास्तव राजकारणापासून लांब राहिले. वडगावशेरी २०१४ आणि २०१९ च्या निवडणूकीत भाजपचे जगदीश मुळीक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनिल टिंगरे यांनी विजय मिळवला होता. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत बापूसाहेब पठारे पुन्हा राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी विधानसभेचे तिकीट मिळवलं आणि त्यात ते विजयी झाले.

विधानसभेच्या या लढाईत बापूसाहेब पठारे यांना मुलाची साथ लाभली ती म्हणजे मुलगा सुरेंद्र पठारे यांची. सुरेंद्र पठारे हे देखील मागील काही वर्षापासून वडगावशेरीचा राजकारणात सक्रिय आहेत. या संपूर्ण परिसरात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. मतदारसंघातील प्रत्येक छोट्या मोठ्या कामात त्यांनी सहभाग घेत अडचणी सोडण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी आंदोलने ही केली आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले.

गेल्या काही वर्षांपासून सुरेंद्र पठारे यांनी मतदार संघात आपला जनसंपर्क वाढवत कामाला सुरूवात केली. प्रत्येक गोष्टीत सहभागी होत त्यांनी मतदार संघातल्या अडचणी जाणून घेतल्या व सोबतच पर्यायाने त्या सोडविण्यासाठी लढा उभारला आणि आंदोलने केली. पुण्यातील सीईओपी महाविद्यालयातील गोल्ड मेडलिस्ट असलेल्या सुरेंद्र पठारे यांनी मागील काही वर्षात संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. दीड महिन्यांपासून ते पायाला भिंगरी लागल्यासारखी फिरत होते. आणि त्याचा परिणाम विजयात झाला. वडील बापूसाहेब पठारे यांच्या गळ्यात त्यांनी विजयाची माळ घातली.

वडगाव शेरीत आरपीआयची भूमिका ठरली जाईंट किलर:. वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) तसेच आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका निर्णायक ठरली आहे. गेल्या अनेक वर्षात महायुती मधील प्रमुख नेत्यांनी आरपीआयला सन्मानपूर्वक वागणूक न दिल्याने या मतदारसंघात महायुतीला पराभवाचा फटका बसला आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयात आरपीआयची भूमिका जाईंट किलर ठरली आहे. सर्वसामान्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आरपीआयच्या कष्टाचे हे फळ आहे.– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोथरूडमध्ये सात्यकी सावरकर आयोजित ‘संन्यस्त खडग’ नाटक वंचित बहुजन आघाडीने पाडले बंद

नाटकात तथागत गौतम बुद्ध यांच्याविषयी अवमानकारक संवाद असल्याचा...

यूनेस्को हेरिटेज वारसा, जाहिरातीतुन नव्हे तर कृतीने जपण्याची गरज..काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

रयतेच्या राजांना अभिप्रेत कल्याणकारी लोक-राज्याची संकल्पना वास्तवात उतरवावी. बारसू रिफायनरी...

पुणे: बीडीपी झोन निश्चिती संदर्भात नियुक्त समितीने व शासनाने पर्यावरण संवर्धन आणि बाधीत जनतेच्या भावनांचा विचार करावा

BDP करिता आरक्षित क्षेत्रातील पर्यावरण संवर्धनासोबतच पुणेकरांचे संरक्षणाचे अनुषंगाने...

शहनाई हृदयाला भिडणारे वाद्य : डॉ. प्रमोद गायकवाड

गानवर्धन, स्वरझंकार ज्ञानपीठ आयोजित चर्चासत्रात स-प्रात्यक्षिक व्याख्यान पुणे : पुराण...