Home Blog Page 470

‘रा. स्व. संघ जनकल्याण समिती’तर्फेआरोग्यविषयक जागृती मोहीम

रविवारी ‘सेवा भवन दौड़’

पुणे
‘सेवा भवन’ या पुण्यातील रुग्णसेवा प्रकल्पातर्फे ‘सेवा भवन दौड़’ या मूत्रपिंडाच्या स्वास्थ्या विषयी जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सेवा भवन दौड़’चा प्रारंभ रविवारी, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता होईल. या उपक्रमापासून ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’च्या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेचाही प्रारंभ होणार आहे.

‘जनकल्याण समिती’तर्फे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे कार्यवाह प्रमोद गोऱ्हे आणि ‘सेवा भवन’ प्रकल्पाचे कार्यवाह पलाश देवळणकर यांनी ही माहिती दिली. ‘रन फॉर किडनी हेल्थ’ हा विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सेवा भवन दौड़’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘जनकल्याण समिती’तर्फे ‘सेवा भवन’ हा सेवा प्रकल्प चालवला जातो. या प्रकल्पाच्या वतीने ‘सेवा भवन दौड़’ होत असून कर्वेनगरमधील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेपासून त्याचा प्रारंभ होईल.

या ‘दौड़’चे पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर असे दोन टप्पे आहेत. या शिवाय ‘चॅरिटी रन’ हा उपक्रमही केला जाणार आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, प. महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सेवा भवन दौड़’चा प्रारंभ होईल.

‘जनकल्याण समिती’तर्फे आरोग्यविषयक जागृती मोहीम सुरू केली जात असून या मोहिमेचा प्रारंभ ‘सेवा भवन दौड़’ या उपक्रमापासून केला जाणार आहे. या मोहिमेत प्रामुख्याने तज्ज्ञ डॉक्टरांची आरोग्यविषयक व्याख्याने, विविध विषयांवर चर्चासत्र, आरोग्य शिबिरे, जिज्ञासूंचे शंका-समाधान, महिलांसाठी संवादसत्र, योग, स्वास्थ्य, जीवनशैली याबाबतचे मार्गदर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन ‘जनकल्याण समिती’तर्फे ‘सेवा भवन’मध्ये केले जाणार आहे.

‘सेवा भवन’ या प्रकल्पात अल्प दरात डायलिसिसची सुविधा आहे. पुण्यात उपचारांसाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची निवास, भोजन आदी व्यवस्थाही अल्प शुल्कात केली जाते. याशिवाय निःशुल्क स्वास्थ सल्ला आणि समुपदेशन केंद्र चालवले जाते. किडनी आजारासंबंधीची जनजागृती आणि ‘सेवा भवन’ प्रकल्पाची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सेवा भवन दौड़’ आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या उपक्रमामध्ये १८ वर्षांवरील महिला आणि पुरुषांना सहभागी होता येणार आहे. त्यासाठी नोंदणी आवश्यक असून ८२७५३९६३९७ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करता येईल.

कचऱ्याच्या एक-एक कणापासून करोडोंचे उत्पन्न मिळवणारे इंदौर..! आमदार हेमंत रासने

इंदोर/पुणे-“कचऱ्यातून सोने निर्माण करणे” ही केवळ बोलण्यासाठीची म्हणी न ठेवता इंदौर शहराने ती सत्यात उतरवलीय. गेली सात वर्षे स्वच्छ सर्वेक्षणात देशात अव्वल स्थान मिळवणाऱ्या इंदौरने 100% कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारले आहेत. कचऱ्याचे सहा प्रकारे वर्गीकरण करण्यात येत असून त्यापासून बायो-सीएनजी, सेंद्रिय खत तसेच प्लास्टिकचा कचरा रस्ते निर्माणासाठी वापरला जात आहे. या मॉडेलच्या माध्यमातून शहर स्वच्छ राहण्यासोबत करोडोंचे उत्पन्नही मिळवत आहे. इंदौरच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी “स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा” अभियाना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या अभ्यास दौऱ्यात आज या कचरा प्रक्रिया प्रकल्पांना भेट देत माहिती जाणून घेतली.असे पुण्यातील कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी म्हटले आहे.

इंदूर महानगरपालिका (IMC) सह सार्वजनिक-खाजगी भागीदारीमध्ये चालवलेला, एव्हर एन्विरो बायोगॅस हा प्रकल्प शहराच्या पर्यावरण धोरणाचा आधारस्तंभ म्हणून उभा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून इंदूरमधील वायू प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे या प्रकल्पात प्रतिदिन ५५० मेट्रिक टन कचरा गोळा त्यावर प्रक्रिया करून १७ हजार किलो बायोगॅस निमित केला जातोय. स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियाना अंतर्गत आमदार हेमंत रासने यांच्या नेतृत्वात ३०० जणांच्या शिष्टमंडळाने आज इंदूरमधील २ कचरा पुनर्चक्रीकरण (रिसायकलिंग) प्रकल्पास भेट दिली. या मध्ये शहरातील नेपरा रिसोर्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि एव्हर एन्विरो बायोगॅस या दोन्ही प्रकल्पांचा समावेश होता. या दोन्ही प्रकल्पांना भेट देऊन महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि कसबा मतदारसंघाचे आमदार यांनी संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली. दोन्ही प्रकल्पांच्या अधिकाऱ्या येथील संपूर्ण प्रक्रियांची माहिती दिली. ‘

फुरसुंगीच्या हॉटेल ब्लू बेरी मालकाला आसामच्या महिलेने घातला दीड लाखाचा गंडा

पुणे-फुरसुंगी, येथील हॉटेल ब्लू बेरीमध्ये कार्यरत असलेल्या महिला कॅशियरने हॉटेल मालकाची १.५३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी सीमा सिन्हा (रा. करीमगंज, आसाम) हिच्याविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेल मालक शेखर हनुमंत कामठे (वय ४४) यांच्या तक्रारीनुसार, सीमा सिन्हा ही डिसेंबर २०२१ पासून हॉटेलमध्ये कॅशियर म्हणून काम करत होती. २ जानेवारीला रात्री जेव्हा मालक हॉटेलमध्ये आले, तेव्हा कॅशियर गायब होती आणि तिचा मोबाईल फोनही बंद होता. संशय आल्याने मालकांनी कॅश काउंटरची तपासणी केली असता त्यांना रोख रक्कम गायब असल्याचे आढळले.

