पुणे- सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना हेरून त्यांचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या कात्रज कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगरच्या चोरट्यास भारती विद्यापीठ पोलिसांनी पकडले आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.३०/०१/२०२५ रोजी सकाळी फिर्यादी ह्या प्रज्ञा वॉशींग सेन्टर समोर, त्रिमुर्ती चौकाचे पुढे, भारती विद्यापीठ, पुणे येथे वॉकीग करत असताना मोटार सायकल वरुन आलेल्या दोन इसमांनी आप आपसात संगनमत करुन फिर्यादी यांचे गळयातील ४०,०००/- रु. किं.ची सोन्याची चेन हिसका मारुन चोरुन नेली म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर ७६/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०४, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार यांना आरोपींचा तात्काळ शोध घेणेबाबतचे मार्गदर्शन केले होते. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे हे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरुन आरोपींचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील राजु महादेव डेंगळे, वय २२ वर्षे, रा. प्रतिकनगर, गोकुळनगर, गल्ली नंबर १, कात्रज कोंढवा रोड, पुणे यांनी केल्याची खात्रीशीर माहीती मिळाली. त्यानुसार आरोपी राजु डेंगळे याचा शोध घेतला असता तो कात्रज कोंढवा रोडवर मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात दि. ०४/०२/२०२५ रोजी अटक करण्यात आली असुन आरोपीकडुन फिर्यादी यांचे चोरी केले १ तोळे वजनाची सोन्याची चेन जप्त करण्यात आली आहे. आरोपीकडे आणखीन गुन्हे केले आहेत अगर कसे याबाबत तपास चालु आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर प्रविणकुमार पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे श्रीमती स्मार्तना पाटील सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगावकर, पोलीस निरीक्षक गुन्हे राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, चेतन गोरे, महेश बारवकर, सचिन सरपाले, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांच्या पथकाने केली आहे.