पुणे- २३ नोव्हेंबर, २०२४:-
संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिन्दर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले, की मिशनच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने आज संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा येथे निरंकारी सामूहिक साध्या विवाहांचे एक अनुपम दृश्य प्रदर्शित झाले ज्यामध्ये देश-विदेशातील एकंदर ९६ नव वर-वधु सतगुरु माता सुदीक्षाजी आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात परिणय सूत्रात बांधले गेले. या मध्ये महाराष्ट्रातील पुणे पिंपरी-चिंचवड तसेच भारतभरातील बिहार, छत्तीसगढ़, दिल्ली, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मीर, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांव्यतिरिक्त विदेशातील आस्ट्रेलिया, यू.एस.ए. या देशातील जोडप्यांचा समावेश आहे. या प्रसंगी निरंकारी मिशनचे अधिकारीगण, वधू-वरांचे माता-पिता व नातलग तसेच मिशनचे अनेक भाविक भक्तगण उपस्थित होते. सर्वांनी या दैवी दृश्याचा भरपूर आनंद प्राप्त केला.
सामूहिक विवाह कार्यक्रमाची सुरवात पारंपारिक जयमाला व निरंकारी विवाहाचे विशेष चिन्ह सांझा-हार (सामायिक हार) यानी झाली. त्यानंतर भक्तिमय संगीताच्या तालावर ‘निरंकारी लावां’चे प्रथमच हिंदी भाषेतून गायन करण्यात आले ज्यातील प्रत्येक ओळ नव विवाहित युगुलांसाठी सुखमय गृहस्थ जीवन जगण्याची कल्याणकारी शिकवण देत आहे. नव विवाहित युगुलांवर सत्गुरु माता जी व निरंकारी राजपिता जी तसेच तिथे उपस्थित सर्वांनी पुष्प-वर्षा केली आणि त्यांच्या कल्याणमय जीवनासाठी भरपूर आशीर्वाद प्रदान केले.
उल्लेखनीय आहे, की दरवर्षी आयोजित होणारे हे पावन आयोजन साधेपणा व शालीनता पसरवत जात, धर्म, वर्ण, भाषा यांसारख्या संकुचित भेदभावांच्या पलीकडे जाऊन एकत्वाचे सुंदर स्वरूप प्रदर्शित करतो.
नव विवाहित जोडप्यांना आशीर्वाद प्रदान करताना हुए सतगुरु माताजी म्हणाल्या, की गृहस्थ जीवनाच्या पवित्र बंधनात नर व नारी दोहोंचे समान स्थान असते ज्यामध्ये कोणी लहान-मोठा नाही. दोघांना समान महत्व आहे. सहयोगाचे हे एक उत्तम उदाहरण असते.
सतगुरु माताजींनी सांझा हार रूपी प्रतीकाचे उदाहरण देऊन सांगितले, की ज्याप्रमाणे सांझा हार एकतेची भावना दर्शवितो तद्वत गृहस्थ जीवनात राहून सर्व नात्यांना महत्व देत सर्वांच्या प्रति आदरभाव धारण करुन आपल्या जबाबदाऱ्या निभावण्याचीही प्रेरणा देतो. गृहस्थ जीवनातील सर्व कर्तव्यांचे पालन करत सदोदित सेवा, सुमिरण व सत्संगाद्वारे या निरंकाराचा आधार घेऊन सुखद जीवन जगायचे आहे. निःसंदेह अनेक प्रांतांतून आलेल्या नव युगुलांच्या व उभय परिवाराच्या मिलनाचे हे एक सुंदर स्वरूप आज इथ दृष्टीगोचर झाले. सतगुरु माताजींनी सर्व नव विवाहित दाम्पत्यांना आनंदमय जीवन व्यतीत करण्यासाठी शुभाशीर्वाद प्रदान केले.