तपासात उघड झाले की, आरोपी कॅशियरने ग्राहकांकडून येणारी रक्कम थेट तिच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करून घेत होती. हॉटेल मालकाचा विश्वास संपादन करून त्यांची फसवणूक केली. एकूण १ लाख ५३ हजार रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

हडपसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विश्वासघात आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून तिचा शोध सुरू आहे.

इंदोरमधील कचरा निर्मुलन,वायुप्रदूषण नियंत्रण प्रकल्प आदींना पुणे महापालिकेच्या पथकाची भेट

पुणे-इंदोर :- ‘गेली सात वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिल्या क्रमांकावर राहणाऱ्या इंदूरमध्ये शहर स्वच्छ ठेवण्यासोबतच निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या अनुषंगाने पुणे महापालिकेच्या इंदूर दौऱ्यात एव्हर एन्विरो बायोगॅस प्रकल्पाला भेट देण्यात आली. २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झालं होतं. या पाहणी आणि अभ्यास दौऱ्यात महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम, आमदार हेमंत रासने त्यांच्यासोबत नगरसेवक विशाल धनवडे, राजेश येनपुरे, योगेश समेळ, नगरसेविका, पल्लवी जावळे, गायत्री खडके,मनीषा लडकत, भजपा चे प्रमोद कोंढरे, राजेंद्र काकडे, प्रणव गांजीवाले,अमित कंक, राजू परदेशी, चंद्रकांत पोटे, वैशाली नाईक आदी कार्यकर्ते यांचा समावेश आहे.

इंदूर महानगरपालिका (IMC) सह सार्वजनिक-खाजगी भागीदारीमध्ये चालवलेला, एव्हर एन्विरो बायोगॅस हा प्रकल्प शहराच्या पर्यावरण धोरणाचा आधारस्तंभ म्हणून उभा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून इंदूरमधील वायू प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.या प्रकल्पात प्रतिदिन ५५० मेट्रिक टन कचरा गोळा त्यावर प्रक्रिया करून १७ हजार किलो बायोगॅस निमित केला जातोय. स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियाना अंतर्गत आमदार हेमंत रासने यांच्या नेतृत्वात ३०० जणांच्या शिष्टमंडळाने आज इंदूरमधील २ कचरा पुनर्चक्रीकरण (रिसायकलिंग) प्रकल्पास भेट दिली. या मध्ये शहरातील नेपरा रिसोर्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि एव्हर एन्विरो बायोगॅस या दोन्ही प्रकल्पांचा समावेश होता. या दोन्ही प्रकल्पांना भेट देऊन महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि कसबा मतदारसंघाचे आमदार यांनी संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली. दोन्ही प्रकल्पांच्या अधिकाऱ्या येथील संपूर्ण प्रक्रियांची माहिती दिली. ‘गेली सात वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिल्या क्रमांकावर राहणाऱ्या इंदूरमध्ये शहर स्वच्छ ठेवण्यासोबतच निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. येथे कचऱ्याचे ६ वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करण्यात येत असून त्यापासून बायो-सीएनजी, सेंद्रिय खत तसेच प्लास्टिक कचरा रस्ते निर्माणासाठी वापरला जात आहे. या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवण्यासोबतच करोडोंचे उत्पन्न देखील इंदूर मिळवत आहे.” अश्विनी सिंह, वरिष्ठ सुपरव्हाझर, नेपरा रिसोर्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी दररोज ३०० मेट्रिक टन पेक्षा अधिक पुनर्चक्रीकरण (रिसायकलिंग) म्हणजे कचऱ्याच्या मालाचा पुन्हा वापर करून नवीन उत्पादन व वस्तूंमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया पार पडते. यातील २० टक्के पेक्षा अधिक कचरा चे रिसायकलिंग हून त्यातून विविध गोष्टी तयार होतात. अॅल्युमिनियम फॉइल, प्लास्टिक बॉटल, तेलाच्या पिशव्या, कार्डबोर्ड यासारखे अनेक वस्तूंचे याठिकाणी पुनर्चक्रीकरण होते. या कंपनी मध्ये २०० अधिक कर्मचारी करतात. दरवर्षी या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे चेक अप केले जाते तसेच त्यांची सुरक्षा म्हणून हेल्मेट, ग्लोव्ह घालूनच त्यांना काम करायला परवानगी आहे.

देशाचे खरे डिफेन्स क्लस्टर हे महाराष्ट्र आणि पुण्यात- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लि.च्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल, लघु शस्रास्त्र उत्पादन सुविधेचे उद्घाटन

पुणे, दि. ६: महाराष्ट्र हे पहिले असे राज्य आहे की ज्याने काळाची पावले ओळखून २०१७ साली संरक्षण उत्पादन धोरण तयार केले. आज देशाचे खरे डिफेन्स क्लस्टर हे महाराष्ट्र आणि त्यातही ते पुण्यात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया- मेक फॉर वर्ल्ड’ ही घोषणा दिली आणि देशातील नवोन्मेषकांना संधी, व्यासपीठ मिळवून दिल्याने आज आपला देश संरक्षण क्षेत्रात श्रेष्ठत्वाकडे वाटचाल करत आहे, असेही ते म्हणाले.

चाकण औद्योगिक क्षेत्रांतर्गत नानेकरवाडी येथील निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लि.च्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल, लघु शस्रास्त्र उत्पादन सुविधेचे उद्घाटन आणि स्थापना दिन सोहळा तसेच कंपनीच्या शिर्डी सुविधेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार महेश लांडगे, निबे लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे, एल अँड टी डिफेन्सचे कार्यकारी उपाध्यक्ष अरुण रामचंदाणी उपस्थित होते.

आपल्या देशात नवोन्मेषकांची कधीच कमतरता नव्हती, मात्र त्यांना संधी, व्यासपीठ मिळत नव्हते, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री मोदी यांनी ‘मेक इन इंडिया- मेक फॉर वर्ल्ड ही घोषणा केली. संरक्षण उत्पादन आणि तंत्रज्ञानाच्या बळावळ श्रेष्ठत्व असलेल्या अमेरिकेसह जगातील श्रीमंत देशांच्या श्रीमंतीच्या पाठीशी त्यांचे संरक्षण उत्पादन आहे. संरक्षण उत्पादनांच्या बाबतीत आपला देश दुर्दैवाने मागे राहिला. आपण अनेक शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्या सुरू केल्या. त्यांनी निश्चितच चांगले काम केले. मात्र, यामध्ये जी अत्याधुनिकतेकडे, तंत्रज्ञानाधारित युद्धपद्धतीकडे (टेक्नॉलॉजिकल वॉरफेअर) वाटचाल होणे आवश्यक होते, ते झाले नाही. ते काम मोदी यांच्या काळात झाले.

