सांगोला: सांगोला मतदारसंघात विद्यमान आमदार शहाजी पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेतील बंडखोरीत एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या विद्यमान आमदार शहाजी पाटील यांचा (बापू) यांचा पराभव झाला
शेकापचे बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचा पराभव केला. आबासाहेब देशमुख 25 हजार 384 मतांनी विजयी झाले आहेत. दीपक साळुंखे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
सांगोला हा मतदारसंघ पूर्वीपासून शेकापचा बालेकिल्ला होता. गणपतराव देशमुख या मतदारसंघातून ११ वेळा विधानसभेवर निवडून गेले होते. खुद्द शहाजी पाटील यांनी देशमुख यांच्याविरोधात 6 वेळा निवडणूक लढविली होती. त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. 2019 ला बाबासाहेब देशमुख यांची वय झाल्याने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शहाजी पाटील यांना संधी चालून आली. या निवडणुकीत शहाजी पाटील यांचा विजय झाला होता. यंदाच्या निवडणुकीत बाबासाहेब देशमुख यांनी 1 लाख 16 हजार 280 मते घेत शहाजी पाटील यांचा 25 हजार 384 मतांनी पराभव केला. बाबासाहेब देशमुख यांनी पुन्हा एकदा सांगोला मतदारसंघ खेचून आणत मतदारसंघात शेकापचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.
सांगोला विधानसभा मतदार संघांमध्ये पडलेली मते
काेणाला किती मते मिळाली?
बाबासाहेब देशमुख : 1 लाख 16 हजार 280
शहाजी पाटील : 90 हजार 896