आगामी काळ हा टेक्नॉलॉजिकल वॉरफेअरचा असून या मध्ये भारताला श्रेष्ठत्व मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री मोदी यांनी, ज्या देशांकडून संरक्षण उत्पादने आयात करण्यात येतील त्यातील काही भाग त्यांनी भारतातच तयार करावेत अशी अट ठेवली. या अटीमुळे आयात होणाऱ्या संरक्षण उत्पादनांचे काही भाग आपल्या देशातच तयार व्हायला सुरुवात झाली. २०१६ साली माझगाव डॉक येथे एका पाणबुडीचे जलावतरण झाले होते ती १०० टक्के आयातीत भागांवर होती. मात्र नुकतेच प्रधानमंत्री यांच्या हस्ते जलावतरण झालेल्या पाणबुडीचे ६० टक्क्याहून अधिक भाग हे भारतात तयार करू शकलो आहोत. यापूर्वी या पाणबुडीसाठी चार पट अधिक खर्च करत होतो. यामुळे एक मोठी परिसंस्था (इकोसिस्टीम) आपल्या देशात तयार झाली आहे. यापूर्वी संपूर्ण संरक्षण उत्पादनांचे आयात करणारा आपला देश आज 25 हजार कोटी रुपयांची निर्यात करत आहे. आज मोठे काम या क्षेत्रात देशात होत आहे.

महाराष्ट्राने २०१७ साली संरक्षण उत्पादन धोरण तयार करुन त्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी अंतर्गत निधी (फंड ऑफ फंड) स्थापन केला. त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील ३०० स्टार्टअप सुरू झाले. आज पुणे नागपूर आदी ठिकाणी संरक्षण उत्पादन होत आहे.

आपला देश यापूर्वी संरक्षण साधनांसाठी याचक होता; मात्र आज श्रेष्ठ असून अचूक पद्धतीने विविध संरक्षण उत्पादने तयार करीत आहे. शत्रूदेशावर अचूक मारा करण्याच्या दृष्टीने आज मार्गदर्शित क्षेपणास्त्राचा (गायडेड मिसाइल) जवळपास दोन हजार किलोमीटरची पल्ला गाठण्याकडे आपला प्रवास सुरू असून संरक्षण क्षेत्रात जगातील प्रगत देशांमध्ये आपला समावेश होत आहे. संरक्षण क्षेत्रात होत असलेल्या प्रगतीचे श्रेय नीबेसारख्या लोकांना जाते, त्यांनी संशोधन केले, एल अँड टी सारख्या कंपनीने त्यांच्यावर विश्वास दाखविला, असेही ते म्हणाले.

ज्याला नाविन्यता समजते आणि दूरदृष्टी असते तो व्यक्ती साधने नसली तरी तो यशस्वी होतो, असे सांगून श्री. फडणवीस यांनी एका मराठी तरुणाने एक स्वप्न पाहिले आणि कर्तृत्वाच्या जोरावर ते पूर्ण केले या शब्दात गणेश निबे यांचे अभिनंदन केले. याही वर्षी गतवर्षीपेक्षा मोठ्या स्वरूपातील डिफेन्स एक्स्पो करण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

शासकीय कंपन्यांच्या बरोबरीने खाजगी क्षेत्रानेही देशाच्या संरक्षणसिद्धतेत योगदान द्यावे- अजित पवार

श्री. पवार म्हणाले, येणाऱ्या काळात होणारी युद्ध, जमिनीवर होतीलच, त्याचबरोबरीने आकाशात, पाण्यात, अंतराळात, इंटरनेट, मोबाईलच्या माध्यमातूनही होतील. त्यादृष्टीनेही आपली संरक्षणसिद्धता असण्याची गरज आहे. त्यासाठी शासकीय कंपन्यांच्या बरोबरीने खाजगी क्षेत्रानेही देशाच्या संरक्षणसिद्धतेत योगदान द्यावे, महत्वाची भूमिका बजावावी, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी नीबे कंपनीसारख्या संस्थांचे कार्य, मदत, भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

गणेश निबे यांच्या नेतृत्वाखाली २०२१ मध्ये स्थापन झालेल्या निबे लिमिटेडनं अवघ्या पाच वर्षात केलेला प्रवास निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानस्पद आहे. श्री. निबे यांच्यासारख्या शेतकरी कुटुंबातून पुढे येऊन काम करणाऱ्या तरुणाला मदत करण्याचा आनंद वेगळाच असतो. सतत काहीतरी नवीन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन् इंडियाचं उद्दीष्ट समोर ठेवून, देशाला संरक्षणसिद्धतेकडे नेण्याच्या त्यांच्या प्रयत्नाबद्दल त्यांचे कौतुक करतो, असेही श्री. पवार म्हणाले.

गेल्या काही वर्षात देशाच्या संरक्षणसामग्री निर्मिती उद्योगात अमूलाग्र बदल झाले. परदेशातून आयात होणारी संरक्षण सामग्री महाग असते. कधीकधी त्यांचा दर्जा कमी असतो. या सगळ्या संकटांवर मात करण्यासाठी, डीआरडीओ सारख्या शासकीय संस्थांच्या बरोबरीने संरक्षण सामग्री निर्मितीत खाजगी क्षेत्राचे सहकार्य घेण्यात येत आहे. दारुगोळा, लष्करासाठी आवश्यक पुलाचे यंत्र, अत्याधुनिक रायफल आदी अनेक शस्त्र स्वदेशात तयार होत असल्याने त्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचत आहे.

देशाची संरक्षणसिद्धता वाढवताना, देशाला संरक्षणाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवताना, आयात कमी करुन,संरक्षण सामग्रीची निर्यात वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा, देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहाचवण्याचे प्रधानमंत्र्यांचे स्वप्न साकार करायचे आहे.

गेल्या आर्थिक वर्षात देशानं ८५ हून अधिक देशात, २१०.८ अब्ज रुपयांची निर्यात केली. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात, संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेला (डिआरडीओ) २.९ अब्ज अमेरिकन डॉलर्स मिळाले. २०२८-२९ पर्यंत, ५०० अब्ज रुपये म्हणजे ६ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या वार्षिक संरक्षण निर्यातीचं लक्ष्य आहे.

येणाऱ्या काळात, देशाचा अभिमान, स्वाभीमान असलेल्या, डीआरडीओ, इस्रो, माझगाव डॉक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत इलेक्ट्रिकल्स, भारत डायनॅमिक्स, कोल इंडिया, एचएएल, आयडीया फोर्ज, अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लॅबोरेटरी या कंपन्यांच्या यादीत ‘निबे लिमिडेट’ कंपनीचे, ‘निबे’ उद्योगसमुहाचे नावही ठळकपणे असेल यासाठी त्यांनी कंपनीला शुभेच्छा दिल्या.

उद्योगमंत्री सामंत म्हणाले, गतवर्षी निबे यांनी पुणे येथे डिफेन्स एक्स्पो घेण्यात पुढाकार घेतला. त्याची नोंद जागतिक पातळीवर घेतली गेली. श्री. निबे यांच्यासारखा मराठी माणूस संरक्षण क्षेत्रामध्ये देशाचे नेतृत्व करतो आहे याचा मनापासून आनंद होत आहे. त्यांना राज्याच्या उद्योग विभागाकडून जे जे सहकार्य लागेल ते देण्याचे काम केले जाईल. महाराष्ट्राच्या उद्योग जगतातील असेट अशा शब्दात श्री. निबे यांचा त्यांनी गौरव केला.

श्री. विखे पाटील म्हणाले, प्रधानमंत्री मोदी यांनी मेक इन इंडियाचा जो संकल्प आणला आहे. तो पुढे नेण्याचे काम श्री. निबे करत आहेत. शिर्डी येथे नवीन औद्योगिक क्षेत्रात संरक्षण क्लस्टर उभे राहत असून त्यात पहिला प्रकल्प निबे समूहाचा येत आहेत. संरक्षण क्लस्टर सुरू करण्यातील तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करू शकल्यास या प्रकल्पाचा चालना मिळेल, असेही ते यावेळी म्हणाले.

प्रास्ताविकात श्री. निबे यांनी आपल्या कंपनीविषयी माहिती दिली. कंपनी संरक्षण क्षेत्र, अवकाश, सायबर आदी क्षेत्रात काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी बालकृष्णन स्वामी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे कंपनीच्या प्रवासाची माहिती दिली. मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांनीदेखील यावेळी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लि.चे डिआरडीओशी तंत्रज्ञान आदानप्रदान करार, प्रिमीअर एक्प्लोजिव्हस, महाराष्ट्र सरकारचे एमआरसॅक, थॅलेस ॲलेनिया स्पेस, ब्लॅक स्क्ाय या कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अन्य मान्यवरांनी प्रकल्पाची पाहणी केली.

यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी अनबलगन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलरासू, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, निबे लि. चे अकार्यकारी स्वतंत्र संचालक सुनील भोकरे, रंजना मिमानी, डॉ. दशरथ राम, वेंकटेश्वरा मन्नावा, भगवान गदादे यांच्यासह कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
0000

मॉर्निंग वॉक: महिलांची सोनसाखळी हिसकावणा-या सराईत चोरट्यास पकडले

पुणे- सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना हेरून त्यांचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या कात्रज कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगरच्या चोरट्यास भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले आहे.

या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.३०/०१/२०२५ रोजी सकाळी फिर्यादी ह्या प्रज्ञा वॉशींग सेन्टर समोर, त्रिमुर्ती चौकाचे पुढे, भारती विद्यापीठ, पुणे येथे वॉकीग करत असताना मोटार सायकल वरुन आलेल्या दोन इसमांनी आप आपसात संगनमत करुन फिर्यादी यांचे गळयातील ४०,०००/- रु. किं.ची सोन्याची चेन हिसका मारुन चोरुन नेली म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर ७६/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०४, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार यांना आरोपींचा तात्काळ शोध घेणेबाबतचे मार्गदर्शन केले होते. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे हे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरुन आरोपींचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील राजु महादेव डेंगळे, वय २२ वर्षे, रा. प्रतिकनगर, गोकुळनगर, गल्ली नंबर १, कात्रज कोंढवा रोड, पुणे यांनी केल्याची खात्रीशीर माहीती मिळाली. त्यानुसार आरोपी राजु डेंगळे याचा शोध घेतला असता तो कात्रज कोंढवा रोडवर मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात दि. ०४/०२/२०२५ रोजी अटक करण्यात आली असुन आरोपीकडुन फिर्यादी यांचे चोरी केले १ तोळे वजनाची सोन्याची चेन जप्त करण्यात आली आहे. आरोपीकडे आणखीन गुन्हे केले आहेत अगर कसे याबाबत तपास चालु आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर प्रविणकुमार पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे श्रीमती स्मार्तना पाटील सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगावकर, पोलीस निरीक्षक गुन्हे राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, चेतन गोरे, महेश बारवकर, सचिन सरपाले, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांच्या पथकाने केली आहे.

‘हर हर महादेव’ रंगावली प्रदर्शनातून अवतरले महादेव चरित्र 

श्रीरंग कलादर्पण फाउंडेशन तर्फे आयोजन : रंगावलीकार प्रा.अक्षय शहापूरकर आणि त्यांच्या १०० विद्यार्थ्यांचा सहभाग
पुणे : रंगावलीतून दाखविलेली शिवाची उत्पत्ती… शिवाला झालेला सती वियोग… भव्य रंगावलीतून साकारलेला शिव-पार्वती विवाह सोहळा… सप्तरंगातून दर्शविलेले अर्धनारी नटेश्वराचे सौंदर्य… वीरभद्रेश्वर आणि हनुमंताची टू इन वन रांगोळी… आणि पाण्याच्या मधोमध कार्तिक स्वामींचे बालस्वरूपातील मोहक रुप पाहताना पुणेकर भारावून गेले. तसेच रंगावलीच्या माध्यमातून बारा ज्योर्तिलिंगांचे दर्शनही नागरिकांना घडले.

श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशन तर्फे ‘हर हर महादेव’ या रंगावली प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालनात करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ अध्यात्मिक गुरु व प्रवचनकार स्थितप्रज्ञानंद सरस्वती माताजी आणि शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी फाउंडेशनचे प्रा.अक्षय शहापूरकर, अजित पवार, जगदीश चव्हाण, प्रतीक अथणे, महादेव गोपाळे, श्रीहरी पवळे आदी उपस्थित होते. 
प्रा. अक्षय शहापूरकर आणि त्यांचे १०० विद्यार्थी यांनी तब्बल ३० ते ३५ तासांत महादेवांच्या लीला रांगोळीच्या माध्यमातून साकारल्या असून रांगोळीतील अनेक संशोधने प्रदर्शनात पहायला मिळत आहेत. यावेळी स्थितप्रज्ञानंद सरस्वती माताजी यांनी उपस्थितांना आशीर्वचन दिले. 

प्रा. अक्षय शहापूरकर म्हणाले, प्रदर्शनात ३० रांगोळ्या असून रंगावली चे विविध प्रकार देखील आपल्याला प्रदर्शनात पाहायला मिळतील. यामध्ये थ्री डी रांगोळी, टू इन वन रांगोळी, पाण्यावर – पाण्याखाली तसेच पाण्याच्या मधोमध रांगोळी, प्रतिबिंब रांगोळी, हलती रांगोळी स्पाॅटेड रांगोळी तसेच आणखी बरेच प्रकार पुणेकरांना अनुभवायला मिळतील. हे प्रदर्शन दि.९ फेब्रुवारी पर्यंत सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे, असेही त्यांना सांगितले. 

फडणवीसानी धरताच नेम .. दादांनीही घेतले हाती क्षेपणास्त्र .. पहा फोटो

आणि फडणवीस ही खळखळून हसले…..

पुणे/चाकण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत, चाकण, पुणे येथील अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुलाचे, लघु शस्त्रास्त्र निर्मिती सुविधेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांचा अनोखा अंदाज बघायला मिळाला. दोघांनीही क्षेपणास्त्र हातात घेत नेम धरला..

अजितदादांनी सायकलची रपेट ही मारली …

शहर आणि उपनगरे सर्वत्र उपलब्ध असावी मेट्रो: डीपीआर करा, महापालिकेला मंत्री मोहोळ यांची सूचना

पुणे मेट्रोच्या नव्या मार्गांबाबत सुचविले नवे पर्याय !

पुणे -मेट्रोचा शहरभर विस्तार होत असताना मेट्रो जास्तीत जास्त पुणेकरांना प्रवास करता येणारी असावी आणि पुण्याचा सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी भविष्याचा विचार करुन वाहतूक नियोजनासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सूचित केले आहेत. या संदर्भातील बैठक पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रवण हर्डिकर यांच्याशी झाली असून महापालिका आयुक्त श्री. राजेंद्र भोसले यांना यासंदर्भातील डीपीआर तयार करण्याच्या सूचना मोहोळ यांनी दिल्या आहेत.

नेमक्या काय सूचना केल्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ….

१) खराडी ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो मार्गिका
▶️ पुणे महानगरपालिकेने खराडी ते पुणे विमानतळ या मेट्रो विस्तारासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करावा. हा मार्ग खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या मंजूर मेट्रो मार्गात समाविष्ट करुन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ-खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला असा संपूर्ण मार्ग करण्यात यावा.

२) खराडी येथे Interchangeable and Multimodal Transport Hub म्हणून विकसित करावे.
▶️ खराडी आणि परिसर हा व्यावसायिक आणि राहीवाशीदृष्ट्या झपाट्याने विकसित होत असून Interchangeable and Multimodal Transport Hub साठी खराडी योग्य पर्याय आहे. खराडी येथे हे हब झाल्यास पुणे विमातळावर जाण्यासाठी मेट्रोच्या सर्व मार्गावरुन जाण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. चांदणी चौक ते वाघोली या मार्गावर प्रवास करणारांना खराडी येथून थेट विमानतळ गाठता येईल. तर निगडी ते स्वागरेट या मार्गावरील प्रवाशांना स्वारगेटहून थेट विमानतळाकडे जाता येईल. शिवाय या मार्गावरील प्रवाशांना शिवाजीनगर-खराडी-विमानतळ हाही पर्याय उपलब्ध असेल. तसेच हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील प्रवाशांना शिवाजीनगरहून खराडी येथे आणि तेथून थेट विमानतळावर जाता येईल. शिवाय खडवासला-स्वारगेट-हडपसर या मार्गावरील प्रवाशांना थेट विमानतळावर पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे खराडी हब होणे संपूर्ण पुणे शहराच्या दृष्टीने आवश्यक आहे.

३) कात्रज ते हिंजवडी मेट्रो मार्गाचाही विचार व्हावा !
▶️ पुण्यातील वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूककोंडीची गंभीर समस्या होत असताना मेट्रोच्या नव्या मार्गांचाही तातडीने विचार होणे आवश्यक असून यात कात्रज- चांदणी चौक ते हिंजवडी या मार्गावर मेट्रोचा विचार करावा, असे सूचित केले आहे. या दोन्ही दरम्यानच्या भागात होणारा विकास, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज आणि भविष्याचे नियोजन या बाबींचा विचार करुन हा मार्ग होणे आवश्यक आहे. हा मार्ग झाल्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांसाठी मेट्रोचे वर्तुळाकार मार्ग होऊ शकतील.

४)भूसारी कॉलनी, पीएमपी डेपो ते चांदणी चौक दुमजली उड्डाणपूलाची निर्मिती
▶️ वनाज ते चांदणी चौक या मार्गावर वाहतूककोंडीचा विषय गंभीर असून वनाज ते चांदणी चौक हा मेट्रो मार्ग साकारताना तो दुमजली स्वरुपात करावा, जेणेकरुन या भागातील सर्वप्रकारची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. नळस्टॉप येथे दुमजली उड्डाणपुलाचा प्रयोग यशस्वी झाला असून वनाज ते चांदणी चौक या दरम्यानही दुमजली पूल आवश्यक आहे. त्यामुळे वनाज ते चांदणी चौक या मार्गावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल.

‘पुणे शहराचा सर्वांगीण विकास होत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन भविष्याचा विचार करुन करणे गरजेचे आहे. मोदी सरकारच्या आणि राज्य सरकारच्या भक्कम पाठिंब्यामुळे पुणे शहरात मेट्रोचे जाळे अधिक प्रमाणात विस्तारत आहे. मेट्रोच्या या विस्ताराचा अधिकाधिक पुणेकरांना फायदा व्हावा आणि शहरातील सर्व महत्त्वाचे भाग मेट्रो जोडले जावेत, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत’ -मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार आणि नागरीक हवाई वाहतूक राज्यमंत्री

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा!

  • महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश
    •शिव पाणंद व शेत रस्त्यांची कामे दर्जेदार करा
  • ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करणार
  • पाणंद रस्त्यांची प्रलंबित प्रकरणे महिनाभरात निकाली काढणार
  • मोजणीसह पोलीस संरक्षणासाठीची फी बंद करणार

मुंबई, दि. ६ – राज्यातील सर्वच शिव पाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररीत्या पूर्ण करा अशी सूचना प्रशासनाला देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

शिव पाणंद आणि शेत रस्ते समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने श्री. बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे या बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

  • नागपूर पॅटर्न राबवणार

श्री. बावनकुळे म्हणाले, नागपूर जिल्ह्यात प्रती किलोमिटर केवळ आठ ते दहा लाख रुपये खर्चामध्ये उत्कृष्ट पाणंद रस्ते बनविण्यात आले आहेत. या कार्यपद्धतीचा सर्व जिल्ह्यांनी अभ्यास करून इतर जिल्ह्यांमध्येही याप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच ग्रामस्तरीय शेतरस्ता समिती स्थापन करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा. रस्त्यांचे काम दर्जेदार होईल, याची दक्षता घ्यावी. पाणंद रस्त्यांबाबत प्रलंबित असलेली प्रकरणे एका महिन्यात निकाली काढावीत.

  • मोजणीसह पोलीस संरक्षणासाठीची फी बंद करणार

पाणंद रस्ते, शेतरस्ते, सार्वजनिक वहीवाटीच्या रस्त्यांच्या मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी असलेली फी बंद करण्याचा विचार करण्यात येईल असे सांगून मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, अशा रस्त्यांच्या नंबरींगचे सर्वेक्षण करुन नंबरींग हटवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. रस्त्यांच्या प्रकरणी तहसीलदारांच्या निर्णयावर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केल्यानंतर त्यांनीच अंतिम निकाल देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगून मंत्री श्री.बावनकुळे यांनी शेतरस्त्यांचा उल्लेख झाल्याशिवाय वाटप पत्र मंजूर करण्यात येऊ नये यासाठीही शासन सकारात्मक असल्याचे सांगितले.

सामाजिक बांधिलकी अखंड जपत रुग्णांना आरोग्यसेवा पुरवाव्यात- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोशी येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन

पुणे, दि. ६: तंत्रज्ञान खूप वेगाने वाढत आहे. तसेच धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आजारही वेगाने वाढताना दिसतात. एक प्रकारे तंत्रज्ञान आणि आजार यांची स्पर्धा चाललेली आहे. परंतु नवीन तंत्रज्ञानामुळे रुग्णाला दिलासा मिळत आहे. सामाजिक बांधिलकी जोपासण्याची परंपरा अखंड जपत वैद्यकीय क्षेत्रातील चांगल्या व अत्याधुनिक सुविधा देण्याचं काम पटवर्धन कुटुंब करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मोशी येथे धनश्री सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार महेश लांडगे, अमित गोरखे, अण्णा बनसोडे, शंकर जगताप, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, मनपा आयुक्त शेखर सिंह, रुग्णालयाचे संस्थापक डॉ. राजीव पटवर्धन, रवींद्र भुसारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, अलीकडच्या काळामध्ये आरोग्य सुविधा महागलेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ‘युनिव्हर्सल हेल्थकेअर’ सिस्टीम लागू केली आहे. महात्मा फुले जन आरोग्यच्या माध्यमातून मोठ्या रुग्णालयांमधून १ हजार ३०० सेवा मोफत देण्यात येतात. या माध्यमातून केंद्र शासनाच्या १ हजार ८०० सेवांचे पॅकेज राज्यातील जनतेला उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. धनश्री रुग्णालयानेही या सेवा दिल्यास गरजू रुग्णांना पैसे नसले तरी उपचार घेता येईल. शासन मुख्यमंत्री सहायता कक्ष व धर्मादाय सहायता कक्षाच्या माध्यमातून कोणत्याही पॅकेज मध्ये न बसणाऱ्या आजारांसाठी अर्थसहाय्य देत असल्याचे सांगून या सेवाही धनश्री रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांना मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या दोन्ही कक्षामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा या रुग्णालयामार्फत दिल्याने अत्याधुनिक सेवेचा लाभ गरजूंना मिळू शकेल असेही श्री. फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, सामाजिक बांधिलकीने पटवर्धन कुटुंब काम करत आहे. या रुग्णालयामध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत. वेगवेगळ्या सर्जरी तंत्रज्ञानामुळे सोप्या झाल्या आहेत. रोबोटीक सर्जरीमुळे दुसऱ्या कुठल्याही अवयवाला धोका पोहोचत नाही. या सर्व आधुनिक सुविधा देण्याचं काम धनश्री रुग्णालयाने केले आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, उत्तम आरोग्य सेवा सुदृढ समाजाचा पाया आहे. आरोग्य सेवा मजबूत असेल तर समाज प्रगती करु शकतो. आजच्या काळात केवळ मोठ्या श्रणमध्येच नव्हे तर ग्रामीण आणि निमशहरी भागातही उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधांची गरज भासत आहे. धनश्री हॉस्पिटलने ही गरज ओळखून १०० खाटांचे आधुनिक रुग्णालय सुरु केले आहे. शासनही नेहमीच आरोग्य सेवेला प्राधान्य देत आहे. राज्य शासनाने ग्रामीण भागातही दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी विविध योजना आखलेल्या आहेत. धनश्री रुग्णालयासारख्या खाजगी संस्थांमुळे या सेवांना पूरक आधार मिळतो व सरकारच्या आरोग्य सेवांना बळकटी येते. वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल होत आहेत. तंत्रज्ञानामुळे अनेक सुविधा व्यवहार्य होत आहेत. महाराष्ट्राने या क्षेत्रातही आघाडी घेतली आहे असे सांगून धनश्री रुग्णालयात रुग्णाला उत्तम सुविधा मिळतील, असा विश्वास श्री. पवार यांनी व्यक्त केला.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

एमआयटी डब्ल्यूपीयूच्या ‘कॅासमॅास क्लब’ चा वर्धापन दिन:  ‘पिल्लर्स ऑफ क्रिएशन, इगल नेबुला’चे काढले फोटो तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीस अर्पण

पुणे, दि. ६ फेब्रुवारी: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विश्वरूप दर्शन आर्यभट्ट वेधशाळेच्या कॉसमॉस अ‍ॅस्ट्रॉनॉमी क्लबच्या वतीने नुकतेचे सहा अब्ज प्रकाशवर्ष दूर असलेल्या ‘पिल्लर्स ऑफ क्रिएशन, इगल नेबुला’ (गरूड तेजोमय निर्मितीचे स्तंभ) चा फोटो काढले. आज या फोटोची एक प्रतिमा एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊलीच्या मूर्तीस अर्पण केला. ‘कॅासमॅास क्लब’ ह्या विद्यार्थी-शिक्षक क्लबचा आज प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. दीपक रानडे आणि गिरीश दाते उपस्थित होत.
या प्रसंगी विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” अखिल ब्रह्मांड हे ईश्वराचे प्रतिरूप आहे. हे तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वरांनी प्रतिपादलं होतं. आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने आणि योगसामर्थ्याने विश्वाचे गुह्यज्ञान उलगडून सांगणार्‍या ज्ञानेश्वर माऊलींना ईगल नेब्यूलाचे छायाचित्र सादर करून कॅासमॅास क्लबच्या विद्यार्थ्यांनी अतिशय औचित्यपूर्ण कार्य केले आहे.”
या वेळी विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फिजिक्सचे विभाग एचओडी प्रसाद जोगळेकर, विभाग प्रमुख प्रा. अनघा कर्णे आणि विद्यार्थी टीमधील विद्यार्थी प्रतिनिधी ओजस धुमाळ, रोहित देशमुख, नमन अगरवाल, श्रेष्ठ गुप्ता, मल्हार झाडकर, अस्मित राय, पायल मोदी, वरूण नायर, अर्पणा सुब्रमण्यम, इमॅन्युअल आनंदन उपरणं, पदक आणि ज्ञानेश्वर माऊलींचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर खगोल निरीक्षणात रस असणार्‍या पुणेकर नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने‘ विश्वरूप दर्शन आर्यभट वेधशाळे’ला भेट द्यावी असे आवाहनही प्रा. कराड सरांनी केले.
एमआयटी विश्वशांती विद्यापीठांतर्गत ‘एमआयटी स्कूल अ‍ॅाफ कॅान्शसनेस अँड रिअ‍ॅलिटी’ या संस्थेमध्ये चैतन्यशक्तीचे विश्वात्मक स्वरुप यावर संशोधन केले जात आहे. सुप्रसिद्ध कॅन्सर संशोधक आणि वैज्ञानिक डॅा. जयंत खंदारे हे संस्थेचे प्रमुख असून, सुप्रसिद्ध न्यूरोलॅाजिस्ट आणि तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या तत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. दीपक  रानडे हे त्यांचे सहयोगी आहेत.
ब्रह्मांड दर्शनाचे निरीक्षण व अध्ययनासाठी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स च्या वतिने सुरू करण्यात आलेल्या ‘विश्वरूप दर्शन आर्यभट्ट वेधशाळे’ची निर्मिती एमआयटीच्या इकोपार्क टेकडीवर करण्यात आली. येथे एकूण तीन दुर्बीणी बसविण्यात आल्या आहेत. त्यात जीएसओच्या दोन दुर्बीण एक ८ इंची न्यूटोनियन आणि १० इंची रिचिक्रीशन आणि युनीस्टेलर इव्हीस्कोप टू ही दुर्बीण आहे. या वेधशाळेतून डीप स्काय इमेज घेता येता. यामध्ये चंद्र, नेबूला, ग्रह, तारे,गॅलेक्सी, ५० हजार वर्षातून एकदा दिसणार्‍या धूमकेतूनचे ही फोटो काढले आहेत.

शरीरसौष्ठव स्पर्धेत राहुल कांबळे ‘महावितरण श्री’

अतितटीच्या लढतींमुळे राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेला मोठा प्रतिसाद

बारामतीदि. ६ फेब्रुवारी २०२५: वीजसेवेच्या धकाधकीचे दैनंदिन कामकाज सांभाळून शरीराला सुडौल व सुबद्ध आकार देत शरीरसंपदा कमावणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रेक्षकांची मने जिंकत वाहवा मिळवली. यात कोल्हापूर परिमंडलाचे राहुल विजय कांबळे यांनी पहिला ‘महावितरण श्री’चा किताब पटकावला.

दरम्यान, बारामती येथील विद्यानगरी प्रतिष्ठानच्या क्रीडा संकुलात सुरु असलेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा अतितटीच्या लढतींमुळे रंगतदार होत आहे. सांघिक कामगिरीमध्ये पहिल्या दिवशी पुणे-बारामती संघाने वर्चस्व ठेवत आगेकूच सुरु केली.

महावितरणच्या क्रीडास्पर्धेत यंदा प्रथमच शरीरसौष्ठव स्पर्धेचा समावेश करण्यात आला. बुधवारी (दि. ५) रात्री विविध वजनगटात शरीरसौष्ठव स्पर्धा झाली. यामध्ये तब्बल ३१ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत आश्चर्याचा धक्का दिला. या स्पर्धेत पिळदार शरीरयष्टीचे दमदार प्रदर्शन करीत कोल्हापूरच्या राहुल विजय कांबळे यांनी ‘महावितरण श्री’चा किताब पटकावला. त्यांच्यासह विविध वजनगटातील विजेते व उपविजेत्यांना पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सर्वश्री धर्मराज पेठकर, स्वप्निल काटकर, चंद्रमणी मिश्रा, सुनील काकडे, मुख्य महाव्यवस्थापक (मासं) श्री. भुषण कुलकर्णी, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके यांच्याहस्ते पदक व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये वजनगटनिहाय विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे – ६५ किलो- सुनील सावंत (कल्याण-रत्नागिरी) व विशाल मोहोळ (पुणे-बारामती), ७० किलो– अमित पाटील (कोल्हापूर) व मोहम्मद जरीन शेख (अकोला-अमरावती), ७५ किलो- प्रवीण छुनके (कोल्हापूर) व नामदेव शिंदे (नाशिक-जळगाव), ८० किलो- राहुल कांबळे (कोल्हापूर) व दिनेश धाडे (नाशिक-जळगाव), ९० किलो– अपूर्व शिर्के (कल्याण-रत्नागिरी) व गौरव पोवार (कोल्हापूर) आणि ९० किलोवरील सलमान मुंडे (कोल्हापूर).

सांघिक कामगिरीत पुणे-बारामती संघाची आगेकूच– महावितरणच्या क्रीडास्पर्धेत मागील दोन वर्ष अजिंक्यपदाचे मानकरी झालेले पुणे-बारामती संघाने पहिल्याच दिवशी आगेकूच सुरु ठेवली आहे. या संघाने पहिल्या दिवशी ३ सुवर्ण तर २ रौप्यपदक जिंकले. तर मुख्य कार्यालय-भांडूप संघाने २ सुवर्ण जिंकले.

फडणवीसांसमोर अजित पवारांनी महेश लांडगेंना फटकारले..

पुणे- आमदार महेश लांडगे यांनी अजितदादांचे नाव घेणे टाळले, विकास कामे झाले ती फक्त मुख्यमंत्र्यांमुळेच झाली, असं ते म्हणाले. त्यानंतर अजितदादांनी महेश लांडगे यांना भाषणातून सुनावले, माझं नाव घ्यायला काय वाईट वाटते काय माहिती, अशा शब्दात अजितदादांनी लांडगेंना सुनावलं.देवेंद्र फडणवीस यांचा शिलेदार असलेल्या आमदार महेश लांडगे यांनी त्यांचे तोंडभरुन कौतुक केले. त्यांनी पिंपरी चिंचवडच्या विकासाचे श्रेय फडणवीसांना दिले आहे. यामुळे अजित पवार यांनी भर भाषणामध्ये महेश लांडगेंना फटकारले आहे.पिंपरी चिंचवड पालिकेंतर्गत उद्घाटन आणि भूमिपूजनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये अजित पवार यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस यांचे आमदार महेश लांडगे यांनी कौतुक केले. विकासकाला फडणवीसांमुळे सुरुवात झाली तसेच फडणवीस यांच्यामुळे पिंपरी चिंचवड शहराला वेगळी ओळख मिळाली असे देखील महेश लांडगे म्हणाले. मात्र यावेळी त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख देखील केला नाही. यामुळे अजित पवार यांनी भाषणामध्ये महेश लांडगे यांचा समाचार घेतला.कार्यक्रमामध्ये भाषण देताना महेश लांडगे म्हणाले की, “पिंपरी चिंचवडची खरी ओळख ही 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून झाली. ते मुख्यमंत्री असताना पिंपरी चिंचवड आयुक्तालयाला मंजूरी मिळाली. आता ते मुख्यमंत्री असताना त्याचे भूमिपूजन होत आहे. पिंपरी चिंचवडची ओळख ही पुण्याच्या खाली कुठेतरी लपली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हा विकास आणि ओळख मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीचा वेगळा जिल्हा झाला तर त्याला शिवनेरी असं नाव द्यावं,” अशी इच्छा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे.आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांचे नाव न घेतल्यामुळे अजित पवारांनी बोलून दाखवले. कार्यक्रमातील भाषणावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “आता महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवडच्या विकासाबाबत सांगितलं. त्यांना काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही. परंतू अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहित आहे. 1992 ला मी तुमचा खासदार झालो 92 ते 2017 कोणी पिंपरी-चिंचवड सुधरवलं. आज 25 वर्ष झाली प्रत्येक गोष्ट मी पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष देऊन करत असतो. इथल्या अधिकाऱ्यांना विचारा या इमारतींमध्ये मी किती वेळा येतो किती वेळा चौकशी करतो आणि किती वेळा बसतो. शेवटी आपण महायुतीमध्ये आहोत त्यामुळे ज्यांनी चांगलं केलं त्याला चांगले म्हणायला शिका. एवढाही कंजूषपणा दाखवू नका. मी दिलदार आहे ज्याने केलं त्याला त्याच क्रेडिट देत असतो,” असा टोला अजित पवार यांनी महेश लांडगे यांना लगावला.

महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम राज्य-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेशात औद्यागिक क्षेत्रात सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात

पुणे, दि. ६ : महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम राज्य असून, देशातील सर्वात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तळेगाव येथील हॅवमोर लोट्टे आईस्क्रीम उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार सुनील शेळके, लोट्टे समूहाचे अध्यक्ष डोंग बीन शीन, रिपब्लिक ऑफ कोरियाचे भारतातील राजदूत शेंग हो ली, उद्योग विभागाचे सचिव पी अनबलगम, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू, माजी आमदार बाळा भेगडे, हॅवमोर आईस्क्रीम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कोमल आनंद आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, दावोस मधील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचा दबदबा होता. अनेक गुंतवणुकीचे करार या ठिकाणी करण्यात आले. विविध उद्योजकांशी चर्चा करुन, त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत, राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करीत आहोत. दोनच दिवसांपूर्वी मैत्री कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले. या पोर्टलवर उद्योगासाठी आवश्यक असणारी सर्व व्यवस्था उपलब्ध करुन दिली आहे. Ease of doing business या धोरणावर शासनाचे काम सुरू आहे.

आपल्याला लहानपणी आईस्क्रीम खूप आवडायचे. एक महिना आईस्क्रीम फॅक्टरी मध्ये राहायला जावे असे वाटायचे, असे सांगत आज या प्रकल्पाचे उद्घाटन करताना ते बालपणीच्या आठवणीत काही क्षण रमले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते लोट्टे आईस्क्रीम उत्पादन सुविधांचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या सुरवातीला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आईस्क्रीम प्रकल्पाची पाहणी केली.

कार्यक्रमात समूहाचे अध्यक्ष डोंग बीन शीन आपल्या मनोगतात म्हणाले, लोट्टेच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा असलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन करताना आम्हाला अभिमान वाटतो, भारत आमच्यासाठी एक महत्वाची बाजारपेठ आहे, आणि आमच्या जागतिक कामकाजाचा अविभाज्य भाग आहे. हॅवमोरला भारतातील सर्वात लोकप्रिय आईस्क्रीम ब्रँड बनविण्याच्या उद्देशाने आम्ही पुण्यातील प्रकल्पामध्ये १६ प्रॉडक्शन लाईन्स सुरू करणार आहोत.

रिपब्लिकन ऑफ कोरियाचे भारतातील राजदूत शेंग हो ली यांनीही मनोगत व्यक्त केले. हा आईस्क्रीम प्रकल्प एकूण साठ हजार चौरस मीटर क्षेत्रात विस्तारलेला असून, या प्रकल्पात ५० दशलक्ष लिटर अशी प्रभावी वार्षिक उत्पादन क्षमता आहे. पुण्यातील या प्रकल्पाची रचना विशेष करुन तीव्र उन्हाळ्याच्या काळात आईस्क्रीमची मागणी पूर्ण करण्यासाठी करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये नऊ प्रोडक्शन लाईन कार्यरत आहेत. हॅवमोर प्रकल्प आपल्या विकासाला पुढील तीन वर्षात अधिक गती देईल. पाचशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह हा ऐतिहासिक उत्पादन प्रकल्प पुढील दोन वर्षात हजार लोकांना रोजगार देईल, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे.
कार्यक्रमाला स्थानिक कोरीअन असोसिएशन समुदाय सदस्य, लोट्टे इंडीयाचे व्यवसाय सहकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.